Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हेतीवासी लोकांचे कुत्री
हेतीवासी लोकांचे कुत्री मांजरी खाणे हा खरे तर गौण मुद्दा आहे. ५०००० संख्येच्या गावात २०००० हेतीवासी जबरदस्तीने आणून घुसवणे आणि अनेक सामाजिक समस्या निर्माण करणे हा खरा प्रश्न आहे.
पण तरी, आपण पाळीव प्राण्यांबद्दलचे स्प्रिंगफील्डच्या महापौराचे विधान पाहू. हेतीचे लोक स्थानिक लोकांचे पाळीव प्राणी मारून खात आहेत ह्याचा कुठलाही विश्वसनीय पुरावा नाही. हे विधान म्हटले तर मूळ दावा खोडून काढणारे आहे. पण पुढेमागे जर खरोखर असे आहे असे निष्पन्न झाले तर मी तर म्हटलो होतो की तसा पुरावा नाही. आता पुरावा आला आहे.
खरोखर खात्री असती तर त्या मेयरने असे म्हणायला हवे होते हेतीच्या लोकांनी एकही पाळीव प्राणी मारलेला नाही की हेतीच्या लोकांनी एक जरी पाळीव प्राणी मारून खाल्ला आहे असे निष्पन्न झाले तर मी राजीनामा देईन. पण नाही. एक विझल सारखे कातडीबचावू विधान आहे.
ट्रंपने कोविड व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून निघाले आहे असे विधान केले होते तर असेच प्रत्युत्तर विधान स्वतःला विज्ञानाचा प्रेषित म्हणवणार्या फौचीने केले होते. "कोव्हिडचा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून आला आहे ह्याचा कुठलाही "विश्वसनीय पुरावा नाही". "
हे विधान येताच माध्यमांनी ट्रंप कसा चीनद्वेष्टा आणि बेजबाबदार आहे वगैरे ट्यांण ट्याण सुरु केले. नंतर कधीतरी हा व्हायरस चीनच्या वुहानमधील राक्षसी प्रयोगात पुरेसी दक्षता न घेतल्यामुळे बाहेर पडला आणि जगभर त्याने थैमान घातले असे निष्पन्न झाले. तेव्हा प्रेषित फौची म्हणला पण मी तर असे कधीच म्हणालो नाही की हा व्हायरस प्रयोगशाळेतून निघालेला नाही. फक्त पुरावा नाही एवढेच म्हटलो होतो. थोडक्यात चित मै जीता, पट तुम हारे!
तीच गोष्ट रंडीबाज, हेरॉईनबाज, भ्रष्ट, करबुडवा म्हातार्या बायडनचा दिवटा हंटर बायडनचा लॅपटॉप. त्या लॅपटॉपची बातमी बाहेर येताच अनेक आगाऊ सरकारी अधिकारी जे एफ बी आय आणि सी आय ए मधे उच्च पदावर होते त्यांनी हे लॅपटॉप प्रकरण हे रशियन कारस्थान असल्याची लक्षणे असल्याचे पत्र लिहिले. लगेच माध्यमांनी ट्रंपला अव्याहत शिवीगाळ सुरू केली. माजोरड्या समाजमाध्यमांनी ह्या विषयीच्या बातम्या सेन्सॉर करणे सुरू केले. राजकारण्यांनी ट्रंपद्वेष भडकवायला ह्याचा व्यवस्थित वापर केला.
आज हे उघडकीस आले आहे की हा लॅपटॉप रशियन कारस्थान बिरस्थान काही नसून खरोखरचा ह*खोर हंट्याला दोषी ठरवणारा भक्कम पुरावा आहे. कोर्टाने त्या जोरावर त्याला दोषी ठरवले आहे.
तेव्हा ज्या प्रकारची विधाने त्या शहराच्या प्रशासनाकडून येत आहेत ती पहाता निवडणूकीचा ज्वर ओसरला की खरोखरच हेतीचे लोक पाळीव प्राण चोरून खात होते हे उघड होईल.
आज निदान काही रहिवासी तसे म्हणत असल्याचे व्हिडियो उपलब्ध आहेत. काही ब्लॉगर्स त्या गावात जाऊन लोकांच्या मुलाखती घेताना त्यांनी तसे म्हटले आहे.
अर्थात ट्रंपचा तिरस्कार करायला काहीही सबब पुरणार्या लोकांना सध्या हे कारण पुरेसे आहे!
पण तरी, आपण पाळीव
पण तरी, आपण पाळीव प्राण्यांबद्दलचे स्प्रिंगफील्डच्या महापौराचे विधान पाहू. हेतीचे लोक स्थानिक लोकांचे पाळीव प्राणी मारून खात आहेत ह्याचा कुठलाही विश्वसनीय पुरावा नाही. हे विधान म्हटले तर मूळ दावा खोडून काढणातारतम्य रे आहे. पण पुढेमागे जर खरोखर असे आहे असे निष्पन्न झाले तर मी तर म्हटलो होतो की तसा पुरावा नाही. आता पुरावा आला आहे. >> तारतम्य नि कॉमन सेन्स असणारे पब्लिक सर्वंट ज्यांच्या विधानांनी लोकांच्या आयुष्यांवर फ्गरक पडू शकतो त्यांनी 'उचलली जीभ लावली टाळ्याला" प्रकार न करता सेंसिबल विधाने करणे हे चुकीचे वाटते ह्यातच सगळे स्पष्ट होते.
निस्तरपट्टी करायला किती
निस्तरपट्टी करायला किती लोकांना किती ठिकाणी जाऊन तोंड वाजवायला लागतंय!
त्या ऐवजी हेशिअन लोक स्प्रिंगफिल्डला फार आले आहेत आणि त्याने सिस्टिमवर ताण येत आहे. इतकं एका वाक्यात बोलून समस्येवर घाव घालता आल असता ना!
पण नाही वक्रोक्ती, कांचनगुणोक्ती... आपलं चेतनगुणोक्ती अशा अलंकारांत तात्या बोलतात. पामर पत्रकार आणि डेम्सला झेपत नाही.
>>
>>
तारतम्य नि कॉमन सेन्स असणारे पब्लिक सर्वंट ज्यांच्या विधानांनी लोकांच्या आयुष्यांवर फ्गरक पडू शकतो त्यांनी 'उचलली जीभ लावली टाळ्याला" प्रकार न करता सेंसिबल विधाने करणे हे चुकीचे वाटते ह्यातच सगळे स्पष्ट होते.
<<
ज्या नराधमांनी ह्या लहानशा गावात इतक्या प्रचंड संख्येने हेतीचे लोक आणून घुसवले त्यांचे काय? त्यांनी त्या गावच्या रहिवाशांचा किती विचार केला? ह्या हेतीवासीयांना करदात्यांच्या पैशाने भरपूर भत्ते वगैरेची सोय केली आहे आणि हेच हेतीवासी स्थानिक लोकांना भाड्याने घरे मिळणे अवघड करत आहेत. गुन्हेगारी वाढत आहे.
निरर्थक गोड गोड बोलून कोट्यावधी घुसखोर अमेरिकेत आणुन त्यांना करदात्यांच्या पैशाने त्यांना पोसून त्यातलेच काही महाभाग बलात्कार, खून, चोर्या वगैरे विधायक कार्यक्रम करतात त्याची जबाबदारी कोणाची?
ज्या नराधमांनी रशिया युक्रेनच्या युद्धाची आग धडधडत रहावी म्हणून लोकशाहीचे रक्षण वगैरे इराकवर हल्ला करण्याचे मंत्र म्हणून लाखो युक्रेनी लोक मरतील आणि अमेरिकन करदात्यांचे अब्जावधी डॉलर जळून भस्मसात होतील त्यांचे काय?
>>
>>
त्या ऐवजी हेशिअन लोक स्प्रिंगफिल्डला फार आले आहेत आणि त्याने सिस्टिमवर ताण येत आहे. इतकं एका वाक्यात बोलून समस्येवर घाव घालता आल असता ना!
<<
हे सगळे ट्रंप आणि व्हान्स बोलतच आहेत. परंतु त्यांना दोन विदुषकी चाळे करणारे आचरट लोक अशा रंगात रंगवायचा चंग बांधलेली माध्यमे त्यांची
त्यांना हवी तीच विधाने उचलून त्या राईचा पर्वत करून लोकांना सादर करण्यात मग्न आहेत. आणि आधीच ट्रंपद्वेषाने आंधळे झालेले लोक लेमिंगसारखे तेच खरे मानत आहेत.
हे सगळे ट्रंप आणि व्हान्स
हे सगळे ट्रंप आणि व्हान्स बोलतच आहेत. >> शेंडॅनक्षत्र, तात्या नि वान्स वेगळेच इंग्लिश शिकले असावेत. पेट्स खातात म्हणजे "त्या ऐवजी हेशिअन लोक स्प्रिंगफिल्डला फार आले आहेत आणि त्याने सिस्टिमवर ताण येत आहे." ह्याच लॉजिकने "मी स्त्रियांचा तारणहार"" किंवा " ग्रॅब द .." म्हणाजे काय ते पण लगे हाथ सांगून टाका .
(No subject)
<<<त्या ऐवजी हेशिअन लोक
<<<त्या ऐवजी हेशिअन लोक स्प्रिंगफिल्डला फार आले आहेत आणि त्याने सिस्टिमवर ताण येत आहे. .........आणि डेम्सला झेपत नाही.>>
अमितव, बरोबर आहे. त्रंप्याने मागेच सांगितले की त्याला अशिक्षित, मूर्ख लोक आवडतात, तेच खरे त्याचे मतदार. त्यांना साधी सभ्य सोज्ज्वळ भाषा समजतच नाही.
अमेरिकन राजकारण म्हणजे डुकरांचे चिखलात लोळणे! दोन्ही पक्षांची भाषा, वर्तणूक सारखीच. कुणालाच सभ्यता माहित नाही.
हेतीवासी लोकांचे कुत्री
हेतीवासी लोकांचे कुत्री मांजरी खाणे हा खरे तर गौण मुद्दा आहे. ५०००० संख्येच्या गावात २०००० हेतीवासी जबरदस्तीने आणून घुसवणे आणि अनेक सामाजिक समस्या निर्माण करणे हा खरा प्रश्न आहे.>>
स्प्रिंगफइल्ड भागातील कंपन्यांमधून जॉब्ज होते. त्यामुळे हेतीचे लोक तिथे आले. ही मंडळी काही कुठल्या गवर्मेंट प्रोग्रॅमचा भाग म्हणून तिथे आणून वसवली असे झालेले नाही. पॅरोल प्रोग्रॅममधून अमेरीकेत आल्यावर (लिगली) हे लोकं जिथे जॉब उपलब्ध आहेत तिथे गेले. स्प्रिंगफिल्ड आणि त्याच्या आसपासच्या अनेक कंपन्यांना कामगारांची गरज होती. ती गरज या लोकांमुळे भागली. माझ्या माहितीतल्या ऑटोमोटिव इंडस्ट्रीतल्या अनेक कंपन्यांमधून हे लोकं काम करत आहेत. लोकसंख्या वाढल्याने सिस्टिमवर ताण येतो का तर हो नक्कीच येतो. पण त्याच वेळी स्थानिक लोकांना कामावर ठेवल्यावरही कंपन्या कामगारांअभावी स्ट्रगल करत होत्या ही देखील बाजू आहेच. अणि सिस्टिमवर ताण याबद्दल बोलायचे तर आयटी वाले देशी जेव्हा हजारोंच्या संख्येने इथे आले तेव्हाही सुरवातीला ताण आलाच. पोर्टेबल क्लासरुम्स, रेंट वाढ, घरांच्या किमती वाढणे तेव्हाही झालेच. कितीतरी सबडिविजन्स या इथल्या लोकल लोकांना न परवडणार्या, देशी बहूल, आयटीवाले अशा बांधल्या गेल्या. आमच्या आसपासच्या भागात भरपूर वेअर हाऊसेस, त्यामुळे ट्रक ड्रायवर्सची गरज आणि त्यातून भरपूर पंजाबी मंडळी हा देखील बदल बघितला.
मंगळवारच्या डिबेटमधे टिम
मंगळवारच्या डिबेटमधे टिम वॉल्झ, जे डि व्हान्स दोघांनी समंजसपणे आणि सभ्यता दाखवत आपले मुद्दे मांडले. व्हान्स अपेक्षेपेक्षा बराच चांगला बोलला. प्रश्न कुठलाही असला तरी प्रत्येक प्रतिसादांत कमला हॅरिस वर रोख होता.
Idiot supreme leader is it
Idiot supreme leader is it seems contemplating about attack on Iran oil reserves. At the time of Kuwait attack this has happened with iraq. Just weeks of black smoke and burning . Terrible. Waste of natural resources. Netla tondala rakt lagle aahe. To kahi aikat nahi. Kiti mule marli. Uncle la tartamya nahi. To bomb deu Nako na. Te kuthun bombing karteel? Pan doke wapraiche nahi. Kami dear pan tech Karel nobel peace nenar.
Vaibhavshali mhane. Bafa band padla aahe.
२००१ च्या सुमारास रिपब्लिकन्स
२००१ च्या सुमारास रिपब्लिकन्स युद्धखोर आणी डेमोक्रॅट्स शांतताप्रेमी असे चित्र होते. आज ते उलटे झाले आहे.
विवेक रामास्वामी आणी जॉन बोल्टन यांचे डिबेट छान आहे. विवेक बहुदा गव्हर्नर होईल ओहायो चा.
कमलाबाईंच्या अफाट कर्तृत्वाला
कमलाबाईंच्या अफाट कर्तृत्वाला सलाम करणारे एक पुस्तक अॅमेझॉनवर बेस्ट सेलर म्हणून झळकत आहे.
दी अचिव्हमेंटस ऑफ कमला हॅरिस
लेखक : जेसन डूडॅश, मायकेल बोल्स
गंमत म्हणजे ह्या पुस्तकातील बहुतांश पाने कोरी आहेत! अगदी कमला बाईंच्या कर्तबगारीसारखी!
वाचले पाहिजे कधीतरी!
https://www.hindustantimes.com/world-news/us-news/kamala-harris-achievem...
(No subject)
फीमा ह्या केंद्रीय संकट
फीमा ह्या केंद्रीय संकट निवारण करणार्या विभागाने आपले फंड बेकायदा घुसलेल्या लोकांचे आदरातिथ्य करण्यासाठी वापरले. त्यामुळे आता तो विभाग कफल्लक आहे आणि नुकतेच नॉर्थ कॅरोलिना इथे झालेल्या वादळामुळे सर्वकाही गमावलेल्या अमेरिकन नागरिकांना ७५० डॉलर इतकी "घसघशीत" मदत करण्याइतकेच पैसे उरलेले आहेत.
किती छान. आपल्या नागरिकांना उपाशी ठेवून उपर्या, घुसखोर लोकांना तुपाशी जेवायला घातले जात आहे!
अमेरिकेतील विविध भागात ह्या बेकायदा लोकांना वसवून त्यांना सेलफोन, विविध भत्ते, अनेकदा हॉटेलात फुकटात रहाण्याची सोय, बाकी मौजमजा अशा सोयी सवलतींचा पाऊस पाडला जात आहे. किती रम्य दृश्य आहे! बहुतांश अमेरिकन नागरिक तर आनंदातिशयाने हुरळून जात असतील.
त्यात आईस ह्या इमिग्रेशनला जबाबदार असणार्या अमेरिकन विभागाने आकडेवारी जाहीर केली आहे ज्यात असे म्हटले आहे की आजवर १३००० खुनी, १५००० बलात्कार आणि तत्सम अत्याचार करणारे आणि एकंदरीत सव्वा चार लाख गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक अमेरिकेत बेकायदा घुसखोरीच्या राजमार्गाने घुसलेले आहेत. (अर्थात ही अधिकृत आकडेवारी आहे. असे आणखी कितीतरी लोक असतील जे सीमा पूर्ण खुल्या असण्याचा लाभ घेऊन कुठल्याही नोंदीशिवाय अमेरिकेत घुसले असतील)
डोळे मिटून बेकायदा आगंतुक लोकांचे लोंढेच्या लोंढे अमेरिकेत येऊ देण्याच्या म्हातारबाच्या मूर्ख निर्णयामुळे अशी नररत्ने अमेरिकेत येऊन दाखल झाली आहेत. अर्थातच हे आलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक अमेरिकेत येऊन गुगल, फेसबुक, एन्व्हिडिया, टेस्ला सारख्या कंपन्या स्थापन करतील का आणखी जास्त गुन्हे करतील हे आपण आपल्या कुवतीनुसार ठरवा!
अमेरिकेत भरपूर गुन्हेगारी आहेच की मग काही आगंतुक येऊन आणखी गुन्हे करत असतील तर बिघडले काय असा प्रश्न काही विचारवंत विचारतीलच!
कमलाला रिपब्लिकनच काय पण
गंमत म्हणजे ह्या पुस्तकातील बहुतांश पाने कोरी आहेत! >>>
कमलाला रिपब्लिकनच काय पण डेम्स मधले लोक सुद्धा इतकी वर्षे सिरीयसली घेत नव्हते. पण म्हातारबा खरोखरच म्हातारा झाला आहे हे डिबेट मधे दिसले व तिकडे तात्याचा समंजसपणा फक्त अर्धा तास टिकला कन्वेन्शन स्पीच मधे. नंतर पुन्हा तेच सगळे सुरू झाले. व्हान्सची वक्तव्ये पाहता याची नक्की प्रिन्सिपल्स काय आहेत त्याचा पत्ता नाही, आणि असलीच तर ती कर्मठ ख्रिश्चन लोकांचीच वाटतात. त्यामुळे कमला पुढे आली. वॉल्झ माणूस चांगला वाटतो. त्याची झेप व्हीपी लेव्हलची आहे का माहीत नाही. पण बहुतांश असेच सगळे असतात या स्टेजला.
हॉट शॉट्स २ मधे एक कोट आहे: We picked you because you are the best of what's left.
या ठिकाणी हा 'लेफ्ट'वर श्लेष
या ठिकाणी हा 'लेफ्ट'वर श्लेष होतो आहे.
जे डी व्हान्स हा अत्यंत
जे डी व्हान्स हा अत्यंत कर्तृत्ववान माणूस आहे. त्याचे आत्मचरित्र जे त्याने राजकारणात शिरण्याआधी लिहिले ते अतिशय वाचनीय आहे (Hillbilly Elegy).
तो ज्या पार्श्वभूमीत वाढला त्याला सुशिक्षित अमेरिकन रेडनेक म्हणतात. कायमची गरीबी. व्यसनी आई. वरचेवर बदलणारे सावत्र बाप. अफाट गरीबी. हे सगळे असताना सैन्यात मरीन दळात भरती झाला. तिथे सन्माननीय पदक मिळवले. ओहायोत पदवी मिळवून नंतर येल लॉसारख्या प्रतिष्ठित कॉलेजात प्रवेश मिळवून तिथे पुढची पदवी मिळवली.
रेडनेक म्हणजे रेसिस्ट अशी प्रस्थापित कल्पना आहे. पण जे डी व्हान्सने एका भारतीय वंशीय स्त्रीशी लग्न केले. आणि उत्तम प्रकारे मुलाबाळांसह संसार करत आहे.
पुढे सिनेटर आणि आता उपाध्यक्षपदाचा उमेदवार. त्याचे बालपण, त्याचे नातेवाईक आणि अन्य गोतावळा आणि आसपासचे वातावरण पाहिले तर ही प्रगती नेत्रदीपक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून जिद्दीने इतकी प्रगती करणारा एक लढवय्या माणूस आहे.
कर्तृत्वाचा आलेख पाहिला तर आपल्यापेक्षा २०-२५ वर्ष मोठ्या म्हातार्या विली ब्राऊनची *** म्हणून राजकारणात प्रवेश करुन त्या जोरावर अनेक पदे मिळवणार्या आणि नंतर सोयीनुसार आपल्या भारतीय किंवा काळ्या वंशाची टिमकी वाजवत बाकी सगळी पदे मिळवणार्या कमला बाईपेक्षा जेडी कितीतरी वर आहे.
जे डी व्हान्स हा अत्यंत
जे डी व्हान्स हा अत्यंत कर्तृत्ववान माणूस आहे. त्याचे आत्मचरित्र जे त्याने राजकारणात शिरण्याआधी लिहिले ते अतिशय वाचनीय आहे (Hillbilly Elegy).
तो ज्या पार्श्वभूमीत वाढला त्याला सुशिक्षित अमेरिकन रेडनेक म्हणतात. कायमची गरीबी. व्यसनी आई. वरचेवर बदलणारे सावत्र बाप. अफाट गरीबी. हे सगळे असताना सैन्यात मरीन दळात भरती झाला. तिथे सन्माननीय पदक मिळवले. ओहायोत पदवी मिळवून नंतर येल लॉसारख्या प्रतिष्ठित कॉलेजात प्रवेश मिळवून तिथे पुढची पदवी मिळवली.
रेडनेक म्हणजे रेसिस्ट अशी प्रस्थापित कल्पना आहे. पण जे डी व्हान्सने एका भारतीय वंशीय स्त्रीशी लग्न केले. आणि उत्तम प्रकारे मुलाबाळांसह संसार करत आहे.
पुढे सिनेटर आणि आता उपाध्यक्षपदाचा उमेदवार. त्याचे बालपण, त्याचे नातेवाईक आणि अन्य गोतावळा आणि आसपासचे वातावरण पाहिले तर ही प्रगती नेत्रदीपक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून जिद्दीने इतकी प्रगती करणारा एक लढवय्या माणूस आहे.
कर्तृत्वाचा आलेख पाहिला तर आपल्यापेक्षा २०-२५ वर्ष मोठ्या म्हातार्या विली ब्राऊनची *** म्हणून राजकारणात प्रवेश करुन त्या जोरावर अनेक पदे मिळवणार्या आणि नंतर सोयीनुसार आपल्या भारतीय किंवा काळ्या वंशाची टिमकी वाजवत बाकी सगळी पदे मिळवणार्या कमला बाईपेक्षा जेडी कितीतरी वर आहे.
कमलाबाईचा वर्तमान नवरा एमहॉफ
कमलाबाईचा वर्तमान नवरा एमहॉफ ह्याला काही डेमोक्रॅट धार्जिणी माध्यमे अकारण डोक्यावर घेत आहेत. काय तर म्हणे पौरुषाची एक नवी व्याख्या ह्या नरपुंगवामुळे निर्माण झाली आहे! म्हणून म्हणे हा आधुनिक काळातील पुरुषोत्तम आहे. मग आपण फस्ट झंटल्मन बनल्यावर आपली ही नवी पौरुषाची कल्पना कशी लोकप्रिय कराल? वगैरे गोडगोड प्रश्न विचारले गेले.
त्यानंतर ह्याच्या "पौरुषाची" काही उदाहरणे पुढे आली. ह्या नरोत्तमाने कुठल्यातरी समारंभाला गेला असताना तिथल्या पार्किंग लॉटमधे आपल्या गर्लफ्रेंडच्या सणसणीत श्रीमुखात भडकावली होती. कारण म्हणे तिने पार्किंगवाल्या व्हॅलेचे लक्ष वेधण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता!
आणि आधीच्या बायकोशी विवाहित असताना त्याने मुलीच्या नॅनीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले होते. आणि त्यामुळेच हे लग्न संपुष्टात आले.
आता ही सगळी कर्तबगारी म्हणजे पौरुषाची नवी व्याख्या असेल तर नव्या मंत्रीमंडळात बिल क्लिंटनला सल्लागार नेमायला हरकत नसावी!
हे सगळं तात्याच्या तोंडून
हे सगळं तात्याच्या तोंडून ऐकलं आणि नंदीबैलाना माना डोलावताना पाहिलं की सुडोमि!
या ठिकाणी हा 'लेफ्ट'वर श्लेष
या ठिकाणी हा 'लेफ्ट'वर श्लेष होतो आहे >>> हो मलाही लिहीताना जाणवले होते
व्यक्तिशः व्हान्स ची झेप अफाट आहे. पण तो किंवा इतर कोणी किती कर्तृत्ववान आहे हे इथे इररिलेव्हंट आहे. तो ऑलरेडी व्हीपी कॅण्डिडेट आहे. त्याची बायकांबद्दल मते टोटली रिग्रेसिव्ह आहेत. त्याने प्रोजेक्ट २०२५ च्या पुस्तकाला प्रस्तावना लिहीलेली आहे. ते सगळेच त्याच्या कर्मठ विचारांशी सुसंगत आहे.
आणि ते फीमा चे "फक्त" $७५० ही फॉक्स व इतरांची नवीन "बिग लाय" दिसते. २०२० निवडणूक, पाळीव कुत्रे मांजरी खाणारे इमिग्रंट. फीमाचा "डिझास्टर रिलीफ फंड" काँग्रेस ठरवते. कमला नाही. सगळे पॅट्रियट ई मागा रिपब्लिकन्स आत्ताही तो फंड वाढवू शकतात. पण तात्यालाच ते नको असेल. बाकी रिपब्लिकनचा याबाबतीतील गौरवशाली इतिहास २००५ मधे न्यू ऑर्लिन्सने पाहिला आहे.
पण वस्तुस्थितीशी या लोकांना घेणेदेणे नसते. असल्या बकवास वर जराही विश्वास ठेवण्यासारखी यांची गेल्या चार वर्षातली हिस्टरी नाही.
<< आणि आधीच्या बायकोशी
<< आणि आधीच्या बायकोशी विवाहित असताना त्याने मुलीच्या नॅनीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले होते. आणि त्यामुळेच हे लग्न संपुष्टात आले. >>
----- चारित्र्य बघायचे असेल आणि त्यांची तुलना करायची असेल तर निवडणूकीसाठी उभ्या असणार्या उमेदवारांचे बघायचे ना? त्यांच्या बेटर हाफनी कुठे काय काय केले हे बघत बसल्यास ट्रम्पचे पहिले दोन विवाह आणि या बंधनांत अडकलेला असतांनाच अनेक वादळांना ( स्टॉर्म ) जवळ केले. नंतर वादळ शांत करण्यासाठी कोव्हेन मार्फत हश मनी द्यावे लागले.
कमला हॅरिस सती सावित्री आहे. विरोधकही तिच्या चारित्र्याबद्दल चांगलेच बोलतात.
>>
>>
चारित्र्य बघायचे असेल आणि त्यांची तुलना करायची असेल तर निवडणूकीसाठी उभ्या असणार्या उमेदवारांचे बघायचे ना? त्यांच्या बेटर हाफनी कुठे काय काय केले हे बघत बसल्यास ट्रम्पचे पहिले दोन विवाह आणि या बंधनांत अडकलेला असतांनाच अनेक वादळांना ( स्टॉर्म ) जवळ केले. नंतर वादळ शांत करण्यासाठी कोव्हेन मार्फत हश मनी द्यावे लागले.
<<
राजकारणात नसताना ट्रंप अनैतिक वागला होता ह्यात शंका नाही. पण त्याला पौरुषाचा नवा आदर्श घालून देणारा पुरुषोत्तम म्हणून डोक्यावर घेऊन त्याच्या लडिवाळ मुलाखती घेत नाहीत.
डग एम्हॉफच्या असले कर्तृत्व असताना त्याला रिडिफायनिंग मॅस्क्युलिनिटी वगैरे गोड गोड पदव्या देऊन त्याच्या मुलाखती का घेतल्या जातात? त्याला एक अनैतिक माणूस म्हणून दुर्लक्षित का ठेवले जात नाही?
पुन्हा एकदा कुत्री मांजरी
पुन्हा एकदा कुत्री मांजरी खाण्याबद्दल. त्या गावच्या, राज्याच्या सरकारी अधिकार्याने असा दावा केलेला नाही की एकाही हेती हून आलेल्या उपर्याने कुत्री, मांजरी आणि बदके खाल्ली नाहीत. उलट फक्त विश्वसनीय पुरावा (क्रेडिबल एव्हिडन्स) नाही एवढेच म्हणत आहेत. पण विश्वसनीय पुरावा केव्हा मिळेल? जर संबंधित प्राण्याच्या मालकाने पोलिसात तक्रार केली तरच. एकंदरीत अमेरिकेत पोलिस गुन्ह्याचा तपास करतात तो ही इतक्या क्षुल्लक गोष्टीचा ह्यावर लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे असल्या प्रकरणात चार शिव्या हासडून आपल्या नशिबाला दोष देत संबंधित व्यक्ती त्याकडे दुर्लक्ष करणे शक्य आहे.
तरी अनेक खाजगी ब्लॉगर्स जेव्हा जेव्हा त्या गावातील गावकर्यांच्या मुलाखती घेतात तेव्हा तेव्हा ते प्राणी खाल्ल्याच्या तक्रारी करतात.
सरकारी अधिकार्यांचे नरो वा कुंजरो वा बोलणे हे १००% सत्य आणि गावकर्यांचे बोलणे हे १००% खोटे असा दावा असेल तर बोलणेच खुंटले.
>>कमला हॅरिस सती सावित्री आहे
>>कमला हॅरिस सती सावित्री आहे. विरोधकही तिच्या चारित्र्याबद्दल चांगलेच बोलतात.
हो का? राजकारणात प्रवेश घेताना राजकीय स्वार्थ साधायला एका विवाहित, म्हातार्या माणसाशी लग्न न करता संबंध ठेवणे म्हणजे सती सावित्री असण्याची नवी व्याख्या आहे का?
सॅन फ्रॅन्सिस्कोच्या विली ब्राऊनशी कमलाबाईने आपल्या राजकीय पदार्पणातच संबंध ठेवून त्या बदल्यात लठ्ठ पदे मिळवली हे इथल्या लोकांना व्यवस्थित माहीत आहे. फक्त सध्या माध्यमे हे पुन्हा चर्चेत येणार नाही ह्याची खबरदारी घेत आहेत.
सॅन फ्रॅन्सिस्कोच्या विली
सॅन फ्रॅन्सिस्कोच्या विली ब्राऊनशी कमलाबाईने आपल्या राजकीय पदार्पणातच संबंध ठेवून त्या बदल्यात लठ्ठ पदे मिळवली >>> निषेध!! शेंडे किती खालच्या थराला जाल ?
"इथल्या लोकांना व्यवस्थित माहीत आहे." >>> कुठल्या लोकांना ?? एक बाई इतक्या वर जाते म्हणाजे नक्की कुणा कुणाला "खूष करूनच" तिथे पोहोचली असणार, दुसरा काही मार्गच असू शकत नाही अशा विचारसरणीच्या सेक्सिस्ट, रेसिस्ट बुरसटलेल्या खोडांनाच ना? आणि अशा विचारांचे उघड उघड समर्थन करणे तुम्ही भूषणावह समजता?! डिसगस्टिंग !
काही महिन्यापूर्वी हत्येचा
काही महिन्यापूर्वी हत्येचा प्रयत्न ज्या गावात झाला तिथेच पुन्हा एक रॅली घेऊन ट्रंपने आपली जिद्द पूर्ण केली.
आधीच्या रॅलीपेक्षा कितीतरी जास्त गर्दी ह्या रॅलीला होती. इलॉन मस्कने उपस्थित राहून आणखी गंमत आणली.
ट्रंपने भाषणाची सुरवात "तर मी काय म्हणत होतो..." अशी करून "त्या" चार्टकडे बोट दाखवले ज्याच्याकडे ऐनवेळी वळून बघितल्यामुळे जिवावरचे कानावर निभावले! जबरदस्त!
मुख्य प्रवाहातील पूर्वग्रहदूषित माध्यमांनाही ह्या रॅलीबद्दल बोलणे भाग पडले. नाहीतर इतका गंभीर प्रसंग आता पूर्ण विसरून टाकला गेला आहे.
बायडन सरकारने जाणून बुजून केलेल्या ढिसाळपणामुळे ट्रंप मरता मरता थोडक्यात वाचला.
जेव्हा ट्रंपवर गोळीबार झाला तेव्हा तो मारेकरी क्रूक्स एका इमारतीच्या छपरावर चढून बंदूक रोखून व्यवस्थित गोळ्या मारता झाला. परंतु सिक्रेट सर्विसच्या प्रमुख चितळे बाईंनी म्हटले की त्या इमारतीचे छप्पर खूप उतरते होते म्हणून आम्ही तिथे कुणी रक्षक तैनात केले नव्हते. धन्य आहेत!
पण ह्यावेळेस सिक्रेट सर्विसच्य लोकांना प्रचंड ट्रेनिंग दिले असावे कारण त्या भयंकर उतरत्या छपरावर जीवाची पर्वा न करता कही रक्षक उभे होते! किती दैदीप्यमान प्रगती केली आहे. एका विशीच्या अननुभवी कार्ट्याइतकी हिंमत दाखवू शकले. आपले करदात्यांचे लाखो डॉलर्स शेवटी उपयोगी पडले.
>>
>>
सॅन फ्रॅन्सिस्कोच्या विली ब्राऊनशी कमलाबाईने आपल्या राजकीय पदार्पणातच संबंध ठेवून त्या बदल्यात लठ्ठ पदे मिळवली >>> निषेध!! शेंडे किती खालच्या थराला जाल ?
<<
मी खालच्या थराला गेलो नाही. कमलाबाई खालच्या थराला गेली आहे. कुणी मुलाखतकार ह्या प्रकरणाबद्दल प्रश्न विचारणार नाही.
उगाच आदळआपट, कांगावा, रडारड, स्त्रीस्वातंत्र्य वगैरे बोंब मारून वस्तुस्थिती बदलत नाही.
होय, कमलाबाईने आपले शरीर वापरून आपला राजकीय स्वार्थ साधला.
स्थानिक सॅन फ्रान्सिस्को वासी, कॅलिफोर्नियावासी, जे ह्या सुमारास राजकारणात काय चालले आहे ह्याकडे लक्ष ठेवून होते त्यांना ह्या प्रकरणाची लफड्याची व्यवस्थित माहिती आहे.
<<डोक्यावर घेऊन त्याच्या
<<डोक्यावर घेऊन त्याच्या लडिवाळ मुलाखती घेत नाहीत.>>
आहेत हो, पुष्कळ लोक आहेत त्रंप्याला डोक्यावर घेऊन नाचणारे. तुम्ही जरा यू ट्यूबवर जोर्डन क्लेप्पर चे इंटर्व्यू पहा - लोक किती त्रंप्याला चांगले म्हणतात. तुम्ही किनई, तसल्या लोकांच्यात जा - तिथे तुमच्यासारखे लोक तुम्हाला भेटतील. तकर कार्ल्सन, शॉन हॅनिटी, लेव्हिन इ. लोकांचे ऐका.
तुम्ही अजून त्रंप्याचे स्नीकर्स, बायबल वगैरे विकत घेतले का? की उगीचच त्रंप्या किती चांगला म्हणायचे नि पैसे द्यायची वेळ आली की गप्प?
Pages