Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.
ओह.अभ्यंकर बातमी खरी असेल रार
ओह.डॉ अभ्यंकर बातमी खरी असेल तर श्रद्धांजली. खूप सुंदर लिखाण असायचे त्यांचे.
आता दैनिक पुढारी, प्रभात,
आता दैनिक पुढारी, प्रभात, मॅक्स महाराष्ट्र इत्यादी ठिकाणी बातमी दिसते आहे.
बातमी खरी आहे, विवेकवादी
बातमी खरी आहे, विवेकवादी चळवळीतील एका सिनियर मित्राने कळवले आहे
कलकत्ता रेप चे डिटेल्स भयानक
कलकत्ता रेप चे डिटेल्स भयानक आहेत, भयानक शब्द पण तोकडा आहे. काय पाशवी नराधम असतात. भयानक. आणि लोक अशा गुन्ह्यांवर पण पांघरूण घालू पाहतात, अवघड आहे एकंदर.
डॉक्टर शंतनु अभ्यंकरांचं
डॉक्टर शंतनु अभ्यंकरांचं वाचून फार वाईट वाटलं
. श्रद्धांजली.
अरेरे डॉ अभ्यंकर??
अरेरे डॉ अभ्यंकर??
मी फार वाचायचे त्यांचे ब्लॉग. साध्या सोप्या शब्दाक, कधी नर्मविनोदी शैलीत फार मस्त लिहायचे. अगदी पटायचे त्यांचे लिखाण.
त्यांच्या ब्लॉगवर मासिक पाळी, बाळंतपणातले समज गैरसमज यावर फार छान लेख होता.
बहुतेक ते १-२ वर्षांपुर्वी कॅन्सर मधून बरे झाले होते असं कुठेतरी वाचण्यात आलं होतं. श्रद्धांजली डॉ....
कलकत्याची न्यूज नाही बघितली.
कोलकता मधली बलात्कार, खून
कोलकता मधली बलात्कार, खून घटना चिड आणणारी आहे
. आरोपीला कोर्टासमोर उभे करुन, कायद्याच्या चौकटीत कडक शिक्षा व्हायला हवी अशी अपेक्षा.
कोलकता मधली बलात्कार, खून
कोलकता मधली बलात्कार, खून घटना नीट वाचवत पण नाहिये
दु:ख आणि चीड दाटून येतेय.
त्यात च उत्तराखंड मधिल नर्स वर अनोळखी इसमाचा रेप, मर्डर & लूट.
कोलकता मधली बलात्कार, खून
कोलकता मधली बलात्कार, खून घटना चिड आणणारी आहे >>+१
डॉ शंतनू अभ्यंकर यांच्या निधनाची बातमी वाचून खूप वाईट वाटलं. देव नेमकी चांगली माणसं लवकर नेतो. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांचे सोप्या भाषेत वैद्यकीय माहिती देणारे लेख फार आवडायचे. त्यांना श्रद्धांजली.
जनहो, कलकत्ता केस मधले तपशील.
जनहो, कलकत्ता केस मधले तपशील... लोक आपापसात चर्चा करत आहेत... ते अत्यंत हिडीस आणि पशू सुध्दा करणार नाहीत इतक्या नीच पातळीवरचे तपशील आहेत. पाशवी म्हणायला सुध्दा लाज वाटत आहे. इथे एक टक्का सुध्दा लिहू शकत नाही. अतिशय विदीर्ण मन झाले. २०१२ ला जे 'निर्भया' प्रकरण झाले त्याचीच पुनरावृत्ती व्हावी ह्याला काय म्हणावे?
निःशब्द.......
कोलकता मधली बलात्कार, खून
कोलकता मधली बलात्कार, खून घटना नीट वाचवत पण नाहिये --अगदी खरं, ओरडू नये म्हणून तोंडावर हात ठेवला म्हणून नसा फाटल्या, 1 नसून जास्त पुरुष आहेत...हे सगळं अगदी कल्पनेच्या पण बाहेर आहे,खूप खूप वाईट वाटतं
कोलकाता केस - वाचवतसुद्धा
कोलकाता केस - वाचवतसुद्धा नाही. इथल्या शिक्षा, त्या शिक्षा देणारे कायदे, हे सगळे इथल्याच लोकशाहीचे आणि न्यायव्यवस्थेचे भाग आहेत. पब्लिक फोरमवर लोक संतप्त होऊन म्हणतात की गुन्हेगारांचे एन्काऊंटर करा, त्यांना जनतेच्या हवाली करा, त्यांना यापेक्षा भयंकर मृत्यू द्या. (मायबोलीवर असे कोणीही म्हणालेले नाही, मायबोलीवर त्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून कडक शिक्षा मिळावी हीच अपेक्षा व्यक्त केली गेली आहे).
लोकशाही आणि न्यायव्यवस्था म्हणतात की अश्या गुन्हेगारांचे वय बघा, अल्पवयीन तर नाहीत ना? प्रौढ असले तर खटला दाखल करा, पुरावे सादर करा, जामीन मिळू शकत असेल तर तो द्या, कितीही वर्षे लागली तरी चालेल पण दिला गेलेला न्याय योग्य होता याचे समर्थन करता येईल हे बघा.
... आणि लोकशाही मेली आहे ही बोंबही मारा!
(अवांतर लिहिले याची जाणीव व त्याबाबतची अपराधीपणाची भावनाही मनात आहे. हा विषय इतर धाग्यावर असावा हेही समजते. राहवले नाही म्हणून लिहिले गेले. या प्रतिसादावरील प्रतिसाद मात्र कृपया इतरत्र किंवा विपूत द्यावेत. ह्या धाग्याचे महत्व घालवण्यासारखे जे कृत्य माझ्याकडून झाले ते पुढे कोणाकडून continue होऊ नये ही विनंती!)
दुःखद निधन म्हणून इकडे लिहिले
दुःखद निधन म्हणून इकडे लिहिले मी. वेगळा धागा कसा काढणार.इकडे नोंद घेतली जावी हा हेतू. अगोदरच याची चर्चा चानेलसवर भरपूर सुरू आहे.
दुर्देवी घटना असा एक धागा मायबोलीने काढावा. त्यात केरळमधल्या डोंगर कोसळणे, दिल्लीत कोचिंग क्लासच्या तळघरात पाणी शिरून तीन जण बुडून मेले यांसारख्या घटना नोंदवता येतील.
किती धागे काढणार असे.
किती धागे काढणार असे.
नेमेचि येतो मग पावसाळा...
Admin काढेल ना असा एक धागा.
Admin काढेल ना असा एक धागा. तिथे लिहिता येईल . दुर्दैवी घटनांचे वेगवेगळे धागे नाही म्हणत.
पाशवी म्हणायला सुध्दा लाज
पाशवी म्हणायला सुध्दा लाज वाटत आहे. इथे एक टक्का सुध्दा लिहू शकत नाही>>>
पाशवी नाही. पशुंनी हॅंगरेप केल्याची उदा. ऐकली नाहीत. निर्भया प्रकरणापेक्षा जास्त हैवानियत झालेली आहे. ऐकलं तेव्हा सुन्न झाले होते. आणि हे सर्व ह्युमन ट्रॅफिकिंगची तक्रार केली म्हणून धडा शिकविण्यासाठी केलेलं आहे असाही प्रवाद आहे.
बदलापूर!
बदलापूर!
परत सगळे तेच! राक्षसी, विकृत, अमानवी वर्तन! निषेध, फाशी द्या, आंदोलन, दगडफेक! पत्रकार परिषद! 'गृहमंत्री काय करत आहेत'!
तुम्ही-आम्ही - यांना पब्लिकच्या तावडीत द्या, एन्काऊंटर केले पाहिजे, प्रचंड पण क्षणिक संताप व एका दुःखद बातमीची एक additional layer मनावर! मग घरी जाणे, हसत खेळत वावरणे, 'एका तीव्र दुःखद बातमीवर योग्य ते मत मांडले की' हे स्पष्टीकरण स्वतःला देणे, इतरांना देताना 'छे छे, नुसते मत नाही व्यक्त केले, जिवंत जाळा म्हणालो त्यांना' हे सांगणे!
उद्या सगळे आजसारखेच!
अजून पंधरा, वीस दिवस! मग विस्मरण! दुर्दैवाने दुसरेच काहीतरी!
आणि मग हेच सगळे रिपीट!
मुलांचे मोबाईल हक्काने तपासा, ज्यांना जन्म देऊन जेवायला खायला घालतोय त्या मुलांचे मोबाईल रोज तपासा. अगदी मुलींचेही तपासा. जुन्या पिढीतील काही शिक्षा अगदीच वर्ज्य करू नका. इथे 'झाला गुन्हा की घाल गोळी' प्रकारचे सरकार येणारच नाहीये. कोणालाही कायद्याची भीती वाटणारच नाहीये. त्यामुळे, आपापल्या कुटुंबियांना जपा आणि आपापल्या कुटुंबियांना वेळीच अक्कल प्रदान करा
कोलकाता, बदलापूर किंवा अजून
कोलकाता, बदलापूर किंवा अजून कोणते ठिकाण. 31 वर्ष किंवा 4 वर्ष. हॉस्पिटल किंवा शाळा. स्थळ, काळ, वेळ किंवा अशा इतर गोष्टींचा कुठलाही संदर्भ बदलतो पण नीच, विकृत माणसाची वृत्ती मात्र कशालाही बधत नाही.
अशा हैवानांना तुरुंगात ठेवून, त्यांच्या सुरक्षेवर खर्च (जनतेच्याच पैशांवर) करून वर्षानुवर्ष खटले चालण्यापेक्षा काही काळापूर्वी हैद्राबाद मध्ये केलेला तसा न्याय करण्याची गरज आहे. तरच कदाचित अशा घटना कमी होतील.
दोन्ही घटनांमध्ये गुन्हेगारांना आणि त्यायोगे त्यांच्या पाठीराख्यांना संरक्षण देण्याचा जो कारभार चालू आहे तो आत्यंतिक लाजिरवाणा आणि खालच्या पातळीचा आहे.
जनताच भ्रष्टाचारी आणि अनैतिक
जनताच भ्रष्टाचारी आणि अनैतिक होऊ लागली तर गृहमंत्री काय करणार?
मला आता बरोबर आठवत नाही पण माहीमची खाडी का कुठल्या कादंबरीत या प्रकारच्या राक्षसी विचारामागली मानसिकता लिहिली आहे.
नेपाळ मधे बस नदीत कोसळून
नेपाळ मधे बस नदीत कोसळून झालेल्या अपघातामधे जळगाव जिल्ह्यातील २७ जणांचा मृत्यू झाला.
फार भीषण अपघात होता तो
फार भीषण अपघात होता तो
नेपाळमध्ये बस आणि विमानाचे
नेपाळमध्ये बस आणि विमानाचे बरेच अपघात सध्या वाचण्यात आले.
मृतांना श्रद्धांजली.
दहा वर्षाच्या अल्पवयिन मुलीवर
दहा वर्षाच्या अल्पवयिन मुलीवर अत्याचार
. पालघरची घटना. अपराध्यांना कायद्याच्या मार्गाने शिक्षा होईल अशी अपेक्षा.
https://www.esakal.com/mumbai/maharashtra-shocked-again-10-year-old-girl...
CPM नेते सीताराम येचुरी यांचे
CPM नेते सीताराम येचुरी यांचे निधन. संशोधन आणि अभ्यासासाठी त्यांनी हॉस्पिटलला देहदान केले.
भावपूर्ण आदरांजली !
येचुरींची भाषणे आणि मुलाखती
येचुरींची भाषणे आणि मुलाखती ऐकणं हा एक अभ्यास होता.
आदरांजली
https://www.hindustantimes
https://www.hindustantimes.com/trending/ey-pune-employee-anna-sebastian-...
फार वाईट वाटले. नुसतेच
फार वाईट वाटले. नुसतेच मुलांना स्वावलंबी बनवणे जरुरी नसून जीवनाचा स्ट्रेस न घेता तब्बेत सांभाळणे, बुली न होता आपला गैर वापर होतोय का हे सतत चेक करणे असे लाईफ लेस्सन्स देणे पण फार गरजेची बाब आहे आजकाल.
वाईट वाटले.खरं अश्या वेळी
वाईट वाटले.खरं अश्या वेळी वाटतं की स्पष्ट नाही म्हणू शकत नाही का?(किंवा नोकरी महत्वाची असेल, आर्थिक अडचणी असतील.)
आर्थिक अडचण असो वा नसो, मुळात
आर्थिक अडचण असो वा नसो, मुळात डोक्यावर इतके काम टाकण्याचा हलकटपणा मॅनेजरने का करावा? जपानमध्ये तर कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या करण्याची उदाहरणे पण आहेत. त्याला karōjisatsu म्हणतात.
मॅनेजर ने करणं चुकीचं आहेच.या
मॅनेजर ने करणं चुकीचं आहेच.या घटनेतून काही कायदे बदलतील असं वाटतं.
Pages