रॉकी और राणी
काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.
पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.
एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.
आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.
रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.
जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका.
रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!
रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.
मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.
(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥
मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. )
धन्यवाद सामी, बघितला का मग? >
धन्यवाद सामी, बघितला का मग? > बघायला लावलास

तुझ्या कमेंट आठवत आठवत फास्ट फॉरवर्ड करत बघितला.
शेवटी दसऱ्याच्या मुहूर्तावर
शेवटी दसऱ्याच्या मुहूर्तावर बघितला रॉकी आणि राणी एवढा काही वाईट वाटला नाही ,हा फक्त पिसे काढण्याच्या लायकीचे असतात करणचे सिनेमे हे खरंय.त्यातला अदलाबदली राहण्याचा प्रकार आवडला आलिया पेक्षा तिच्या आईचा रोल चांगला केलाय तो 'चोली के पीचे' वाला प्रसंगही ,कित्येक पंजाबी च काय मराठी मुलांनाही स्त्रीविषयक कुतूहल सगळ्याच बाबतीत असते पण प्रत्यक्षात स्त्री विषयक बेसिक ब्रा पिरियड पॅड बद्दलही माहीत नसते किंवा उगाचच ऑकवर्डनेस असतो ऑर्गझम क्लिटोरियस च महत्व तर विसरूनच जा. चित्रपटातून तरी किती बौद्धिक घेतात देव जाणे .
पिच्चर मला तरी आवडला.करणचं फॅमिली मूल्य संस्कार वगैरे नेहमीचा मालमसाला आहेच. क्षिती जोग चा इंटव्युव पहिलेला त्यात तिचा काहीतरी जबरदस्त सीन आहे असं बघून चित्रपट पाहिला तो काही एवढा खास वाटला नाही उलट बहीण झालेल्या मुलीचा सीन जमून आलाय.
बाकी शेवटचा लग्न दाखवावं ते करण जोहरनेच,काय ती श्रीमंती कपडे दागिने,कलर कॉम्बिनेशन सगळंच लार्जर दयान लाइफ .वेडिंग प्लॅनर झाला असता तरी चित्रपटाइतकेच पैसे छापले असते .
बाकी शेवटचा लग्न दाखवावं ते
बाकी शेवटचा लग्न दाखवावं ते करण जोहरनेच,काय ती श्रीमंती कपडे दागिने,कलर कॉम्बिनेशन सगळंच लार्जर दयान लाइफ .वेडिंग प्लॅनर झाला असता तरी चित्रपटाइतकेच पैसे छापले असते .>> अगं/अरे हो. कुडमाई गाण्यावरच १० क्रोर खर्च झालेत पण पिक्चर फार लांब होत होता म्हणून ते शेवटी टाकले. छान आहे ते गाणे. ह्या वेळ च्या दुर्गा पुजा पांडाल मध्ये लाल लाल भडक पांडाल प्रत्यक्षात आहेत असे पाहिले यु ट्युब वर.
कल्की केकलां किंवा तो दशवतारात ला लास्ट अवतार कल्की हे कळेना म्हणून दोन्ही सर्व नामे लि हलीत.
हो पैसा भरपूर आहे करनकडे आणि
हो पैसा भरपूर आहे करनकडे आणि तो खर्च करण्याची कुवतही चित्रपटाच्या एका सीन गाण्यासाठी ती दिसतेच चित्रपटात .
दोन्ही सर्व नामे लि हलीत.>>काहीही म्हणा अमा ,जाणिवपूर्वक unisex नाव घेतलंय शेवटी नावं वेगळी असली तरी शिवशक्ती एकच तो असो वा ती.
बस ढूँढ रहा है मौका, खुल के
बस ढूँढ रहा है मौका, खुल के मारेगा चौका, बाय चान्स किसी लडकीका, जहाँ झुमका गिरा रे"
त्यापेक्षा जास्त zest आणि दिल्लीची वाईब यात आहे. अनुष्काची व रणवीरची सुद्धा एनर्जी अफाट आहे यात.
>>>>
https://youtu.be/pElk1ShPrcE?si=rQNKBcfmYzhbjBGu
क्यों मेरी गली में आके वेट करदा
हरकतें डाउन मार्केट करदा
देखूं जो हटके खिड़की का पर्दा
सिट्टी विट्ती मार irritate करदा
हो छड attitude कभी मान कुड़िये
ब्लॅंक चेक दे दूं या ते जान कुड़िये
ईंटे का ये दिल कर नरम जरा
देख ले यह गबरू जवान कुड़िये
छे फुट से डेढ़ फुट हो गया
सामी
सामी

कल्की, आवडली आयडी मागची कल्पना.
त्यापेक्षा जास्त zest आणि
त्यापेक्षा जास्त zest आणि दिल्लीची वाईब यात आहे >>> टोटली. बॅण्ड बाजा बारात ना?
हो. लावलंच शेवटी.
हो. लावलंच शेवटी.
बर्नींग ट्रेन?? अजून ही असावे
बर्नींग ट्रेन?? अजून ही असावे. >>> नाही त्यात नाही ती. त्यात तिने नक्की काय रोल केला असता विचार करतोय. विनोद खन्ना घरी लक्ष देत नाही म्हणून सोडून जायला निघालेली बायको - हा रोल फिट्ट बसला असता तेव्हा ती जसे रोल्स करायची त्यानुसार
फारेंड तुम्हाला आठवत नाही म्हणजे हद्दच झाली आता >>>
जाम आठवत नाही.
ती आलियाची आई ब्रा शॉपिंगच्या वेळेस रणवीर स्त्रियांचा रिस्पेक्ट वगैरे म्हणायला लागतो तेव्हा अगदी साध्या शब्दांत त्याला सुनावते - तेथे मी एकदम टोट्ल रिस्पेक्ट झालो. परफेक्ट बोलली आहे तेथे ती. सोमिवरच्या अर्ध्याहून जास्त लोकांना फार चपखल उत्तर होईल ते.
“बाकी धरम-शबाना जोडी
“बाकी धरम-शबाना जोडी त्यांच्या लीड रोल्सच्या काळात कधी एकत्र होती का?” - ख़ेल खिलाड़ी का, स्वामी, मर्दोंवाली बात
नो वंडर कुणाला आठवले नाही अशा
नो वंडर कुणाला आठवले नाही अशा नावाचे सिनेमे
'स्वामी'मध्ये धर्मेंद्र कुठे
'स्वामी'मध्ये धर्मेंद्र कुठे होता? (बाकी दोन ऐकलेलेसुद्धा नाहीत!)
मलाही तोच प्रश्न पडला. फेफ -
मलाही तोच प्रश्न पडला. फेफ - खेल खिलाडी का मी पाहिला आहे कधीतरी
पण अगदी लहानपणी. त्यात धर्मेंद्र होता इतकेच लक्षात आहे
मर्दोंवाली बात हा अस्सल ९०ज पिक्चर होता. त्यात हिरॉइनचे नाव माहीत असू नये हे पिक्चरच्या नावाप्रमाणे अॅप्ट आहे 
बॅक तू रॉरा - पुढे अगदीच पांचट आहे पिक्चर. एक दुर्गापूजेचा दिमाखदार सीन सोडून - व्हिज्युअली तो भारी आहे. हे पिक्चर्स मधले पंजाबी जिकडेतिकडे जॅझ पासून ते शास्त्रीय गाण्यांच्या कार्यक्रमात कधीही अचानक बल्ले बल्ले चालू करून पार्टीमधे सपोजेडली जान आणतात त्यावर तो आलियाचा बंगाली बाबा कुरघोडी करेल असे मिनिटभर वाटले होते. पण तेथे त्याला कारूण्य मोड मधे नेला एकदम केजोने. मग सगळे अर्धा पाऊण तास विविध कारणांनी रडतात. त्यांना उपरती वगैरे होते. धरम गचकण्याचा त्या उपरतीशी काय संबंध आहे कोणास ठाउक. जयाला उपरतीचा अभिनय १५-२० रिटेक्स मधे न जमल्याने केजोने नाद सोडून दिला असावा.
फॉर द रेकॉर्ड - बच्चन फॅमिलीतील कोणीतरी उसूल शब्द म्हंटलेला बर्याच वर्षांनी ऐकला
'स्वामी'मध्ये धर्मेंद्र कुठे
'स्वामी'मध्ये धर्मेंद्र कुठे होता? (बाकी दोन ऐकलेलेसुद्धा नाहीत!) >>> तेच लिहायला आलेले मी
“ 'स्वामी'मध्ये धर्मेंद्र
“ 'स्वामी'मध्ये धर्मेंद्र कुठे होता?”
आठवण्यासारखं काहीही नाहीये त्यात, पण बाकी तीन प्रसिद्ध गाण्यांत एक नौटंकीमधलं गाणं आहे (भाग जाऊँगी) ज्यात धर्मेन्द्र-हेमा मालिनी चा कॅमिओ आहे. 
जयाला उपरतीचा अभिनय १५-२०
जयाला उपरतीचा अभिनय १५-२० रिटेक्स मधे न जमल्याने केजोने नाद सोडून दिला असावा.>>>>+१११
शबाना आझमी पेक्षा खरतर रेखाला
शबाना आझमी पेक्षा खरतर रेखाला घ्यायला हव होत...जया आणी रेखाची जुगलबन्दी बघायला मजा आली असती.
आत्ता बघते आहे. मग परत येउन
आत्ता सिनेमा बघते आहे. मग परत येउन पिसं पाहीन(वाचेन)
तो अॅड बदला की ओ वाला सीन
तो अॅड बदला की ओ वाला सीन थेट तुला पाहते रे किंवा माझ्या नवर्याची बायकोमधे शोभेल असा आहे. सहज मीटिंग मधे आलेली व्यक्ती एकदम क्रांतिकारक आयडिया देऊन जाते जी त्याकरता पगार देऊन बसवलेल्या लोकांनाही इतके दिवस सुचलेली नसते.
फा, इथे दुसऱ्या पानावर मीही
फा, इथे दुसऱ्या पानावर मीही(आणि फेफनी) हेच लिहिले आहे.


प्राजक्ता, मग जयाला अभिनय करावाच लागला नसता.
सामो, काही घाई नाही. आमचं दुकान नेहमी उघडंच असतं.
अस्मिता आत्ता सॅच्युरेशन
अस्मिता आत्ता सॅच्युरेशन झाल्यअजुन्पूर्ण नाही पाहीला नाही अजुन. पण मला आवडला
ते बंगाली आणि पंजाबी स्टिरिओटाइप्स अगदी परफेक्ट चितारलेले आहेत.
फा, इथे दुसऱ्या पानावर मीही
फा, इथे दुसऱ्या पानावर मीही(आणि फेफनी) हेच लिहिले आहे >>> हो आठवले, आणि परत वाचले - चपखल आहे
ते सर अशा धाग्यावर फिरकत
ते सर अशा धाग्यावर फिरकत नाहीत.
लिंक देऊ का ?
कोणते सर? इथे तीन सर (sir)
कोणते सर? इथे तीन सर (sir) आहेत…
काय च्रप्स राव बोअर करता जिथे
काय च्रप्स राव बोअर करता जिथे तिथे ! इतका वेळ या आयडीचे कपडे खुंटीला टांगून ठेवलेले !
कोणते तीन सर ? काहीच माहिती नाही.
असो.या धाग्यावर विषयांतर नको. जरा चंमतग म्हणून पण सोय नाही राहिली.
जया भादुरी सरदारन दिसायला
जया भादुरी सरदारन दिसायला वाटत नाही कारण दॅट्स लिमिटेशन ऑफ हर लुक्स. पण सरदारनचा ठसका तिने आवाजातून, डोळ्यातून मस्त दाखवलाय.
शबाना नॅह!!! वेस्टेड.
आलिया लग्नोपरान्त मस्त दिसते. साड्या सुपर्ब. बाकी रणबीर सिंग पंजाबी वाटतो.... आहेच पण हॉट नॅह!! नॉट दॅट मच.
आक्ख्या पंजाबी फॅमिलीत (लूक्स
आक्ख्या पंजाबी फॅमिलीत (लूक्स म्हणा, अॅक्सेंट म्हणा) एक सणसणीत अपवाद म्हणजे क्षिती जोग. एफर्टलेस पंजाबी…. म्हणजे पंजाबी दिसावं, वाटावं, बोलावं असे काही एफर्ट्सच घेतलेले नाहीयेत.
फेफ
फेफ
पंजाबी ड्रेस घातला की झालं पंजाबी..!
क्षिती जोग ने केलेले काम मला
क्षिती जोग ने केलेले काम मला अगदी झिम्मा सारखे डिट्टो वाटले. काहीही फरक नाही.
फेफ
फेफ
मेकिंग ऑफ मधे क्षिती जोग आणि जया बच्चन एकमेकींशी "पंजाबी कॅरेक्टर्स आहेत म्हणे!" असे खुसफुसत गिगलिंग करताना दिसतील
Pages