Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
अश्चिग, १.अ
अश्चिग,
१.अनेक ठिकाणी "religion, politics आणि sex" हे विषय taboo असतात. काही बाबतीत पहिल्या दोन गोष्टी या तिसर्याइतक्याच नीच असतात, अनैतीक असतात, बिभत्स असतात. त्याउलट तिसरी गोष्ट सुंदर असु शकते, जी की पहिल्या दोनच्या बाबतीत शक्य नाही. >>>>
२.जर पहिल्यापानावर सगळे नविन लिखाण नाही दाखविले तर अनेक प्रश्न निकालात निघु शकतील.
मला तुमची ही दोन्हीही स्टेटमेंट फारच vague वाटली. अशा स्टेटमेंट्सच्या आधारे चर्चेमधे काहीही निकष निघु शकत नाहीत !
उपास आणि आसामी तुमच्या पोस्ट मान्य !
मायबोलीचा प्रशासकाचा याबाबतचा निर्णय हा अंतीम निर्णय असेल. आणि तो सर्व सभासदांना मान्य करावा लागेल. त्यामुळे या सगळ्या बाबतीत लोकांना त्यांच्या स्वतःची मते ठरवायला, इथे साहित्य
लिहायला, इव्हन प्रतिसाद* द्यायलाही एक क्लॅरीटी मिळेल. आणि
*"ए हाकला रे याला " अशी टोकाची प्रतिक्रिया तरी दिसणार नाही. असा प्रक्षोभक प्रतिसाद द्यायला धजण्यार्याला हे तरी समजेल कि त्याचे हे काम नाही ! जर पटत नसेल तर त्याने दुर्लक्ष करावे.
(मी असे म्हणतोय कारण हेच इथल्या बर्याच जणांना माहीत नाहीये! इथे बरेच जण आपल्या मालकीचा गाव असल्याच्या थाटात वावरतात. )
>>> अनेक
>>> अनेक ठिकाणी "religion, politics आणि sex" हे विषय taboo असतात. काही बाबतीत पहिल्या दोन गोष्टी या तिसर्याइतक्याच नीच असतात, अनैतीक असतात, बिभत्स असतात. त्याउलट तिसरी गोष्ट सुंदर असु शकते, जी की पहिल्या दोनच्या बाबतीत शक्य नाही.
Well said, Aschig!! खरंच विचार करण्यासारखी बाब आहे.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
१.अनेक
१.अनेक ठिकाणी "religion, politics आणि sex" हे विषय taboo असतात. काही बाबतीत पहिल्या दोन गोष्टी या तिसर्याइतक्याच नीच असतात, अनैतीक असतात, बिभत्स असतात. त्याउलट तिसरी गोष्ट सुंदर असु शकते, जी की पहिल्या दोनच्या बाबतीत शक्य नाही. >>
परफेक्ट बॉस!!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नीधपा,
नीधपा, त्या अर्धनग्न बाहुल्यान्चे फोटो मला इथे टाकता आले नाहीत याचे बिलकुल वाईट वाटत नाही, उलट परवानगी न घेता टाकले असते तर ती माझी चूक झाली असती!
असो
श्लिल अश्लिल याचा विचार करतानाच मला, इष्ट्/अनिष्ट, शिष्ट्/अशिष्ट वगैरे अनेक शब्द आठवतात
माझ्या मते, जी गोष्ट मी "उघड्यावर" करू धजत नाही, तिची चर्चा वा अन्य प्रकारे प्रकटीकरण देखिल उघड्यावर होऊ शकत नाही, होऊ नये!
तसेच, केवळ अन केवळ लन्गिक भावना डायरेक्टली वा इनडायरेक्टली (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या) उद्दिपीत व्हाव्यात अशा प्रकारेच जाणूनबुजून केलेले चित्रण्/लेखन हे "सार्वजनिक फोरम वर" त्याज्यच मानायला हवे
लिम्बीच्या गावाकडे कालपरवा नव्हे तर आजही उघड्यावर शौचास जातात! (बघा, "हगायला" या ऐवजी मला "शौचास" हा शब्दच वापरावा वाटला, कदाचित तो माझ्या "पेठी" सन्स्कारान्चा भाग असेल )
तर मुद्दा असा की, लिम्बीच्या गावचे अन्य वर्णन करताना, तिच्या शेतीचे/बान्धाचे/जन्गलाचे निरुपण करताना, तिच्याच गावात कारणपरत्वे सन्डास असुनही (जे मीच बान्धलेत), साप वगैरेन्च्या भितीमुळे रात्रीचे दोन नम्बरला जायचे असल्यास उघड्यावरच जाऊन बसतात, त्याची वर्णने माझ्या "रसाळ" भाषेत इथे केली तर चालेल का? अप्रस्तुत नाही ठरणार?
आमचे अनेक मायबोलीकर नियमित ट्रेकर्स आहेत, मुक्कामी जातात, तेव्हा त्यान्च्या मागे काय नगरपालिकेची सन्डासाची गाडी येते सकाळी सकाळी? नाही ना? अन त्या जीवनातल्या एका महत्वाच्या, अत्यावश्यक घटनेची वर्णने उद्या ट्रेकच्या वर्णनात येऊ लागली, पाणी कसे वापरले, वापरताना कसे सान्डले, पाण्याशिवाय काय काय केले, गवत कसे टोचले वगैरे वर्णने कदाचित काही "आम्बटशौकी" लोकान्ना आवडतीलही, पण मायबोलीसारख्या जाहीर फोरम वर ती चालावीत अशा मताचा मी नाही!
तर मुद्दा हाच, की उघड वा छुप्या "आम्बटशौकी" लोकान्च्या भावनिक व मानसिक वासनान्ची पूर्ती होण्यासारखे काही लिखाण, त्या आम्बटशौकीनान्ना" जरी हवे असले, तरी येथे ते चालणार नाही! अन कुणी तसे जबरदस्तीने खरडलेच, तर "हाकला रे याला" अशाच प्रतिक्रिया येणार, जशा की वेगवेगळ्या ठिकाणी असलेला ड्रेसकोड न पाळता मी मला हवे तेच, मला भावेल तेच कपडे घालून वा न घालून जाईन असे म्हणले तर जसे हाकलतील!
माझे लहानपण इतक्या विरोधाभासात गेल आहे की ज्याच नाव ते!
मी रहात असलेल्या चाळीत सर्व ब्राह्मण वस्ती, च्यायला हा शब्द शीवी खात्यातच जमा केला जायचा, व सहजासहजी कुणासही अरे मूर्खा, अरे वेड्या असे म्हणणे गुन्हा मानला जायचा!
त्याउलट माझी १ली ते ४थी ची शाळा! भ अन म पासून सुरू होणार्या यच्चयावत शिव्या, अन स्त्रिदेहाची, खास करुन समोरच्याच्या आयाबहिणीविषयीची त्यान्ची वैखरी नित्य कानावर पडत असलेली!
नशिब माझे, बाहेर "त्यान्नी" तसे वागले बोललेले चालते, तर मी का नाही? या माझ्या "सम्भावित" प्रश्नास माझ्या दक्ष आईने आधीच काही एक उत्तरे देऊन ठेवली होती!
वरील श्लिल अश्लिलतेचे एकन्दरीत प्रश्न म्हणजे माझ्या त्या "सम्भावित" प्रश्नाचेच अजुन एक रुपडे वाटते आहे!
नीधपा,
नीधपा, त्या अर्धनग्न बाहुल्यान्चे फोटो मला इथे टाकता आले नाहीत याचे बिलकुल वाईट वाटत नाही, उलट परवानगी न घेता टाकले असते तर ती माझी चूक झाली असती!<<
श्रीयुत लिंबूटींबू, हे तुमचं मत आहे. मला ही घटना दुर्दैवी वाटते.
संपूर्ण कला जगतानेच नग्नतेतलं सौंदर्य मान्य केलं असताना आपण कुठल्या तरी दांभिक संकल्पनेच्या आधारावर ते अमान्य करायचं हे मला दुर्दैवी वाटतं.
त्याहून दुर्दैवी म्हणजे नग्न शरीरे असलेल्या कलाकृतींची तुलना संडासाशी करणं. तेही ते पुतळे बनवणार्या माणसानेच.
झापड लावलेली संस्कृती हीच बहुतेक.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
>>>>> आपण
>>>>> आपण कुठल्या तरी दांभिक संकल्पनेच्या आधारावर
माफ करा, पण या "कुठल्यातरी दाम्भिक सन्कल्पना" नव्हेत,
प्रॅक्टिकल जगात वावरताना, पावलोपावली उमटणारे "वासनेचे" उन्माद अन त्याचे हुन्कार बघितल्यावर, बहुधा अन बहुषः जे नग्नता बघुनच अतिचाळवले जातात, अशान्ना अजुन पेटवुन त्या पशूवत सेक्स्युअल रासवटान्ना उद्दिपीत करुन मोकळे रान देण्यास मला माझी कला वापरायची नाही! भले मग कोणी त्यास "दाम्भिक" म्हणोत!
लक्षात घे, मी माझ्या चिल्यापिल्ल्यान्ना ते दाखवू शकलो, पण सार्वजनिक ठिकाणी त्यान्चे प्रदर्शन करणे मला अयोग्य वाटते, कारण, ते बघुन किती जण "कलेला" वा वा करतील, अन किती जण, त्यातिल अन्गोपान्गाचे आशाळभूत, लाळ सुटलेल्या अवस्थेत आम्बटशौकाकरता, स्पष्टच सान्गायचे, तर "नजरेची खाज" भागविण्याकरता "दर्शन" घेतिल, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.
बाकी, सन्डासाचे उदाहरण मुद्दामहून दिले, अहो दरवेळेसच काय श्लिल/अश्लिल नावाखाली केवळ सेक्स वा स्त्री विषयक बाबीन्वर तुटुन पडावे????? जरा वैयक्तिक अनुभवान्वर आधारित विषयान्तर नको????
श्रीयुत
श्रीयुत लिंबूटिंबू,
एकच गोष्ट बघून काही लोक चाळवतात आणि काही लोक नाही चाळवत म्हणून ती गोष्टच अश्लील म्हणणं हे माझ्यासाठी दांभिक आहे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
>>>>> एकच
>>>>> एकच गोष्ट बघून काही लोक चाळवतात आणि काही लोक नाही चाळवत
बघ, तू अजुनही, "चाळवणे" या बाबीवरच अडकुन पडली आहेस, तर मी केव्हाच, सन्डास वा अशाच अन्य गोष्टिन्ची उदाहरणे देखिल समोर ठेवू पहातोय!
श्लिल वा अश्लिल या बाबी केवळ नरमादी सम्बन्धातील "एकान्तातील घटनान्च्या" पण उघडपणे मान्डलेल्या बाबीन्पुरता मर्यादित नाही असे माझे मत!
तसेच, काही लोक चाळवतात, काही नाही या फरकाला एका मर्यादे पलिकडे महत्वही नाही, जे चाळवत नाहीत किन्वा अनाठाई चाळवुन घेणे ज्यान्ना त्याज्य वाटते, त्या "कम्पुत" म्हण हवे तर, माझ्यासारखे लोक असतात.....
अन तरीही,
अगदीच बुप्रा विचारसरणीनुसार गेले, तर...........
कपडे घालावेतच का? नैसर्गिक अवस्थेत का राहू नये? जन्माला येताना तर माणुस नागडाच जन्मतो ना?
नरमादी सम्भोग देखिल बन्द दारा आडच का करावा??? उघड्यावर का करु नये, निसर्गात पशूपक्षी तर तसच करतात, तर माणसानेच स्वतःला अपवाद का करुन घ्यावे?????
वगैरे वगैरे अनेक "आचरट" प्रश्न बुप्राच्या वा व्यक्तिस्वातन्त्र्याच्या नावाखाली उमटू शकतात, उमटले असतीलही, व लोक तसे वागतही असतील (मला माहित नाही)
इथे प्रश्न आहे की "मायबोली" नावाच्या नेटवरील "सोसायटीत" हे चालू द्यावे का?
नसेल चालू द्यायचे तर त्याची मर्यादा कशी नि काय ठरवायची????
श्लिल/अश्लिल हा वाद योग्य की अयोग्य, दाम्भिक की झापडबन्द, हा विषयच नाही!
मायबोलीवर काय असायला हवे नि काय नको, हा विषय आहे!
उड्डाण विश
उड्डाण
विश्वासाचे
Koknaat sarraas vaaprlyaa jaanaaryaa
AZ......
Kivaa deshaavar vaaparlyaa janaaryaa
AG........
Hya aai taai suddhaa aaikat asnaarya
shabdaache
sookshm vistruteekaran,
Saransh Shabdaachaa vistaar,
HYAVAR KURUKSETRA KASHAALA?
Vikaasaa che barech mudde aahet tyaavar bola
Sadbhavanansah
उड्डाण विश
उड्डाण
विश्वासाचे
Koknaat sarraas vaaprlyaa jaanaaryaa
AZ......
Kivaa deshaavar vaaparlyaa janaaryaa
AG........
Hya aai taai suddhaa aaikat asnaarya
shabdaache
sookshm vistruteekaran,
Saransh Shabdaachaa vistaar,
HYAVAR KURUKSETRA KASHAALA?
Vikaasaa che barech mudde aahet tyaavar bola
Sadbhavanansah
येवढा वाद
येवढा वाद का चालला आहे?
मा़झ्या जुन्या मयबोलीवर आणि नविन माबोवर सध्या असलेल्या ह्या कविता येथे देतो आहे. तेंव्हा हा वाद का नाही झाला?
http://www.maayboli.com/node/4763
http://satyajit-m.blogspot.com/2007/04/blog-post_4438.html
मला वाटत, प्रो. ची कविता आणि त्या नंतर लगेच आलेली सानेंची कविता. हा वाद आणि चर्चा प्रोच्या कवितेचा अनवाँटेड आफ्टर इफेक्ट आहे. काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. चर्चा झाली हे मात्र चांगले झाले.
त्या कवितेवर ही चर्चा झाली असती तर जास्त योग्य होत, चहा अकारण भरडली जात आहे यात..:)
कविला जे
कविला जे खरंच संगण्यासारख काही सांगायचय व त्यासाठी चपखल शब्डांप्रमाणेच जर शॄगारही योग्य प्रमाणात अपरिहार्यपणे येत असेल, तर तो उचित. नपेक्षा, अनुचित. मग ते सुरेश भट, मर्ढेकर, असोत किंवा कुणी नवोदित कवि असोत. कवितेतील श्लील-अश्लिलतेला माझ्या मते हा एकच मापदंड लागू होतो. बाकी, श्लील-अश्लील हा वादच इतका सापेक्षी आहे कीं तोच अश्लीलतेसारखा किळसवाणा होण्याची शक्यता असते.
दुपारच्या
दुपारच्या चहाची वेळ झाली. सुबोधच्या नाही आपल्या red label मलाइ मारके. चर्चेला अनुमोदन. आमचे एक उत्पादन आहे कच्ची कली. मला तरorder लिहून घेता ना पण अवघड वाट्ते.
ही कविता
ही कविता अश्लील हैदोस छाप का वाटली?
त्यात वक्षथळे हा शब्द वापरला आहे म्हणून अजिबात नाही. ह्या कवितेत स्त्रीला नुसते भोग्य वस्तू समजले आहे म्हणुनही नाही तर ह्या कवितेतल्या स्त्रीला कोणतीही एजन्सी नाही. प्रणयाचे चित्र कवीने रेखाटले नाही तर स्वतःची वासना रेखाटली आहे. हे नागडेपण जास्त विकृत वाटले मला. हि कविता अनुभव व्यक्त करत नाही (जसे काही सम्र्थकांनि सुचवले आहे) तर कसा अनुभव हवा आहे ते व्यक्त करते. त्या हव्या असलेल्या अनुभवाला कोणताही रिडीमिंग पैलु नाही. तो अनुभव जरी दोघानी मिळुन घ्यायचा असला तरी त्याच तीला काय वाटले ह्याची सुतराम कदर नाही. 'तुझ्या सावळ्या दाल्चिनीची भुगटी व्हावि" हा फक्त आवेग आहे ? मेबी असेलही पण अनुभवाचे सच्चेपण जाणिव पिकलेपण नाही. विंदा. ची रक्तसमाधी नावची कविता जरूर वाचवि अशी. करंदिकर ह्या प्रणयक्रीडेला सहज पर्दर्शक पणे भिडतात व म्हणुन जातात
"आणीक त्या आत्यंतिक अद्भुत वेळी
दिक्कालाची बेडी भंगून गेली.
रक्तसमाधीत दिव्य रवाने वदलो जेंव्हा दोघे
तू- "ये ...ये...", मी-"घे... घे...";
रक्तसमाधी लागून विरली माया;
रक्तातूनीया रक्त मिसळले जीवन पुढती न्याया!
हा इतका वैयक्तिक अनुभवही अश्लील वाटत नाही कारण त्यात एक मॅटर ऑफ फॅक्ट्नेस आहे! जाणिव आहे. माझ्या मते जाणिव जपणार ते श्लील आणि न जपणारं ते अश्लील !
.
.
>> जाणिव
>> जाणिव जपणार ते श्लील आणि न जपणारं ते अश्लील >> पेशव्याशी सहमत
हे पटलं
हे पटलं जया. आता मला सांग कोणतं नक्की जाणीव जपतं आणि कोणतं नाही? आणि कुठल्या जाणिवा नक्की?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
पेशवा
पेशवा तुमच्या मतांशी, व्याख्यांशी असहमत आहे. अनुभव कसा होता किंवा कसा असावा ह्याबाबतीत कविता ओपन एंडेड आहे. या अनुभवाचा वासना हा एक अटळ पैलू आहे.
बाय द वे, रक्तसमाधी विंदांची कविता आहे. मर्ढेकरांची नाही.
.............................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
माबोवर
माबोवर जास्त भटकंती न केल्याचा हा परिणाम. हे मिसले होते मी.
हा सर्व उहापोह, चर्विच्चरण वाचायला, त्यात भाग घेउन मतं नोंदवायला बराच उशिर झाला म्हणायचा.
बाकी वैभव जोशी ह्यांच्या पोस्टला अगणित मोदक. चिनुक्स, स्वाती आणि काही प्रमाणात लिंबुटिंबु सर्वांनाच अनुमोदन.
शेवटी कविता हि प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार आपल्याला कळेल अशी समजवून घेत असतो. त्यामुळे काही वेळा कवीला अभिप्रेत नसणारे पण तरीही सुंदर असलेले अर्थ आपल्याला उमगतात. काही वेळा कवीला बरेच काही सांगायचे असते पण तरीही आपल्याला ते अर्थ समजवून घेता येत नाही.
आता प्रत्येक कलाकृतीतील असलेले/नसलेले, सुंदर/बिभत्स ,श्लील/अश्लील वाईट/चांगले असे अर्थ आपण केवळ आपल्या कुवतीनुसार काढत असतो.
तेव्हा चालले आहे ते चालु द्या!!!
<<हा फक्त
<<हा फक्त आवेग आहे, >>
बरोबर.
<<अनुभवाचे सच्चेपण जाणिव पिकलेपण >>
ते यायला जरा वय वाढावे लागते. सगळेच तरुण पुरुष संयम बाळगून, भावनांचा विचार करून कृति करत नाहीत. कधी कधी एकच भूक जाळत असते. मग त्यांनी कविताच करू नये?
ज्या व्यासपीठावर एम एफ हुसेन यांच्या चित्रांची 'कलादृष्टी', 'बीभत्स रसाचा अविष्कार' अश्या शब्दात 'स्तुति' (हो, स्तुतीच केली होती) केली होती तिथे या लहानश्या कवितेवर इतका गोंधळ?
फार तर या निमित्ताने श्लील्/अश्लील याच विचार करा, किंवा कविता आवडली नाही असे म्हणा. पण चार चार पाने भरून चर्चा! तुम्ही काय कवितेचे रसग्रहण या विषयावर सामुहिक डॉक्टरेट मिळवण्याचा प्रयत्न करत आहात का?
तुम्ही विचारडबके, किंवा 'Think Tank' या धाग्यावर जा. तिथे लोक तुम्हाला या साठी पैसे देतील असे म्हणाले आहेत. शेवटी डॉक्टरेट पेक्षा रोख पैसे बरे. अर्थात् हे फक्त " अनुभवाचे सच्चेपण जाणिव पिकलेपण " आल्यावरच कळते.
झक्की, त्या
झक्की,
त्या तुमच्या हुसेनच्या उदाहरणांचा कंटाळा आलाय आता. एकतर तिथे तुमच्यापेक्षा वेगळं मत मांडणार्यांचं काय म्हणणं होतं हे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्नही केला नव्हतात. अजूनही करत नाही आहात. आणि परत हे..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
ज्यांना
ज्यांना चर्चेत मुद्दे मांडावेसे वाटतात ते अगदी मनापासून मतं मांडताहेत. पण काहींना चर्चेचं निष्पन्न काय असा प्रश्ण पडला आणि तसं त्यांनी इथे नोंदवलं तर त्यात काहीही गैर नाही. फक्त झक्कींनी त्याबद्दल जसं थोडसं उपहासात्मक लिहिलय ते व्यक्तीशः मला खटकलं.
सुबोध चुक
सुबोध चुक लक्षात आणुन दिल्या बद्दल धन्यवाद! दुरुस्ती केली आहे.
अनुभव कसा असवा कीवा हवा ह्याबाब्त कविता स्पेसिफिक आहे ह्यात ओपेन एंडेड असे काय आहे हे कळाले नाही. फारतर जेंव्हा "तुझ्या बाळा सारखे..." ओळ येते तेंव्हा कवितेच्या नायकाला इडिपस काँप्लेक्स असावा असे वाटू शकते..पण त्यातही ओपेन एंडेड काय ते मला समजले नाही....
प्रणयाचा वासना हा एक पैलु आहे पण जेंव्हा त्याच एक्मेव पैलु बद्दल साहित्य लिहिल जात ते साहित्य जनरली पोर्न ह्या विभागात टाकल जात.
ते यायला जरा वय वाढावे लागते. सगळेच तरुण पुरुष संयम बाळगून, भावनांचा विचार करून कृति करत नाहीत. कधी कधी एकच भूक जाळत असते. मग त्यांनी कविताच करू नये?>>>
हे इतक धाडसी विधान तेही ह्या वयात. कदाचीत परिपक्वता यायला नुसत शाररीक वय वाढण पुरेस नसाव. *हसरा चेहरा* *दिवा*
पेडोफाइल, रेपिस्ट ह्यांनाहि एकच भुक जाळते. बरेचजण वयानेही वाढलेले असतात. त्यांचे अनुभवसुधा सच्चे असतात. त्यांचाही वासना हा पैलू असतो. क्रुती करताना (दुसर्यांच्या) भावनांचा विचार करत नाहीत. मग त्यांनी कविता करू नये? जारूर करावी...पण त्या कवितेला / त्यातील अनुभवाला समाज मान्यता मिळेल अशा भ्रमात राहू नये... इतकच
शिल अश्लिल ह्या वर्गवाऋचा महत्वाचा निकश 'जाणिव' हा असावा इतकच माझ म्हणण आहे....
पेशवा
पेशवा माझ्या प्रतिसादानंतर चूक दुरुस्त केल्याबद्दल विंदांचा एक चाहता म्हणून मी तुमचे आभार मानतो. ज्याचे श्रेय त्याला मिळालेच पाहिजे
पेशवा, कविता खऱ्याखऱ्या अनुभवावर आहे की नुसते स्वप्नरंजन हे वाचकांनी ठरवावे. It is open for interpretation. बाळासारखे मध्ये Oedipus complex ही असू शकतो. किंवा एखादा हट्ट, लाड पुरविल्यावर एखाद्या बाळासारखे वाटते एवढेच कवीला सांगावेसे वाटते. 'वाटू शकते' मध्ये शक्यता आल्या. I think you would also agree that good poetry is also about creating a complex (केवळ इडिपसचा कॉम्प्लेक्स नव्हे) of possibilities.
................................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
सुबोध
सुबोध साने,
तुमच्या कवितेत यातलं काहीही नव्हतं. ही चर्चा सुरू व्हायला तुमची कविता केवळ निमित्तमात्र झाली आहे.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
इथले बरेच
इथले बरेच पांढरपेशे लोक कधीच वक्षस्थळ हा शब्द न ऐकल्यासारखं का करत आहेत ते कळलं नाही. >>>>>>>>>>>>>>> बरोबर आहे. माणूस वीनी... कारण काहि लोकांचा असा समझ असतो कि तेच खरे संस्कृती रक्षक आहेत वैगरे वैगरे..... मग समोरचा जरी चूक मान्य करीत असला तर जोर आणखी चढ्तो
नीधप, तुम्ह
नीधप,
तुम्ही म्हणता तसं नसेलच या कवितेत काही ! तुमचा काव्यक्षेत्रातला अधिकार निश्चितच मोठा आहे. त्यापुढे मी काय बोलणार ?
कवीला कुठलीही अपेक्षा नसताना त्याच्या एका साध्यासुध्या कवितेमुळे एक वेगळी चर्चा होते आहे ही चांगली गोष्ट आहे. ह्या चांगल्या चर्चेचा 'टीआरपी' वाढतो आहे. त्याच्या कवितेचा नव्हे. तरी तो 'उगाच हुरळून जातो' आहे, हे त्याने प्रामाणिकपणे कबूल करायलाच हवे:)
.............................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
तुमच्या
तुमच्या कवितेत यातलं काहीही नव्हतं. ही चर्चा सुरू व्हायला तुमची कविता केवळ निमित्तमात्र झाली आहे
>>>
मायबोलीवर लिहीत असताना :- ही साईट एका व्यक्तीच्या मालकीचा असल्यामुळे त्याना जर एखादे गोष्ट अश्लील वाटली तर मी ती बदलेनच, त्यात माझे अभिव्यक्ती स्वतंत्र्य वगैरे गेले तेल लावत. सुदैवाने आतापर्यंत माझ्या कुठल्याच लिखाणावर "अश्लील" असा आरोप झालेला नाही.
हे झालं मी नंदिनी एक लेखिका या बाजूने.
नंदिनी एक वाचक म्हणून बोलयचे झाल्यास जे मला अश्लील वाटते ते इतर कुणाला वाटणार नाही. पण मग दुसर्याला जे श्लील वाटेल ते मला अश्लील वाटू शकतेच ना??? त्यात चूक काहीही नाही. मी फार फार तर जे मला अश्लील वाटतय ते अॅडमिनच्या कानावर घालून कृपया यात लक्ष घाला असे सांगू शकते. पण कुणी असे लिहूच नये असे म्हणत नाही ना?
लिटरॉटिका.कॉम या साईटवर कित्येक अश्लील कथा सापडतील. मात्र त्याच कथा मायबोलीवर कुणी लिहत असेल तर् कुणी ना कुणी तरी आवाज उठवणारच ना?
मागे कुणाच्यातरी कथेमध्ये "हागणदारीचे" उल्लेख होते. मला स्वत:ला ते प्रचंड किळसवाणे वाटले होते. आजही वाटतील. बाकीच्याना कथा आवडली होती. यामधे माझी मते मी मांडली तर काय चुकले?
सतिश चौधरीची कविता तर किळसवाणीच्या पेक्षा किळसवाणी होती. ( त्याच्या बर्याचशा कविता याच पठडीतल्या अस्तात, त्यामुळे त्यानी काहे चांगले लिहिले तरी ते आवडत नाही).
एखाद्या स्त्रीला जो माणूस "कमरेखालचे" उत्तर देइन असा शब्द वापरून बोलतो. त्यानंतर त्याने कितीही स्त्रीस्तुतेपर्/आईस्तुतीपर लिहिले तरी तो माणूस मला "अश्लीलच" वाटणार.
अशा लोकानी जरी चांगले लिहिले तरी त्यातला दांभिकपणा लक्षात येतो आणि मग ते "चांगले" लिखाण फक्त शब्दाचे बुडबुडे वाटयला लागतं. दुर्दैवाने मायबोलीवर सध्या असलेल्या बुडबुड्यानाच जास्त किम्मत आहे. जो माणूस स्वतः फिल्डवर जाऊन फिरून तिथले अनुभव आपल्याला सांगतोय त्याच्या लिखाणावर एक किंवा दोन प्रतिसाद आणि असल्या फालतूच्या फालतू लिखाणावर शंभराच्या वर प्रतिसाद आणि वर यवढी मोठी चर्चा..
चालू द्या.
--------------
नंदिनी
--------------
तुमच्या
तुमच्या कवितेत यातलं काहीही नव्हतं. ही चर्चा सुरू व्हायला तुमची कविता केवळ निमित्तमात्र झाली आहे. >>>> हेच अंतिम सत्य आहे. श्लील अश्लीलतेच्या चर्चेतुन ह्या कवितेला वगळतर बरं होईल.
इथले बरेच पांढरपेशे लोक कधीच वक्षस्थळ हा शब्द न ऐकल्यासारखं का करत आहेत ते कळलं नाही. >> वैभवच्या ह्या वाक्या सगळ आलच आहे. प्रत्येक कवितेची अनुभुती ही अनुभवा नुसार बदलत जाते. अनुभवने मतं आणि विचार बदलतात त्याचा वयाशी काही संबंध नाही.
असो,
शिल अश्लिल ह्या वर्गवाऋचा महत्वाचा निकश 'जाणिव' हा असावा इतकच माझ म्हणण आहे.... >> जया हे मान्य, तरी तुझी सगळीच विधानं पटली असं नाही.
गुरुवर्य मंगेश पाडगावकरांच्या हा कवितेत सगळचं आलं. त्याने-तिने काय केल चुक की बरोबर?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?
त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
कवी - मंगेश पाडगावकर
==================================
किंवा मृणमयीच्या गझलेतल्या ह्या ओळी काय चुकीचं आहे? चुकीच आहे किंवा नाही हा मुद्दा इथे नसावाच. कविता ही भावनाचा उत्कट प्रवाह आहे. त्यात कुणी काय कराव याचा उपदेश नाही, जे आहे ते असं आहे इतकाच....
अद्याप आहे अंतर जरासे, तृष्णा जरासी
अद्याप कोठे लज्जित कळीचे उमलून झाले?
नाहीतरी ते पाऱ्याप्रमाणे निसटून जाते
उधळून यौवन टाकावयाचे ठरवून झाले
हा दोष नाही वेड्या वयाच्या वेड्या क्षणाचा
दोघात सारे समजून झाले, उमजून झाले...
==============
"देवा मुलींना अस का बनवल?" ह्या कवितेव देखिल वाद झाला होता.
शेवटी काय तर प्रत्येकाला जाणिवा आहेत, अनुभव आहेत, मतं आहेत आणि ती वेग-वेगळी आहेत हे महत्वाचं, आणि सर्वात महत्वाच की कोणतेही वाद न होता चर्चा झाली हे फार स्तुत्य!!! मला ही चर्चा फार आवडली.
मा़झ्या मते चर्चा व्हावी तर अशी व्हावी, वयक्तीक पातळीवर आरोप न होता फक्त मतं मांडली जावित. पुढे जो काही निर्णय व्हायचा आहे त्यास अॅडमिन समर्थ आहेतच.
ह्या
ह्या वेगळ्या केलेल्या चर्चेत माझ्या कवितेवरदेखील चर्चा करण्यासाठी मी कुणाला coax किंवा cajole केलेले नाही. पण तरीदेखील ह्या वेगळ्या केलेल्या चर्चेत माझ्या कवितेवर काही जणांनी मते मांडली.
का कळेना माझी कविता निमित्तमात्र असलेल्या ह्या चर्चेला एवढे प्रतिसाद मिळतायत. ह्या गोष्टीमुळे मी मात्र का बरे 'उगाच हुरळून जातो' आहे ?:) असो.
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?
वा पाडगांवकर वा!!! सलाम तुमच्या प्रतिभेला!!! धन्यवाद. सत्यजीत.
..........................................................................................................
अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून | एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे ||सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून | तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे ||
Pages