दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झाकिर हुसेन >>>> लिव्हिंग लीजंड बनले होते ते. त्यांना लाईव्ह ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं एका प्रोग्राममध्ये. वेगळाच ऑरा व तेवढेच हंबल वाटले.
श्रद्धांजली

ओह नो! Sad

फारच वाईट बातमी Sad श्रद्धांजली __/\__
त्यांना प्रत्यक्ष भेटून पाच मिनिटे बोलण्याचे भाग्य लाभले आहे. छान नर्मविनोदी बोलणे. त्या वेळी हस्तांदोलन करताना झालेला त्या जादुई हातांचा स्पर्श अजून लक्षात राहिला आहे. अतिशय मृदू हात होते त्यांचे.

काही लिजंड्स आपल्यासमोर मोठ्या झाल्या, त्या आपल्यातल्याच वाटतात. एक दिवस ते गेल्याची बातमी येते आणि वाटते, अरे असे कसे झाले. इथेच तर होता आजुबाजूला, कधी उठुन गेला?? Sad जायचे वय झाले??

झाकिर असाच डोळ्यासमोर मोठा झाला. तेव्हा वेगवेगळे फेस्टिवल भरत, त्यात त्याच्या वडलांसोबत असायचा शेजारी. नंतर सोलो.. त्याचे ते सिग्नेचर केस उडवत वाजवायचा…. त्याच्यावर मी फिदा होते, इतर लाखो लोकांसारखी.. त्याने वाह ताज जाहिरात केली तीही आवडलेली खुप. साज चित्रपटातील त्याचा वावर अगदी सहज होता. न-अ‍ॅक्टर काम करतोय असे अजिबात वाटले नाही… त्यातले त्याचे संवादही मला आठवताहेत….

देव त्याला शांती देवो. तो शांतच होता. शांत आणि नम्र, सोफ्ट स्पोकन. तबल्यातला देव.

झाकिर हुसेन यांचा कार्यक्रम आय आय टी मध्ये पाहीला होता. त्यांना श्रद्धांजली. ७३ कमी आहे वय. आजकाल आयुर्मान, ८० तरी झालेले आहे.

राजू पटेल तेजराज टेलिस्कोप. खूपच प्रेमळ माणूस. खगोलशास्त्र आणि टेलिस्कोपबद्दल दांडगा अभ्यास आणि कधीही मदतीस तयार असलेला माणूस.

श्रद्धांजली …
झाकीर हुसेन यांनी 1998 मध्ये आलेल्या 'साज' चित्रपटातही काम केले होते>> > Inspiration to choose my name here.

श्याम बेनेगल
अंकुर, निशान्त, मंथन, भूमिका, मंडी , जुनून, कलयुग, मम्मो, सरदारी बेगम, वेलकम टु सज्जनपूर, द मेकिंग ऑफ महात्मा, नेताजी सुभाषचंद्र बोस, वेल डन अब्बा

ओह! Sad

श्याम बेनेगल हे प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून माहिती होते. त्यांच्या सगळ्या चित्रपटांची नावे उत्तम चित्रपट म्हणून ऐकली आहेत. पण पूर्वी दूरदर्शनवर लागणारी भारत एक खोज व वेलकम टु सज्जनपूर शिवाय काही पाहिले नाही. भारत एक खोज समजण्याचे वय नव्हते. वेलकम टु सज्जनपूर मात्र खूप छान होता. सामान्य माणसाचे डार्क कॉमेडीचा आधार घेत केलेले चित्रण अप्रतिम.
श्रद्धांजली

Pages