रॉकी और राणी की कायकी प्रेमकहाणी

Submitted by अस्मिता. on 30 September, 2023 - 10:27

रॉकी और राणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. Proud लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. Wink गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका. Wink

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. Happy )

©अस्मिता

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
ओके मी गुगलवर त्याच्या चित्रपटांची यादी पाहिली.
राझी, काल आणि दिदुलेजा पाहिलेत.

प्राईमवर आला म्हणून उगा टीपीसाठी लावला. सहनच नाही झाला ब्वॉ... अर्धा तास जेमतेम!
सगळंच लाऊड, ओव्हर.. पूर्ण मुव्ही बघणार्‍यांना सलाम!

मानव - हे करण जोहर चे सिनेमे नाहीयेत हे त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचे असतील Happy
केजो चे सिनेमे म्हणजे त्याने डायरेक्ट केले - कुछ कुछ होता है, स्टुडन्ट ऑफ द इयर, कभी अल्विदा ना कहना, कल हो ना हो, कभी खुषी कभी गम, दोस्ताना वगैरे

कुछ कुछ होता है, कल हो ना हो, कभी खुषी कभी गम
>>>>
हे सगळे मस्त आहेत. कदाचित शाहरूख हे सुद्धा एक कारण असेल. पण रिपीट वेल्यु खूप आहे यांना.

कभी अल्विदा ना कहना हा मात्र वेगळा निघाला. याची स्टोरी तेव्हाच्या पब्लिकला बिलकुल झेपली नाही. काळाच्या पुढे असलेला चित्रपट म्हणू शकतो.

मै+1
तो निर्माता म्हणून चांगला(बिझनेसमन) आहे, दिग्दर्शक म्हणून मात्र यथातथाच आहे. तरीही त्याने दिग्दर्शित केलेला 'ऐ दिल है मुश्किल' माझ्यामते अप्रतिम सिनेमा आहे. तो सिनेमा 'अलिझे' म्हणजे अनुष्का शर्मासाठी तरी बघावाच.

ऐ दिल है मुश्किल' माझ्यामते अप्रतिम सिनेमा आहे.
>>>>

मी हा परवाच पहिल्यांदा पाहिला.
त्या आधी पाहिला नव्हता.
लोकांनी उगाच काहीबाही लिहिल्याने बघितला नव्हता आजवर.
पण काय कमाल संवाद आहेत त्यात. मला डायलॉग फार आवडले. त्यासाठी तो पुन्हा बघणार..

कुछ कुछ होता है थिएटरला पाहिलेला. खूप वर्षांनी सिनेमा पाहिला.
मेलोड्रामा असला तरी न जाणवण्यामागचं कारण. कभी खुशी कभी गम (टीव्हीवर) पाहिला तेव्हां मात्र त्रास झाला .

एकापेक्षा एक कृत्रिम अभिनयाची स्पर्धा लागलेली शाहरूख आता उतारवयात जसा सहज अभिनय करतो तसा तो तेव्हां अजिबात नव्हता. या चित्रपटात अमिताभने सुद्धा प्रचंड कृत्रिम अभिनय केलेला. शिनेमाचं शीर्षक इतकं मनावर घेतलंय कि आता रडवतो आता हसवतो, कुठेच जाऊ नका थाटाचा पिक्चर. लहान असताना शोथीम / शोटाईम नावाचा एक कार्यक्रम असायचा ज्यात सिनेमाचे तुकडे दाखवायचे. तसा अनेक गोड गोड ठिगळं बनवून तयार केलेला प्रचंड दवणीय सिनेमा. यातच ते हेलिकॉप्टर घराच्या बाहेरून उतरूनही जया बच्चनला समजत नाही आपलं कार्ट आलं.

या चित्रपटात अमिताभने सुद्धा प्रचंड कृत्रिम अभिनय केलेला.
>>>>
चोप्रा जोहर यांच्या चित्रपटात म्हणजे केथ्रीजी, मोहोब्बते, वीरझारा यात जिथे जिथे शाहरूख अमिताभ समोरासमोर आलेत तिथे अमिताभ नकलीच वाटला आहे. ते पिक्चर शाहरूखसाठीच बनवले गेले होते हे सहज कळते.

यातच ते हेलिकॉप्टर घराच्या बाहेरून उतरूनही जया बच्चनला समजत नाही आपलं कार्ट आलं.
>>>

बेस्ट एवर बॉलीवूड एन्ट्री
यावर माझा स्वतंत्र लेख होता. आता लिंक शोधायला कंटाळा आला आहे. राहू दे.

त्याने एका वर्षात दोन हिट दिले हे सांगूनही त्याच्या बद्दल लोकांच्यात इरीटेशन निर्माण व्हावं म्हणून चालू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
तरीही डंकी चालणार , अर्थात राजकुमार हिरानीने स्वतः दिग्दर्शित केला असेल तर, दुसर्‍याचं नाव वाचलं, ते खरे असेल तर मी नाही पाहू शकणार.

मैत्रेयी, अच्छा. तरीच मला नवल वाटत होते लिहिताना की मी नेमके त्याचे चांगले/ओके चित्रपट कसे काय बघितले, उगाच स्वतःची पाठही थोपटून घेतली याकरता. Proud

आता बघतोच त्याने दिग्दर्शित केलेला.

करन जोहर चा विषय आहे म्हणून हे विकी वरून कॉपी पेस्ट आहे. त्या दिवशी दुसऱ्या धाग्यावर सुद्धा टाकलेले. तो आवडता नाही. पण मला बरेच कुतूहल आहे त्या माणसाबद्दल Happy

Karan Johar has worked as a costume designer for Shah Rukh Khan on many films like Dilwale Dulhania Le Jayenge (1995), Dil To Pagal Hai (1997), Duplicate (1998), Mohabbatein (2000), Main Hoon Na (2004), Veer-Zaara (2004), and Om Shanti Om (2007).

या चित्रपटात अमिताभने सुद्धा प्रचंड कृत्रिम अभिनय केलेला.
>>> या चित्रपटात सुद्धा अमिताभने प्रचंड कृत्रिम अभिनय केलेला.

हे बरोबर ठरेल...

एके काळी अमिताभ हा शाहरुख इतकाच फेमस होता.. ते जुने चित्रपट आणि अभिनय छान आहे...

सूर्य पूर्वेला उगवतो.
( वाट बघतोय काय बरोबर ठरेल याची ) Happy

पुढे येऊ घातलेली पण आधीच मान्यता दिलेली वाक्ये.
- शाहरूख खान अमिताभपेक्षा दोन फूट उंच आहे.
- भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना शाहरूख खानच्या पणजोबांनी प्रेरणा दिली. आर्थिक मदत सुद्धा केली.
- दिलीपकुमार अभिनय शिकायला शाहरूखच्या आजोबांकडे जायचे.
- अमिताभ बच्चनला शाहरूख खानच्या वडलांमुळे सिनेमात संधी मिळाली.
- शोले हा टुकार सिनेमा असून रा-वन आणि जब तक है जान हे अप्रतिम सिनेमे आहेत.
आणखीही काही येऊ शकतात.
शुरा.

सावधान
SRK हायजॅक alert !
शुभ रात्री शब्बा खैर खुदा हाफिज Happy

दोस्ताना सुद्धा केजोने डिरेक्ट नाही केलेला , प्रोड्युसर आहे फक्तं !
मला ए दिल है मुष्किल पण नाही आवडला.
कुछ कुछ होता है आवडला होता बाकी कुठलेच त्यानी डिरेक्ट केलेले सिनेमे नाही आवडले, थोडा फार स्टुड्स्न्ट ऑफ द इयर एन्जॉय केला होता काहीतरी बिनडोक बघायचा मूड असताना.
बाकी सगळेच उथळ आणि संदेश देण्याचा आव आणणारे जुनाट विषय असतात !

धर्मेंद्र सोबतची केमिस्ट्री 'मायाळू नर्स आणि पेशंटची' वाटली>> अस्मिता Lol Rofl किती हसवशील?

फेरफटका...अगदी अगदी. असच बोर्ड मिटींग चालू असताना सिरियस विषय डिस्कस होत असताना अय्या कुठेयस तू? असं लपाछपी खेळल्या सारखं आलिया त्या मिटींग मधे फस्सकन घुसते आणि पिंक टाकून जाते. ह्या असल्या डोक्यात जाणार्‍या & इतर क्रींज सिन्स मुळेच केजो चे चित्रपट अजिबात पटत नाहीत आणि रीलेट पण होत नाहीत.
आलिया च्या वडिलांचा एकमेव सिन ज्यात ते सांगतात की पुरुष असून कथ्थक शिकायच्या पॅशन वरून माझी किती टर उडली गेलिये, तो एकमेव च सिन चांगला होता. त्याने नाच ही अप्रतिम केलाय.

मस्त .. धमाल लिहिलयं..
सिनेमा पाहिला नाही अजून.. बघेन नंतर
तु सिनेमा बघताना वही पेन घेऊन बसतेस का..??
प्रत्येक प्रसंगाची जबरदस्त चिरफाड करतेस..

माबोवर 'शाखांतर' हा शब्द हवा, शाहरुखमुळे झालेले विषयांतर = शाखांतर Wink
आणि हे 'शाखांतर' थांबवण्यासाठी KBC तलं 'शाखांतर समाप्ती की सूचना' Lol
-----------

आचार्य, कभी खुशी कभी गमची 'सुपारी' घ्या. Wink Happy
आशु Happy
मी अमि , श्रीमंत झाल्यावर आडनाव बदलले असेल. सही पकडे है... Happy

लंपन, रूपाली, आबा,
लेखावरील प्रतिसादासाठी धन्यवाद. Happy

रूपाली, 'मुझसे दोस्ती करोगे'साठी तपशीलवार लिहिताना एकदा तसं केलं होतं. पण फार वेळ लागून लिंक तुटत होती. 'सर्कस' सिनेमाच्या वेळी सोडून दिले. सिनेमा बघताना तसं काही ठरलेलंही नसतं. आता 'एकटाकी' (एकटायपी) लिहितेय. Happy

आणि हे 'शाखांतर' थांबवण्यासाठी KBC तलं 'शाखांतर समाप्ती की सूचना' >>> लका , तेवडंच चवथी फ च्या वर्गात बसल्यावानी वाटतंय कि.

यातच ते हेलिकॉप्टर घराच्या बाहेरून उतरूनही जया बच्चनला समजत नाही आपलं कार्ट आलं.
>>>
बेस्ट एवर बॉलीवूड एन्ट्री

मोस्ट पांचट व पेद्रू एन्ट्री. बाकिचे सोडाच, शहरुख चीच यापेक्षा छान एन्ट्री असलेले सिनेमे असतील. डॉन मधली अमिताभ ची एन्ट्री पहा.

केवळ महागडे घर व हेलिकॉप्टर आहे म्हणून बेस्ट एन्ट्री म्हणणे म्हणजे एखाद्या पुस्त्काची बांधणी मजबूत आहे, कागद गुळगुळीत आहे, चित्रे रंगीत आहेत, म्हणून ते पुस्तक छान आहे असे म्हणण्यासारखे आहे.

हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते.

स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही.

ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग.
मुलं अनुकरणातून शिकतात ती अशी

>>> अस्मिता, समजले ग तुझे फ्रस्ट्रेशन

अरे घोड्या, तुला मैत्रीण तरी मिळाली. दुष्काळी प्रदेशातून आलेल्यांचा विचार केलास कधी ?

करण जोहरच्या सिनेमाचं रसग्रहण(?), चिरफाड करणं म्हणजे “तुम्हारा नाम क्या है, बसंती?“ हे विचारण्यासारखं आहे…

फिल्म इंडस्ट्री बॅकग्राऊंड असलेल्या फरहान अख्तर चा दिल चाहता है पाहिलाय का?
सुपर रिच किड्स चे आयुष्य दाखवलं आहे पण त्यातले श्रीमंती सोडली तर इतर गोष्टी relate होत नाहीत का?

>>>>>> अगदी अगदी

लगेच हीरो-हिरवीन कमीत कमी कपड्यात प्रेमालाप करायला मोकळे. >> तुला कोणाचे प्रेमालाप बघायचे होते रे मग ? Lol

बाकी केजो च्या सिनेमात कशाला काही शोधायला जायचे हे राज चे म्हणणे १००% बरोबर. दोन घडीचा टाईमपास एव्हढा विचार करून बघितला कि मजा येते. शबाना, जुन्या गाण्यांचे रेफरन्स, रणवीरचे पंजाबी इंग्लिश नि डान्स, आलियाचा मस्त प्रेझेन्स मजा आणतात. ( मनिष मल्होत्राच्या साड्या नि ब्लाऊज लिहिणार होतो पण विकु ना परत हार्ट अ‍ॅटॅक यायचा Wink )

केवळ महागडे घर व हेलिकॉप्टर आहे म्हणून बेस्ट एन्ट्री म्हणणे म्हणजे....
>>>>>

छे हो.. त्यामुळे कोण म्हणतेय.. हेलिकॉप्टर जागी रिक्षा सुद्धा चालली असती.. त्या राजमहाल जागी पर्णकुटी सुद्धा चालली असती.. फक्त शाहरूख जागी तोच हवा.. सोबत संगीत तेच हवे.. सीन मागे जे मातृत्वाचे इमोशन आहेत ते तेच हवेत.. ते शाहरूखचे स्टाईल मधून धावणे यात कुठे आलेय हेलिकॉप्टर.. त्याचे ते बॅग सावरत घरात शिरताना बोटांनी केलेली ॲक्शन.. जयाचे आधी थबकने, मग मुलगा दिसताच चेहरा खुलने.. शेवटी शाहरूखचा डायलॉग.. आई तुला नेहमीच कसे समजते मी आलो आहे.. त्यामागे आई आणि मुलाची कशी नाळ जोडली गेली असती तो विचार लक्षात घ्यायला हवा. त्यातही ती त्याची खरी आई नसेना. त्याने काही फरक पडत नाही. पूर्ण जादू आहे तो सीन. असे सीन बघताना लॉजिक नाही तर मॅजिक बघायचे असते Happy
** आम्ही डिप्लोमाला असताना पिक्चर पिक्चर खेळायचो तेव्हा तो एक आवडीचा हिट सीन होता Happy

Pages