रॉकी और राणी
काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.
पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.
एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.
आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.
रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.
जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका.
रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!
रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.
मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.
(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥
मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. )
आई तुला नेहमीच कसे समजते मी
आई तुला नेहमीच कसे समजते मी आलो आहे.. त्यामागे आई आणि मुलाची कशी नाळ जोडली गेली असती तो विचार लक्षात घ्यायला हवा.
>>>
"मॉं, तुम्हे कैसे पता के मुझे गाजर का हलवा पसंद है", ही हलवी- आपलं हळवी नाळ निरूपा रॉयने वीस वर्षे आधीच जोडली आहे. ते हिरो तर बिचारे पायी- पायी दरवाज्यातून यायचे. आईचा खोकल्याचा औषधाचा एक डोसच उरलेला असायचा. कधीही तक्रार केली नाही त्यांनी. त्यांच्या ममतेला हेलिकॉप्टरच्या पंख्याने उडवून लावल्याबद्दल निषेध.
मला मजा आली आहे असामी, ही काय
मला मजा आली आहे असामी, ही काय वर मजाच तर घेतली आहे.

धन्यवाद माझेमन.
निरुप्प रॉय ने इतक्या सिनेमात
निरुप्प रॉय ने इतक्या सिनेमात कपडे शिवायच्या मशीन वर काम केले आहे की नंतर तिला खरेच मशीन चालवायला येउ लागले म्हणे !
विकु
विकु


ऋ , कभी खुशी कभी गमांतर/ शाखांतर पुरे प्लीज.
'रॉकी और राणी'ची स्तुती किंवा निंदा करूया.
निरुपा रॉय कमालीची अभिनेत्री
निरुपा रॉय कमालीची अभिनेत्री होती... माझ्या चाळीसाव्या वाढदिवशी गड्ड्याच्या यात्रेत मी नुकताच रिलीज झालेला दिवार पाहिला होता.. शशी, अमिताभ इतकेच निरुपा रॉय चे डायलॉग्ज भारी होते...
“तुला कोणाचे प्रेमालाप बघायचे
“तुला कोणाचे प्रेमालाप बघायचे होते रे मग ?” -
माझी काही तक्रारच नाहीये. मी किती कौतुकानं लिहिलंय. 
त्यांच्या ममतेला
त्यांच्या ममतेला हेलिकॉप्टरच्या पंख्याने उडवून लावल्याबद्दल निषेध.
आणि
निरुप्प रॉय ने इतक्या सिनेमात कपडे शिवायच्या मशीन वर काम केले आहे की नंतर तिला खरेच मशीन चालवायला येउ लागले म्हणे !
>>>
ओ च्रप्स, गब्बसा , कायपण लिहु नका
त्यांच्या ममतेला
त्यांच्या ममतेला हेलिकॉप्टरच्या पंख्याने उडवून लावल्याबद्दल निषेध.

>>>>
या रिपोर्टनुसार रणवीर आणि
या रिपोर्टनुसार रणवीर आणि आलिया यांचे काही डिलीटेड वाफाळलेले सीन्स सारेगामा कारवा ने रॉऔराकिप्रे मेडले या व्हिडीओत समाविष्ट केले आहेत असा दावा केला आहे. काळजी वाटली. दोघेही विवाहीत, त्यांच्या हातून असे तसे काही घडले तर नाही ना ? त्यामुळे देशात महामारी तर येणार नाही ना ? काही आक्रीत घडलेच असेल तर शुद्धीकरण करून घ्यावे अशा हेतूंनी व्हिडीओ पाहिला. सिनेमा पाहिला नसल्याने डिलीटेड सीन्स अभ्यासकच सांगू शकतील.
हाच तो व्हिडीओ ( विवाह संस्था आणि संस्कृती शाबूत आहे का या एकाच चिंतेने माबोकर पाहणार आहेत ही खात्रीच )
https://youtu.be/FBTgulBOUy0
धर्मेंद्रचा चेहरा रोज
धर्मेंद्रचा चेहरा रोज द्राक्षासव घेऊनही प्रमाणात आहे. शबाना आजमी, जया बच्चन यांचा सुजीतकुमार का झालाय ? कि या सर्वांना थायरॉईड आहे ?
ते किसिंग सीन्स कथेची गरज आहे
ते किसिंग सीन्स कथेची गरज आहे.. आलिया ला लव्ह नसून लस्ट असते रणवीर बद्धल... चित्रपट बघा... जवान ला पैसे खर्च करण्यापेक्षा याला खर्चलेले कधीही चांगले...
. जवान ला पैसे खर्च
. जवान ला पैसे खर्च करण्यापेक्षा याला खर्चलेले कधीही चांगले... >> अकाऊंट नंबर पाठवतो. सोसायटीला घेऊन जातो बघायला.
शाहरूख किंवा त्याच्या चित्रपटाचा उल्लेख करू नका. हेडमास्तरीण बाईंनी छडी काढलेली आहे. छमछम वाजू लागली कि नंतर तक्रार नको.
मला पहिल्या अर्ध्या तासातच
मला पहिल्या अर्ध्या तासातच बोअर झाला... मग पुढचे ३-४ दिवस वेबसिरीजच्या एक एक एपिसोडसारखा बघून पूर्ण केला.
इथे सर्वांनी शबाना आझमीचं कौतुक केलंय, पण यात मला ती अजिबातच आवडली नाही.
सिनेमात आवडलेली एकच गोष्ट - "ठाकू मां" हे संबोधन.
कुस्ती, दुर्गा पूजा हे मॉब-सीन्स अति-मॉब वाटले, बजबजपुरी नुसती.
रणवीर सिंग आवडत नाही, त्यामुळे नो कमेंट्स.
आलियाच्या साड्या-ब्लाऊज पाहताना एकच प्रश्न पडत होता, रानीला पाठीवर घाम-बिम येत नाही का? आला तर तो कसा टिपला जात असेल?
अगदी..ललीता प्रीती.. मलाही ते
अगदी..ललीता प्रीती.. मलाही ते ठाकू मा संबोधन फार्फार आवडले!
रानीला पाठीवर घाम-बिम येत
रानीला पाठीवर घाम-बिम येत नाही का? >>>> म्हणुन तर एसी ब्लाऊजेस होते ना सर्व
डोळ्यात बदाम आणून बघू अशी
डोळ्यात बदाम आणून बघू अशी आलिया आहे त्या चित्रपटात, पण ललिताने जो प्रश्न विचारला त्याने डोळ्यात बदामच्या जागी अंजन पडले
हा शुद्ध दुष्टपणा आहे माने
( टोन सर्वाना माहितीच आहे की बनवाबनवी )
हलकेच घ्या हो ललिता
_/\_
(No subject)
दुष्टपणा>>हलकटपणा आहे
दुष्टपणा>>हलकटपणा आहे
नायतर काय. तो सलमान उघडाबंब
नायतर काय. तो सलमान उघडाबंब होऊन नाचतो तेव्हा नाही यांना असले प्रश्न पडत
पाठीवर घाम आहे का यासाठी
पाठीवर घाम आहे का यासाठी चित्रपट पुन्हा बघणे आले.. झूम करून करून बघावे लागणार आता...
अस्मिता , तुझ्यामुळे नको नको
अस्मिता , तुझ्यामुळे नको नको ते पिक्चर बघायला लागतात ग. बंदिवान संसारी १५ मिनिटात फास्ट फॉरवर्ड करून तरी बघितलाच . मुझसे दोस्ती करोगे आतापर्यंत हट्टाने बघितला न्हवता तो हि बघितला
आता हा सिनेमा दरवेळी प्राईम ओपन केल्या केल्या दिसत होता तरीही नेटाने इग्नोर करत होते. आता बघितलाच पाहिजे
^^^ रंग ओला आहे.
^^^ रंग ओला आहे.
आता बाईपण भारी देवा ची वाट
आता बाईपण भारी देवा ची वाट आहे ओ टी टी वर....
डोळ्यात बदामच्या जागी अंजन
डोळ्यात बदामच्या जागी अंजन पडले

रंग ओला आहे.
आता बाईपण भारी देवा ची वाट
आता बाईपण भारी देवा ची वाट आहे ओ टी टी वर.>> हो माझ्या मेडने मोबाइल वरच बघुन टाकला. त्या सात बहिणी आहे. व पिक्चर मध्ये एक कर्जबाजारी बाई आहे ना ती तूच आहेस असे तिला बाकीच्या भिणी म्हण तात म्हटली.
^^^ रंग ओला आहे.>>>
^^^ रंग ओला आहे.>>>
लेख आणि प्रतिसाद दोन्ही मस्त
लेख आणि प्रतिसाद दोन्ही मस्त आहेत
फॉल सुरू झालाय तर मस्तपैकी When Harry met Sally वगैरे पुन्हा बघावा झालं!
या विकेंडला हा पिक्चर बघायच्या विचारात होते. आता विचार कॅन्सल करेन असं वाटतंय
भारी लिहिलं आहे. काल पिक्चर
भारी लिहिलं आहे. काल पिक्चर बघितला आणि हा लेख वाचला. सगळं पटलं. प्रतिसाद अजून वाचायचे आहेत.
पिक्चरच्या शेवटाकडे एका गंभीर प्रसंगी ती दिव्या (जेव्हा दामिनी सिरीयल बघितली होती, तेव्हापासून मी क्षिती जोगला दिव्याच म्हणतो) एकदम गायलाच लागते. तिथे हहगलो. मूळ मुद्दाच बाजूला राहतो तिथे. बाकी पूर्ण सिनेमात रेट्रो गाणी फार छान आणि विनोदी पद्धतीने वापरली आहेत. मला आवडली. आलियाच्या साड्या सुंदर आहेत. (पूर्ण सिनेमात हिरोईन फक्त आणि फक्त साड्याच नेसते, ह्या गोष्टीला साडेबत्त्याष्ठ वर्षं झाली असतील.)
शेवटच्या संस्कृत श्लोकाबद्दल साधु साधु!
आलीयाच्या मनिष मल्होत्रा
आलीयाच्या मनिष मल्होत्रा साड्या सुंदर आणि मेजॉरीटी साड्या सीथ्रु , हवेत उडणार्या आहेत , तिची ब्लाउजेस ब्रा पेक्षा जास्तं फ्लॉन्टिंग आहेत.
ओव्हर ऑल तिचा साडी ब्लाउज गेटप बिकिनी इतकाच सेक्सी आहे , जर इतक्या हॉट साड्या नेसायला मिळत असतील तर सगळ्या हिरॉइन्स नेसतील सिनेमा भर !
इतकेच काय, पालकांनी कॉलेज मधे जाणार्या मुलींवर ड्रेसकोड लादला नाही तर कॉलेजात जातानाही नेसतील मुली आलीया स्टाइल साड्या
दीपांजली
दीपांजली
Pages