मायबोलीवरील साहित्य आणि श्लील अश्लीलतेच्या मर्यादा

Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41

ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

">> ती कविता अश्लिल आहे किंवा नाही, हा मुद्दा आलाच कुठुन ??

अश्लील नाही वाटली तर

>> होय ! मला ते अश्लील वाटते. 'जर तुम्ही एखादे साहित्य तुमच्या आईला वा बहीणीला वाचुन दाखवू शकत नसाल तर ते साहित्य अश्लिल ! ' अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे याबाबतीत. जर मी अमेरिकन कुटुंबात वाढलो असतो, तर कदाचित मलाही ते तसे वाटले नसते.
....
पण एका सार्वजनिक स्थळी वावरताना, लेखकाने वा कविने ते भान ठेवावे असे माझे वैयक्तीक मत आहे!

ही पोस्ट काय होती?

आणि,
१. ही कविता मला आवडली असं मी कुठे म्हटलं आहे?
२. आणि समजा माझ्या पोस्टमधून तो अर्थ ध्वनित होतही असला तरी ती इतरांनाही आवडायलाच हवी असा अट्टाहास मी कुठे केला आहे?

आता कृपा करून 'बरं, तुम्हाला नसेल आवडली तर आम्हालाही नाही आवडली. हाकानाका!' असं म्हणू नका."
Submitted by वैभव_जोशी on 9 June, 2009 - 14:29

--> कसं सांगू मला काय वाटतय
फक्त एवढच लिहीतो
एखाद्याच्या घरातील फरशीवर/शेतातील एका दगडावर दत्त प्रभुंच्या पादुका उठल्यावर त्या व्यक्तिला किती आनंद होत असेल...
तितकाच आनंद मला तुझ मायबोली वरच काहीही लिखाण सापडलं तरी मिळतो देवा!
मला खरच खूप उशीर झाला... इकडे यायला मायबोलीवर... नुसती हळहळ...जन्माची!!

दुसर्‍या एका कवितेवरून सर्च दिला असता हा धागा समोर आला. चाळला फक्त.
धागा जुना असला तरी विषय आजही ताजा आहे.

अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||

पहिल्या वेळी याचा काय संदर्भ असावा म्हणून डोकं खाजवलं. या ओळींमुळे कुणीतरी प्रतिसादात बदल केला का असेही वाटले. पण नंतर मायबोलीवर त्या वेळी आयडीची टॅगलाईन अस्तित्वात असावी असे वाटले. Lol

>> दुसर्‍या एका कवितेवरून सर्च दिला असता

"तरुण आहे रात्र अजुनी" वर सर्च केला होता ना? Lol कारण मला सुद्धा त्यासाठी हाच धागा समोर आला होता Proud

"तरुण आहे रात्र अजुनी" वर सर्च केला होता ना? >>> Lol
म्हण आहे ना ? चोराच्या वाटा थोरांस ठाऊक !

मराठी कविता म्हटली की माझ्या डोळ्यासमोर फक्त ही एकच कविता येते, मोकलाया दाही दिशा. ही कविता आणि त्यावरील कॉमेंट्स अजरामर आहेत.

>>>>फ नी दिलेलं हे उत्तर:

रैने, एकनाथांच्या 'कुंटीण' भारुडातला हा एक चरण आहे. या भारुडामध्ये एकनाथांनी मुमुक्षू शिष्य व त्याला मोक्षमार्गाची वाट दाखवणारा गुरू यांना वेश्या-कुंटिणीच्या जोडीचे उपमान योजून आत्मबोधाची लक्षणे सांगितली आहेत.
.........पदररूपी भौतिकाच्या भ्रम फेडला. (पुढे सद्गुरूरूपी कुंटिणीच्या मदतीने त्या परतत्त्वरूपी पुरुषाने) माझी वासनारूपी चोळी सोडवली .................. या भारुडात मुमुक्षू शिष्याला प्रथम भोळ्या असणार्‍या, पण पुढे व्यभिचारिणी बनलेल्या बाईची, मोक्षमार्गाची वाट दाखवणार्‍या गुरूला कुंटिणीची व परतत्त्वाला (= सत्) परपुरुषाची उपमा योजली आहे.>>>>>>>>>>

हे रत्न खतरनाक आहे. बंगाली देव्युपासनेच्या कविता वाचलेल्या आहेत, एथन वॉकर यांचे 'सॉफ्ट मुन शायनिंग' सुद्धा अशाच मस्त उपमा दाखविते - उदा - देवी म्हणजे चाचा (पायरेट) असणे, लहान मुलगी असणे, आपण शेतकरी असणे, भिकारी असणे - या सर्व उपमान-उपमेयांतून लोभस अध्यात्माविष्कार घडतो. पण सद्गुरुंना 'कुंटीण' ही उपमा व त्याचे स्पष्टीकरण निव्वळ खतरनाक आहे.

आपल्या पाटणकर साहेबांच्या कवितांपुढे या सगळ्या कविता फेल आहेत.>> पाटणकर साहेबांच्या कविता आणि परिचित सरांच्या चित्तरकथा..

Pages