रॉकी और राणी की कायकी प्रेमकहाणी

Submitted by अस्मिता. on 30 September, 2023 - 10:27

रॉकी और राणी

काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.

पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. Proud लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.

एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.

आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.

रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. Wink गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.

जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका. Wink

रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!

रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.

मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.

(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥

मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. Happy )

©अस्मिता

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि तो रणबिर सिंगचा साईड-किक तर डोक्यातच जातो. काय भुवयांची हालचाल करतो सतत. उगाचच शायनिंग.
प्रचंड डोक्यात जातो.

कुणाला सुप्रसिद्ध अभिनेत्री शिबा ओळखू आली का ? पाजीबा जिचा मुका घेतात आणि तीही ह्या किसला पन्नास वर्षे उशीर झालेला असूनही 'ट्रू लव्ज किस' असल्यागत गालातल्या गालात हसते. ती अभिनेत्री शिबा होती. आधी मी गुगल केलं व स्वतः च्या संशोधनावर पाठ थोपटून घेतली, मग माझी मलाच लाज वाटली. त्यामुळे ह्याला 'कबुलीजबाब' समजू शकता. ती व 'आजा मेरी गाडीमें बैठजा' हे गाणं- दोन्ही होतं सिनेमात. त्यामुळे पुनःप्रत्ययाचा क्लेश झाला आहे. एक प्रेक्षक म्हणून आपण किती दूर आलो आहोत बघा. Wink Happy

कुणाला सुप्रसिद्ध अभिनेत्री शिबा ओळखू आली का ?
>>
कोई शक??
वाळत घातलेल्या पापडासारखी ओली नव्हती तरी ओळखली....

हम है कमाल के (व्हिक्टोरिया २०३ / एकापेक्षा एक ची भ्रष्ट नक्कल) मधे पण होती...

कुणाला सुप्रसिद्ध अभिनेत्री शिबा ओळखू आली का ? >> हो हो ! कसला शिंचा व्यासंग आहे आपला Wink शिबा घोस्ट च्या भ्रष्ट आवृत्ती - प्यार का साया मधे पण होती. त्यात सानु नि आलिषा चिनॉय चे आजा आजा आजा आभी जा असे एक नजाकतदार गाणे होते.

अँकी नं.१ आणि असामी Lol
मी ओळखू आली का विचारलं , तुम्ही दोघांनी तर रिसर्च केलेला दिसतो आहे. 'हम है कमाल के' आठवला, नजाकतदार गाणं बघून येते.
असामी, कुफेहेपा. शिबा आणि राहुल रॉय आहे. डान्स तर... Lol

असामी, कुफेहेपा >> पापाचा घडा भरायचाच असेल तर त्यातच ' तू चाहत है, तू धडकन है, तू आरजू है, मेरा जिगर है वगैरे वगैरे .. हे विजय बेनेडीक्ट (डिस्को डान्सर फेम) नि अलिशा चिनॉय चे गाणे ऐक. ( पाहा सांगितलय नाहिये हे लक्षात घे) . दोघेही गाणारे एकमेकांना एकदम एव्हढे अ‍ॅप्ट फार क्वचित सापडतात. अर्थात हेच आपण पडद्यावरच्या जोडीबद्दल नि संगीतकार जोडीबद्दल्पण बोलू शकतो हा भाग अलहिदा Wink

प्यार का साया
>>
यात व्हूपी गोल्डबर्ग च्या भूमिकेत अमृता सिंग होती. अवतार गिल पण होता बहुतेक.
केबल कृपेनी हा अन् घोस्ट बॅक टू बॅक पहाण्याचा पराक्रम पण केलाय...

हा अन् घोस्ट बॅक टू बॅक पहाण्याचा पराक्रम पण केलाय...
>>>> असा काही पिक्चर होता? पॅट्रीक स्वाझीच्या जागी राहुल रॉय आणि डेमी मूरच्या जागी शिबा? कुफेहीपा! ‘अनचेन्ड मेलडी’च्या जागी काय होतं प्लीजच सांगू नका.

धमाल सिनेमा आहे. विकतच घ्यायचा होता पण नाही घेता येत एक्स्क्लुझिव्हिटी आहे.
-------------------------------------------
आणि अशाच एक्स्क्लुझिटीच्या विरुद्ध अ‍ॅपल व गुगल विरुद्ध दाखले कोर्टात आहेत.
- Google is on trial for allegedly using underhand tactics to ensure it stays the world's leading search engine. The U.S. Justice Department claims Google, which owns a 90% market share in search, paid massive sums to companies like Apple to make it the default search engine on products like the iPhone.

अमेरिकेत कॅपिटॅलिझम असुनही असा दाखला चालवता येतो व जिंकताही येऊ शकतो. अजुन बरच काही आहे या विषयात. माझा तेवढा अभ्यास नाही.

कुणाला सुप्रसिद्ध अभिनेत्री शिबा ओळखू आली का ?>>> हो हो आली ना. त्या क्षणी वाटून ही गेले..सलमान नंतर डायरेक्ट धरम पाजी Sad किती एज गॅप पण माईंड नाही केले ताईंनी Wink

सलमान आणि धर्मेंद्र वयात जास्त फरक नसावा…
ईशा देओल चे वय तीस असावे.. म्हणजे धर्मेंद्र नक्कीच ६० असेल… सलमान बहुतेक ५५ आहे…


धर्मेंद्र 60?ये मय क्या सून रही?

६८

रजनी ७२
शाखा ६१
नागार्जुन ६४
विजय थलपती ४९
A victory Godteam 58
Akshay 59
Amir 57
Salman 55
Sanjay Dutt 70
Mahesh Babu 46
Allu Arjun 47

Pages