दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे काय हे चालू आहे . किती तो जीव धोक्यात घालतात . भावपूर्ण श्रद्धांजली!

तो कुंभमेळा बंद व्हायला हवाय

बिनडोकपणा आहे>>> हे बाहेर फक्त बोलून पहा . खरेतर कोणीही बोलण्याची हिम्मतही करू शकत नाही .

बोरिस स्पास्की (1937–2025) - १० वा वर्ल्ड चेस चॅम्पियन

Not so long ago, somebody asked him what he did for his chess preparation. He replied: “I do not prepare for chess. I am preparing for – death! It is a long and difficult endgame.”

दूरदर्शनवर मराठी बातम्या देणारे म्हणून बहुतेकांना परिचित असलेले अनंत भावे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एकोणनव्वदाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले. बालसाहित्यिक ही त्यांची आणखी एक ओळख होती. त्यांनी लहान मुलांसाठी अतिशय सुरेख पुस्तके लिहिली. त्यापैकी अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी हे माझ्या संग्रही आहे. मराठी भाषेसाठी अत्यंत महत्त्वाचे काम चिकाटीने गाजावाजा न करता करणारा साहित्यिक हरपला. श्रद्धांजली.

Ohh अनंत भावे Sad

भावपूर्ण श्रद्धांजली

सर्वच बातम्या Sad

प्रेमा साखरदांडे माझे मन तुझे झाले मध्ये नायिकेची आजी होती, फार सुरेख काम केलेलं त्यांनी.

अनंत भावे बातम्या द्यायचे म्हणून फार घरातले वाटायचे.

ओह्ह्ह अनंत भावे. मराठी वृत्तनिवेदकांच्या यादीत प्रदीप भिडे यांच्यासोबतचा अजून एक ओळखीचा चेहरा. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
दुर्दैवाने नेटवर त्यांचा त्या काळातील बातमी देतानाचा एकही फोटो दिसत नाही. सगळे वृद्धापकाळातलेच दिसत आहेत.

प्रेमा साखरदांडे आणि अनंत भावे यांना श्रद्धांजली _/\_
अनंत भावे यांचा चेहरा छान प्रेमळ, घरगुती वाटायचा Happy

Pages