रॉकी और राणी
काही तुकडे चांगले आहेत, पण 'क्या करू ओं लेडीज मैहूं आदतसे मजबूर' या नेमाने मधेमधे केजोने डिझायनर कपड्यांचे ठिगळ जोडले आहे. त्याने ही गोधडी शेवटी 'न्यूयॉर्कमध्ये भीक मागताना पांघरावी जशी'- अशी बटबटीतच झाली आहे. यांना पेट्रियार्की विरोधात बोलायचा आव आणून फक्त लक्ष वेधून घ्यायचं असतं. ते कुठल्याही बाजूने नसतात. 'खरा भाव व उगा खळबळ ' यातला फरक आजकालच्या प्रेक्षकांना कळतो.
पापाजीची 'याददाश्त' गेलेली असल्याने ते लेकीएवढ्या कुठल्याही बाईचे मुके घेतात. ती बाईही 'ठीक आहे नं , लग्नाकार्यात कमीजास्त चालायचंच' म्हणते. लेकरंबायको विसरून हे तेवढं लक्षात रहातं. धरमपाजीबा 'एकनिष्ठ' आहेत , ते पूर्ण सिनेमात एकच शब्द वारंवार बोलत रहातात. 'जामिनी-जामिनी' करत आयुष्यभर सुस्कारे सोडतात. हे नाव बंगाली असल्याने मूळ 'यामिनी'(रात्र) असावं, एवढ्या सुंदर नावाचा 'गुलाबजाम' केला आहे. जांबंबोरं न खाताच तोंड आंबट पडतं.
एक तेवढं शबाना आझमीचं काम मनापासून आवडलं. ती असलेले सगळेच प्रसंग खरेखुरे वाटलेत. बाकी कुणातच कसलंच कन्विक्शन दिसलं नाही. सगळे नमुने यांच्याच घरात हे तर डेली-सोप प्रेरित वाटलं. रिबेल-वाग्दत्त सूनबाई आलिया येऊन चाळीस वर्षांपासूनची अडलेली क्रांती चार दिवसांत करते. मग तिच्या सासूबाई एकदम बोलतबोलत 'कांटो सें खिंच के ये आंचल तोड के बंधन बांधी पायल' ही कृती गाऊन दाखवीत करतात. 'दिल की उडान' भरायला सासूबाईंची ना असते, म्हणून यांना स्वतःची सून यायची वाट बघावी लागते. कधीकधी असं होतं बऱ्याच घरात, पण इथं पाच मिनिटांत एक क्रांती घडवून आणतात. क्रांतीचा हा वेग अचंबित करणारा आहे.
आलिया मुलाखती घेत असते म्हणे, पण एकुण एकच मुलाखत घेतली आहे. त्यातही तिचं पात्र कसं आहे हे दाखवण्यासाठी ते तेवढं रचलं आहे असं वाटतं. सतत साड्या घालून फिरते व पदराने महाल झाडते, कामानिमित्त म्हणावं तर दुसरीकडे सुद्धा साड्या हे काळाप्रमाणे मला काही पटणेबल वाटत नाही. आजकालच्या स्त्रियांना सगळ्या प्रकारचे पेहराव आवडतात. स्त्रिया अविवाहित असताना, आपल्याच घरी कुठलाही समारंभ नसताना, मध्यरात्री साडी आणि बिकिनी ब्लाऊज घालतीलच असं नाही. कपडेपट कितीही सुंदर असला तरी कथानक असे असल्याने 'जरी का शृंगारले मढे' या ओळींचा प्रत्यय येत रहातो.
रणवीरचा घर/महाल/रंधावा हाऊस का जे काय आहे ते इतकं मोठं आहे -इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- इतकं मोठं आहे- आता इन्फिनिटीपर्यंत मोजा. एवढंही फेकू नये माणसानं, प्रेक्षकांनी आईच्या मायेने पदराखाली घ्यावं तर काल्पनिक पदरही फाटायचा. एवढं मोठं घर फक्त 'धनलक्ष्मी लड्डू ' विकून झाले आहे. फक्त लाडू विकून एवढं श्रीमंत व्हायला दिल्लीतल्या प्रत्येकाने अन्नपाणी सोडून गेले तीस वर्षे फक्त यांचे धनलक्ष्मी लाडूच खाल्ले असावेत असं वाटलं. इथं मात्र कन्विक्शन दिसलं. गंमत म्हणजे पूर्ण विश्वात पसरलेल्या महालात एकही नोकर नाही.
जया बच्चनला पंजाबी लाऊड खडूस बाई साकारता येत नाही. ती अजिबात पंजाबी वाटत नाही, फक्त खडूस वाटते. का गं, पडद्यामागे तर जमतं तुला, आताच का अंगात आलं मग. हा अभिनयही टिकटॉक वरचा खडूस बाईचा कायिक अभिनय वाटतो. ही भूमिका किरण खेरला खूप सूट झाली असती. अमिताभचा KANK मधला 'डेफिनेटली चंदिगढ' हा चावट डायलॉग आठवू नका.
रणवीर सिंगची एनर्जी सुपरफिशियल वाटते, एरवी हीच एनर्जी अशाच रोलमधेही जेनुईन वाटायची. आलिया तर 'बघाच मी असं काही करेन की तुमचे डोळेच दीपतील' याच आत्मविश्वासाने वावरते. तिच्या आईबाबाचा अभिनय व नृत्य बरे आहे. पण मूळ संहितेपासून सुटेसुटे वाटत रहाते. एखादी स्वतंत्र क्लिप जोडल्यासारखी वाटते. जसं रणवीर सासूसोबत ब्रा-खरेदीला जातो व सासऱ्यांकडून कथक शिकतो हे चांगले आहे. पण हे सगळेच एकदम गूगली मारून उथळ होतात, डोळे मिचकवतात, अतिशय पांचट जोक्स मारतात म्हणून पॅकेज म्हणून अशा सीन्सना हवा तो आदर मिळत नाही. एरव्ही पांचट बोलणारा माणूस कधीमधी तात्विक बोलला तर आपणही विश्वास ठेवणार नाही, तसं!
रणवीरचा बाबा मख्ख-डेलीसोप बाबा आहे. जो साक्षात्कार झाल्यासारखा एकदम कुटुंबवत्सल होतो. बहिणही आजीला फडंफडं काहीतरी बोलते. आजी एक सेकंद गोरीमोरी होते, धरमपाजीबा 'घरं तोडू नकोस रे लेकरा' म्हणत- अगम्य हातवारे करत 'भगवंताला प्यारे' होतात. पूर्ण वेळ नातू आणि होणारी नातसून 'ऐका पाजीबा-ऐका पाजीबा' करत होते. तेव्हा अवाक्षरही बोलले नाहीत हे. एकदम मरूनच जातात, तेव्हा 'अंत्यदर्शन तरी घेऊ द्या माझ्या एक्सचं' म्हणत वैकुंठाला शबाना आझमी आसवं गाळत येते, इतके भारीभारी कपडे की लेक आणि सूनेला धरून न्यावं लागतं हिला. आपल्याला वाटतं अती दुःखाने तोल जाईल म्हणून धरलेय.
मग पाजीबा गेल्यावर तर जया आजीला सगळे 'याचीच वाट बघत होतो, आता दाखवतोच तुला इंगा' खेळतात. आता कुणीच नाही आपल्याला कळल्यामुळे व पिक्चर संपत आल्यामुळे तिलाही उपरती होते. मग लग्न होतं, 'इतक्या वेळ कशाला मांडव चढवला होता बे' असं प्रेक्षकांना वाटून सिनेमा संपतो.
(अवांतर - यामिनी-जामिनी नाव ऐकून,
या राका शशिशोभना गतघना सा यामिनी यामिनी
या सौन्दर्यगुणान्विता पतिरता सा कामिनी कामिनी ।
या गोविन्दरसप्रमोदमधुरा सा माधुरी माधुरी
या लोकद्वयसाधनी तनुभृतां सा चातुरी चातुरी ॥
मला ह्या सुरेख सुभाषिताचा 'सा यामिनी यामिनी' हा तुकडा आठवला, मग मी संपूर्ण ओळी शोधल्या. )
नातू नातू किंवा जय हो सारख्या
नातू नातू किंवा जय हो सारख्या सुमार गाण्यांना ऑस्कर मिळाले हे आठवले तर यातना अजून कमी होतील...
माबोवर विवाहित गृहस्थही आहेत
माबोवर विवाहित गृहस्थही आहेत
>> फक्त विवाहितच आहेत आता अलमोस्ट. इथं एकेकाळी कितीतरी लग्नं जमलेली, तो भुतकाळ झाला. यावर एक केजो फिल्म होईल, पण मनावर कोण घेतो.
शबाना आझमी गोड दिसतात, आणि जया बच्चन भयानक. तसंच दिसायचा रोल केजोने त्यांना दिलाय, पण तेही नीट जमलं नाहीये त्यांना. धरमपाजींना केजोने निव्वळ भरीस पाडलेलं दिसतंय. करिअरचा शेवट गोड व्हावा (टचवुड, पाजी) म्हणून तेही पडले असावेत.
उरलेलं बाकी सारं क्राफ्टच म्हणायचं, नि काय. आपल्याला सवय आहेच.
अस्मिता. यांनी छान लिहिलंय. परीक्षण म्हणू नका त्याला.
परीक्षण मत कहो ना ...
परीक्षण मत कहो ना ...
सगळ्याच ओळींना अगदी अगदी झालं
सगळ्याच ओळींना अगदी अगदी झालं

हेच हेच मत झालं माझंही.
तद्दन फिल्मी पणा. ती मुलाखत तर कहर होती. नेत्याचा जाहीर टीव्ही वर अपमान करते आणि तिला कोणी काहीच बोल लावत नाही, उत्तरं द्यावी लागत नाहित. सही यार मलाही हवा असा जॉब
& काहीही सूर न जुळणारं हिरो-होरोईन नातं उगाच मिठी छान मारतो, ह्या तत्वा वर पेललेलं आहे.
तो ब्रा खरेदी सिन तर कैच्याकै आहे, असं कोणी पुरुषा ला का बसऊन बघेल ब्रा? मुळात असं कोणी करत नाहीत. दिल्ली असो का युएस.
बेक्कार... वाचताना कितीतरी
बेक्कार... वाचताना कितीतरी वेळा अगदी अगदी झालं. ना धड उथळ ना धड डीप. फक्त भोज्ज्याला स्पर्श करून आल्यासारखं शेवटच्या १०-१५ मिनिटात सगळी क्रांती दाखवायची आणि "आमचा सिनेमा बघा किती progressive" चा आव आणायचा. आलिया आणि रणवीर दोघेही आवडत असले तरी त्यांना ह्याच छापाच्या भुमिकांमध्ये पाहून कंटाळा आला आता. बोअर. बोअर. बोअर..
रुन्मेष मान्यच की त्याचं
रुन्मेष मान्यच की त्याचं अनुभवविश्व वेगळं.

फिल्म इंडस्ट्री बॅकग्राऊंड असलेल्या फरहान अख्तर चा दिल चाहता है पाहिलाय का?
सुपर रिच किड्स चे आयुष्य दाखवलं आहे पण त्यातले श्रीमंती सोडली तर इतर गोष्टी relate होत नाहीत का?
ही अपेक्षा हुशार सेन्सिबल करण जोहर कडे ठेवणे चूक आहे का?
करण जोहर हा राजकुमार हिरानी /
करण जोहर हा राजकुमार हिरानी / संतोषी , मन्सूर खान , अनुराग कश्यप, साईराम राघवन, मेघना गुलजार, झोया अख्तर , सुजॉय घोष यांच्या पेक्षा श्रेष्ठ दिग्दर्शक आहे किंवा
शाहरूख खान अमिताभ बच्चनपेक्षा दोन फूट उंच आहे असे दावे मायबोलीवर काही लोकांनी केले कि मम म्हणायचं असतं.
तो अती मोठ्ठाला महाल बघून असं
तो अती मोठ्ठाला महाल बघून असं मत होणार होतं, पण मला हल्दिराम, घसिटा आठवले. मेन प्रॉडक्ट लाडू आणि इतर मिठाया असा बिजनेस असू शकतो.. तरी ते फायनान्स सीईऑ वगैरे
Lol.. पाजिबा:P हे रत्न अजून
Lol.. पाजिबा:P हे रत्न अजून बघितले नाही.
घुसमट व अश्या परिस्थितीत
घुसमट व अश्या परिस्थितीत अचानक भेटले ला/ ली सोलमेट हे शबाना व धरमचे नाते एकदम रिलेटेबल आहे>>>> नाही हो नाही अजिबाआआआतच रीलेटेबल नाहिये ते तसं त्या दोघांचं भेटणं/भेट घडऊन आणणं वगैरे.
शिवाय प्रेम वगैरे ठीके पण प्रतिकूल परिस्थिती तून गडगंज संपत्ती प्रसिद्धी आज्जी ने मिळवलेली असताना तिला ऑफेंड करून घरात शबाना ला आणणे वगैरे कैच्यकै गोष्टी कसंकाय केली जातात? स्वतःच्या मर्जीने नाचू ही शकत नसतात आणि ४ दिवसात थयथया नाचतात आणि धरम पाजी चा भर पार्टीत मध्यम वयीन बाई चा मुका घेणे...ही असली फालतू गंमत???
relate होत नाहीत का?
relate होत नाहीत का?
ही अपेक्षा हुशार सेन्सिबल करण जोहर कडे ठेवणे चूक आहे का?>>> हो. कारण करण फक्त श्रीमंतांच्याच प्रॉब्लेम सोबत रीलेट वगैरे करवू शकत असावा. आणि हे समजण्याची अपेक्षा ऋन्मेश कडून धरणं पण तितकंच चूक आहे
नाही हो नाही अजिबाआआआतच
नाही हो नाही अजिबाआआआतच रीलेटेबल नाहिये ते तसं त्या दोघांचं भेटणं/भेट घडऊन आणणं वगैरे.>> तुम्हाला रिलेटेबल नाही वाटत म्हणजे पूर्ण जगात कोणाला च रिलेट होत नाही असे नाही ना. सर्वांनाच साजुक तुपातल्या रिलेशन शिप नाही भेटत. काही काही तर अगदी अब्युजिव रिलेशन शिप मध्ये अडकलेले असतात पण काही कारणाने बाहेर पडता येत नाही. मग असे मार्ग शोधले जाउ शकतात.
शिवाय प्रेम वगैरे ठीके पण प्रतिकूल परिस्थिती तून गडगंज संपत्ती प्रसिद्धी आज्जी ने मिळवलेली असताना तिला ऑफेंड करून घरात शबाना ला आणणे वगैरे कैच्यकै गोष्टी कसंकाय रेलेटेबले वाटतात? >> त्या व्यक्तिरेखे ची आर्क बघितल्यास समजेल. जया एकदम डॉमिनंट पत्नी तिला नवर्याला कविता आव्डतात व तो तितका अॅग्रेसिव पंजाबी पैसा पैसा वाला नाही म्हणून तो नवरा आव डत नाही. लहान मुलग्याला पण बापापासून दूर करते. अश्या परिस्थितीत नवरा कुठेतरी आउटलेट शोधेलच न निदान प्रयत्न तरी करेल. नाहीतर मेल्या मनाने जगायचेच आहे.
जया अशी का झाली ते तिचे स्वगत हवे होते.
आणि धरम पाजी चा भर पार्टीत मध्यम वयीन बाई चा मुका घेणे...ही असली फालतू गंमत??? Uhoh>> गंमत नाही आहे ती सर्व कानकोंडेच होता त. वयस्कर व्यक्ती ( पालक ) सुद्धा डिमेन्शिआ/ पार्किन्सन/ अल्झेहायमर/ आर्थराइ टिस अशा आजारा चे पेशंट असले की अगदी किस नाही पण लाजिरवाणे वागणे होते ज्येना पालकांकडून. ते केअर गिव्हर ला सांभाळून घ्यावे लागते. दे लिव्ह इन अॅन आल्टरनेट रिअॅलिटी.
धरम शबाना चोरुनच भेट तात की.
धरम शबाना चोरुनच भेट तात की. मै जट यमला पगला दिवाना असा तो धरम व इंटलेक्चुअल बंगाली शबाना उतार वयात परत एकदा भेटु शकतात हेच ग्रेट आहे. बर्याच लोकांना असे भाग्य मिळत नाही. जुनी प्रेमे तशीच मनात लपून बस तात व आपल्या बरोबरच कैलासवासी होतात.
होय "मला" रीलेटेबल वाटले नाही
होय "मला" रीलेटेबल वाटले नाही असे लिहायला हवे होते..
इतकं प्रगत झालय का जग?
प्रचंड गोतावळ्यातले अनेक आजोबा आजी पाहिलेत (पर प्रांतिय/पर धर्मिय पण) पण असे नाही कधीच पाहण्यात आले.
त्यांची भेट ही एक वेळ समजू पण बायको समोरच प्रेयसी च्या ओठांचा मुका!
बायको समोरच प्रेयसी च्या
बायको समोरच प्रेयसी च्या ओठांचा मुका! Uhoh इतकं प्रगत झालय का जग?
ही पद्धत कोणी आणि का सुरू केली असावी?
>>>
इथे जग नाही भारत लिहा. नाहीतर लोकं जगातली उदाहरणे देतील
बाकी मला ते हात मिळवावे तसे गालावर किस करणे सुद्धा भारी वाटते
रुन्मेष मान्यच की त्याचं
रुन्मेष मान्यच की त्याचं अनुभवविश्व वेगळं.
फिल्म इंडस्ट्री बॅकग्राऊंड असलेल्या फरहान अख्तर चा दिल चाहता है पाहिलाय का?
>>>>
हो पण फरहान आणि झोया अख्तर ही कोणाची मुले आहेत ते देखील बघा. मी यांचे आणि करणचे बालपण पाहिले नाही जे तुलना करावी, पण तरी फरक नक्की असावा असे वाटते ज्यामुळे त्यांचे अनुभव विश्व वेगळे असावे. त्यामुळे येणाऱ्या संवेदना वेगळ्या असाव्यात.
पण तरी फरक नक्की असावा असे
पण तरी फरक नक्की असावा असे वाटते >> काय ?
दोन्ही चांगल्या परिस्थिती तली
दोन्ही चांगल्या परिस्थिती तली लोक आहेत. फरक क्वालिटी चा आहे.
घ्या उत्तर मिळाले
घ्या उत्तर मिळाले
हा चित्रपट (अजून ... )
हा चित्रपट (अजून ...
) वास्तववादी करायचा असता तर केजो ने धरमपाजींच्या ऐवजी अमिताभ आणि शबानाच्या ऐवजी रेखाला घ्यायला हवं होतं. या अशा स्टारकास्टमुळे का होईना, पण जया बच्चन ने तिच्या भुमिकेला व्यवस्थित न्याय दिला असता.
बाकी चित्रपटात आवडलेल्या गोष्टी म्हणजे सढळ हाताने वापर केलेला हिंदी गाण्यांचा संच आणि आलिया ....
अस्मिताचा रिव्ह्यू मस्त. पण
अस्मिताचा रिव्ह्यू मस्त. पण खूप लोकांना आवडल्यामुळे
असे एकूण फीलिंग आहे.
केजो चे सिनेमे कधीच मला अपील झालेले नाहीत त्यामुळे आश्चर्य नाही पण हा अजूनच नावडलेला आहे.
केजो चे सिनेमे कधीच मला अपील
केजो चे सिनेमे कधीच मला अपील झालेले नाहीत >>> तो बॉलिवूडचा दवणे आहे. अनेक सीन्स डायबेटिक आणि दवणीय असतात.
मी कजोचा/चे चित्रपट पाहिला/ले
मी कजोचा/चे चित्रपट पाहिला/ले-ही अ-सेल/सतील, पण हा/हे कजोचा/चे असे काही माहित नाही.
अरूण
अरूण
जया बच्चनला अभिनय जमलाच नाही, चेहऱ्यावरील हावभाव टिकटॉक वरील 'अभिनयाचे' आहेत. मला धर्मेंद्र सोबत शर्मिला टागोर आवडली असती, थोडं चुपके चुपके रिक्रिएट झालं असतं. ती फारच ग्रेसफुल, सुंदर आणि बंगाली तिन्ही आहे. तिला टागोरांच्या कविता वाचताना ऐकायला आवडले असते. शबाना आझमी स्वतंत्र व्यक्ती म्हणून चांगली वाटते, तिनेही फिराकची शायरी व कविता छानच वाचल्या आहेत. पण यात धर्मेंद्र सोबतची केमिस्ट्री 'मायाळू नर्स आणि पेशंटची' वाटली. Going to help him pass over to the other side types....
मैत्रेयी

कुणाला आवडतो, कुणाला नाही तेव्हाच 'झिम्मा' सुरू होतो. मी ओटीटीवरचे सगळे नवीन सिनेमे बघते, हाकानाका.
चणा, कविन, द्वादंशागुला,
चणा, कविन, द्वादंशागुला, झकासराव, मानवदादा, स्वस्ति, AMIT, आशु, भक्ती साळुंके, मै आणि साजिरा
मनापासून आभार.
किल्ली, थॅंक्स
मी काही सीन्स पाहिलेत youtube
मी काही सीन्स पाहिलेत youtube वर. आलिया आणि रणवीर आता डोक्यात जाऊ लागलेत खरंच.
जया बच्चन चा थोबाडीत मारलंय आताच कुणीतरी छाप चेहरा आणि हावभाव आहेत.
मस्त लिहिलंय अस्मिता
तो बॉलिवूडचा दवणे आहे. >>>
तो बॉलिवूडचा दवणे आहे. >>>
मानवदादा,
न्यूयॉर्कचं वाटावं असं कॉलेज, दोन हजार करोडचा टर्न ओव्हर असलेल्या कंपनीचे मालक, हेलिकॉप्टर मधून येजा करणारा हिरो, नॉस्टॅल्जिया असलेल्या गाण्यांवरची अंताक्षरी किंवा पिकनिक, महालांसारखी घरं, स्वतःच्याच मोठ्या तसबिरी समोर ऑफिस -ऑफिस किंवा दिवाणखाना, करवाचौथ, मोठमोठ्या पूजा, झुंबराखालचे टडोपा सीन्स, गे जोक्स, उठसूठ औक्षणाची तबकं घेऊन हिंडणाऱ्या बायका.... यापैकी काही किंवा सगळं असेल तर ते केजोचं असतं. साधेसुधे श्रीमंत नाही, 'प्रायव्हेट जेट श्रीमंत' पार्श्वभूमी असते.
या सिनेमातला कुस्तीचा फडही सर्कशीसारखा होता, तिथेच आफ्टर कुस्ती पार्टीत(?) अचानकच 'झुमका गिरा रे' सुरू झालं.
" दोन हजार टर्न ओव्हर
" दोन हजार टर्न ओव्हर असलेल्या कंपनीचे मालक" - पण ह्यांची बोर्ड मिटिंग घरातच चालते. बोर्ड रूम ही घरातल्या बाथरूमपेक्षाही लहान आहे. बोर्ड मेंबर्स एकमेकांना टोमणे मारणं, हमरीतुमरीवर येणं, येड्यात काढणं वगैरे गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही बाळबोध वाटाव्या अश्या बाळलीलांमधे मश्गूल असताना (पक्षी: बोर्ड मिटिंग चालू असताना) तिथे सहज कुणीही फिरकू शकतं. आलोच आहोत तर आपल्याला त्या बिझनेस मधलं काही कळो, न कळो, पण एक मत ठोकून देऊ शकतं. आणि आश्चर्य (?) म्हणजे, अश्या कसलाही आगापीछा नसलेल्या व्यक्तीनं दिलेल्या रँडम मताने कंपनी अचानक तोट्यतून (प्रचंड) फायद्यात येते. लगेच हीरो-हिरवीन कमीत कमी कपड्यात प्रेमालाप करायला मोकळे.
फेफ
फेफ

हो, इथेही होती मिटिंग. लाडूच्या जाहिरातीचे टॅग लाईन आलियाने अचानक येऊन बदलले आणि कंपनी पुन्हा करोडोत, ते आपल्या सारख्या लोकांना कळावे म्हणून एक वेडावाकडा आलेखही दाखवला होता.
इथले (हिरोहिरविन) आजीआबा मागे 'संयत प्यार' करत असताना, नातवंडे समोर 'असंयत प्यार' करत होती. मुलं अनुकरणातून शिकतात ती अशी.
"मुलं अनुकरणातून शिकतात ती
"मुलं अनुकरणातून शिकतात ती अशी" -
Pages