दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द्वारकानाथ संझगिरी Sad श्रद्धांजली.
त्यांच्या खूप लेखमाला न्यूजपेपर्स मधे वाचलेल्या आहेत. त्यांची शैली आवडायची.

अमा, धक्कादायक

आज बऱ्याच दिवसांनी इकडे आले अन ही वाईट बातमी वाचली

भावपूर्ण श्रद्धांजली __/||\__

द्वारकानाथ संझगिरी यांची नर्मविनोदी शैली छान होती. त्यांचे क्रिकेट आणि सिनेमा विषयक लेख वाचनीय होते. काही राजकीय लेखही वाचले आहेत असं आठवतंय (एक लेख टी एन शेषन यांच्यावर होता हे ठळक आठवलं). भावपूर्ण श्रद्धांजली.

कवठीचाफा Sad

भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

कवठीचाफा ???
भावपूर्ण श्रद्धांजली

कवठी चाफा??
त्यांचे खरे नाव सांगा, आवडत्या लेखकांपैकी एक

श्रद्धांजली.

चाफ्या धक्काच दिलास इथेही Sad

खूप दंगा केलेला आहे माबोवर त्याच्यासोबत.
वेंधळेपणा आणि इब्लिसपणा ह्या 2 धाग्यावर.
फोनवर बोलणे व्हायचे.
मागच्या 2 वर्षात मात्र फारसा संपर्क नव्हता.

आशिष निंबाळकर नाव त्याचे.

My God seriously??? काही दिवसांपूर्वी त्यांचा एक धागा वाचनात आला...आणि मग काही दिवसापासून त्यांचे जुने लेखन शोधून शोधून वाचतेय....किती छान लेखनशैली होती (खरंतर 'आहे 'असं म्हणावस वाटतंय) त्यांची...ते आता मायबोलीवर का लिहित नाहीत असेही राहून राहून मनात येत होतं....खरंच काही लोकांना प्रत्यक्षात कधी भेटलो, बोललो नसलो तरी अशी बातमी ऐकली की वाईट वाटतं चुटपुट लागून राहते...जड मानाने लिहावं लागतंय, 'भावपूर्ण श्रध्दांजली '

कवठीचाफा = भयकथा, थरारकथा
ट्विस्ट असलेले शेवट वाचायला मजा यायची. माबोवर लिहणे कचाने केव्हाच बंद केलय परंतू माबोकर त्यांना विसरले नाहीत. आज ही बातमी वाचून खरचं खूप वाईट वाटले.
भावपूर्ण श्रध्दांजली कचा Sad

कधीही न भेटता, बोलता बरेच मायबोलीकर ओळखीचे होतात . फक्त ID ची ओळख , बाकी नाव गाव काहीच माहित नाही. नकळत यांचे लिखाण जीवनाचा एक भाग बनून जाते आणि जेव्हा अश्या बातम्या कळतात तेव्हा खरंच खूप धक्का बसतो. वाईट वाटते.
कवठीचाफा यांच्या कथा तर पुन्हा पुन्हा वाचल्या आहेत.
भावपूर्ण श्रध्दांजली (हे शब्द लिहिणे खूप कठीण होतंय )
कुटुंबातील सदस्यांना यातून सावरण्याचे बळ मिळूदे हि प्रार्थना

कवठीचाफा Sad
कधीही न भेटता, बोलता बरेच मायबोलीकर ओळखीचे होतात . फक्त ID ची ओळख , बाकी नाव गाव काहीच माहित नाही. नकळत यांचे लिखाण जीवनाचा एक भाग बनून जाते आणि जेव्हा अश्या बातम्या कळतात तेव्हा खरंच खूप धक्का बसतो. वाईट वाटते. >> खरं आहे.

कधीही न भेटता, बोलता बरेच मायबोलीकर ओळखीचे होतात . फक्त ID ची ओळख , बाकी नाव गाव काहीच माहित नाही. नकळत यांचे लिखाण जीवनाचा एक भाग बनून जाते आणि जेव्हा अश्या बातम्या कळतात तेव्हा खरंच खूप धक्का बसतो. वाईट वाटते. >> खरं आहे. फक्त लिखाणातून आणि अनेक वर्षांपूर्वीच्या मायबोली वावरामधून ओळख असली तरी मायबोलीवरचे बरेच जण थोड्या काळापुरते का होईना आयुष्याचा भाग बनतात. चाफा त्यातलाच एक.
श्रद्धांजली.

अजून एक वाईट बातमी. Sad
कवठीचाफ्याच्या कथा अफलातून असत. नंतर नंतर त्यानी माबोवर लिहीणं बंद केलं.

भावपूर्ण श्रद्धांजली.

अरेरे! Sad

ओह वाईट बातमी! कवठी चाफाच्या कथा वाचल्यात. चांगले लिहायचे, हॉरर, मिस्टरी मधल्या नव्या नव्या कल्पना ट्राय करायचे.
श्रद्धांजली!

वाईट बातमी Sad

आवडत्या कथा होत्या त्यांच्या.

श्रद्धांजली!

Pages