रॉकी और राणी की कायकी प्रेमकहाणी

Submitted by अस्मिता. on 30 September, 2023 - 10:27

रॉकी और राणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. Proud लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. Wink गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका. Wink

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. Happy )

©अस्मिता

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वय ओळखा म्हणून एक युट्यूबवर व्हिडिओ आहे. त्यात वय ओळखण्यासाठी वेळ देतात नंतर वय. जन्मतारीख सांगतात.

https://youtu.be/5Km6ShC7RYM?si=Z-HO9BReke3YUU3r
याच्या आजूबाजूला आणखी व्हिडिओज मिळतील.

बरं, हे वर कुठे आलं असेल तर माफी द्या, पण पाजींचा देहांत होण्याआधी रॉकी, गोलू और उनकी मम्मी अचानक उद्भवलेल्या बाणेदारपणे जे घर सोडून जातो म्हणतात, ते नक्की कुठे जाणार असतात? बहीण निदान ट्रेडिंग करते, रॉकीला पोटापाण्याचा काही उद्योग करता येतो का?

Happy
तसंच पाजींचा तो पप्पी प्रसंग 'पंजाबी ऑफ द यर'च्या बक्षिस समारंभात होतो - असं बक्षिस असतं दिल्लीत? Proud
'मराठी ऑफ द यर'साठी काय करावं लागेल? पुरणपोळी? Proud

'मराठी ऑफ द यर' नाही जमणार, आपण फारच विद्वान असल्याने दर महिन्याला एक निवडावा लागेल. आणि आपण बक्षीस वितरणा आधी नाचणार पण नाही, वर श्रीखंड खाऊन कोपऱ्यात जाऊन चहाड्या करू. Lol

Lol

बरं, एक अवांतर :
अस्मिता, ते लेखात 'साडी 'घालून'' लिहिलंय ते 'साडी 'नेसून'' केलं तर चालेल का? Happy
आलियाची त्या दूर्गापूजेच्या वेळच्या नाचाची एकच साडी शिवलेली दिसते, त्यामुळे ती तेवढी 'घातली' आहे असं म्हणता येईल.
हे आपलं माझ्या एक पेट पीव्ह्जपैकी एक आहे.

Happy मला लक्षात आलं होतं स्वाती पण संपादनाची वेळ उलटून याचा शिलालेख झाला आहे. माझ्या बोलण्यातही ती चूक होते, ते उमटलं आहे. पण हे लक्षात ठेवून मी जवान सिनेमाच्या पोस्टीत मात्र 'नेसून' लिहिले आहे. एवढ्याने पेट-पिव्हजला थेरपी होईल का.. ? Happy

lol हो.

हा मराठी सिनेमा असता तर असं उगाच डोक्यात आलं आता

हीरो फॅमिली नागपूर /कोल्हापूर ची, बच्चन बै ऐवजी अलका कुबल खडूस चेहेरा घेऊन सोन पापडी किंवा मिसळीच्या दुकानाची ओनर, तिचा मुलगा प्रसाद ओक अन् नवरा अशोक सराफ. सून मात्र क्षिती जोग च. नातू सिद्धार्थ जाधव.
हिर्विण फॅमिली पुण्याची, आजी किशोरी शहाणे, बाप सुबोध भावे, आई सो कु (मोठी) अन् हिर्वी सो कु (धाकटी)

अशोक - किशोरी चं अगं हेमा गाणं रीमिक्स करून परात एकदा वाजवता येईल...

श्रीखंड खाऊन कोपऱ्यात जाऊन चहाड्या करू >>> Lol

द्वैभाषिक टॉर्चर कशाला हवं आहे? >>> Lol सून मात्र क्षिती जोगच हे सुपरलोल आहे. झिम्मा वगैरे बघितले की ती आता या रोल मधे टाइपकास्ट होणार आहे Happy सतत "छप्पन्न सशांची व्याकुळता" वगैरे जशी पुलंना गटण्यामधे दिसली होती.

मराठीत किस वगैरेही नसेल. फक्त एकमेकांकडे बघून "अवचित", "बहर" वगैरे ममव शब्दांत एक गाणे बॅकग्राउण्डला वाजेल. किंवा मग नुसते गाल जवळ नेवून ते "म्वा म्वा" करतात तसे करतील फारच मॉडर्न असतील तर. मग पेपर्स मधे त्यातल्या मॉडर्नपणा बद्दल हिरॉइन्स "ती एक स्वतंत्र विचाराची स्त्री आहे" वगैरे मुलाखती देतील. लोकसत्तेत "या सीनमुळे नेटकरी संतापले" वगैरे क्लिकबेट्स येतील.

>>> छप्पन्न सशांची व्याकुळता
Lol

>>> एकमेकांकडे बघून "अवचित", "बहर" वगैरे ममव शब्दांत एक गाणे बॅकग्राउण्डला वाजेल
Lol
छ्या! म्वा कसले करतायत, फारतर हात हातात घेतील आणि ती पिशवीतून साखिचा डबा काढेल. 'मला साखि आवडते हे तुझ्या अजून लक्षात आहे?!' इ.इ.
मग 'नातं सांभाळायचं तर साबुदाणे नीट भिजायला हवेत - कमी भिजले तर खिचडी चामट होते, जास्त भिजले तर गिच्च होते' वगैरे फिलॉसोफाइजही करता येईल. Proud

ती पिशवीतून साखिचा डबा काढेल. 'मला साखि आवडते हे तुझ्या अजून लक्षात आहे?!' इ.इ. >>> Lol

कुकुहोहै मधे काजोल व राणी मुखर्जी या दोन स्वतंत्र विचारांच्या मॉडर्न स्त्रिया बास्केटबॉल खेळणार्‍या राहुलला ज्यूस देतात तसे तरूणपणी एखाद्या ममव प्रसंगात- उदा: तो वक्तृत्वस्पर्धा गाजवून आला आहे- त्याला ही स्वतः बनवलेली साखि देत आहे असा एक फ्लॅशबॅकही होऊ शकतो.

>>> स्वतंत्र विचारांच्या मॉडर्न स्त्रिया बास्केटबॉल खेळणार्‍या राहुलला ज्यूस देतात
>>> वक्तृत्वस्पर्धा

Biggrin

द्वैभाषिक टॉर्चर >>> Lol

अवांतर - द्वैभाषिक वरून हे टॉर्चर आठवलं. मूळचं मराठी टॉर्चर नाही, (स्प्रिंगच्या बाहुलीच्या हालचाली सोडून) पण हिंदीकरण भयाण आहे.
https://www.youtube.com/watch?v=KDov4H0Kd4s

काय चाललंय काय? Happy
मराठीत रॉकी रानी काढला तर आपण सुनील बर्वे किंवा नितीश भारद्वाज घेऊ आबा म्हणून.शबाना म्हणून निवेदिता किंवा किशोरी किंवा सुप्रिया(सुप्रिया घेतली तर आबा म्हणून महागुरू.)
रणवीर म्हणून ललित प्रभाकर(दुसरं आहेच कोण) आणि आलिया म्हणून पर्ण पेठे(कारण तिला सगळीकडे घ्यायचंच असतं.) किंवा वैदेही परशुरामी.आलिया चे वडील म्हणून अंकुश चौधरी.
क्षिती जोग च्या भूमिकेत सुहासिनी मुळे किंवा एका लग्नाची दुसरी गोष्ट मधल्या इला भाटे.
लाडूंच्या भूमिकेत उकडीचे मोदक किंवा आंबा बर्फी.

मराठीत किस वगैरेही नसेल. फक्त एकमेकांकडे बघून "अवचित", "बहर" वगैरे ममव शब्दांत एक गाणे बॅकग्राउण्डला वाजेल.
>>> किंवा या निमित्ताने फुलावर फूल आपटणे याचं मॉडर्न व्हर्जन शोधण्याचीही संधी असेल.

साखि, वक्तृत्वस्पर्धा - हाइट आहे Rofl

अस्मिता, स्वाती, फा, अनु >>> Rofl Rofl

मराठीत रॉकी रानी काढला तर आपण सुनील बर्वे किंवा नितीश भारद्वाज घेऊ आबा म्हणून.
>>> नक्को. आपल्याला त्यातल्या त्यात डॅशिंग पाहिजे ना? मग अजिंक्य देव. अर्थात त्याला आबाची भूमिका चालणार असेल तर.
किशोरी जयाबाई म्हणून चालेल. तिला खडूसपणा व्यवस्थित करता येतो. आसावरी जोशीसुद्धा चालेल. उषा नाडकर्णीच म्हणणार होते. पण अजिंक्यची आई वाटेल म्हणून जाऊ दे.
निवेदिता जरा गोग्गोड आहे. सुप्रिया प्रेमळ वाटते. त्या दोघी चालतील शबाना म्हणून.
आलियाचे वडील म्हणून इथे सु भा/अतुल कुलकर्णी/गिरीश ओक चालतील. त्यांना बालगंधर्व/नटरंगच्या भूमिकेवरून/सीरिअलमध्ये शेफ आहेत म्हणून लोक अजून हिणवतात असे दाखवून.
लाडूंच्या भूमिकेत माबो फेमस सिंडीची गुळपोळी....
क्षिती जोग = इला भाट्ये...पण मग सासू सूनेपेक्षा तरुण दिसते असे होईल ना? मुक्ता बर्वे चालेल का?
रणवीर सारखा एनर्जेटिक उर्फ माकडउड्या मारणारा मराठीत कोण आहे? सुचतच नाही.

Pages