Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
<<<बट मेनी अमेरिकन्स आर
<<<बट मेनी अमेरिकन्स आर स्केप्टिकल अबौट हॅरिस. ,,,,,,,,,,,. ए मिस्ड अपॉर्चुनिटि इंडिड...>>>>
१०० टक्के अनुमोदन.
गेल्या चार वर्षात महागाई प्रचंड वाढली आहे. ती कमी कशी करता येईल, एव्हढे मोठे ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स चे कर्ज झाले आहे ते कमी कसे करता येईल, याबाबत काही ठोस उपाय कुणाला माहितच नाहीत. ना त्रंप्याला ना डेमोक्रॅट्स ना.
उगाच beautiful weave विणत बसायचे!
भारताने जशी सगळी अर्थव्यवस्था
भारताने जशी सगळी अर्थव्यवस्था मुळापासून उखडून टाकली नि नवी तयार केली, तसे आता अमेरिकेत व्हायला पाहिजे. मिलिटरी, परदेशांना मदत, सोशल सिक्युरिटी, वेल्फेअर या सगळ्या गोष्टींत आमूलाग्र बदल घडवून आणायला पाहिजेत.
ओबामा केअरच्या नावाने ९ वर्षे
ओबामा केअरच्या नावाने ९ वर्षे खडे फोडून मी ते पूर्ण रद्द करू शकलो असतो पण उगाच लोकांना त्रास झाला असता म्हणून मी जे आहे त्यात काम चालवायचं ठरवलं.
बरं मग आज प्लॅन आहे का? तर आय हॅव कनसेप्टस ऑफ प्लॅन. ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कुत्री मांजरी खातात, बाळांचे एक्झिक्युशन अशा अंदाधुंद फैरी ऐकून शेंडे गायब असण्याचं कारण समजलं. त्यांनी तयारी करुन घेतली असणार.
आता तात्या परत काही डिबेटला उभा रहाणार नाही.
हॅरीसची उत्तरं पाठ केलेली होती तर तिला फोलपणा दाखवून स्टॅट्स मधले घोळ दाखवून उघडं पाडता आलं असतं ना एखादयाकडे सबस्टंस असता तर. पण ट्रम्पला काय बोलायचं 'नाही' हे पक्कं पढवलेलं. त्यामुळे बोंब झालेली त्याची. त्या न बोलण्यातून जे उरलं ते तात्या रँबल करत बसला.
हॅरिस कुंपणावरच्या लोकांना वळवायला जे हवं तितकंच ठोस बोलत होती. आणि तात्या मागा क्राऊडला जे हवं ते. मागा तर त्याचेच आहेत, डिबेट मध्ये आपल्या लोकांना नाही तर आपले होऊ शकतील त्यांना चुचकारायचं असतं.
पाठ केलेल्या उत्तरात काय वाईट
पाठ केलेल्या उत्तरात काय वाईट?
उगाच काहीही स्पॉन्टॅनियस बरळण्यापेक्षा चांगलेच.
इमिग्रंट्स अमेरिकन्सची कुत्री
इमिग्रंट्स अमेरिकन्सची कुत्री मांजरी खातात,सगळ्या जगाचे क्रिमिनल अमेरिकेत घुसले आहेत , कनसेप्टस ऑफ प्लॅन. > हे म्हटल्यावर मी आपले परत एकदा पाठी जाऊन ऐकून घेतले कि ऐकले ते खरेच आहे का?ते . हे बोलणारी व्यक्ती नॅशनल टीव्ही वर बोलणारी व्यक्ती सेन आहे असे वाटणे म्हणजे हे कमाल आहे
हॅरिस ने तात्याला जेव्हढ्या वेळेला बेट लावली तेव्हढ्या वेळेला तात्या बिनडोकपणे बेट घेत गेला. ही ईज इंडीड स्टेबल जिनियस. तात्या आठ वर्षात ज्यांना जेव्हढा कळला आहे त्यापेक्षा अजून काही नवीन नव्हते त्यामूळॅ त्याच्या बाजूच्यांना काही फरक पडेल असे काहीछ नवह्ते. जे त्याच्या बाजूने नव्हते किंवा कुंपणावर होते त्यांना आपलेसे करणारे काही वाटले नाही.
काही जणांना त्यंच्या काही
काही जणांना त्यंच्या काही कारणांमुळे कमला आवडत नाही!
टेड क्रुझ, लिंड्से ग्रम सारखे नेते(!) सुद्धा त्रंप्यालाच मत देणार. रॉम्नी सुद्धा. आणि इतर रिपब्लिकन.
<<<शेंडे गायब असण्याचं कारण समजलं>>
मला वाटले ते आता त्रंप्याच्या भाषणातले विनोद आपल्याला समजावून सांगतील. कसे beautiful weave आहे ते सांगतील. जसे कोविड च्या वेळी त्रंप्याने सुचवलेले विचार कसे उपहासात्मक होते असे सांगितले. त्यांच्या दृष्टीने त्यांना त्रंप्याचे खरे वाटते.
शेंडे नेहेमी उपहासात्मकच लिहितात असे मला वाटते - एक भारतीय नि इतका भोळा!
Free ka entertainment. How
Free ka entertainment. How this guy got nomination. He he. Greatest nation it seems.
शेंडे सोडा त्या मॉडरेटर ने
शेंडे सोडा त्या मॉडरेटर ने तात्या ला कोट केलं तर तात्या म्हणतो ते मी sarcastically म्हणलेलो. मॉडरेटर बिचारा म्हणाला की मी सगळं भाषण ऐकल पण sarcasms काही जाणवलं नाही. कदाचित तात्या आणि शेंडे आणि इतर मागास लोकांना ... ( मागा अपोस्टोफी स
) बरोबर sarcasm समजतं. आपण आपले लायझोल पिणारे!
Jimmy Kimmel parody debate
Jimmy Kimmel parody debate mast aahe.. kaay Bhikari public. Checking out Springfield specials.
जेव्हढ्या वेळेला बेट लावली
जेव्हढ्या वेळेला बेट लावली तेव्हढ्या वेळेला तात्या बिनडोकपणे बेट घेत गेला >> हो!
जॉन मकेन, प्राउड बोईज, पलोसी. हॅरिस बेट लावत होती हे येडं अपस्ट्रीम स्विम करत होतं.
https://x.com/swimmerbr78
https://x.com/swimmerbr78/status/1833974996810797369?t=96XMiSjh-PG8RbwH7...
ट्रम्पचे डायलॉग सिम्पसन्स पात्रांच्या आवाजात.
लॉजिकल पद्धती ने विचार
लॉजिकल पद्धती ने विचार केल्यास ट्रम्पने एकाही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. संदर्भ असो/ नसो, जे काही त्याच्या डोक्यांत होते ते त्याने अक्षरश: ओतले आहे.
ट्रम्प स्टेजवर आहे अशा डिबेटमधून धोरणांवर ( policies ) चर्चेची अपेक्षा ठेवता येत नाही. ट्रम्पसोबत एका स्टेजवर येणे, डिबेट करणे आणि कमीत कमी चिखल स्वत : ला लागू देणे यामधे कमला हॅरिसने यश मिळविले आहे.
निवडणूकीमधे ट्रम्पचा पराभव झाला ( अशी एक शक्यता आहेच ) तर त्याचे असंख्य पाठिराखे तो पराभव स्विकारतील का? peaceful transition हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता, पण प्रश्नाला उडवाउडवीचे उत्तर होते.
एक महत्वाची डिबेट पार पडली.
एक महत्वाची डिबेट पार पडली. ट्रम्प - हॅरिस डिबेट आता पुढे होणार नाही असे वाटते. लक्ष आता VP डिबेट कडे आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डिबेटमधे कोण जिंकले / हरले याने निवडणूक निकालावर परिणाम होणार नाही. यापुढे गाफील राहून चालणार नाही, आता जास्त उत्साहाने कामाला लागायला हवे.
“ >>अरे बाबा मी प्रश्न काय
“ >>अरे बाबा मी प्रश्न काय विचारला? आणी तु काय बरळतोयस?<<
ते तर हॅरिसच्या बाबतीतहि म्हणता येइल. पहिल्याच थेट प्रश्नाला (आर वी बेटर ऑफ टुडे दॅन वि वेर ४ इयर्स अॅगो) तिने दिलेली बगल दिसली का?”
राज, हो दिसली.
पण पॉलिटिकल डिबेट्समधे, खासकरुन प्रेसिडेंशिअल डिबेट्समधे अशी काही प्रश्नांना बगल दिलेली आपण नेहमीच बघतो. किंबहुना उमेदवारांकडुन ते अपेक्षितच असते. अरे पण एक-दोन प्रश्नांना बगल दिली तर ठिक आहे पण ट्रंप तर पोपट पढवल्यासारखा कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर न देता( कारण उत्तर द्यायचे नसेल म्हणा की उत्तर त्याला माहीत नाही म्हणा!).. त्याचा आपला एकच घोष! “ बायडन इज द वर्स्ट प्रेसिडेंट, “कामाला” हॅरीस इज द वर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट, अमेरिका इज अ शिट प्लेस, हाउ आय अॅट्रॅक्ट मिलिअन्स इन माय रॅलीज, हाउ माय रॅलीज आर "द बिगेस्ट रॅलीज एव्हर!" , ऑल इमिग्रंट्स आर वर्स्ट क्रिमिनल्स अॅंड मर्डरींग अमेरिकन्स इन स्कोर्स अँड इटिंग अमेरिकन पिपल्स डॉग्स अँड कॅट्स!"
च्यायला वैताग व विट आला त्याच्या तोंडुन ९० मिनिटे तेच तेच ऐकुन!
हेल्थ केअर सिस्टिम कशी सुधरवणार याचा काही ठोस प्लान आहे का हा एक साधा काँक्रिट प्रश्न विचारला तर त्याची त त प प झाली! आणी हा अमेरिका ग्रेट करणार आहे म्हणे! तोंड बघा याचे!
If @KamalaHarris wins, the
If @KamalaHarris wins, the White House will smell like curry & White House speeches will be facilitated via a call center and the American people will only be able to convey their feedback through a customer satisfaction survey at the end of the call that nobody will understand.
ट्रम्पची खास सल्लागार लॉरा लूमर
आपण आपले लायझोल पिणारे! >>
आपण आपले लायझोल पिणारे! >>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तात्या मीच डीबेट जिंकलो असे बरळत सुट्ला आहे. त्यावर विश्वास ठेवणारे कोण असा प्रश्न आता पडायला नको.
https://www.cnn.com/2024/09
https://www.cnn.com/2024/09/15/politics/donald-trump-safe-shots/index.html
मरणासन्न म्हातार्याने एकदा ट्रंपला ठार मारून लोकशाही वाचवायचा निकराचा प्रयत्न केला त्याने निदान ट्र्म्पच्या कानाचा एक तुकडा तोडला. ह्यावेळी नाक किंवा एखादा डोळा टिपला असता तर प्रगती म्हणता आली असती. पण हा दुसरा प्रयत्न अगदीच फसला. कदाचित आसन्नमरण थेरड्याने कमलाबाईला असॅसिनेशन झार म्हणून नेमले की काय आणि तिने आपल्या लाडक्या डी ई आय कोट्यातून भरती केलेल्या कुणाला ह्या मोहिमेचे संचालन करायला सांगितले अशी शंका येते इतका हा प्रयत्न ढिसाळ होता (कदाचित हेती मधून आयात केलेला मारेकरी असेल. त्याला कुठलेसे मांजर दिसल्यामुळे त्याची एकाग्रता भंगली असेल! असो!)
मागच्या वेळी चितळेबाईला बळीचा बकरा बनवले होते. ह्यावेळेस कुणी होतो की पुढच्या प्रयत्नानंतरच काही कारवाई होते ते बघणे मनोरंजक आहे.
डेमोक्रॅट पक्ष आणि त्याचे उच्च पदस्थ अगदी तळहातावर शीर घेऊन लोकशाहीचे रक्षण करू पहात आहेत हीच एक आश्वासक गोष्ट आहे!
या शेंडॅनक्षत्र, स्वागत असो.
या शेंडॅनक्षत्र, स्वागत असो. अगदीच एकतर्फी चालू होते इथे.
<<हेती मधून आयात केलेला मारेकरी असेल>>
हे सत्य आम्हालाच काय अनेक बातमीदारांना तुम्ही सांगितले. इतके दिवस ते हे सत्य सांगत नव्हते.
<< अगदी तळहातावर शीर>>
कुणाचे शीर?
>>इतके दिवस ते हे सत्य सांगत
>>इतके दिवस ते हे सत्य सांगत नव्हते.
आजच घडलेल्या घटनेबाबत इतके दिवस का बरे बोलणार?
>>कुणाचे शीर?
अर्थातच ट्रंपचे!
लोकशाहीचे रक्षण करायला दुसर्या कुणाचे शिर कलम करणार?
काय निरर्थक प्रश्न आहे!
<<<आजच घडलेल्या घटनेबाबत>>>
<<<आजच घडलेल्या घटनेबाबत>>>
माफ करा - मी तुमच्या इतक्या त्रंप्याच्या बातम्या ऐकत नाही. हे आजच घडले हे मला माहित नव्हते.
लोकशाहीचे रक्षण करायला दुसर्या कुणाचे शिर कलम करणार? अर्थातच ट्रंपचे!
तसे झाले तर खरच अमेरिका ग्रेट अगेन होईल.
>>माफ करा - मी तुमच्या इतक्या
>>माफ करा - मी तुमच्या इतक्या त्रंप्याच्या बातम्या ऐकत नाही. हे आजच घडले हे मला माहित नव्हते.
हो, अगदी बरोबर. अशा अयशस्वी हत्येच्या प्रयत्नांना आपण दुर्लक्षित करता हे समजण्यासारखे आहे. आम्हासारख्या ट्रंप चाहत्यांना त्याच्या जिवंत असण्याची काळजी आहे. आणि मायबोलीवर असे मानवताविरोधी लोकशाहीविरोधी सदस्य अपवादानेच आढळतात. बहुतेक सर्व लोकशाहीच्या रक्षणाला सज्ज आहेत! लोकशाही वाचल्याची बातमी वाचायला चातकासारखे आतुर वगैरे आहेत. चालायचेच!
अजून ५० दिवस आहेत. आशा सोडू नये!
If @KamalaHarris wins, the
If @KamalaHarris wins, the White House will smell like curry >>> ट्रम्प-व्हान्स जिंकले तरी ऑल्मोस्ट तसेच होणार आहे
लॉरा लूमरला एमटीजी सुद्धा रेसिस्ट म्हणाली म्हणजे ती लेजेण्ड लेव्हल दिसते.
परवा जे डी व्हान्स म्हणाला जनतेशी कनेक्शन नसलेल्या बिलियनेयर लोकांना कोणी किंमत देत नाही. तो टेलर स्विफ्ट बद्दल बोलत होता. रिपब्लिकन पार्टीत असे कोणी नसल्याने बरोबर आहे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आता एलन मस्कने पहा काय शेअर
आता एलन मस्कने पहा काय शेअर केलंय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एक अमेरिका बॉर्न बाई तिच्या हैटीयन वडिलांनी तिला पूर्वी काय सांगितलं ते सांगतेय. एवढा धडधडीत पुरावा आहे बघा.
टेलर स्विफ्ट सारख्या विद्वान,
टेलर स्विफ्ट सारख्या विद्वान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल जाण बाळगणार्या, सर्वज्ञानी, गडगंज श्रीमंत कलाकार स्त्रीने कमलाबाईला पाठिंबा जाहीर करताच जेडी व्हान्स आणि ट्रंप दोघांनी स्वच्छ शरणागती पत्करून आता जवळपास कमलाबाई जिंकल्यातच जमा आहे. सरळ बिनविरोध तिला निवडून द्यावे असे जाहीर सांगावे. हीच खरी राजकीय प्रगल्भता आहे. इतके झाल्यावरही निवडणूक लढण्याच्या वल्गना करणे बालिश आहे. म्हणूनच कदाचित असे हत्येचे प्रयत्न होताना दिसत आहेत. सरळ बोलून समजावता येत नसेल तर वाकड्यात शिरावे लागते!
लोकशाही परंपरा टिकवण्यासाठी पूर्ण शरणागती पत्करून माघार का बरे घेत नाहीत हे मंदबुद्धी लोक?
फारएन्ड
फारएन्ड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओहायोमधे ११ वर्षाच्या केलब (जो बस अपघातात मेला) त्याचे आइवडिल निर्लज्ज व संधिसाधु प्रेसिडेन्शिअल व व्हाइस प्रेसिडेन्शिअल उमेदवार जे धडधडीत खोटा अँटाय इमिग्रंट प्रचार करत आहेत त्यांना उद्देशुन काय म्हणत आहेत पहा.
Father of 11-year-old killed in Ohio crash says Trump and Vance are using his son 'as a political tool' and asks for apologies
The father of an Ohio boy killed last year when a Haitian immigrant driver hit a school bus is imploring Donald Trump and other politicians to stop invoking his son’s name in the debate about immigration.
“This needs to stop now,” Nathan Clark said. “They can vomit all the hate they want about illegal immigrants, the border crisis and even untrue claims about fluffy pets being ravaged and eaten by community members. However, they are not allowed, nor have they ever been allowed, to mention Aiden Clark from Springfield, Ohio. I will listen to them one more time to hear their apologies.”
तरीसुद्धा या दोघांचा खोटा व हेटफुल प्रचार चालुच आहेच. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज?
फारएन्ड, टेलर स्विफ्टच्या
फारएन्ड, टेलर स्विफ्टने कमला हॅरीसला दिलेल्या जाहीर एंडॉर्समेंटने ट्रंप व त्याच्या पाठीराख्यांच्या नाकाला प्रचंड झोंबलेले स्पष्ट आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हेतीचे लोक ओहायोच्या त्या
हेतीचे लोक ओहायोच्या त्या लहानशा.गावात घुसल्याने त्या गावाची उदंड भरभराट होऊ लागली आहे. नोकर्या, धंदे इतके प्रचंड संख्येने वाढत आहेत की ते गाव आता सिलीकॉन व्हॅली वगैरे जागांना कस्पटासमान ठरवेल इतके मोठे होताना दिसत आहे. गुन्हेगारी तर सूक्ष्मदर्शक यंत्राने शोधली तरी सापडायची नाही इतकी नामशेष झाली आहे. सगळ्या घरांना सोन्याची कौले चढवता येतील इतकी अफाट श्रीमंती सर्व गावकर्यांकडे आली आहे!
हेतीच्या निष्पाप, कष्टाळू लोकांनी नि:स्वार्थी मनाने, केवळ अमेरिकेतील एका गावाची अफाट प्रगती व्हावी ह्या उद्देशाने आपला प्रचंड श्रीमंत, समृद्ध, सुसंस्कृत देश सोडला आणि ते ह्या ओहायोत आले हे विसरून ट्रंप आणि त्याचे समर्थक त्यांच्याबद्द्ल वावगे बोलतात हे प्रचंड चूक आहे. एखादा संतप्त पुरोगामी अशा लोकांना संपवू पहात असेल तर त्यात आश्चर्य ते काय?
ओ मग तेथे स्थानिक
ओ मग तेथे स्थानिक लोकसंख्येच्या मानाने जास्त इमिग्रंट घुसले आहेत व तेथील व्यवस्था बिघडवत आहेत असे साधे सोपे सांगायचे की. एकदम लोक कुत्रे मांजरी खात आहेत हे इतक्या ठामपणे सांगितल्याने कोणाचा फायदा झाला?
मागा लॉजिकः
"हैतीचे लोक त्या गावात लोकांची पाळीव कुत्री व मांजरे खात आहेत"
"याला काहीही आधार नाही. कोणताही पुरावा नाही"
"मग तेथे भरभराट, सोन्याची कौले आहेत म्हणताय?"
"नाही. तुमचे नेते लोक कुत्री मांजरी खातायत असे सांगतायत तसे काही नाही इतकेच सांगतोय"
"म्हणजे गुन्हेगारी नामशेष झाली आहे?"
"अहो ते गुन्हेगारी करत असतील तर त्याबद्दल लिहा. तुम्ही एकदम पाळीव प्राणी..."
"बघा. आम्ही त्यांच्याबद्दल जराही वावगे बोलू नये काय"
माणूस कुत्र्याला चावला तर त्याची न्यूज होते हे सांगणारे लोक यांना हे सांगायचे विसरले की तसे काही प्रत्यक्षात झाले तरच ती न्यूज होते.
टेलर स्विफ्ट, मार्था स्टिवर्ट
टेलर स्विफ्ट, मार्था स्टिवर्ट ( किंवा आधी ऑलिव्हिया रॉड्रिगो ) यांनी एंडोर्स केले म्हणजे त्यांचे सगळे फॅन ट्रम्पला मते देतील असे नाही. ट्रम्पला द्राक्षे आंबट लागत आहेत.
रिहानाने कडून एंडोर्समेंट यायचे आहे.
ट्रम्पवर आज पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न होणार होता ?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हल्लेखोराचे नांव FBI ने जाहिर केले आहे. तिथे एव्हढ्या जवळ जाण्याचा उद्देश काय होता?
हॅरिसला अजून दुसरी डिबेट हवी
हॅरिसला अजून दुसरी डिबेट हवी आहे? कशासाठी.
https://www.washingtonpost.com/politics/2024/09/10/harris-campaign-wants...
ट्रम्पला आज तरी दुसरी डिबेट नको आहे. लहरी आहे, त्यामुळे दुसर्या क्षणाला बदलेलही.
Pages