दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट बातमी..

अश्विनीमावशींना श्रद्धांजली...

बापरे एवढं माहीत नव्हतं आजाराचं ,,, आता यापुढे अमा हे नाव प्रतिसादात दिसणार नाही यावर विश्वास बसत नाहीये,,, खूप दिवसांनी माबोवर आले आणि ही बातमी,,, फार धक्कादायक आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली अमा.

अमांची बातमी वाचून खूप वाईट वाटतंय..आज खूप दिवसांनी मायबोली वर आले आणि ही बातमी मिळाली. प्रत्यक्ष भेट झाली न्हवती कधी पण त्यांचं लिखाण आवडायचं...मिश्किल होत्या त्या...
त्यांना मनापासून श्रद्धांजली

अमा Sad
मी आणि सत्तरीतली माझी आई आम्हादोघींंनाही अमांचे प्रतिसाद, लेखन आवडायचे. आशुडी यांनी लिहीले त्याप्रमाणे खरोखरंच स्वतःच्या wonderland मधली Alice होत्या अमा!

अमा यांना श्रद्धांजली. त्यांच्या प्रतिक्रिया व लेख वाचले होते. एका चांगल्या मायबोलीकराला आपण कायमचे मुकलो.

स्वाती_आंबोळे यांचा लेख वाचून अमांबद्दल कळले. प्रत्येक वाक्यागणिक वाईट वाटत होते आणि डोळ्यात टचकन पाणी आलं. अश्विनीमामींना कधीही न भेटता फक्त त्यांच्या पोस्ट्स वाचून त्यांचं व्यक्तिमत्त्व आवडायचं. त्यांचं फटकारण परखड असायचं आणि सेन्स ऑफ ह्युमर हि जबरदस्त होता. त्यांच्या पोस्ट मधून जिंदादिल व्यक्तिमत्व डोकावायच.
खूप वाईट झालं. अरुंधती कुलकर्णी, अश्विनीमाई यांना श्रद्धांजली वाहणे पटतच नाही.
अमांच्या मुलीला यातून सावरण्याचे बाळ मिळूदे. आई वडिलांचे छत्र हरवणं खरंच खूप वाईट असतं . तिला तिच्या आयुष्यात सगळं काही मिळूदे. आई वडिलांचे आशीर्वाद कायम असतीलच तिच्यासोबत

Sad .

माजी न्यायमूर्ती व विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांचं आज निधन झालं.

अनेक सामाजिक संघटना चालवणाऱ्या, अनेक संस्थांना मदत करणाऱ्या आणि संशोधक असणाऱ्या पुष्पा आगाशे यांचं अपघाती निधन झालं.

ओह... न्या. चपळगावकर
आदरांजली __/\__
एकदा एका सेमिनारमधे भेटलेले. अतिशय आपुलकीने बोललेले.

कुंभमेळा दु:खद बातमी. सिगरेट आरोग्यास हानीकारक आहे अशी चेतावनी (वॉर्निन्ग) लिहीतात तसेच कुंभ मेळ्याबद्दल करावे का?

वॉशिंग्टन डीसी ला आर्मी हेलिकॉप्टर व विमानाची हवेत टक्कर होउन, कमीत कमी काही डझन्स जण दगावले.

कुंभ मेळाच कशाला ? गर्भगृह , लहान कोंदट असणारी आपली सगळी प्रसिद्ध देवळं ही ह्यात सामील करा. किती होते लोटलोटी , धक्काबुक्की आत जाताना ...

सिगरेट आरोग्यास हानीकारक आहे अशी चेतावनी (वॉर्निन्ग) लिहीतात तसेच कुंभ मेळ्याबद्दल करावे का?>>>>>>>>> काही उपयोग व्हायचा नाही. वैधानिक इशारा इग्नोरून सिगारेट ओढतातच तशातली गत. जोपर्यंत आपल्या इथे ********** जनता आहे तोपर्यंत हे चालूच राहिल.

नॅचरल सिलेक्शन!
कुंभमेळ्यात जीव गेला! अहो डायरेक्ट मुक्तीच की हो! हेवा वाटला पाहिजे तुम्हा लोकांना.

>>>>>दोष फक्त जनतेचा?
मोनोलॉग : नाही. सुरक्षितता दाव्याला लागल्यामुळे सरकारी यंत्रणेचा दोषही आहे. कारण करदात्यांचे पैसे घेते सरकार. पण मग हे साधू नक्की कुठला कर भरतात? पण मग कर भरत नसले तरी त्यांचे समाजोपयोगी काही योगदान (मराठी शब्द?) असू शकतेच की + साधूं व्यतिरिक्त अन्य जनता होतीच की.

द्वारकानाथ संझगिरी Sad
त्यांनी लिहिलेले लेख लहानपणापासून वाचले आहेत. खुसखुशीत, निर्भेळ, सौम्य विनोदी शैली होती त्यांची. क्रिकेट आणि सिनेमावरचे लेख आवडायचेच, पण काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात आलेला इस्रायल प्रवासावरचाही त्यांचा लेख आवडला होता.

Pages