Submitted by उपाशी बोका on 28 June, 2024 - 09:42
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अमित, मी अॅन कोल्टरसारख्या
अमित, मी अॅन कोल्टरसारख्या फडतुस बाइच्या कॉमेंट्स/ मताला ( फारएन्डच्या चित्रपटाच्या नियमांबद्दलच्या फनी लेखात असलेल्या
) फुट्या कवडीचीही किंमत देत नाही.तिला ट्रंपसारखा माणुसही फाट्यावर मारतो ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
राज तुर्तास रुमाल! आज मी कॅनडाच्या बँफ नॅशनल पार्क/ योहो नॅशनल पार्कला व्हेकेशनवर निघालो आहे. ( जॅस्पर व जॅस्पर नॅशनल पार्कलाही जाणार होतो व तिथले एअर बी अँड बी चे बुकींगही होते पण दुर्दैवाने गेल्याच महिन्यात जॅस्पर गाव वाइल्ड फायरमधे जळुन बेचिराख झाले
)
आल्यावर त्या मुद्द्यांवर व इतर काही महत्वाच्या मुद्द्यांवर जरुर चर्चा करु.
शेंडेनक्षत्र, आता या हो.
शेंडेनक्षत्र, आता या हो. तुमच्या बाजूचे एक दोन लोक इथे आले आहेत.
कमलाला काही करता येणार नाही. इमिग्रेशन, इन्फ्लेशन, गन कंट्रोल हे प्रश्न इतके गहन आहेत की कुणालाच काही करता येणार नाही.
हे प्रश्न कुणि "सोडवत" नाहीत. परिस्थिती बदलत रहाते नि काही काही गोष्टी आपोआप होतात, मग त्याचे श्रेय घेण्यावरून भांडणे.
कुठलाहि राजकारणी जनतेसाठी काही करायला राजकारणात पडतच नाही. निरनिराळ्या प्रकारे स्वतःचा फायदा करून घेता यावा म्हणून राजकारणात घुसतात. तेंव्हा कुणि निवडून येईल नि आपले भले करेल असे नसते. आपणच स्वतः बदलती परिस्थिती बघून आपली काळजी घ्यावी.
राज, कोव्हीड मध्ये सप्लाय चेन
राज, कोव्हीड मध्ये सप्लाय चेन disrupt झाली होती. त्यामुळे इनफ्लेशनरी इकोनोमी बायडेनने inherit केली हे खरेच आहे. त्यापलीकडे ट्रम्पने काय पॉलिसी सुचवल्या आहेत इन्फलेशन आटोक्यात आणायच्या?
बाकी फोरकास्ट मध्ये इन्फलेशन २% वर येईल असे दिसत आहे.
मिशेल आणि तिची स्पीचेस कोण
मिशेल आणि तिची स्पीचेस कोण लिहितं ते! _/\_ >> Sarah Hurwitz होती नि तीच अजून असावी असे एकंदर तिच्या भाषणांमधले tricolon नि anaphora वापरलेले बघून वाटते.
Buttigieg चे पण मस्त वाटले. किती सीमलेसली त्याने तात्याच्या डार्क स्पीच मधला काँट्रास्ट दाखवला घरगुती उदाहरणे देऊन . पॉलिटिक्स पर्सनल ठेवताना दिलेला मास्टरक्लास होता. Walz ने फूटबॉल मेटाफोर वापरून धमाल केली. जगबुडी आली आहे नि एकच तारणहार वाचवू शकतो ह्या टोनपेक्षा किती रेफ्रेशिंग प्रकार होता.
>>Submitted by मुकुंद on 22
>>Submitted by मुकुंद on 22 August, 2024 - 16:57>> पोस्ट आवडली.
>> किराणा मालावर प्राईस कंट्रोल !>> बर्याच राज्यात दोन्ही पार्टीजनी सत्तेत असताना केलेले price-gouging laws आधीच आहेत. त्यात काय काय कव्हर होते ते वेगवेगळे आहे पण कायदे आहेत.
किमती कंट्रोल केल्या की माल
किमती कंट्रोल केल्या की माल दुकानातून नाहीसा होईल, मग काळा बाजार! १९५० चा भारत!
तसाहि हा देश एकूणच पूर्वीच्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज पेक्षा भिकार व्हायला लागला आहे.
आता भारतात घरे घ्या!
२०२० निवडणूकीत, ट्रम्पला
२०२० निवडणूकीत, ट्रम्पला मतदान करणारे ७४ मिलीयन मतदार होते. ' americans must listen to each other more...' असे ओबामा म्हणाले होते, म्हणून शेंडे नक्षत्रांची मते जाणून घ्यायला आवडतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिसींग शेंडेनक्षत्र.
>>राज, कोव्हीड मध्ये सप्लाय
>>राज, कोव्हीड मध्ये सप्लाय चेन disrupt झाली होती. त्यामुळे इनफ्लेशनरी इकोनोमी बायडेनने inherit केली हे खरेच आहे. <<
साफ चूक. कोविड पीक वर होता २०१९-२०, त्यानंतर तो कमी-कमी होत गेला. २०२०च्या अखेर (ट्रंप प्रेसिडेंसी) पर्यंत इन्फ्लेशन रेट १.५च्या खाली घुटमळत होता. बाय्डन अॅडमिनिस्ट्रेशन आल्यापासुन (२०२१) इन्फ्लेशन रेटने जी उचल घेतली ती पार ७-८ टक्क्यांपर्यंत. सप्लाय चेनचा इशु वर्ल्डवाइड असुनहि आशियायी देश रेट आटोक्यात आणतात पण अमेरिकेला ते का जमलं नाहि हा संशोधनाचा विषय आहे..
इन्फ्लेशन कंट्रोल करण्याचा ट्रंपचा ट्रॅक रेकर्ड आहे. लुक इट अप..
बाय्दवे, मी वर फॉरेन पॉलिसीचा मुद्दा आणला नाहि, कारण हॅरिस-वॉल्झ कडुन काहि अपेक्षाच नाहि. परंतु, ट्रंप निवडुन आला तर युक्रेन-रश्या, हमास-इझ्रेल-इराण सगळे लाइनिवर येतील...
भगवद्गीतेच्या पाचव्या
भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायात एका श्लोकातील ओळ अशी आहे:
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा
अर्थात, जसे कमलपत्र पाण्यात राहून कोरडे राहते तसेच संत मंडळी संसारात राहून पापापासून अलिप्त असतात.
पापाची दलदल असणाऱ्या म्हातारबाच्या मंत्रिमंडळात मानाचे पान मिळालेल्या कमलाबाईचा असाच काहीसा प्रयत्न चालू आहे की त्या मंत्रिमंडळात उपराष्ट्रपती असूनही आपण कमळाच्या पानासारखे कोरडेठाक आहोत.
किती लोक हे मान्य करतील ते लवकरच कळेल!
बंदुकीत चुकून दिवाळीतल्या
बंदुकीत चुकून दिवाळीतल्या केपांचं कार्ट्रिज रिप्लेस झालं की काय!
आता गं बया! दाजी आले!
आता गं बया! दाजी आलं! हे म्हणजे एनआरए च्या ऑफिस मध्ये जावे आणि अध्यक्ष ए आर१५ ला झाडू बांधून पंखा पुसताना दिसावा असा झालाय!
या शेंडेनक्षत्र.
या शेंडेनक्षत्र.
एक उपकार करा - या अमेरिकेच्या राजकारणातल्या चिखलात बिचार्या श्रीमद्भगवगीतेला आणू नका.
खुद्द श्रीमद्भगवगीतेला काहीहि फरक पडत नाही, पण उगाचच त्या भल्या ग्रंथाला का चिखलात आणता?
तुम्हाला कमला आवडत नसेल तर असू दे. तुम्हाला गुन्हेगार, सैनिकांना लूजर म्हणणारा, बायकांवर बलात्कार करणारा, पैशाची अफरातफर करणारा असली माणसे आवडतात तरी असू देच म्हणेन मी!
बोलून चालून चिखलातले प्राणी - कोण उजवा नि कोण डावा!!
झक्की, अहो स्वँप ड्रेन
झक्की, अहो स्वँप ड्रेन करायला उतरलेले महात्मे आहेत. चिखल लागणारच ना हो.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आयला, ट्रंप सारख्या जगातले
आयला, ट्रंप सारख्या जगातले सगळे दुर्गुण असलेल्या व दुनियाभरची पापे केलेल्या माणसाच्या अंधभक्तांनी दुसर्यांना पापी म्हणणे म्हणजे फार मोठ्ठा विनोदच आहे राव! अर्थात ज्यांची पानेच्या पाने असलेल्या सगळ्या पोस्टी विनोदी व करमणुकीने भरलेली असतात त्यात अजुन एका विनोदी पोस्टीची भर!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
राज, तुझा प्रश्न १: इन्फ्लेशनः
राज, तु आजचा इन्फ्लेशनचा आकडा पाहीला आहेस का? का तु पण फॉक्स/न्युजमॅक्स च्या घिसापिट्या प्रोपोगँडा च्या जाळ्यात अडकला आहेस? तरीसुद्धा तुझ्यासाठी, लेटेस्ट इन्फ्लेशन नंबर- २.८९% अँड फॉलींग! गेल्या ३ वर्षात बायडन-हॅरीस अॅडमिनिस्ट्रेशनने तो कसा खाली खेचुन आणला आहे ते बघ! २०२१ मधे ७.५% , २०२२ मधे ६.५ %, २०२३ मधे ३.५ % व आता २.९%!
याचा अर्थ स्पष्ट आहे. ट्रंपने पँडेमिक मधे अमेरिकेचा जो अक्षरशः बट्ट्याबोळ केला होता तो बट्ट्याबोळ बायडन- हॅरीसने इनहेरीट केला.
२: आता तुझा दुसरा इल्लिगल इमिग्रेशनचा प्रश्न.
मी इथे १९८५ पासुन आहे. तेव्हापासुन रेगन अॅडमिनिस्ट्रेशन( रिपब्लिकन-८ वर्षे), सिनिअर बुश( रिपब्लिकन-४ वर्षे), क्लिंटन( डेमोक्रॅट्स- ८ वर्षे), ज्युनिअर बुश( रिपब्लिकन- ८ वर्षे), ओबामा( डेमोक्रॅट- ८ वर्षे) , ट्रंप( रिपब्लिकन - ४ वर्षे), बायडन( डेमोक्रॅट- ४ वर्षे) - इतके दोन्ही पक्षातले प्रेसिडेंट्स व दोन्ही पक्षांचे अॅडमिनिस्ट्रेशन्स येउन गेली. पण रिपब्लिकन पक्षाने २४ वर्ष सत्तेवर असुन काय केले?( मुंबईच्या स्लँग भाषेत बोलायचे तर काय केले त्यांनी?) त्याचे उत्तर दे आधी. ( दिवारमधे अमिताभ ज्या स्टाइलमधे म्हणतो तसेच काहीतरी " जाव और पहले उन लोगोंका साइन लेके आओ जिन लोगोंने मेरे हाथ पर ये लिखा था की तेरा बाप चोर है!) थोडक्यात रिपब्लिकन पक्षालाही हा इमिग्रेशन प्रश्न सोडवण्यात रस नाही. रिपब्लिकन पक्षाला साथ देणार्या बिझिनेस वर्गाला मग चिप लेबर कस बर मिळणार? प्लिज! हे समजण्याइतका तु नक्कीच हुशार आहेस राज!
बायडन ने आणलेले बॉर्डर बिल
बायडन ने आणलेले बॉर्डर बिल हया लोकांनी आपल्या हाता्टून मुद्दा जाईल म्हणून हाणून पाडले.
आणि ट्रम्प टॅक्स कट सोडून दुसरे काय करणार आहे? इन्फलेशन वर काय पॉलिसी आहे त्याची का नुसता दोषारोप? का ट्रम्प कडे जादु आहे कीं तो व्हाईटहाऊस वर आला कीं इन्फलेशन डाऊन येते?
>बायडन ने आणलेले बॉर्डर बिल
>बायडन ने आणलेले बॉर्डर बिल हया लोकांनी आपल्या हाता्टून मुद्दा जाईल म्हणून हाणून पाडले.
टू बी फेअर
१ त्या बिलात बॉर्डर सोडून दुसरेच पोर्क भरलेले होते.
२ क्लीन बॉर्डर बिल चक शुमर च्या टेबलावर पडून आहे.
३ ट्रंप कोणत्याही पदावर नाही, तरीही तो एक बिल हाणून पाडू शकतो इतका शक्तीशाली अहे ? मग बायडेन सरळ राजिनामा देऊन ट्रंप ला का बसवत नाही ?
४ एक्झुकेटिव्ह ऑर्डर सारखे मार्ग बायडेन ला उपलब्ध होते/ आहेत.
ट्रम्पने हया बिलाला मत देऊ
ट्रम्पने हया बिलाला मत देऊ नका असे रिपब्लिकन नेत्यांना सांगितले. बरेचसे gop नेते ट्रम्पला भिऊन असतात. कारण प्रायमरी मध्ये विरोधी कॅन्डीडेटला सपोर्ट करून ट्रम्प पत्ता कट करू शकतो.
दुसरेच पोर्क भरले असेल तर त्यावर चर्चा करायची असते. हवेतून तुमच्या मनासारखे बिल प्रकट होतं नसते.
बायडनला जे मार्ग होते ते ट्रम्पला नव्हते का? मग त्याने वॉल वॉल पुढे केले काय? कायद्यात बदल करणे, असायलम सिकिंग हा मुख्य रिफॉर्म आहे ज्यावर बॉर्डर बर्डर करणार्यांनी आग्रही असायला हवे. ट्रम्प ने काय केले त्याबाबतीत? काहीच नाही. बायडेन ने जे बिल आणले ते उलट फेल करायला लावले.
बाकी, डेमोक्रॅटिक पार्टी बॉर्डर बद्दल आगरही नाही हे स्पष्ट आहे. तो डेम्सचा प्रमुख पार्टी प्लॅटफॉर्म अजिबात नाहीये. ऑन द आदर हॅन्ड बॉर्डर हा जिओपीचा मोठा इशू आहे. मग बायदन का बुवा executive ऑर्डर काढेल? ज्यांना हवे आहे ते नुसते दंगा करतात, लेजिसलेटिव्ह अचिव्हमेंट घंटा. नुसते बोनबलायचे.
३ ट्रंप कोणत्याही पदावर नाही,
३ ट्रंप कोणत्याही पदावर नाही, तरीही तो एक बिल हाणून पाडू शकतो इतका शक्तीशाली अहे ? मग बायडेन सरळ राजिनामा देऊन ट्रंप ला का बसवत नाही ? >> विकु किती बाळबोध प्रश्न विचारता राव ! ही अपेक्षा कमीत कमी तुमच्याकडून नव्हती.
बिलात संबंध नसलेल्या गोष्टी
बिलात संबंध नसलेल्या गोष्टी भरुनच ती पास होतात ही सुद्धा अगदीच बेसिक गोष्ट आहे अमेरिकन राजकारणातील.
>>ट्रंपने पँडेमिक मधे
>>ट्रंपने पँडेमिक मधे अमेरिकेचा जो अक्षरशः बट्ट्याबोळ केला होता तो बट्ट्याबोळ बायडन- हॅरीसने इनहेरीट केला.<<
मी लिहिलंय वर पुराव्यानिशी. ट्रंपच्या प्रेसिडेंसी अखेर अॅवरेज रेट १.२ होता - दॅट वाज व्हॉट बाय्डन इन्हेरिटेड. हा चार्ट बघ एकदा; यापेक्षा सोप्प्या भाषेत मी समजवु शकत नाहि..
>>थोडक्यात रिपब्लिकन पक्षालाही हा इमिग्रेशन प्रश्न सोडवण्यात रस नाही.<<
या प्रश्नाकडे तु कुठल्या बाजुने बघतोस त्यावर उत्तर अवलंबुन आहे. डेम्सना इल्लीगल्/अन्डॉक्युमेंटेड इमिग्रंट्सना नॅचरलाय्ज करायचं आहे, याउलट रेप्सना इमिग्रेशन रिफॉर्म्स आणुन त्यावर पायबंद घालायचा आहे, प्लस लिगल इमिग्रंट्स्ना प्रमोट करायचं आहे. तु रेगन पासुन उदाहरणं दिलिस, पण त्यावेळेस हा इशु ऐरणीवर आला न्हवता. जेडब्ल्युने सुरुवात केली ड्रग्स कार्टेल्स्चं ऑपरेशन्स याचा बायप्रॉडक्ट असल्याने. ट्रंप वाज मोर अग्रेसिव, पण वॉल बांधण्यावरुन त्याची खिल्ली उडवण्यात आली. डेम्स्च्या पुअर बॉर्डर पॉलिसिजमुळे आलेले लोंढे अॅबट/डिसँटिसने सँक्च्युअरी सिटीजना पाठवले, हि ताजी घटना. आणि तु ज्या बिलाचा उल्लेख केला आहेस त्याचं टाइमिंग पहाता त्याला पोलिटिकल गिमिकपेक्षा दुसरं नांव सुचत नाहि..
फुल डिस्क्लोजर - मी डेम्स सपोर्टर एव्हढा हुशार नाहि याची कल्पना आहे. चीप लेबर मिळावं (भविष्यात वोटरबेस एस्टॅब्लिश करावा; इकानमी, होमलँड सिक्युरिटी गेली तेल लावत..) म्हणुन बॉर्डर खुली केली जावी हा विचार अंमलात आणण्याची हुशारी माझ्यात नाहि हे मी जाहिररित्या कबूल करतो...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
<< पण रिपब्लिकन पक्षाने २४
<< पण रिपब्लिकन पक्षाने २४ वर्ष सत्तेवर असुन काय केले?>>
हा प्रश्न थोडासा बदलून असे विचारा की सामान्य माणसासाठी काय केले?
रेगनने itemized deduction मधे medical expenses ५% ऐवजी ७.५% पेक्षा जास्त असले तरच deduct करता येतात, असा कायदा केला. त्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले. त्रंप्याने itemized deduction मधे जे बदल केले त्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान झाले.
असो.
एकूणच रेगॅनॉमिक्स - ट्रिकल डाउन, यावर रिपब्लिकनांचा जास्त विश्वास आहे, पण प्रत्यक्षात तसे घडले की नाही याचा अभ्यास कुणि केला आहे का? अजूनही हेच तत्व लागू पडते का? या गोष्टींचा विचार झाला आहे का? काही आकडे आहेत का?
या शिवाय इतरहि काही प्रश्न आहेत नि ते सोडवले पाहिजेत असे कुणा रिपब्लिकनाच्या ध्यानात येत नाही.
त्रंप्याचे बाळबोध विचार असे की परकीय मालावर टॅरिफ वाढवली की सगळा माल अमेरिकतच तयार करावा लागेल म्हणजे अमेरिकन लोकांना जास्त नोकर्या मिळून त्यांचे कल्याण होईल. चूक नाही, पण याचे इतर काय परिणाम होतील याचा सर्वांगीण अभ्यास कुणि केला आहे का? तसे खरोखर झाले का? हे कुणी तपासले आहे का?
डेमोक्रॅट्स तर फक्त LGBTQ नि परकीय देशांना मदत नि अधिकाधिक परकीय लोकांना कायदेशीर किंवा बेकायदेशीरसुद्धा अमेरिकेत कसे आणता येईल, यातच गुंतले आहेत. बाकी काही नाही.
एकूण कुठलाच राजकीय पक्ष एखाद्या विषयाचा अभ्यास करून त्यातले प्रश्न सोडवण्यासाठी काही करत नाही.
जोपर्यंत मॅट गेत्झ, MTG, Bobart असले लोक house of representative मधे आहेत तोपर्यंत काहीहि होणार नाही.
मला अर्थशास्त्रातले काSSहिही कळत नाही, पण ज्यांना कळते ते सांगतील का?
इमिग्रेशनच्या प्रश्नामधे
इमिग्रेशनच्या प्रश्नामधे ड्रग्स हा एक मोठा भाग आहे असे माझे मत आहे. या देशातले अर्द्याहून अधिक लोक ड्रग्स च्या आधीन आहेत. या देशात द्रग्स करायला बंदी आहे, जोपर्यंत डॉन ज्युनियर नि हंटर बायडेन सारखे व इतर ड्रगचे चहाते आहेत तोपर्यंत या बाबतीत काहीहि होणार नाही.
बाकी घरचे संडास साफ करणारे, लॉन कापणारे असले लोक कायदेशीर रीत्या आले तर कुणाची हरकत नसावी.
कॅनॉट वेट फॉर द प्रेसिडेंशियल
कॅनॉट वेट फॉर द प्रेसिडेंशियल डिबेट...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॅनॉट वेट फॉर द प्रेसिडेंशियल
ड्पो
"Statistics are like a bikini
"Statistics are like a bikini. What they reveal is interesting. But what they hide is vital."
राज, Aaron Levenstein या बिझिनेस प्रोफेसरचा वरचा फेमस quote तुला माहीत असेलच!
तु दिलेल्या कोष्टकाचे अगदी तसेच आहे!![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नंद्या म्हणतात तसेच मीही काही एक्स्पर्ट अर्थशास्त्रज्ञ नाही पण इन्फ्लेशन व त्यामागची कारणे न समजण्याइतका बावळट व नाइव्ह तर नक्कीच नाही. मायबोलीवर अर्थशास्त्राचे अधिक ज्ञान असलेले एक्स्पर्ट यावर जास्त प्रकाश टाकु शकतील किंबहुना त्यांनी अधिक प्रकाश टाकावा असे मी त्यांना आवाहन करीन.
माझ्या अल्पमतीनुसार मला इन्फ्लेशन बद्दल जे माहीत आहे ते तुला सांगतो. एक्स्पर्ट्सनी त्यात जरुर दुरुस्ती करण्यात माझी मुळीच् हरकत नाही. तेवढीच आम्हा पामरांच्या ज्ञानात भर पडेल.
इन्फ्लेशन कमी व जास्त होणे हे बर्याच बाबींवरती अवलंबुन असते. त्यात सरकारच्या हातात (म्हणजे सरकारचा त्या इन्फ्लेशन नंबरला वर किंवा खाली करण्यात हातभार कसा असतो) २ गोष्टी असतात.
१: फिस्कल पॉलीसी( जे सरकार/ ट्रेझरी सेक्रेटरी ठरवतो/ठरवते)
२: मॉनीटरी पॉलीसी( जी इंडिपेंडंट पद असलेला फेडरल रिझर्व्ह चेअरमन ठरवतो बाय वे ऑफ डिसायडींग इंटरेस्ट रेट्स अँड प्रिंटींग डॉलर्स. )
या पदावरचा माणुस अमेरिकेच्या प्रेसिडेंटनेच जरी नेमलेला असला तरी प्रेसिडेंटने त्याच्या निर्णयात ढवळाढवळ( इन्फ्ल्युएन्स) करायची नाही असा ढोबळ नियम असतो जे बहुतेक यु एस प्रेसिडेंटस पाळतात.
आता आपण प्रथम फिस्कल पॉलीसीकडे बघु .फिस्कल पॉलीसीच्या मधे बरेच काही येते पण गेल्या ८ वर्षातल्या इन्फ्लेशनची आकडेवारी समजण्याकरता आपण फक्त गेल्या ८ वर्षातल्या फिस्कल पॉलीसीमधल्या त्या बाबींकडे लक्ष केंद्रित करु की जिने इन्फ्लेशन कमी/ जास्त होण्यात फरक पडला.
आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की कोव्हिड १९ मुळे जगात काय झाले. अमेरिकेत लोकांचे जॉब केले. अनएम्प्लॉयमेंट १५% पर्यंत गेले. स्टॉक मार्केट गडगडले. अमेरिकन इकॉनॉमीने नोझ डाइव्ह केले.
अश्या वेळेला ट्रंप सरकारने फिस्कल पॉलीसी मधे लोकांना फुकट पैसे वाटायचा निर्णय घेतला व ज्यांचे इन्कम वर्षाचे १५०,००० डॉलर्स पेक्षा कमी आहे अश्या फॅमीली़जना दर डोइ १२०० डॉलर्स दोन वेळा दिले. तसेच ज्यांचे जॉब गेले त्यांना बेकारी भत्ता तर दिलाच पण त्यावर दर महा १००० डॉलर्स सुद्धा देण्याचा निर्णय घेतला गेला. तो निर्णय बायडन सत्तेवर आल्यावर सुद्धा कंटिन्यु केला गेला.
तिकडे मॉनीटरी पॉलीसीने ( म्हणजे फेडरल रिझर्ह चेअरमनने) इकॉनॉमी जंप स्टार्ट करायला क्वांटीटेटिव्ह इझिंग( बाइन्ग बॅक ट्रेझरी सिक्युरीटीज) अजुन वाढवायला सुरुवात केली व इंट्रेस्ट रेट्स ऑलमोस्ट शुन्यावर आणुन ठेवले की जेणेकरुन बाजारात पैसे बॉरो करायला सोपे पडावे व बाजारात भरपुर चलन उपलब्ध असावे.. त्या गोष्टींसाठी फेडरल रिझर्व्हने भरपुर डॉलर्स प्रिंट करायला सुरुवात केली.( खर म्हणजे या दोन गोष्टी.. क्वांटीटेटिव्ह इझिंग व रिड्युसिंग इंटरेस्ट रेट्स २००८-०९ च्या ग्रेट फायनॅन्शिअल क्राइसिस पासुन सुरु झाल्या होत्या पण पँडेमिक मुळे त्या दोन गोष्टीच्या शिडात परत एकदा नव्या जोराने वारे भरले!)
हा एवढा मोट्ठा फिस्कल स्टिम्युलस, क्वांटीटेटिव्ह इझींग व झिरो परसेंट इंटरेस्ट या तिन गोष्टींचा एकत्र परिणाम म्हणजे बाजारात आलेला एक्स्ट्राचा पैसा! यामुळे इकॉनॉमी जंप स्टार्ट जरी झाली तरी त्यामुळे बाजारात चलनवाढ( इन्फ्लेशन) झाली नसती तरच नवल होते! परिणामी २०२१ मधे इनफ्लेशन ८% पर्यंत वाढले हे सगळ्यांना माहीतच आहे.
मग ते कण्ट्रोल मधे आणायला फेडरल रिझर्व्हने एकदम त्यांच्या मॉनीटरी पॉलीसी मधे यु टर्न करुन भराभर इंटरेस्ट् रेट वाढायला सुरु केले व त्याची परिणती तो रेट २ वर्षात ऑल्मोस्ट शुन्यावरुन ५ टक्क्याच्या वर गेला!त्यामुळे इन्फ्लेशन रेट ७.५ वरुन आता २.९ पर्यंत येउन ठेपला आहे.
पण इंट्रेस्ट रेट्स असा वाढवताना फेडरल रिझर्व्हला एक डोळा हाय इंटरेस्ट रेट्स मुळे इकॉनॉमी रिसेशन मधे तर जात नाही ना याकडे ठेवायला लागतो. ही एक तारेवरची कसरत असते.
(यात आपण रशिया- युक्रेन वॉरचा एनर्जी सप्लायवर झालेला परिणाम व पँडेमिक मुळे सप्लाय चेनवर झालेला परिणाम या दोन गोष्टींचा चलनवाढीवर कसा परिणाम झाला याचा आढावा घेतलाच नाही आहे हे तु लक्षात घे!)
त्यामुळे चलनवाढ जरी बायडन सत्तेवर असताना झाली हे आकडेवारी व स्टॅटिस्टिक्स वरुन वरकरणी जरी दिसत असले तरी त्याचे सगळे खापर फक्त बायडनच्या माथ्यावर फोडणे हे साफ चुकीचे आहे.
बायडन अॅडमिनिस्ट्रेशनची चुकीच म्हणायची तर त्याने दर डोइ दिलेले १००० डॉलर्सचा तिसरा स्टिम्युलस! तोपर्यंत खर म्हणजे इकॉनॉमी वॉज गोइंग इन राइट डिरेक्शन. तो दर डोइ १००० डॉलर्सचा चेक देण्याची जरुर होती की नाही हा वादाचा मुद्दा होउ शकतो.
तु आभार मान ट्रंपला दुसरी टर्म मिळाली नाही. तो तर खुले आम म्हणतो की फेडरल रिझर्व्ह बिनडोक आहे. त्यांनी इंटरेस्ट रेट्स नेहमीच शुन्य ठेवावे! ( म्हणजे याच्या सारख्या बिलंदर, अफरातफर करणार्या व क्रिमिनल बिझीनेसमनला फुकट पैसे बॉरॉ करता यावे! तिमडे इकॉनॉमी व इन्फ्लेशन जाउ देत खड्ड्यात!)
बाय द वे, तु रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इथे सिव्हिल संवाद करतोयस त्याबद्दल धन्यवाद. दोन्ही बाजुची मते इथे जरुर यावीत पण विनोदी नसावीत ही किमान अपेक्षा.
आणी एक! तु माझ्या २४ वर्षे
आणी एक! माझ्या २४ वर्षे सत्तेत असताना रिपब्लिकन पक्षाने इमिग्रेशन पॉलीसी बाबत काय दिवे लावले या माझ्या प्रश्नाला तु रेगन काळात तो प्रश्न ऐरणीवर नव्हता अस काहीतरी कारण देउन मस्त बगल दिलीस! माझ्या आठवणीनुसार इमिग्रेशमचा प्रश्न तेव्हाही चिघळलेलाच होता व तेव्हाही रिपब्लिकन्स डेमोक्रॅट्सच्या नावाने शंख करत होते. पण मला एक सांग की मग खुद्द ट्रंपनेही काय ( शाळेची बेल) प्रश्न सोडवला? कायतरी अर्धवट थातुर मातुर बॉर्डर वॉल बांधली आणी मेक्सिको कडुन त्या वॉलचे पैसे वसुल करीन वगैरे असे काय तरी बरगळुन, फाल्तुच्या वल्गना करुन मागा क्राउडला उल्लु बनवले! मागा क्राउडमधे बहुतेक सगळे अडाणी व अशिक्षित क्राउड भरला असल्यामुळे त्यांना उल्लु बनवणे तसे काही कठिण नाही म्हणा! दे कॅन बी इझीली प्रोव्होक्ड अँड फुल्ड! जानेवारी ६ तर त्याचे मुर्तीमंत उदाहरण होते! आणी कालचच बघ ना.. पेनसिल्व्हॅनिया रॅलीमधे ट्रंप पचकला की मिडिया कशी त्याच्या विरुद्ध आहे तर लगेच एक मॅगा माथेफिरु उठुन प्रेस बॉसकडे प्रेसवाल्यांचा खुन करायला धावुन गेला! नशिब स्थानिक पोलिसांनी त्याला वेळीच जेरबंद करुन अटक केले!
आणी हो, इल्लिगल चिप लेबर” रिपब्लिक्सना हवे आहे” असे मी म्हणालो. म्हणुनच मग ते पॉलीटीकल सिझन आला की नुसता शंख/ स्टंट करतात इमिग्रेशनचा! प्रश्न तर त्यांनाही सोडवायचा नाही आहे असा दावा मी करत आहे. म्हणुन अर्थात त्या न सुटणार्या प्रश्नामुळे जे क्रिमिनल/ टेररीस्ट अमेरिकेत घुसत असतील त्याचे उत्तरदायित्व दोन्ही पक्षाकडे जाते हे लक्षात ठेव!
ट्रम्पच्या इनफ्लेशनरी पॉलिसीज
ट्रम्पच्या इनफ्लेशनरी पॉलिसीज.
वर विचारलेले ट्रम्प काय करेल की इनफ्लेशन कंट्रोल होईल?
ट्रम्प ने काय केलेले?- अमेरिकन इतिहासात सगळ्यात जास्त डेफिसीट वाढवणाऱ्या राष्ट्राध्यक्षापैकी एक. कोव्हीड च्या आधीही बरका.
आता काय करणार आहे?
- टॅक्स कट कंटिन्यू - + डेफिसीट
- इम्पोर्ट tariff - + कॉस्ट
हया दोन्ही पॉलिसी इनफ्लेशन वाढवणाऱ्या आहेत. इन्फलेशन मुळे ट्रम्पला मत द्या म्हणणाऱ्यांनी कृपया प्रकाश टाकावा, कीं ट्रम्प नक्की काय जादु करणार आहे कीं डेफिसीट आणि tariff वाढवून पण इन्फलेशन कमी होईल?
इन्फ्लेशन आले आहे ना खाली?
इन्फ्लेशन आले आहे ना खाली?
ज्या लोकांना साधे स्वतःचे चेक बुक बॅलन्स करता येत नाही, हप्त्यावर घेतलेली वस्तू दामदुपटीला पडते हे कळत नाही अशी आमच्या भागातली मंडळी अजूनही ट्रंप आपली गरीबी दूर करेल आणि कसले स्किल नसताना 'मिडल क्लास' आयुष्य देईल या भ्रमात आहेत. ही मंडळी रोज जे आर्थिक-सामाजिक सेफ्टीनेट वापरातात त्यालाच सोशालिझम म्हणून धोपटतात. तुला अमुक फायदा मिळतो का असे विचारले की हो म्हणतात, त्याचा अर्थ सांगितला की ओह!
काल तात्याने बायडन नि हॅरिस
काल तात्याने बायडन नि हॅरिस ला येत्या निवडणूकीमधे इंटरफीयर करायला परवानगी दिली असे वाचले हे खरे आहे का ?
>>त्यामुळे चलनवाढ जरी बायडन
>>त्यामुळे चलनवाढ जरी बायडन सत्तेवर असताना झाली हे आकडेवारी व स्टॅटिस्टिक्स वरुन वरकरणी जरी दिसत असले तरी त्याचे सगळे खापर फक्त बायडनच्या माथ्यावर फोडणे हे साफ चुकीचे आहे.<<
आपला तो बाब्या काय, बरं..
तु वर जे म्हणतोयस कि स्टिम्युलस मुळे चलनवाढ झाली ते साफ चूकिचं आहे. अरे, स्टिम्युलस मनी वाज दर्यामे खसखस. टिपिकली, चांगल्या इकानमीत लोकांचे पगार भरमसाठ वाढतात, बाइंग पॉवर, डिस्पोझेबल इन्कम भरपुर असल्याने सप्लाय-डिमांड्चं गणित चूकतं आणि वस्तुंच्या किंमतीत वाढ होते. धिस काइंड ऑफ इन्फ्लेशन इज कंट्रोल्ड बाय इंन्क्रिजिंग प्राइम रेट्स. व्हेअरअॅज, बाय्डन काळात झालेलं इन्फ्लेशन म्हणजे इकानमीला आलेली सूज. आणि हि सूज यायला कारणीभूत बाय्डनची फिस्कल पॉलिसी; यात फॉरेन पॉलिसी, कॉर्पोरेट टॅक्सेशन, गवर्न्मेंट स्पेंडिंग इ. सगळे कांपोनंट्स आले. फॉर योर काइंड इन्फरमेशन, इन्फ्लेशन्स मेजर ड्राइविंग फॅक्टर्स आर कॉस्ट ऑफ प्रॉडक्शन अँड डिमांड. या दोन्हि फ्रंट्सवर बाय्डन अॅडमिनिस्ट्रेशनने अक्षरशः हात टेकले. अँड दॅट वाज व्हॉट वी एक्स्पिरियंस्ड ड्युरिंग २०२१-२२.
तु हे मान्य करणार नाहिस याची कल्पना आहे, म्हणुन या टॉपिकवर पुढची चर्चा मी माझ्यापुर्ति इथेच थांबवतो...
Pages