Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
सत्या, गूड
सत्या, गूड वन !
जाणीवा लक्षात घेवून लिहीलेलं अश्लील वाटत नाही हा पेशव्यांचा मुद्दा मान्य!
त्या जाणिवा ह्या व्यक्तिव्यक्तिनुसार बदलतात, सापेक्ष असतात हेही मान्य.
पण तरीही काही सु'जाण' लोकांच्या जाणिवांच्या आधारे या श्लीलाश्लीलतेला काहीतरी मर्यादेची चौकट इथे (इथे मायबोलीवर) घालता येवू शकते का?
का ती चौकट, सेन्सॉरशीप नसावी ?
************************
सुबोध, सकाळचा पहिला चहा मलाही लागतो. पण तो इतका मसाला टाकुन मी पीत नाही.
फक्त प्रेशर बिल्ट करायला तो चहा महत्वाची गरज बनून राहिलाय. त्यामुळे तुझ्या कवितेतल्या चहाच्या अनुभुतीशी समरूप होणे मला जमले नाही! क्षमस्व !
एखाद्या
एखाद्या स्त्रीला जो माणूस "कमरेखालचे" उत्तर देइन असा शब्द वापरून बोलतो. त्यानंतर त्याने कितीही स्त्रीस्तुतेपर्/आईस्तुतीपर लिहिले तरी तो माणूस मला "अश्लीलच" वाटणार.
अशा लोकानी जरी चांगले लिहिले तरी त्यातला दांभिकपणा लक्षात येतो आणि मग ते "चांगले" लिखाण फक्त शब्दाचे बुडबुडे वाटयला लागतं. दुर्दैवाने मायबोलीवर सध्या असलेल्या बुडबुड्यानाच जास्त किम्मत आहे. >>>> नंदिनी, १००० मोदक. माझा तर भडका उठतो याबाबतीत.
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
एखाद्या
एखाद्या स्त्रीला जो माणूस "कमरेखालचे" उत्तर देइन असा शब्द वापरून बोलतो. त्यानंतर त्याने कितीही स्त्रीस्तुतेपर्/आईस्तुतीपर लिहिले तरी तो माणूस मला "अश्लीलच" वाटणार.
अशा लोकानी जरी चांगले लिहिले तरी त्यातला दांभिकपणा लक्षात येतो आणि मग ते "चांगले" लिखाण फक्त शब्दाचे बुडबुडे वाटयला लागतं. दुर्दैवाने मायबोलीवर सध्या असलेल्या बुडबुड्यानाच जास्त किम्मत आहे.
>>>>>>>>
प्रचंड मोदक..
साने, माझा अधिकार मोठा बिठा नाहीये. मी केवळ तुमचा गैरसमज (असल्यास) दूर करायचा प्रयत्न केला.
सेन्सॉरशिप का हवी ह्याबद्दल बोलूया मग हवी की नको ठरवता येईल.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
एखाद्या
एखाद्या स्त्रीला जो माणूस "कमरेखालचे" उत्तर देइन असा शब्द वापरून बोलतो. त्यानंतर त्याने कितीही स्त्रीस्तुतेपर्/आईस्तुतीपर लिहिले तरी तो माणूस मला "अश्लीलच" वाटणार.
>> अनुमोदन ! आणि नवल म्हणजे ह्या स्तुतीपर कवितांमुळे हुशार लोकही भूलतायेत !
त्यातला दांभिकपणा लक्षात येतो आणि मग ते "चांगले" लिखाण फक्त शब्दाचे बुडबुडे वाटयला लागतं. >> दांभिकपणा कोणाच्या लक्षात येतो ? तर काही ठराविक लोक आहेत ज्यांनी अनुभव घेतला आहे , किंवा जे लोक डोळे उघडे ठेवून वावरतात माबोवर त्यांच्याच ! बाकीच्यांना ते महानच वाटणार ...
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
ही चर्चा
ही चर्चा आता वैयक्तिक पातळीवर उतरायचे/उतरवायचे काही प्रयोजन ?
"सेन्सॉरशि
"सेन्सॉरशिप" का हवी ह्याबद्दल बोलूया मग हवी की नको ठरवता येईल.>>>
चला आता
का हवी ह्या वर चर्चा करूयात काय?
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
ही चर्चा
ही चर्चा आता वैयक्तिक पातळीवर उतरायचे/उतरवायचे काही प्रयोजन ? >>> तसं नाही मला वाटत प्रकाश. कारण इथे आधीही श्लिल की अश्लिल हे ठरवण्यासाठी अनेक उदाहरणे दिली गेली आहेत. दांभिकपणा चर्चिला गेला आहे. त्या अनुशंगानेच श्लिल मुखवटा व त्यामागचा अश्लिल चेहरा हे समाजातलं एक उदाहरण म्हणून नंदिनीने दिलं असेल असं मला वाटतं.
तशा इथे सगळ्यांच्याच प्रतिक्रिया विचार करण्याजोग्या आहेत पण त्या वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे निष्कर्श काढू शकतात असं मला वाटतं. बाकी मला कुठे तरी मर्यादा असावी असं वाटतं.
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
ही चर्चा
ही चर्चा आता वैयक्तिक पातळीवर उतरायचे/उतरवायचे काही प्रयोजन ?>> असं वाटायचं काही खास कारण?
मी माझ्या पोस्टमधे लिहितानाच हे स्पष्ट केलय की मी नंदिनी, वैयक्तिक पातळीवरून बोलतेय.
माझ्या दृष्टीने श्लील काय आणि अश्लील काय हे सांगतेय.
--------------
नंदिनी
--------------
असं
असं वाटायचं काही खास कारण?>>>>
मग कोण? कुठे? कोणाला? का ? बोलले ते पण लिही ना
आमचेही अज्ञान आम्हाला कळू दे. अजुन कोणाचे तेच अज्ञान असेल तर त्यांनाही कळेल.
(मला आधी खरंच तो प्रकार माहीत नव्हता. आता आजच तो कळालाय. आणि माझ्याकडुन त्याचा जाहीर निषेध! )
नीधप, मी
नीधप, मी सेन्सॉर असावे ह्या मताचा नाही. पण संकेतस्थळावर कुठल्या प्रकारचे साहित्य राहू द्यायचे, कुठल्या प्रकारच्या साहित्याला थारा द्यायचा नाही ह्यावर शेवटचा अधिकार मायबोलीच्या मालकांना आहे. तो अधिकार कुणीही मान्य करायला हरकत नसावी.
हे 'कमरेखालचे' प्रकरण मला माहीत नाही. बाकी स्त्रीच कशाला पुरुषालाही असे कुणी उत्तर दिल्यास तेदेखील तेवढेच गैर किंवा चुकीचे नाही काय?
...................................................................................................
प्रकाश, तुमचे सकाळी बिल्ट होत असणारे किंवा नसणारे प्रेशर आणि त्यासाठी तुम्हाला लागणारा चहा, त्यातले मसाल्याचे प्रमाण ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे.
...........................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
हे
हे 'कमरेखालचे' प्रकरण मला माहीत नाही. बाकी स्त्रीच कशाला पुरुषालाही असे कुणी उत्तर दिल्यास तेदेखील तेवढेच गैर किंवा चुकीचे नाही काय?>>> हो तेही चूकच आहे.
इथे (या उदाहरणात) आपण चूक की बरोबर ठामपणे सांगु शकतो कारण ते फिक्शन मधे नाही. मग कविता किंवा इतर साहित्य / कलांना, ते फिक्शन आहे म्हणून फायदा देत आहोत का?
***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |
अधिकार
अधिकार अमान्य मी केला?
आपण अधिकाराच्या बाबी बोलतोय की तत्व काय असावे/नसावे याच्या?
तसं अॅडमिन चा अधिकार सगळेच मान्य करतात आणि तरीही अॅडमिन/ अॅडमिन टीम यांची एखादी गोष्ट पटली नाही तर तेवढ्याच हक्काने बोलूनही दाखवतात. तेव्हा केवळ अधिकार या पातळीवर आपण ही चर्चा ठेवण्यात काहीच प्वाइंट नाही.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
त्यासाठी
त्यासाठी तुम्हाला लागणारा चहा, त्यातले मसाल्याचे प्रमाण ही अत्यंत खासगी, वैयक्तिक बाब आहे.>>> माहीत आहे ते . त्याचसाठी ते चर्चेतून * देवून वगळले होतं. आणि तरीही तुमची क्षमा मागीतली होती.तुमची कविताही असा वैयक्तिक(खाजगी) अनुभव सांगणारी आहे.जी अनुभुती सार्वजनिक करणे चुकीचे असते.
आणि ते का चुकीचे आहे त्यासाठी ते वैयक्तिक(खाजगी) उदाहरण देण्याचं प्रयोजन!
कपडे घाला असा आग्रह करणारे लोक दांभीक नसतात. सं..सच्या वा अजुन कसल्याही खाजगी अनुभवांवरून साहीत्य लिखाण करून ते सार्वजनिक करू नका असा आग्रह न करणारे लोकही दांभीक नसतात. त्यांना आपण सुजाण अथवा सुसंस्कृतपणाचे लक्षण समजतो.
तुम्ही अशा संस्कृतीच्या मर्यादा उल्लंघून नक्की काय साधता आहात हेही ध्यानात घ्यावे. जर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उदाहरणातल्यासारखी एखादी कविता केलीत. काही लोकांनी त्या कवितेपाठीमागचा उदात्त हेतू लक्षात न घेता केवळ त्यातले काही असंस्कृत शब्द पकडून... संस्कृती संस्कृती अशी रड केली तर त्यांना दांभीक म्हणता येईल.
चु. भू. द्या घ्या.
**************************************************
आश्वीनी, तुझा मुद्दा मान्य! माझीही गत याबाबतीत अशीच झालीये
फिक्शन
फिक्शन म्हणून फायदा नसून तो लेखकाच्या व्यक्त होण्याचा एक भाग आहे म्हणून त्याला नाकारणं अयोग्य असं म्हणतो आहोत.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नीधप, तुम्ह
नीधप,
तुम्हाला तो अधिकार अमान्य आहे असे मला अजिबात म्हणायचे नव्हते. मी माझी भूमिका सांगितली.
न्यायपालिकेचे अनेक निर्णय अनेकदा आपल्याला मान्य नसतात. पण आपल्याला न्यायपालिकेचे अधिकारक्षेत्र मानावेच लागते. तसेच हे काहीसे.
कृपया गैरसमज नसावा.
.......................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून| एकदम छत्री उघडून| तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून —| येता काय करावे||
>>>>>> कपडे
>>>>>> कपडे घाला असा आग्रह करणारे लोक दांभीक नसतात.
आयला, येवढे सहज सोप्प उत्तर मला कस काय बरे सुचल नाही या आधी???
मला वाटत की यात दाम्भिक बरोबर "प्रतिगामी" हा शब्दही हवा आहे!
<तुमची
<तुमची कविताही असा वैयक्तिक(खाजगी) अनुभव सांगणारी आहे.जी अनुभुती सार्वजनिक करणे चुकीचे असते.<>>
प्रकाश,
पूर्ण असहमत. साहित्यात, अथवा कुठल्याही कलेत अशी बंधनं कधीच नसतात.
शिवाय, तुम्ही 'संस्कृती' वगैरे म्हणताय, ते नक्की काय? त्या कवितेने कोणत्याही (इथे 'सुसंस्कृतपणा' हा शब्द वापरत नाही, कारण तुम्हाला त्यातून नक्की काय अभिप्रेत आहे, ते मला ठाऊक नाही) मर्यादा ओलांडलेल्या नाहीत.
आता इथे जर परत 'घरी कुटुंबाबरोबर वाचता येत नाही' हा मुद्दा असेल, तर त्यासाठी त्या कलाकृतीस वेठीस धरू नये..
'घरी
'घरी कुटुंबाबरोबर वाचता येत नाही' >> त्यासाठी त्या कलाकृतीस वेठीस धरू नये..>> नव्हे धरता येणार नाही ! ते चुकीच ठरेल.
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
पूर्ण
पूर्ण असहमत. साहित्यात, अथवा कुठल्याही कलेत अशी बंधनं कधीच नसतात. >>> मान्य आहे. सहमत व्हाच असा आग्रहही नाही.
शिवाय, तुम्ही 'संस्कृती' वगैरे म्हणताय, ते नक्की काय?>>> मी संस्कृती असे नाही सुसंस्कृत हा शब्द वापरला आहे. आता ते पुन्हा सापेक्षच आहे असे होईल. त्याने काहीही सिध्द नाही होवू शकत!
आणि मी कुणालाही वेठीला बिठीला नाहीये धरलेलं ! खाजगी अनुभव सार्वजनिकपणे वाटल्याने, त्या प्रकाराला कला म्हणता येते हे मला(व्यक्तिशः मला) मान्य नाही!
खाजगी
खाजगी अनुभव सार्वजनिक करायचे नसतील तर बहुतेक सर्व साहित्य हे नाकारावेच लागेल. उदाहरणच द्यायचं झालं तर पिकासोच्या बहुतेक कलाकृती या वैयक्तिक अनुभवातून जन्मास आल्या होत्या. नाटक, कथा, कविता या लेखकाच्या अनुभवांतूनच जन्माला येत असतात. हा मी 'खाजगी' या शब्दाचा घेतलेला अर्थ. आता इथे तुम्हाला 'खाजगी' म्हणजे शृंगारिक असं म्हणायचं असेल, तरी माझं आधीचंच विधान लागू होतं.
.......
.......
चिनूक्स
चिनूक्स अनुमोदन..
कुठली कलाकृती आहे अशी की ज्याला खाजगी अनुभवांचा पाया नाही?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
तुम्ही अशा
तुम्ही अशा संस्कृतीच्या मर्यादा उल्लंघून नक्की काय साधता आहात हेही ध्यानात घ्यावे. जर तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या उदाहरणातल्यासारखी एखादी कविता केलीत. काही लोकांनी त्या कवितेपाठीमागचा उदात्त हेतू लक्षात न घेता केवळ त्यातले काही असंस्कृत शब्द पकडून... संस्कृती संस्कृती अशी रड केली तर त्यांना दांभीक म्हणता येईल.>>>
मी आधीही लिहीलं होतं कि, खाजगी(या शब्दाचा नक्की रोख लक्षात घ्या) अनुभव वाटून जर काही सार्वजनिक अनुभुती वाटता आली. तर त्याला कला म्हणुन जगाने मान्य केलं आहे. त्यासाठी पिकासेपर्यंत जायचीही गरज नाही. आपल्या इथेही अशी उदाहरणे आहेतच.
पण निव्वळ एक खाजगी अनुभव ही कला होवू शकत नाही. त्यात कुठेतरी जाणिवेचा उदात्त हेतू असावा लागतो. जो तुकाराम महाराजांच्या अभंगात आहे. जर तो मांडण्याचा प्रयत्न फसला तर तो केवळ आणि केवळ बीभत्सपणा होतो. त्याला एक 'प्रामाणिकपणाचा प्रयत्न' नांव देवून कला नाही म्हणता येत.
अरारा.
अरारा. माझे चुकले. माबुदोस.
करा, करा, पुष्कळ मनसोक्त चर्चा करा. अगदी गंभीरपणे, तावातावाने करा!
शेवटी काय निष्पन्न झाले (तर) ते एकदा प्रसिद्ध करा म्हणजे सगळ्यांना समजेल.
काही नवीन नियम, जसे उपहासाने लिहू नये, वेड्यासारखे लिहू नये, जुनी उदाहरणे देऊ नये, आपली मते इतरांसारखी नसतील तर लिहू नये असेहि काही नियम असतील तर तेहि सांगून ठेवा.
कदाचित् असे करा, की अनंताक्षरीच्या सुरुवातीला जसे नियम आहेत, तसे प्रत्येक धाग्याच्या सुरुवातीला नियम लिहा.
शिवाय या गृपमधे कुणाला सामिल करायचे नि कुणाला प्रवेश नाकारायचा हेहि कुणितरी ठरवावे. म्हणजे माझ्यासारख्याला बाहेर ठेवून तुम्हा सर्वांना खूप गंभीरतेने चर्चा करता येईल.
मला खरे तर कुठ्ल्याच चर्चेत काही समजत नाही, फक्त गंमतच दिसते.
<त्यात
<त्यात कुठेतरी जाणिवेचा उदात्त हेतू असावा लागतो.<>
मला हे खरंच कळलं नाही. म्हणजे प्रत्येक कलाकृती ही कुठल्यातरी उदात्त भावनेने प्रेरीत होऊनच केली पाहिजे, असं काही आहे का?
म्हणजे
म्हणजे प्रत्येक कलाकृती ही कुठल्यातरी उदात्त भावनेने प्रेरीत होऊनच केली पाहिजे, असं काही आहे का?
>>>> माझ्यामते ऑफकोर्स आहे. जर तसं नसेल तर ती कला नाही होत.ती केवळ एक वैयक्तिक अनुभव म्हणुन सिमीत होते.
हॅ... प्रत्य
हॅ...
प्रत्येक कृती ही कुठल्यातरी उदात्त भावनेने प्रेरीत होऊनच केली पाहिजे
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
प्रकाश, गुल
प्रकाश,
गुलमोहरवर तुम्ही ज्यांना चांगलं म्हणलं आहे अश्या कैक कलाकृतींचं उदाहरण घेऊन आम्हाला त्यात उदात्त जाणीव कुठे आहे ते सांगा. उदात्त चा अर्थ काय?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
आता
आता घ्या...........परत ही चर्चा उदात्त च्या वैयक्तिक विश्लेषणावर आली का ?
जमणार नाही असं नाही. पण खूप ठीकाणी चांगलं म्हणलं आहे ते सगळंच सांगणं आता माझ्यासाठी काम अवघड आहे. माफ करा. चर्चा मला सोडून पुढे चालुद्या
<त्यात
<त्यात कुठेतरी जाणिवेचा उदात्त हेतू असावा लागतो.<>
मलाही हे कळलं नाही.
तुकारामांनी किंवा इतर थोर कवींनीही " हां चला आता आपण ह्या उदात्त भावनेने लोकांसाठी लिहू " असं केलं असेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही. त्याक्षणी (त्या काळी नव्हे) , तसं , व्यक्त होणं ही त्यांची वैयक्तिक गरज होती. त्यांचा स्वभावच उदात्त असेल आणि त्यात उमटला असेल तर नवल नाही. पण म्हणून बाकीचं बीभत्स कसं होईल?
खरंतर कलेइतका स्वार्थ (स्वानंद) कशातच नाही आणि कलाकाराइतका नि:संशय स्वार्थी (स्वांतसुखाय कलाकृतीला आकार देणारा) कुणीही नाही.
Pages