दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमांना श्रद्धांजली. खूप वाईट वाटलं. त्यांना प्रत्यक्ष भेटायचं राहून गेलं. त्यांच्या पोस्टमधून त्यांचं जिंदादिल व्यक्तिमत्व कसं उठून दिसायचं. प्रणिप्रेम, क्रमवार पाककृती लेखन, चौफेर वाचन, प्रवासवर्णन सगळं आठवत राहिलं. अमा तुम्हाला खूप मिस करेन मी. मोठया आजाराला खूप धीराने तोंड दिलत. आता तुमची वेदनेतून सुटका झाली. पुन्नीला खूप लहान वयात आई जाण्याचं दुःख सोसावं लागतंय. देव तीला हे दुःख सोसण्याच बळ देवो.

वाचून खूप वाईट वाटलं.
त्यांच्या पोस्ट्स वाचून त्यांचं व्यक्तिमत्त्व आवडायचं. त्यांचा तत्त्वज्ञानी दृष्टिकोन, एखाद्या गोष्टीला वेगळाच दिलेला perspective, आत्तापर्यंत दिलेली fight, सगळंच admirable होतं.
त्या खरंच एक warrior होत्या.
त्यांना श्रद्धांजली. मुलीला बळ मिळो. खूप लवकर छत्र हरपले.

अमा यांना श्रद्धांजली. मी आणि AMA नेहमी बोलायचो. मी पण त्यांच्याप्रमाणे कॅन्सर मधून वाचलेला आहे
जिंदादील व्यक्ती.
नक्कीच समाधानाने गेल्या असतील
त्या माझ्या गाव वाल्या म्हंजे सासर सांगलीचे.
Ama जिथे असतील तिथला माहोल मस्त करतील
शरद

अमा, भावपूर्ण श्रध्दांजली ...आयुष्याला खूप सकारात्मकतेने सामोरे जात होत्या ... माझे आयुष्य म्हणजे phd चा अभ्यासक्रम आणि सर्व जबाबदाऱ्या संपून मोकळा झालेला पाईप असं एकदा म्हणाल्या होत्या त्या...

अखेरपर्यंत बहुआयामी लेखन करत होत्या...मायबोलीवर चिरंतन राहतील त्यांच्या स्मृतीं..

अमा Sad
कायम सकारात्मक बघणारे आणि वेगळाच दृष्टिकोन मांडणारे व्यक्तिमत्त्व होते. जगाबद्दल, चाकोरी बाहेरच्या माणसांबद्दल त्यांना खूप जिव्हाळा आपुलकी आहे हे जाणवत असे. त्यात पुणेरी नर्म विनोदी तिरकस भाषा. हुशार, आणि असलेल्या परिस्थितीत समरसून जगणाऱ्या वाटायच्या.
अमा, तुमची उणीव कायम भासेल! Sad

अमाचे ऐकून डोळ्यात टचकन पाणी च आले. काही जण न भेटताच खुप जवळचे होऊन जातात, अमा त्यातीलाच एक. देव त्यांच्य आत्म्यास शांती देवो

अर्र कालच कुणीतरी वाड्यावर आठवण काढली होती.
कोणत्याही गोष्टीवरचे त्यांचे व्ह्यूज प्रचंड प्रॅक्टिकल असायचे आणि त्या स्पष्ट शब्दात मांडायच्या. मनाने तरुण होत्या त्या आणि आजारपणातही नवीन गोष्टी शिकत होत्या, फिरत होत्या. लिविंग लाईफ टू फुलेस्ट म्हणजे काय हे त्यांच्याकडे बघून समजायचे. बरेच काही शिकण्यासारखे होते.
श्रद्धांजली वहायला मन धजावत नाहीये.

अमा यांना श्रद्धांजली.
नियतीने त्यांची फार कठोर परीक्षा घेतली आयुष्यात पण सर्व आव्हानांना तोंड देऊन नुसत्या धीरानेच जगल्या नाहीत तर शेवटपर्यंत आयुष्याचा आनंदही घेत राहिल्या. थोड्याशा अडचणीनेही गळून जाणाऱ्या आमच्यासारख्यांना त्यांचा निश्चित आदर्श राहील. एवढ्या व्याधींतून जातानाही त्या कला, जपानी, कोरियन टिव्ही, खाद्यसंस्कृती, यांची आवड जोपासत होत्या. परवाच त्यांच्या जपानी स्वयंपाकाच्या धाग्यावर मी विचारलेल्या प्रश्नावर शारीरिक त्रासातून जात असतानाही त्यांनी वेळ काढून चार शब्द लिहिले होते. तो प्रतिसाद वाचून शंकेची पाल चुकचुकली होती पण यातूनही त्या बाहेर येतील असं वाटत होतं. समाधानाची गोष्ट इतकीच की त्या शेवटपर्यंत वाचनमात्र का होईना पण आपल्या संपर्कात होत्या ❤️
त्यांचं श्वानप्रेम जेन्युईन होतं. आपल्या लाडाच्या घरच्या डॉगी प्रमाणेच त्या भटक्या कुत्र्यामांजरांवरही प्रेम करत हे त्यांच्या प्रतिसादांतून वारंवार जाणवलं होतं.
May she rest in peace _/\_

फार वाईट बातमी.
अमांना श्रद्धांजली.
किती पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व होतं. सगळ्यांना नेहेमी धीर द्यायच्या.

अतिशय धक्कादायक बातमी अमांची, फायटर होत्या त्यामुळे त्या नक्कीच बऱ्या होतील वाटायचं. अतिशय प्रामाणिक, सकारात्मक कष्टाळू होत्या. फार काही सुचत नाहीये, सुन्न. श्रद्धांजली.

Pages

नवीन प्रतिसाद लिहा