२०२४ अमेरिकेतील निवडणूक

Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42

२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.

कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

IMG_3696.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कमलाच्या भावी व्हीपी पिक मधे टिम वॉल्झ हा एक भारी वाटत आहे. त्याची बोलायची स्टाइल एकदम एंगेजिंग आहे. आणि कमलापेक्षा वेगळे डेमोग्राफिक आकर्षित करायलाही योग्य आहे.

माझेमन - इथे प्रेसिडेन्शियल कॅण्डिडेट्सना नेहमी आपण कसे मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत हे दाखवावे लागते. बाकी लोक जर बाह्या सरसावून एखाद्याच्या बॅकयार्ड मधे बार्बेक्यू करत असतील तर कमलाने कांदे चिरणे काही ऑड नाही Happy

इलेक्शन इयर मधे सगळे कॅण्डिडेट्स मध्यमवर्गीय असतात. फॅमिली व्हॅल्यूज वाले असतात. सगळे अमेरिकन्स हार्डवर्किंग असतात.

रिपब्लिकन कन्वेन्शन नंतर निर्माण झालेले चित्र झपाट्याने बदलले आहे. ट्रम्प-वान्स एकदम अनस्टॉपेबल फोर्स वाटत होता. आता बायडेन स्पर्धेतून बाहेर पडल्यावर पब्लिक एकदम कमलाच्या बाजूने उभे राहिले आहे. एका बाजूने डेम्स वाले व्हान्सच्या सगळ्या आधीच्या क्लिप्स, इमेल्स बाहेर काढत आहेत तर दुसर्‍या बाजूला मागावाले ही "हा आपल्यातला नाही" हे सांगत आहेत. तर तिकडे ओहयो, वेस्ट व्हर्जिनिया वालेही त्याला नीट ओळखत नाहीत. तात्याला मदत होण्यापेक्षा त्याच्यावरचे बॅगेज वाढले आहे.

इलेक्शन इयर मधे सगळे कॅण्डिडेट्स मध्यमवर्गीय असतात. फॅमिली व्हॅल्यूज वाले असतात. सगळे अमेरिकन्स हार्डवर्किंग असतात. >> Lol

कमलाच्या भावी व्हीपी पिक मधे टिम वॉल्झ हा एक भारी वाटत आहे. त्याची बोलायची स्टाइल एकदम एंगेजिंग आहे. >> एकदम एंगेजिंग शैली आहे. त्याच्या एव्हढे टोकदार फक्त पीट बोलू शकतो. (अर्थात तो नसेल ह्याची खात्री आहे)

वान्सचा एव्हढा गदारोळ् सुरू आहे कि तात्याच्या जागी तोच प्रेसीडेंशियल कॅंडीडेट आहे असा समज होईल कोणाचा Wink

इलेक्शन इयर मधे सगळे कॅण्डिडेट्स मध्यमवर्गीय असतात. फॅमिली व्हॅल्यूज वाले असतात. सगळे अमेरिकन्स हार्डवर्किंग असतात. >>> Lol Lol

बाकी वान्सच्या टीपीकल कॅट लेडी रीमार्क मूळे तात्याला जबरा चपराक बसते आहे स्विफ्टीज कडून. नुसता धुमाकूळ सुरू आहे.

बाकी व्हाईट ड्यूडस चे एक्स अकांऊट मस्क ने बॅन करणे वगैरे प्रकार गमतीशीर आहे. व्हाईट ड्यूडस फॉर कमला हा प्रकार गमतीशीर आहे खरा. ब्राऊन ड्यूडस चे ह्यावर काय म्हणणे आहे ? Happy

तात्या "ख्रिश्चनांना ह्यानंतर परत व्होट करायची गरज पडणार नाही" असे नेहमीप्रमाणे बरळून गेला. तात्याच्या किमान नि कमाल अकलेचा अंदाज असलेल्या कोणालाही "ते "तात्याच्या केऑटीक मनात आलेल्या एकाच वेळी बरेच विचार आल्यामूळे त्यातले वेगवेगळे शब्द गोळा होऊन इंग्लिश मधे बाहेर आलेले फक्त एक साधे सरळधोप विधान होते " समजायला फारसा वेळ लागणार नाही. सिनेटर कॉटन ला तो जोक वाटला हा मोठा जोक असे म्हणूया ( तात्याने आजवर प्रचारसभेमधे कधी जोक केलेला कॉटन ने ऐकलाय देव जाणे) . त्यात "मी कायम प्रेसीडंट राहणार" वगैरे वाटणे हा राजकिय प्रकाराचा भाग आहे हे उघड आहे. पण मुद्दा असा आहे कि आपले साधे विचारही स्पष्ट्पणे मांडू न शकणार्‍या व्यक्तीच्या प्रेसीडंट म्हणून असण्याच्या शक्यतेबद्दल इथे बायडनच्या वयावरून हैदोस घालणारे काय म्हणतात हे वाचायला गम्मत वाटेल. (हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तात्याच्या विचार(?) मंथनामधून अशी रत्ने सतत प्रसवतच असतात. )

त्यावर इन्ग्राम च्या मुलाखती मधे तात्याने दिलेले स्पष्टीकरण तर अ़जूनही धमाल प्रकार आहे. इंग्राम ने जवळजवळ 'तुला हे म्हणायचे आहे का' इथपर्यंत दिलेला फुलटॉस सुद्धा तात्याला घेता आला नाहीये. तो पीपल लव्ह मी वगैरे मधे रानोमाळ हरवलेला आहे. त्याला एक पन्नासेक शब्द आठवतात नि तेच तो रँडम ऑर्‍डरमधे वापरून वेगवेगळी वाक्ये बनवतो असे आता वाटायला लागले आहे.

त्रंप्याला काय म्हणायचे ते त्याचे त्यालाच माहित नसते, इतरांनी कशाला चर्चा करायची?
कुणि म्हणतं उपहास, कुणि म्हणतं विनोदाचा वेगळा प्रकार.
खरे तर ते नुसते बरळणे असते.
म्हातारा झालाय, अश्या सारख्या प्रचारसभा घेऊन झोप होत नाही नि मग बरळतो काहीच्या बाही! आणि बाकी मंडळी फुकट आपआपसात भांडत बसतात.

ते काहीच्या बाही बरळणारी व्यक्ती न्युक्लिअर बाँबचं बटण कधीही दाबू शकते असं इथे अजुन कसं कोणाला वाटलेलं नाही? नवलच आहे!

तात्याचे अजून एक म्हणजे सध्या तो टीका करत असला (आणि स्त्रियांबद्दल सध्या फक्त टीकाच करतोय, मेलानिया सोडली तर त्याने ज्यांच्याबद्दल चांगले बोलावे अशा फार स्त्रिया सध्या चर्चेत नाहीत Happy ) आणि भाषणात नाव त्याने नॅन्सी, निकी, हिलरी कोणाचेही घेतले तरी तो कमलाबद्दल बोलतोय असे समजायचे. इतकेच नव्हे तर एका भाषणात निकीने केलेली तिच्या कॅम्पेनची एक घोषणा सुद्धा कमलाच्या नावाने खपवली त्याने Happy

त्याच्या मतदारांना चालतय.
आमच्या प्रेताने बायको म्हणून दुसर्‍या कोणाचा हात धरला तर कोण गहजब केलेला! Rofl

म्हातारा म्हटला की भ्रमिष्ट असायचाच .>> भ्रमिष्ट नाही. विनोदी.
मला शेवटचा विनोद 'लायझॉल प्या' आठवतोय असाम्या. Wink

आमच्या प्रेताने बायको म्हणून दुसर्‍या कोणाचा हात धरला तर कोण गहजब केलेला! >> Lol

मला शेवटचा विनोद 'लायझॉल प्या' आठवतोय असाम्या >> अरे आपल्यासाठी नाहि म्हणत विनोद, तात्यासाठी असलेला विनोद. नाहितर आपल्यासाठी विनोदांची काही कमी नाही हे खरय Wink ७८वर्षांचा मनुष्य कमलाच्या ६० वर्षांच्या वयाबद्दल ती बरीच एज्ड आहे म्हणतो - हे अजून एक रत्न !

भाषणात नाव त्याने नॅन्सी, निकी, हिलरी कोणाचेही घेतले तरी तो कमलाबद्दल बोलतोय असे समजायचे. >> नुसते तेव्हढेच नाही कमला, कॅमला, कामला, कॉम ला किंवा क म किंवा ल असलेला काहीही शब्द वाप्रला तरी तेच समजायचे म्हण Wink

हो Happy तरी कमाला राहिली.

आपल्याकडे "शरद कमळ बघ" अशी स्लोगन पूर्वी आली होती तशी इथे भिंतींवर "तात्या कमला म्हण" अशी लिहायला हवी Happy

कमाला मला फार आवडतं. ते त्यात्याच्या अ‍ॅक्सेंट मध्ये ऐकलं की डायरेक गुदगुल्याच होतात. Lol
विवेकामुंमंद Rofl आणि आपली सुलवार डोलाSन ट्रंप म्हणत्येय Biggrin
नानूची नाटक कंपनी!

Lol

तात्याचा राग त्याचा लाइमलाइट गेल्याबद्दल आहे असा मला दाट संशय आहे. एवढी कानावर गोळी झेलली म्हणून उदोउदो व्हायचा तर ते नाही, एकदम लाफिंग कमलाच चर्चेचा विषय झाला!

तात्याचा राग त्याचा लाइमलाइट गेल्याबद्दल आहे असा मला दाट संशय आहे. एवढी कानावर गोळी झेलली म्हणून उदोउदो व्हायचा तर ते नाही, एकदम लाफिंग कमलाच चर्चेचा विषय झाला! >> यू आर म्हणिंग राईट. Happy लाफिंग कमला वरून कमला खूशच झाली म्हणून अधिकच चीडचीड झाली असेल. काही कॅची नेम जमले नाही तात्याला ह्यावेळी. व्हायचेच वयोमानानुसार

कमला हॅरिसचा VP उद्या पर्यंत समजेल. कोण असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बायडनने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. माघार घेणार नाही म्हणून शेवट पर्यंत ताणून धरले. तिकडे ट्रम्पने आपला VP जाहिर केला, जो आता लायाबिलीटी ठरत आहे. बायडन यांनी एव्हढा कमी वेळ ठेवला होता कि कमलाशिवाय डेमोक्रॅटसच्या इतर इच्छुक उमेदवारांना विचार करायची संधी पण दिली नाही. ट्रम्पचे बायडन सेंट्रिक जाहिरात मोहीम आता काही कामाची नाही.

निवडणूकीत आता जान आली आहे.

रिपबलिकन कन्वेन्शन व व्हान्सच्या निवडीनंतर निर्माण झालेले चित्र किती झपाट्याने बदलले! ट्रम्प व व्हान्स दोघांनी त्या कन्वेन्शन मधून मिळालेला फायदा टोटली फुकून टाकला आहे. आणि डेम्स साइडला प्रचंड रिसर्जन्स आला आहे.

व्हान्सची आधी बोललेली काही वाक्ये आता बाहेर निघत आहेत. तर तात्याने कन्व्हेन्शनमधे सुमारे अर्धा तास दाखवलेली प्रगल्भता नंतर गुंडाळून ठेवली आहे. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्ट्स च्या प्रश्नोत्तरांमधे दिलेली अफलातून उत्तरे व नंतर अटलांटाच्या सभेत केलेले टोटल रॅम्बलिंग व त्याहून म्हणजे जॉर्जिया ऑल्मोस्ट खिशात असताना व काही गरज नसताना उकरून काढलेले केम्प विरूद्धचे भांडण. ते ही एकदम चीप पद्धतीने.

फॉक्स व नॅशनल रिव्यू मधे "क्रिंज" प्रतिक्रिया पाहिल्या की लक्षात येते. बिल ओ रायली, हॅनिटी, लिंडसी ग्रॅहॅम व रामस्वामी सगळे टोन डाउन करायला सांगत आहेत.

तात्या व्हान्सला डच्चू देईल का? व्हान्स मुळे त्याला काही खास फायदा झाल्याचे दिसत नाही. उलट त्यालाच डिफेण्ड करावे लागत आहे व्हान्सला.

कमला ब्लॅक की भारतीय याबद्दलच्या प्रश्नांनी तर रिपब्लिकन नेत्यांचे अगाध अज्ञान रोज समोर येत आहे. बाकी "फ्लोरिडामधली केस मी जिंकलो" वगैरे नेहमीच्या थापा तर आहेतच. कमलाच्या विरोधात इतके दिवस फालतू कॉमेण्ट्सव्यतिरिक्त काही रिसर्च केलेला दिसत नाही. २०१६ मधे हिलरीविरूद्द वातावरण तापवायला २-३ वर्षे मिळाली होती. कमला अचानक पुढे आली. या बदलामुळे त्यांची झालेली पंचाईत ट्रम्पच्या NABJ मधल्या एका उत्तरात दिसली होती. इतर लोक हे जाहीर बोलत नाहीत पण ट्रम्पच्या अनफिल्टर्ड बोलण्यामुळे हे लगेच कळते.

>>>>>>तर तात्याने कन्व्हेन्शनमधे सुमारे अर्धा तास दाखवलेली प्रगल्भता नंतर गुंडाळून ठेवली आहे.
Lol

काही म्हणा - त्रंप्या हरला की परत एकदा दंगली सुरु होणार.
या वेळी जरा जास्तच.
मागे हिलरी हरली कारण जरुरीपेक्षा जास्त आत्मविश्वास. याहि वेळी असले काही झाले, तर त्रंप्या निवडून येऊहि शकतो.

वॉल्टझ उत्तम निवड आहे. बेस मध्ये कोण त्याला विरोध करणारे नाहीत (इजरायल पॅलेस्टाईन ई. विषयांवरून). शिवाय व्हान्स बद्दल wierd शेरा मारणारा तोच Happy

Pages