Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
चर्चा फार
चर्चा फार आवडली! सगळ्यांची प्रामाणिक कळकळ अगदी पोचली. हेच तर मायबोलीचं वैशिष्ट्य आहे!!सर्वांना धन्यवाद..
यातल्या काही मुद्द्यांवरची माझी मते.
ही कविता - मला उगाचच बोल्ड केलेली वाटली. आक्षेपार्ह मात्र नाही.
मायबोलीवर सेन्सरशिप - नी ने म्ह्टल्याप्रमाणे दर्जाचा निकष जसा लावता येत नाही तसाच श्लीलतेचाही. त्यामुळे अशी सेन्सरशिप शक्यही नाही आणि योग्यही नाही. थोडं अधिक स्पष्ट करतो - इथे दर्जा आणि श्लीलतेचा काही परस्परसंबंध आहे असे म्हणायचे नाहिये. मुद्दा हा की जसा "दर्जा" हा ऑब्जेक्टिव क्रायटेरिया नाही तसाच "श्लील-अश्लीलता" हाही नाही. मायबोलीसारख्या स्थळावर कुठलाही व्यक्ति-सापेक्ष निकष लावता येणार नाही.
डिफेन्स मेकॅनिझम - स्वातीच्या उत्तराशी अगदी सहमत. मायबोलीसारख्या खुल्या व्यासपीठावर म्हणूनच लेखक आणि वाचकांवरची जबाबदारी जास्त असते. आपलं आपल्यालाच ठरवायला लागतं.
सापेक्षता आणि अस्तित्व - दर्जा, श्लील/अश्लीलता हे सापेक्ष असतं हे आपण सगळेच मान्य करतो. पण हे मान्य करताना मला एक मुद्दा मांडावासा वाटतो. एखादी गोष्ट सापेक्ष आहे असं मानणं आणि ती गोष्ट नाहीच असं मानणं यात फार फरक आहे आणि तो फरक नेहमी लक्षात असावा. there is a huge diff between being relativist and being nihilist. श्लील/अश्लील हे सापेक्ष असतं.. पण असतं! "अश्लील बिश्लील काही नसतं / दर्जा बिर्जा काही नसतो" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही.
लेखक-सापेक्षता - फार फार interesting मुद्दा! मला वाटतं नक्कीच असतं आणि असलंच पाहिजे. सचिन तेंडुलकरने जाणुन-बुजून improvise करणं वेगळं आणि शाहिद आफ्रिदीने आडवीतिडवी बॅट फिरवणं वेगळं. जरी १-२ वेळा शेवटी निघणारा फटका सारखाच "दिसत" असला तरी! याबद्दल सविस्तर नंतर लिहीन.
<<< मग
<<< मग श्लीलतेचा आग्रह धरणं हेही अयोग्यच
>>> अजिबात पटलेले नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे, व ते इतरांना पटावे असा आग्रह नाही.
हल्ली मायबोलीवर सापेक्षता हा शब्द "इन" असावा. प्रत्येकाच्या संवेदना व जाणिवा वेगवेगळ्या असतात यात दुमत नाहीच, पण स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाहेर पडून जेव्हा आपण समाजात वावरतो तेव्हा एका विशिष्ट, सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या चौकटीत राहून वावरणे अपेक्षित असते. आता ही चौकट धूसर असू शकते पण ती चौकट मान्य असलीच पाहिजे. (पुलस्ति यांनी हाच मुद्दा वर मांडला आहे असे वाटते.) उद्या कोणी जर म्हणाले की सत्यनारायणाच्या पूजेला येताना मी घरून मटणाचा डबा घेऊन येईन, तर ते चालणार आहे का? हे म्हणणार्यांच्या प्रथेनुसार त्यांच्या देवाला मटणाचा नैवेद्य अगदीच नेहमीचा असला तरी पूजेला येणार्या इतर भक्तांच्या संवेदनेचे काय? एकतर येणार्या सर्व भक्तांना याची पूर्वसूचना हवी किंवा त्या भक्तांच्या वेगवेगळ्या सोयी. आता सर्वमान्य चौकट म्हणजे काय? तर मूर्ख, हरामखोर (मनुस्विनी यांनी दिलेले उदाहरण) हे शब्द रोजच्या वापराने एवढे गुळगुळीत झाले आहेत की ते जिव्हारी लागून कोणाला असभ्य / अश्लील वाटण्याची शक्यता कमी आहे. पण आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या मात्र अजूनही समाजानुमते असभ्य व अश्लाघ्य समजल्या जातात. जरी या शिव्या सदस्य एकमेकाना देत नसले (आशा करूया) तरी या शिव्या एखाद्या कथेतल्या पात्राच्या तोंडी (विषयाची मागणी असल्यामुळे) जरी आल्या तरी त्या वाचून वाचकाच्या मनातील भावनांमधे स्थित्यंतरे येणे सहज शक्य आहे. त्याहीपुढे जाऊन असे शब्द असलेली कथा "दिवाळी अंकात" आली तर कोणाच्याच भावना दुखावणार नाहीत असे खात्रीने आपण म्हणू शकतो का? या सगळ्यावर कितीही "पुस्तकी किंवा कागदी भावना किंवा सोवळयातले विचार" असा शिक्का मारला गेला तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणे नाहीच.
आशयाची, विषयाची व कलाकृतीची अशी गरज असणे हा एक मुद्दा झाला पण तिच्या मायबोलीवरील प्रसिद्धीची संमती हा वेगळा व गंभीर प्रश्न आहे. एकतर मायबोली सार्वजनिक व्यासपीठ आहे. इथे येणारे लोक अतिशय वैविध्यपूर्ण (व काही बाबतीत परस्परविरोधीही) पार्श्वभूमीचे आहेत. सर्वांच्या जाणिवा-नेणिवा, मानसिकता, उद्देश, श्लील-अश्लीलतेच्या व्याख्या व त्यांची मान्यता (acceptance) हे सारखे असणे शक्य नाही. याचे अनेक पुरावे वारंवार (कैकदा नको त्या प्रकारे) मायबोलीकरांनी अनुभवले आहेतच. मायबोलीवरील वाचकांच्या वयोमानाचे कुठलेही निकष अस्तित्वात आहेत असे मला वाटत नाही. तेव्हा कायद्यानुसार सज्ञान व अज्ञान अशा दोन्ही वयोगटातले वाचक इथे येतात. मायबोलीवर कोणाला आक्षेपार्ह वाटू शकेल अशी भाषा वापरली जाऊ शकते अशी सूचना कुठेही दिलेली नाही.
"चोली के पीछे क्या है" सारख्या प्रश्नाचे "चोली में दिल है मेरा" असे सोपे उत्तर दिले तर त्या गाण्यावर कोणाचीच काही हरकत नसेल का? कोणी म्हणेल की त्या गाण्याच्या चित्रिकरणावर आक्षेप आहे कोणी म्हणेल शब्दांवर. यातले कोण बरोबर व कोण चूक? शिवाय साहित्यावरील असे निर्बंध सैल केले तर मग मायबोलीवरील इतर कलाकृतींवरीलही असे अलिखित निर्बंध सैल केले तर चालणार आहेत का? मायकेलँजलोच्या डेव्हिडसारख्या शिल्पाचे प्रकाशचित्र मायबोलीच्या मुखपृष्ठावर पहाणे सगळ्यांना आवडणार आहे का? मानवेतर प्राणिजगतातील प्रणयाची प्रकाशचित्रे इथे वाखाणली जातील का? असामीने दिलेले उदाहरण घेऊन, नुकत्याच सलमा हयाकच्या प्रसिद्ध झालेल्या व्हिडियोचे (जगभर उठलेले वादाचे मोहोळ सर्वश्रुत असताना) दुवे "मला आवडलेल्या चित्रफिती" इथे कोणी दिले व कोणी ते अजाणतेपणी ऑफिसमधून पाहिले तर काही लोकांच्या भावनांना धक्का पोचेल का? आणि त्याहीपुढे जाऊन स्तनांच्या कर्करोगाची किंवा testicular cancer ची स्वपरिक्षा कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवणार्या चित्रफिती इथे दिल्या तर चालणार आहेत का? (त्यांचे मूल्य कितीही मोठे असले तरी?) मागे "संतू" या आयडीने टाकलेली भडक, अंगावर येणारी प्रकाशचित्रे अयोग्य ठरवली गेली ते चुकले का? तेव्हा ही मर्यादा कुठे, कशी व कोणी ठरवायची? सापेक्षतेने ती ठरवणे शक्य होणार नाही.
कुठलीही कला ही खर्या जीवनाचे प्रतिबिंब असते (Art imitates life) असे मान्य केले व जीवनात जे जे शक्य आहे ते ते कलेत उतरवणे असेही, तर मग चित्रपटसृष्टीने केले तसे इथल्या सगळ्याच प्रकारांचे वर्गीकरण का करू नये? म्हणजे भडक विषय/वर्णने असलेले, भाषा व हिंसा असलेले विषय, द्वयर्थी वा सूचक संवाद असलेले, कुटुंबातील सर्वांनी एकत्रपणे आनंद घेण्याजोगे, इत्यादी? जेणेकरून वाचकाला ठरवता येईल की त्यातले काय वाचावे अन् काय नाही? पालकांना ठरवता येईल की मायबोलीवरील कोणती पाने त्यांच्या मुलांनी पहावीत व कोणती नाही?
तेव्हा श्लीलश्लीलतेच्या मर्यादा ठरवणारे हे असे प्रश्न म्हणजे दुधारी तलवार आहे व ते हाताळणे सोपे नाही. तेव्हा याबाबतीत जास्त निर्बंध असलेला (more restrictive) निर्णय घेणे हितकारक ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे. या निर्णयात सापेक्षता आहेच, तेव्हा मायबोलीच्या प्रशासनाने हे निकष व हा निर्णय केंद्रीय व अंतिम ठेवावा व तो नियम सर्व सदस्यांना बांधील असावा हे ओघाने आलेच. असे आपले मला वाटले.
>>तर मूर्ख,
>>तर मूर्ख, हरामखोर (मनुस्विनी यांनी दिलेले उदाहरण) हे शब्द रोजच्या वापराने एवढे गुळगुळीत झाले आहेत की ते जिव्हारी लागून कोणाला असभ्य / अश्लील वाटण्याची शक्यता कमी आहे. पण आई-बहिणीवरून दिलेल्या शिव्या मात्र अजूनही समाजानुमते असभ्य व अश्लाघ्य समजल्या जातात>><<
फक्त एक खुलासा म्हणून, मी हे उदाहरण ह्याच्यासाठी दिले की मी काही लोक अशी पाहीलीत की ते स्वत अतीशय शिवराळ असतात मग त्यांच्या कथेत काय कविता काय, रोजच्या बोलण्यात काय कुठेच परीसीमा नसते कुठले शब्द वापरायचे ह्यावर. जेव्हा अशीच लोक अश्लील,हे वाईट नी ते वाईट म्हणोन ओरडाओरड करतात तेव्हा आश्चर्य वाटते म्हणूनच मी double standard असे म्हटले.
बाकी व्ययतीक मताप्रमाणे, ना मला असे काही बोलायला,एकायला व वाचायला आवडते. मग काही शब्द कितीही गूळगूळीत वाटू देत बाकींच्याना मला ते शब्द खटकतात. पण उगाच कशाला गोंधळ घाला व वाद करा. इथे काही कथांमधे मी सुद्धा असे शब्द वाचलेत व ते काही आवडले असे नाही पण "मी दुर्लक्ष" करून चालले किंवा संदर्भ समजायचा प्रयत्न केला/करते. झालेच तर गोष्टीची ,कवितेची मांडणी समजायचा प्रयत्न करते. नाहीच समजले तर आहेच ना, "next page or refresh". मग हा माझा पोस्टीचा प्रपंच कशाला इथे केला तर चर्चा चाललीच आहे तर माझे मत का नोंदवू नये?
माझ्या मते तर असले शब्द गरज गरज् म्हणत(कथेची वा कवितेची) सगळेच जण वापरतील कारण कोणी सांगावे त्यांच्या मते ते रोजचे वापरात असणारे गूळगूळीत झालेले शब्द असतील? त्यामुळे हे सर्व ठरवणे जरा कठीण आहेच की कुठले शब्द योग्य/अयोग्य ते. एक ठरावीक protocol असेल तर बरे होइल. पण तो कसा काय ठरवणार हे एक कोडेच आहे.
जाता जाता, चाफा तुमच्या पोस्टमधले काही मुद्दे चांगले आहेत. गूळ्गूळीत शब्दावर जोर दिला ते एक उदाहरण म्हणून,उपहासाने नाही; तेव्हा तुम्हाला कृपया गैरसमज नको.
बाकी ह्या चर्चेला आता वेगळं वळण नक्कीच आहे. ते चालू द्या. माझे शेवटचे मत मी नोंदवले.
चाफा, तुझी
चाफा, तुझी पोस्ट आवडली आणि पटली. मायबोलीसारख्या ठिकाणी <<तेव्हा मायबोलीच्या प्रशासनाने हे निकष व हा निर्णय केंद्रीय व अंतिम ठेवावा व तो नियम सर्व सदस्यांना बांधील असावा हे ओघाने आले>>
हेच योग्य ठरेल.
निर्बंध
निर्बंध घालण्याने काय साध्य होईल?
जे आहे ते 'नाही' असं होणारे का?
या आणि अश्या उर्मि सुप्त/ जागृत, कमीअधिक प्रमाणात सर्वांच्याच मनात नसतात का?
की आपण आपल्यापुरतं नाकारल्याचं समाधान?
त.टी.: माझ्या मुद्द्यांमधे जे समोर आहे त्या पलिकडे जाऊन जर कोणाला शेरे ताशेरे आणि अजून काय काय दिसत असेल तर तो त्यांनी आपल्या बुद्धीचा दोष समजावा.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
<<तेव्हा
<<तेव्हा मायबोलीच्या प्रशासनाने हे निकष व हा निर्णय केंद्रीय व अंतिम ठेवावा व तो नियम सर्व सदस्यांना बांधील असावा हे ओघाने आ<<>>
याने काय साध्य होईल?
मुळात, एखाद्या कलाकृतीबाबत असा निर्णय घेता येतो का? हा निर्णय घेणार कोण? हा निर्णय घेणार्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पना मी का मान्य कराव्यात? त्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पनांना अनुसरून मी लेखन करणे, हे अयोग्य नाही का?
पुलस्ति, सा
पुलस्ति,
सापेक्षता आणि अस्तित्वाचा मुद्दा काही अंशी पटला. तुझ्याकडून या आणि पुढच्याही मुद्द्याबद्दल सविस्तर विवेचनाची वाट बघतेय.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
कुणाच्या
कुणाच्या वाटण्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. पण ही ज्यांना बोल्ड वाटते किंवा बोल्ड केल्यासारखी वाटते त्यांनी सांगावे का, कुठे बोल्ड वाटते. एक कवी म्हणून मी जे मला वाटतं ते माझ्या कुवतीनुसार चपखल शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करत असतो. ही एक साधी कविता आहे. तिला बोल्ड कशाला करता?
श्लिल
श्लिल अश्लिल्तेचा मुद्दा बाजुला ठेवला आणि विचार केला तरी ही कवितेमधुन कविला काय म्हणायचे आहे ते कळत नाही. उगाच काहीतरि विधानं(?) केल्यासारखी वाटतात. आशयाचा अभाव हा या कवितेचा weakpoint आहे असे मला वाटते. कवितेत वापरलेले काही ठराविक शब्द जर आशयाल धरुन आले असते तर ते कोणाला खटकलेही नसते. पण काहीही अर्थ जर प्रतित होत नसेल तर शब्दांकडे लक्ष हे जाणारच. बाकी कवितेचे रसग्रहण वगैरे वेगळ्या गोष्टी आहेत. कविता वाचल्या वाचल्या त्यातुन काहीतरी strong प्रतित होणं अभिप्रेत असतं असं मला वाटतं.
-----------------------------------------------------------
इथे प्रत्येक फ्लॅटचे दार बंद नी प्रत्येक जण घरात बसून आहे,
शेजार्याची बेल वाजल्यावर मात्र आयहोल मधून पाहण्याचा छंद आहे!
-----------------------------------------------------------
श्लील -
श्लील - अश्लीलतेचा मुद्दा उपस्थीत केला ते योग्य आहे. अॅडमीन चे धन्यवाद.
चर्चेचा शेवट हा कृती योजनेने असावा असे म्हणतात.
या चर्चेच्या शेवटी, अॅडमीन " मायबोलीवरील लेखनास आवश्यक किमान शिस्त / अटी " ठरवू शकल्यास अॅडमीन चे अभिनंदन मी सर्वप्रथम करेन.
किमान एक आचारसंहिता, देखील अॅडमीन व त्यांचा चमू राबवू शकल्यास अॅडमीन ची खरी उपलब्धी असेल.
अन्यथा, " ये रे माझ्या मागल्या " या नितीने, अॅडमीन उदासीन आहे असेच म्हणावे लागेल.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
अनीती ने
अनीती ने वर्तन करणार्यांसाठी कायदे करावे लागतात व दंडसंहिता राबवतात. या न्यायाने अॅडमीन ने आचारसंहिता राबवावी.
नितीमंत व्यक्तींना ते वाचायची देखील गरज भासणार नाही, असे माझे ठाममत आहे.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.
सूबोध व
सूबोध व त्त्यान्ची दालचिनि यानी चहा पिण्यावर जितका वेळ खर्च केला नसेल तेवडा वेळ आपण चर्चा केली आहे.
असे का? ही कविता कालातीत अमर साहित्य वाट्त नाही. सार्वजनिक जागी किती भावना व्यक्त करायच्या ते भान सुट्ले आहे नक्कि.
सुबोध आता घ्या जरा दमानं
की बोरड भिजला घामानं
सुबोध,
सुबोध, मंगल पांडेने गोळी झाडली आणि १८५७ चे युध्द तिथुन सुरू झाले.याचा अर्थ १८५७ च्या युध्दास फक्त तो जबाबदार होता असे कोणीही म्हणनार नाही. तुमच्या कवितेमुळे ही चर्चा होत आहे. हा माझ्यासाठी तर निव्वळ योगायोग आहे.त्याला इथली बाकी पार्श्वभुमीही आहे. ते समजुन घ्या.
पुलस्ती आणि चाफा चांगल्या पोस्ट.
चाफा तुमचे मत पटलेय मला तर !
पुलस्ति तुम्ही काही मुद्दे अजुन ओपन ठेवले आहेत. ते विस्तारून मांडाल तर त्यांना अजुन बळकटी येईलसे वाटते.
"अश्लील बिश्लील काही नसतं / दर्जा बिर्जा काही नसतो" असं जर कुणी म्हणत असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही.
मला हे वाक्य सेन्सॉरशीप असावी असा निर्देश करत आहे असे वाटतेय.
प्रकाश, सेन
प्रकाश,
सेन्सॉरशिप असावी याबद्दल जरी मी तुमच्याशी पूर्ण सहमत नसले तरी मंगल पांडे/ कावळा बसला फांदी मोडली मुद्द्यावर अनुमोदन
अश्विनीमामी,
कालातीत अमर साहित्य कोणतं याची चर्चा नाहीये इथे. तुम्ही किंवा मी लिहिलेलंही कालातीत अमर साहीत्य नाहीये तेव्हा तिथे जायचंच कशाला? ते काळालाच ठरवूदेत.
एका कवितेच्या अनुषंगाने एका महत्वाच्या मुद्द्याला तोंड फुटलंय. कधी नव्हे ते चांगली चर्चा होतेय तर होऊ द्या की. खूप काही येईल यातून बाहेर. अनेक मतेमतांतरे वाचायला मिळतील. जी आपल्याला विचारात पाडतील किंवा आपली मते पक्की करायला मदत करतील. प्रॉब्लेम काय आहे?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
चिनूक्स, मु
चिनूक्स,
मुळात, एखाद्या कलाकृतीबाबत असा निर्णय घेता येतो का?
हो. अर्थात तो निर्णय सर्वमान्य असेल/असायलाच हवा असे नाही. २+३ =५ इतक्या गणिती स्पष्टतेने नव्हे पण निर्णय घेता येतो. मर्ढेकरांच्या कविता इयत्ता तिसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात घालाव्यात का नाही हा निर्णय घेता येतो ना?
हा निर्णय घेणार कोण?
मायबोली प्रशासन. अर्थात मा बो करांचे इन्पुटस घेऊन.
हा निर्णय घेणार्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पना मी का मान्य कराव्यात? त्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पनांना अनुसरून मी लेखन करणे, हे अयोग्य नाही का?
> मा बो सारख्या व्यासपीठावर लिखाण करताना ही मर्यादा पाळणे क्रमप्राप्त असावे. आपल्या कलात्मक स्वातंत्र्याची गळाचेपी होत आहे असे ज्यांना वाटेल त्यांनी आपला ब्लॉग पाडावा. अगदी ब्लॉग वर ही थोडीफार बन्धने असतातच. झुंडशाही वाईट हे खरे, पण मा बो वर लिहिताना काही implicit मर्यादांचे पालन व्हावे असे वाटते.
माझ्याकडे,
माझ्याकडे, खूप वर्शान्पूर्वी मीच बनवलेली काही सेमीअॅबस्ट्रॅक्ट न्युडस आहेत! त्याचा फोटो इथे टाकायच्या आधि परवानगीसाठी अॅडमिनला दाखवावासा वाटला, ते आठवले!
माझ्या दृष्टीने एक आर्टिस्ट म्हणून ती केवळ कलाकारी आहे
इतकी की माझ्या लहानग्यान्नी त्या केव्हाच पाहिल्या आहेत!
तरीही, इथे, जाहीर फोरमवर त्या टाकाव्यात की नाही याबद्दल मी शन्कीत होतो!
याचे कारण, जी नजर माझी तशीच प्रत्येकाची असणार नाही, बघणारे एकाच वयाचे असेही नाही!
इन्ग्रजीत "न्यूड" म्हणले म्हणजे काय ते पवित्र होत नाही, नागटे ते नागटेच!
इन्ग्रजीत सेमीअॅबस्ट्रॅक्ट म्हणले तरी बाह्याकार मानवी देहाचाच, स्पष्ट पणे जाणवणारा!
तेव्हा, श्लिल काय नि अश्लिल काय या वादात न पडता मी सरळ परवानगी विचारली! अर्थातच माझि शन्का खरी असल्याने ते फोटो मी टाकले नाहीत!
मागे एका वविच्या वर्णनात, बिघडलेल्या झिप (चेन) मुळे पोस्टऑफिस उघडे राहिल्याचा उल्लेख केला तर माझ्या मायबोलीवरील एका जुन्या परममित्राने मला टोकले होते की "ते देखिल" कशाला लिहीलेस???
तर अस अस्त श्लिल अश्लिल!
बाकी तुमचे चालुद्या!
निर्बंध
निर्बंध घालण्याने काय साध्य होईल?>> हे खरच विचार करण्यासारख आहे. मनोवृत्ती बदलते का? शासन निर्बंध घालतं म्हणजे नक्की काय करतं? "हे इथं चालणार नाही" एवढच ना?
कविता मला आवडलेली नाहीच आहे पण म्हणून ती अश्लील होत नाहीये लगेच ! (बादवे अश्लील शब्दाची व्युत्पत्ती कुठुन झाली?)
प्रकाशजी,
जर तुम्ही एखादे साहित्य तुमच्या आईला वा बहीणीला वाचुन दाखवू शकत नसाल तर ते साहित्य अश्लिल ! ' अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे>> पण (त्या हे वाचु शकतील की नाही कुठेतरी..) ह्याचा अर्थ काय? काय वाचायच काय नाही हे कोण ठरवत ?
*********************
'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !
निधप,
निधप, तुम्ही मांडलेले तिन मुद्दे आणि शेवटचा ओपन मुद्दा लक्षात घेता.
हा प्रश्न फक्त श्लील अश्लीलतेचा नाहीये. हे पटले.
"मायबोली वर असलेली लेखनस्वातंत्र्याची मर्यादा" हे या धाग्याचे नांव असावे अशी मी मागणी करतोय.
लिंबुदा, तुमचे उदाहरण दिलेत ते योग्य केलेत.निधप यांनी मांडलेल्या मुद्यात अजुन एक भर झाली.
*. कलेमधे असलेली नग्नता इथे मायबोलीवर चालेल का ?
कुलदिप,
निर्बंध घालण्याने काय साध्य होईल?>> हे खरच विचार करण्यासारख आहे. मनोवृत्ती बदलते का? शासन निर्बंध घालतं म्हणजे नक्की काय करतं?
>>>> वृत्ती बदलता येणे शक्य नाही हे शासनालाही मान्य असते
शासन अशा मर्यादा घालते कारण ती वृत्ती चुकीची आहे हे शासनाला मान्य असते.
असे नियम बनविले गेले पाहिजेत जेणेकरून त्या चुकीच्या वृत्तीला खतपाणी मिळणार नाही. तीला त्या प्रशासनाखाली आश्रय मिळणार नाही याची जबबदारी प्रशासनाची असते.म्हणुनच तिच्यावर निर्बंध घातला जातो.
तसेच तू अधोरेखीत केलेले माझे वाक्य आणि तो प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहेत असे मला वाटत नाही.
आणि तु सगळी चर्चा वाचशील तर त्या प्रश्नाचे उत्तर आणि मी तसे म्हणण्याचे प्रयोजनही तुझा लक्षात येइल.पण माझ्याकडुन तुला उत्तर हवेच असेल तर तसे विपुमधे कळवशील !
चाफा अगदी
चाफा अगदी १००% अनुमोदन.
वैयक्तिक आणि सार्वजनिक मर्यादा ही वेगळी असू शकते, असायलाच हवी.
प्रकाश, पूर्वी अशीच चर्चा एम एफ हुसेन यांच्या छाया चित्रांसंदर्भात झाली होती, म्हणजे हे जे सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्य आहे ते केवळ लेखनापूर्ते मर्यादीत नसून सगळ्या प्रकारच्या कलांसंदर्भात लागू आहे. चाफाने बरीच उदाहरणे दिली आहेतच पण त्यातच उद्या अश्लील विनोद (आठवा विनोदाच्या बीबी वर आलेल्या अश्लिल विनोदांमुळे माजलेला गहजब), लिंक्स ह्यांचा सुकाळ झाल्यास कुठेतरी निर्बंध ठेवावे लागणार नाहीत का? मायबोली ही साईट सगळ्यांसाठी खुली आहे (कुठल्याही वयोमर्यादेचे इथे बंधन नाही). काही प्रगल्भ लोकांच्या सगळ्यांना स्वातंत्र्याच्या आग्रहामुळे इतरांची (त्यांच्या भावनांची) फरफट होणार नाही हे बघणे मायबोली प्रशासनास आवश्यक आहे असे मला वाटते.
ज्यांना सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंधित अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे त्यांना मायबोली व्यतिरीक्त इतर ठिकाणी (उदा. ब्लॉग्स) लिहीण्याची सुविधा आहेच अन्यथा इथे आता ग्रुपची सुविधा असल्याने R रेटेड ग्रुप बनवण्याचा मार्ग निघू शकतो का हा ही एक पर्याय वाटतो.
मायबोली प्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आणि अंतिम आहे कारण ही त्यांची साईट आहे आणि तिथे कसं, काय लिहिलं जावं तसच प्रशासनास अपेक्षित असं त्याचं स्वरूप टिकाव हे जबाबदार सभासद म्हणून माझं कर्तव्य आहे.
>>हा निर्णय घेणार्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पना मी का मान्य कराव्यात? त्या व्यक्तीच्या नैतिकतेच्या कल्पनांना अनुसरून मी लेखन करणे, हे अयोग्य नाही का?
चिन्मय, दुसर्याच्या नैतिकतेच्या कल्पनांना अनुसरुन लेखन करण अयोग्य असेलही पण ते मायबोली सारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रकाशित करण (जर मायबोलीच्या तत्त्वात बसत नसेल तर) अधिक अयोग्य ठरेल. वैयक्तिकरीत्या किंवा मायबोलीबाहेर कोण काय करतं ह्याचा इथे संबंध असू नये. एवढच काय तर ते लेखन मायबोलीच्या चौकटीत बसतय असं प्रशासनाला वाटलं तर इथे प्रकाशित व्हायला काहीच हरकत नसावी.
एकूणात चर्चा आवडली. ह्यातून सेन्सॉरशिप ह्या मूळ मुद्द्याला हात घातला जातोय हे चांगलेच आहे.
चाफा आणी
चाफा आणी पुलस्ती- पोस्ट आवडली.
सोयीसाठी वर्गीकरण करावे काय? म्हणजे वाचणारा आधीच सावध (?) होईल. म्हणजे फक्त १८ वर्षावरील किंवा आपल्या जवाबदारीवर वाचा वगैरे. संकेतस्थळांना चाईल्ड लॉक लावता येतं का ?
लिंबुंचा मुद्दाही ध्यानात घेण्याजोगा. २०० पानांनी होणार नाही एवढा परिणाम एका चित्रानी होऊ शकतो.
>> एखादी
>> एखादी गोष्ट सापेक्ष आहे असं मानणं आणि ती गोष्ट नाहीच असं मानणं यात फार फरक आहे
पुलस्ति, चांगला मुद्दा आहे.
चाफा, कळकळ समजली. वाचकांच्या वयाचा मुद्दा मान्य. ते माझ्या ध्यानात आलं नव्हतं.
'वाचकांच्या भावना दुखावणे' हा फार मजेशीर प्रकार आहे. तू दिवाळी अंकाचं उदाहरण दिलं आहेस म्हणून, २००८च्या दिवाळी अंकात अज्जुकाचा प्रसाधनगृहांबाबतचा जो लेख होता, तो दिवाळी अंकात असल्यामुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्याच. आता खरंतर त्या लेखात 'अश्लील' काय होतं? 'आज वाचून उद्या विसरल्या जाणार्या' अनेक लेखा/कवितांपेक्षा तो लेख प्रामाणिक, महत्त्वाचा आणि दीर्घकाळ परिणाम करणारा होता. (तू दिलेल्या 'स्तनांच्या कर्करोगाच्या स्व-तपासणीच्या चित्रफितींच्या' उदाहरणासारखाच हा एक प्रकार झाला.)
मग असे विषयही 'वाचकांच्या भावना दुखावतात' म्हणून मायबोलीवर येऊच नयेत काय?
काल प्रकाशजींनी श्री. शरद पाटील यांच्या कथेतील 'भडव्या' शब्द 'सुजाण' वाचकांनी काढायला लावल्याचा संदर्भ दिला होता. मी लिंक शोधून ती कथा पाहिली. आता त्या कथेत 'भडव्या'च्या जागी 'भ@#*' अशी काहीतरी चिन्हं वापरली आहेत. याने काय साध्य झालं? मला कोणीही छातीठोकपणे सांगावं की ती चिन्हं वाचून शब्द कळला नाही किंवा त्याची धार बोथट झाली. या असल्या दांभिकतेचा पुरस्कार करतोय का आपण?
>> उद्या कोणी जर म्हणाले की सत्यनारायणाच्या पूजेला येताना मी घरून मटणाचा डबा घेऊन येईन, तर ते चालणार आहे का? हे म्हणणार्यांच्या प्रथेनुसार त्यांच्या देवाला मटणाचा नैवेद्य अगदीच नेहमीचा असला तरी पूजेला येणार्या इतर भक्तांच्या संवेदनेचे काय?
मी तरी तेच म्हणते आहे. जसं पुजेला मटण नेत नाहीत (सद्ध्या! वेदकालात नेत होते आणि उद्या नेणार नाहीत याची शाश्वती नाही!!) तसंच 'फुलराणी'ने 'मी तुझ्या पाऊली जीव वाहिला' म्हणणं तितकंच अश्लाघ्य आहे. काही वाचकांच्या भावनांचा विचार करून तिच्या तोंडी तसे संवाद घालणं हे तर अश्लीलाहून अश्लील ठरेल.
मग इंग्रजी शब्द वापरण्याबाबतचा मुद्दा इथेही लागू होत नाही का? त्या पात्राची जशी जीवनशैली, तशीच भाषा (इंग्रजाळलेली अथवा शिवराळ) त्याच्या तोंडी असायला नको का? इंग्रजी शब्द आले म्हणूनही भावना दुखावतात, त्याचं काय??
एकूण मी काल पार्ल्यात म्हटलं त्याप्रमाणे 'साहित्यिक अनाचार आणि सेन्सॉरची मुस्कटदाबी' यात सुवर्णमध्य साधणं अशक्य आहे. 'काहीतरी मर्यादा हवी' हे कालपासून ऐकत्ये. पण ते 'काहीतरी' नक्की कुठे आहे ते कोणी ठरवायचं?
प्रेम, दु:ख,
प्रेम, दु:ख, त्याग, संस्कृती अश्या कल्पनांना वेठीला धरून येणारं भडक, खोटारडं आणि गुडीगुडी चित्रण हे अश्लील मधे का घेत नाही आपण?
प्रामाणिक आणि खरं, नितळ याला नकार का?
शरद पाटील यांच्या कथेतल्या शब्दबदल दुर्दैवी वाटला. आणि चिन्हांचा वापर हा विनोद.
श्रीयुत लिंबूटिंबू यांना त्यांनी केलेल्या नग्न अर्धपुतळ्यांची चित्रे टाकायला केलेली मनाई ही तितकीच दुर्दैवी वाटली.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
चाफा,
चाफा, पुलस्ती, स्वाती
फार छान लिहिलेत.
निर्बंध घालण्याने काही साध्य होईल असे मला वाटत नाही. उलट त्यामुळे कवी/लेखकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन घातल्यासारखे होईल. (आणि वर स्वातीने लिहिले आहे तसे ही "मर्यादा" ठरवणार कोण?)
माझे एक suggestion, एक नवीन पर्याय ठेवला तर? PG-13, NR या रेटीग सारखा..आणि असे काही कोणाला वादग्रस्त वाटले तर त्यानी ते अॅडमिन ना कळवल्यास अॅडमिन नी तो लेख्/कविता तो पर्याय वापरुन flagged करावा. आणि अगदीच जर प्रक्षोभक लिखाण वाटले तर काढुन टाकावे.
याचे
फायदे:
१. लेखकांचे/कवींचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील..
२. ज्यांच्या भावना दुखावतात ते flagged लिखाण टाळु शकतील.
३. ज्या प्रमाणात साहित्य लिहिले जातेय ते पाहता अॅडमिनचे अशा लेख्/कवितांवर लक्ष ठेवण्याचे
काम कमी होईल.
तोटे:
असे वादग्रस्त/flagged लिखाण नक्की वाचले जाईल याची खात्री असल्यामुळे कोणी मुद्दाम असे लिहुन प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार वाढल्यास अॅडमिन चे काम आणखी वाढेल.
सुवर्णमध्य साधणे कठीण आहे पण अशक्य नसावे बहुतेक..
धन्यवाद.
असे काही
असे काही कोणाला वादग्रस्त वाटले तर त्यानी ते अॅडमिन ना कळवल्यास अॅडमिन नी तो लेख्/कविता तो पर्याय वापरुन flagged करावा. आणि अगदीच जर प्रक्षोभक लिखाण वाटले तर काढुन टाकावे. >> अतिशय धोकादायक trend. कोणाला काय खुपेल हेच मूळात कळू शकत नसल्यामूळे बहुतेक प्रत्येक गोष्ट flagged ठरेल.
उपासच्या एक मु्द्यात तथ्य आहे. मायबोली हि एक खाजगी वेबसाईट आहे. वाचकांच्या कलाने कितीही गोष्टी इथे होत असल्या तरी अंतिम निर्णय हा मायबोलीच्या प्रशासकांचा आहे. तेंव्हा जी काही मर्यादा (श्लिल-अश्लिल किंवा शिवराळ भाषा किंवा कसल्याही प्रकारचा मर्यादाभंग) असेल ती त्यांनी ठरवलेली असेल नि तीच अंतिम असेल. (ती सगळ्यांना पटेल असे नाही)
अनेक
अनेक ठिकाणी "religion, politics आणि sex" हे विषय taboo असतात. काही बाबतीत पहिल्या दोन गोष्टी या तिसर्याइतक्याच नीच असतात, अनैतीक असतात, बिभत्स असतात. त्याउलट तिसरी गोष्ट सुंदर असु शकते, जी की पहिल्या दोनच्या बाबतीत शक्य नाही. मायबोलीवर पहिल्या दोनबाबत अशी चर्चा पाहिल्याचे आठवत नाही.
जर पहिल्यापानावर सगळे नविन लिखाण नाही दाखविले तर अनेक प्रश्न निकालात निघु शकतील. बहुदा.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
aschig, मायबोली
aschig,
मायबोलीवर उठसूठ जात काढली जाते, 'मुसलमानांना हाकला' वगैरे बोललं जातं, म्हणून मी मागे काही मायबोलीकरांशी बोललो होतो. त्यावेळी या मंडळींनी 'व्यक्तिस्वातंत्र्य', 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य' इ. इ. शब्द वापरून या प्रकाराचं समर्थनच केलं होतं. आणि आता सेन्सॉरशिपबद्दल चर्चा ..
स्वाती... तू
स्वाती... तू अज्जूका च्या दिवाळी अंकातल्या लेखाचा उल्लेख केला आहेस म्हणून जरा विषयांतर..
माझ्या माहिती प्रमाणे अज्जूका च्या लेखावर (जाहिरपणे) निगेटिव्ह प्रतिक्रिया मी एकट्यानेच दिली होती... त्यामूळे मी हा प्रतिसाद लिहित आहे...
त्या लेखामुळे माझ्या भावना वगैरे अजिबात दुखावल्या नव्हत्या.. मला त्यात काहीही अश्लिल देखिल मुळीच वाटलं नव्हतं... किंबहूना लेखात मांडलेली समस्या पूर्ण पणे रास्त आहे असं ही मी म्हंटलं होतं.. फक्त मी तिथे म्हंटल्या प्रमाणे दिवाळीच्या पहाटे, अभ्यंग स्नान वगैरे करून, सुग्रास फराळ चांगल्या लेखिकेचा लेख म्हणून वाचायला घेतल्यावर त्यात येणारी लेडीज टॉयलेट ची वर्णने मला आवडली नव्हती...
इथे भावना दुखावल्या जाण्याचा किंवा काही अश्लील असण्या/नसण्याचा काही संबंधच नाही...
त्यामूळे ह्या चर्चेत तू केलेला माझ्या त्या प्रतिक्रियेचा उल्लेख अस्थानी वाटतो... अर्थात तू काही वेगळ्या संदर्भाने बोलत असशील तर ignore माडी !!
बाकी चर्चा चालू द्या...
चाफा,
चाफा, तुझ्या पोस्टला अनुमोदन! बरे लिहितोस!
अडमा, हो,
अडमा, हो, जाहीरपणे कदाचित तू एकट्यानेच नापसंती व्यक्त केली होतीस.
आणि तू सूज्ञ असल्यामुळे नापसंतीच व्यक्त करून थांबलास.
सद्य
सद्य स्थितीत कुठलातरी सुवर्णमध्य काढायचाच असेल तर रेटिंग शिवाय पर्याय नाही.
असामी - प्रत्येकच गोष्ट फ्लॅग्ड ठरली तरी वाचणारे वाचतीलच, पण इतरेजनांचा मर्यादाभंग (?)टळू शकेल कदाचीत.
उलट फ्लॅग्ड ठरली म्हणूनही टी.आरपी. वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही बाबतीत पहिल्या दोन गोष्टी या तिसर्याइतक्याच नीच असतात, अनैतीक असतात, बिभत्स असतात. त्याउलट तिसरी गोष्ट सुंदर असु शकते, जी की पहिल्या दोनच्या बाबतीत शक्य नाही>>>> वा !! अश्चिग. सॉलीड.
Pages