Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
पहिल्या
पहिल्या चहाची तलफ, आणि तो मनासारखा (योग्य वेळी, योग्य चवी / तापमानाचा इ.) मिळाल्यानंतरची तृप्ती आणि आनंद यांचा संदर्भ प्रेयसीसोबतची जवळीक व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. तसा विचार करता या दोन्ही शारीरिक (आणि काही अंशी मानसिकही) गरजा आणि आनंद आहेत. (असं मीच नाही, 'चोखेर बाली'मधे रवींद्रनाथसुद्धा म्हणतात.) तेव्हा त्यात कवीला साधर्म्य जाणवलं तर त्यात काही गैर नाही.
कविता मला स्वतःला आवडली नाही, पण ते ती वर्णनात्मक आहे आणि मला व्यक्तिशः तसं लेखन आवडत नाही म्हणून. याच कारणासाठी मला बालकवींची 'फुलराणी'ही आवडत नाही.
मी मांडू इच्छित आहे तो मुद्दा निराळा आहे. केवळ देहाची (विशेषतः स्त्रीदेहाची) वा शृंगारिक वर्णनं आल्यामुळे एखादं लिखाण त्याज्य होतं का? का?
मग 'वक्षीं तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके .. देईल शांतवाया ह्रत्स्पंदमंद झोके' (माधव ज्यूलियन) हे ही आपल्याला अश्लील आणि म्हणून आक्षेपार्ह किंवा त्याज्य वाटतं का?
उसनीं मिळालीं शरिरें अम्हांला
विक्रीस जोड्यांइतुकीं तयार;
चिंता न त्रागा. . . रांडेप्रमाणे
नियमीत घेतों सनदी पगार..
(आरती प्रभू)
हे अश्लील म्हणून त्याज्य वाटतं का?
असते ज्यांचे हृदय बॅंकेत सुरक्षित
इन्क्रिमेंट आणि प्रमोशन
वांझेच्या विटाळासारखे निश्चित
त्यांना सर्वच माहीत असते
-- कविताही !
(सुरेश भट)
हे अश्लील म्हणून त्याज्य वाटतं का?
आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले
काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले
(ना. धों. महानोर)
हे अश्लील म्हणून त्याज्य वाटतं का?
मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग ! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !
(सुरेश भट)
हे अश्लील म्हणून त्याज्य वाटतं का?
सगळंच शृंगारिक लिखाण आपल्याला त्याज्य वाटतं का?
एखादं लिखाण शब्दांमुळे अश्लील होतं की संदर्भामुळे? श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा सापेक्ष असू शकतात हे मान्य. मलाही या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत हे कबूल.
पण केवळ अश्लील वाटलं म्हणून एखाद्या लिखाणात मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये असं मला वाटतं.
तुम्हाला काय वाटतं?
(ही चर्चा इथे अस्थानी वाटत असेल तर अन्यत्र हलवायला माझी हरकत नाही.)
स्वातीजी,
स्वातीजी, जर लिखाणात निश्चित संदेश, अर्थ आणि स्पष्ट भावना असेल तर शृंगारिक असूनही कोणताच रसिक वाचक कोठलेही लिखाण त्याज्य करणार नाही. आपण जी उदाहरणे दिलीत त्या महान कवींच्या वरील ओळींमधे एक निश्चित संदर्भ आणि अर्थ आहे. शृंगारिक भाव हा बरेचदा अश्लील वाटत नाही तो त्यामुळेच.
या कवितेत केवळ वक्षस्थळे शब्द आला आहे म्हणूनच आक्षेप नाही तर नेमके काय अभिप्रेत आहे, वापरलेल्या शब्दांचे अर्थाशी काय नाते आहे आणि चहा, वेलची, दालचिनी, भुकटी आणि नेमके वक्षस्थळांवरच पडून राहणे या मिश्रणातून काय अभिप्रेत आहे हे आमच्या अल्पमतीला तरी कळले नाही.
आपण सांगाल तर बरे होईल.
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!
शारिरीक
शारिरीक वर्णने, शृंगार यांच्या उल्लेखांमधे श्लील्/अश्लीलतेची सीमारेखा ठरवणं अवघड जातं बरेचदा. ग्राफिक कविता किंवा लेख मायबोलीसारख्या व्यापक व्यासपीठावर यायला एकदा सुरुवात झाली की हे नको, ते चालेल हे कुणी आणि कसं ठरवायचं? काल चौधरींची कविता वाचून चीड आली तशी आत्ता ही कविता वाचून आली नाही (जरी कविता मला अजिबात आवडलेली नाहीये. सामान्य आहे) पण परत हे माझे वैयक्तिक मत झाले. इतरांचे वेगळे असू शकते. तेव्हां मुद्दा हा की हे उल्लेख योग्य तर्हेने आले आहेत कां, चालून जातील कां हे सर्व लोक ठरवणार कमेन्ट्सच्या भडिमारांतून प्रत्येक वेळीच? की सरसकट बंदी असावी? परत मग लेखन स्वातंत्र्याचा मुद्दा येईलच.
स्वातीजी
स्वातीजी इथे काहीही लिहायची इच्छा नव्हती!
पण तुमची पोस्ट आणि विचारलेल्या प्रश्नांच्या अनुशंघाने लिहीतोय!
(मूळ कवितेवर नो कमेंट्स!)
पण तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत त्याबद्दल बोलायचे झाल्यास.
होय ! मला ते अश्लील वाटते. 'जर तुम्ही एखादे साहित्य तुमच्या आईला वा बहीणीला वाचुन दाखवू शकत नसाल तर ते साहित्य अश्लिल ! ' अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे याबाबतीत. जर मी अमेरिकन कुटुंबात वाढलो असतो, तर कदाचित मलाही ते तसे वाटले नसते.
मायबोली हे एक सार्वजनिक स्थळ आहे. हे फक्त कवितेंचे व्यासपीठ नाही. त्यामुळे इथे काही अलिखीत नियम आहेत.(जसे सर्व सार्वजनिक स्थळांच्या बाबतीत असतात!) हे नियम इथे येणार्या, लिहीणार्या, वाचणार्या लोकांच्या मुल्यांनुसार बनतात.आणि ते तसे असणे हे नैसर्गिक आहे! ( मी चूक,बरोबर हे शब्द जाणीवपुर्वक टाळले आहेत इथे!)
कितीतरी चांगल्या लेखकांच्या साहित्यामधे, श्रूंगाराचे, प्रणयाचे वर्णन असते. ते चूक आहे असे कोणीही नाही म्हणनार. इव्हन वरच्या कविंच्या, कविता त्याज्य आहेत असे म्हणने हेही बरोबर नाही.
पण एका सार्वजनिक स्थळी वावरताना, लेखकाने वा कविने ते भान ठेवावे असे माझे वैयक्तीक मत आहे!
स्वाती अगद
स्वाती
अगदी चांगला मुद्दा मांडलास. मला कविता फारशी कळली नाही - वेलची अन ओठ ही उपमा, दालचिनीची भुकटी इत्यादी . पण ती अश्लील देखील वाटली नाही.
साखर,
साखर, वेलची, दालचिनी हे सगळे 'मसाला चहा' म्हणतात त्याचे घटकपदार्थ आहेत उमेशजी. त्या चहाचा अनुभव जसा विविध स्वादांच्या मिश्रणामुळे हवाहवासा आणि आनंददायी तसाच प्रेयसीबरोबरच्या शारीरिक जवळिकीचा - इतकंच कवि म्हणतो आहे. आणि तशी शारीरिक जवळीक घडून गेल्यावर त्याच नात्याचे निराळे रंगही (प्रेयसी एका विशिष्ट मनोवस्थेत आईसारखीही वाटते हे तर तुम्हाला मान्य असेल?) अनुभवले गेले आहेत.
प्रकाशजी,
'जर तुम्ही एखादे साहित्य तुमच्या आईला वा बहीणीला वाचुन दाखवू शकत नसाल तर ते साहित्य अश्लिल ! ' अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे याबाबतीत.
हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी काय वाचून दाखवू शकता ही तुमची वैयक्तिक बाब झाली. (अमेरिकेत वाढण्याचा त्याच्याशी संबंध कळला नाही, पण ते जाऊ दे.) 'ही कविता तुम्ही घरी वाचून दाखवाच' असा आग्रह मी करत नाहीये. पण अश्लील आहे म्हणून एखादं लिखाण 'न वाचायच्या / छापायच्या लायकीचं' होतं का - हा मुद्दा आहे.
मायबोलीवर असं साहित्य येऊ नये - असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या 'असं'ची व्याख्या आणि व्याप्ती कशी ठरवायची?
चौधरींच्या कवितेचा संदर्भ मला माहीत नाही.
स्वाती
स्वाती तुमचा प्रतिसाद अत्यंत वाचनीय व विचार करायला लावणारा आहे. तुम्ही पहिल्या परिच्छेदात ही कविता अतिशय सुंदरपणे समजावून सांगितली आहे. मला जमले नसते. फार आभारी आहे. माझी कविता वर्णनात्मक वाटते आहे खरी. पण खरे तर ती एवढी वर्णनात्मकही नाहीये. तुम्ही म्हटले आहे त्याशिवाय हा सखी ते माता असा प्रवास आहे. लेखनस्वांतत्र्याबाबत एवढेच म्हणीन लेखन स्वातंत्र्य संपूर्ण असावे. कारण श्लील अश्लील फारच सबजेक्टिव आहे.
पहिल्या
पहिल्या चहाची तलफ, आणि तो मनासारखा (योग्य वेळी, योग्य चवी / तापमानाचा इ.) मिळाल्यानंतरची तृप्ती आणि आनंद यांचा संदर्भ प्रेयसीसोबतची जवळीक व्यक्त करण्यासाठी वापरला आहे.
नि
आईच्या उराशी निवांत झालेल्या बाळाचा निवांतपणा व सुरक्षितपणाची भावना लाभावी ही कल्पना छान आहे.
>> मला तरी हे न कळण्यासारखे कवितेमधे काही क्लिष्ट वाटले नाहि. त्यांची एकत्र मांडणी जमली आहे कि नाही हा भाग अलहिदा.
बाकी श्लील्/अश्लील ज्याच्या त्याच्या interpretation वर आहे. पाहणार्याला स्तनपान करणारी मातादेखील अश्लील वाटू शकते.
हरकत नाही.
हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी काय वाचून दाखवू शकता ही तुमची वैयक्तिक बाब झाली.>>> तसं मी मान्य केलंय की हे वैयक्तिक मत आहे...अगदी ठळक शब्दांत!
आणि मी अमेरिकेत नाही म्हणले....अमेरिकन हा शब्द आहे!(पाश्चात्य संस्कृतीसाठी तो शब्द वापरला होता!) माझ्या म्हणण्याचा कृपया विपर्यास नका करू!(त्याने अमेरिकेत रहाणार्या मराठी लोकांच्या भावना दुखावल्या जातील!)
पण अश्लील आहे म्हणून एखादं लिखाण 'न वाचायच्या / छापायच्या लायकीचं' होतं का - हा मुद्दा आहे!
>>>>
त्याच मुद्याबद्दल लिहीलं होतं मीही...अजुन विस्तारून लिहीन हवे तर !
स्वाती-
स्वाती- मुद्दा समजला.
उत्तान /कामुक, अश्लील आणि बिभत्स यातील सीमा जलरंगांसारख्या एकात एक मिसळायची शक्यता फार वाटते.
त्यात प्रयोग करताना लेखकाने टोन सांभाळला नाही तर लेखनच बेसूर होते. फक्त ९ रसांपैकी एकाच रसावर लक्ष केंद्रीत करायचे असेल, तर त्याला स्वच्छ पोर्नोग्राफी म्हणावे आणि तशा विषयांना वाहिलेल्या स्थळांवर आपले लेखन मांडावे- असे IMHO. कालची चौधरींची कविता (?) मात्र डोक्यात गेली होती. फालतू आणि बिभत्स.
या कवितेत आवर्जून ध्यानात घ्यावं असं विशेष वाटलं नाही. फसल्यासारखी वाटली, आणि उलट कोणीतरी खोड काढण्यासाठीच डुआयने मुद्दाम टाकल्यासारखी वाटली.
कुठल्यातरी कादंबरीत, नाटकात, कथेत काहीतरी योजून/ काहीतरी गडद/स्पष्ट करण्यासाठी आली असती तर कदाचित वेगळे परिमाण लाभले असते. ते त्या पूर्ण कलाकृतीच्या अनुषंगाने पाहता आले असते.
वरची तू दिलेली सगळी उदाहरणं त्यामुळेच वेगळी वाटतात. त्यातल्या प्रत्येक लेखकाने साहित्यात मोलाची भर टाकली.
>> अजुन
>> अजुन विस्तारून लिहीन हवे तर !
जरूर लिहा. मलाही (आधी म्हटल्याप्रमाणे) या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत, तेव्हा मलाही काही मार्गदर्शन झाल्यास मी तुमची आभारी राहीन.
तुम्हा
तुम्हा सर्वांचे मुद्दे वाचले आणि पटले देखील. अश्लिलतेची माझी व्याख्यादेखील नेमकी हिच असूनही मला वरील उदाहरणे अश्लिल वाटत नाहीत. हे बरेचसे व्यक्तीसापेक्ष असावे. त्यापेक्षा देखील कवितेतून कवीला नेमके काय सांगायचे वा सुचवायचे आहे ते महत्वाचे असावे.
स्त्रीदेहाची वर्णने एखादी साहित्यकृती त्याज्य ठरवू शकत नाहीत (वा नयेत) ह्या स्वातीजींच्या मताशी मी सहमत आहे. जीवनाशी फारकत घेऊन साहित्य होउच शकत नाही.
जे आवडेल ते घ्यावे नावडेल ते त्यजावे अस मी माझ्यापुरते ठरवतो. मात्र साहित्यीक पोलीसगिरीला माझा नेहमीच विरोध राहील.
ट्यूलीप यांस - चौधरीच्या कवितेबाबत कही गैरसमज झाला असावा असे मला वाटते. त्याबद्दल नंतर बोलूच.
मी असे सुचवू ईच्छितो की आपले आक्षेप योग्य मार्गाने (अॅडमिन मार्फत) मांडता येतील.
व्यक्तिशः मला हि कविता समजली नाही. त्यामुळे जास्त बोलत नाही.
*************************************************
जे जे आपणासी ठावे.
स्वाती, धन्
स्वाती,
धन्यवाद.
अॅडमिन यांच्या विपुतही मी हाच मुद्दा मांडला आहे.
संदर्भ ध्यानात घेतले नाहीत तर प्रत्येक गोष्ट अश्लील ठरू शकते.
माझे मत
माझे मत असे आहे कुठेही आपण जेंव्हा प्रथमत: जातो त्यावेळी लगेच इतर ४ लोकांना गैरसमज होईल असे बोलत नाही. वेरी साने सुबोध यांनी बहुतेक इथे ही चुक केलीय की इथे आल्याआल्या अशी कविता लिहिली की जी वाचून ४ लोकांना गैरसमज होऊ शकेल.
वेरी साने सुबोध, तुम्ही हा विषय बाजूला सोडून तुमच्या जर काही जुन्या कविता असतील तर त्या लिहा.. त्या वाचून कदाचित लोकांना तुमच्यातला कवि कळेल. खूपदा लेखकाला/कविला आपले विचार वाचकांपर्यत पोचवायला वेळ लागतो. वाचक एकदम कुणाला स्विकारत नाही. मर्ढेकर हे एक उदाहरण आहे ज्यांच्या कविता वाचकांना समजायला खूप वर्ष लागली होती. मग कुठे मर्ढेकर त्यांच्यासाठी कवी झाले!!!!
मायबोली हे
मायबोली हे एक सार्वजनिक स्थळ आहे. हे फक्त कवितेंचे व्यासपीठ नाही. त्यामुळे इथे काही अलिखीत नियम आहेत.(जसे सर्व सार्वजनिक स्थळांच्या बाबतीत असतात!) हे नियम इथे येणार्या, लिहीणार्या, वाचणार्या लोकांच्या मुल्यांनुसार बनतात.आणि ते तसे असणे हे नैसर्गिक आहे! ( मी चूक,बरोबर हे शब्द जाणीवपुर्वक टाळले आहेत इथे!)
कितीतरी चांगल्या लेखकांच्या साहित्यामधे, श्रूंगाराचे, प्रणयाचे वर्णन असते. ते चूक आहे असे कोणीही नाही म्हणनार. इव्हन वरच्या कविंच्या, कविता त्याज्य आहेत असे म्हणने हेही बरोबर नाही.
पण एका सार्वजनिक स्थळी वावरताना, लेखकाने वा कविने ते भान ठेवावे असे माझे वैयक्तीक मत आहे!
>>>>>>>>>
आधी वरही हे लिहीले होतेच .माझा मुद्दा हा कवितेच्या अश्लिल असण्याबाबत वा नसण्याबाबत बिल्कुल नाहीये. इथे जर्मनीत न्युजपेपरच्या फ्रंट पेजवर रोज एका महिलेचा नग्न फोटो छापुन येतो. इथल्या वृत्तपत्र वाचणार्या लोकांना त्यात कांहीही अश्लिल वाटत नाही. तसे भारतातल्या वृत्तपत्रांत चालणार नाही कारण, ती गोष्ट तीथल्या वृत्तपत्र वाचकांना अश्लिल वाटेल.(भारतातही वृत्तपत्रांची याबबातीत अशात बरीच प्रगती झालीये तो मुद्दा वेगळा !) मला यात काहीही शंका नाहीये कि, एखादी गोष्ट अश्लिल वाटणे आणि न वाटणे हे संस्कृतिक मुल्ये सापेक्ष आहे.
मायबोलीवरचे जे वाचक आहेत, त्यांची जी अभिरूची आहे,त्याच साहित्यमुल्यांना इथे आश्रय मिळायला हवा!ही मागणी अवास्तव आहे का ?
ही कविता इथे अस्थानी आहे! फक्त एवढेच माझे मत होते. बाकी कविवरही माझा व्यक्तिशः काहीही रोष नाहीये. त्यांच्या इतर रचनांचे इथे माझ्याकडुन तर स्वागतच होईल!
अॅडमीन यांच्या विपुमधे मी लींक दिली होती ती त्याच कारणाने कि, या विषयावर चर्चा व्हायला हवीय!
प्रोंची कविता कुणाला बिभत्स वाटली असेल. मलाही वाटली होती. तसा जोक कॉलेजात ऐकला होता तीथे तो अस्थानी नव्हता. इथे तो अस्थानी आहे.
मी हे एका सार्वजनिक स्थळाच्या फ्रेम ऑफ रेफरंसने बोलतोय. इथे काय चालु शकेल आणि काय नाही त्याबद्दल माझे जे वैयक्तिक मत आहे ते मी मांडले.
यावर इतरांची मतेही जाणुन घ्यायला आवडेल.
हवे तर चर्चा दुसरा धागा उघडुन त्यावर करायला काहीही हरकत नाही.
>> स्वाती तु
>> स्वाती तु मात्र ह्या कवितेला वेगळ्या पातळीवर नेउन ठेवते आहेस. माझ्या मते कविने येवढी आशय गर्भ कविता नक्कीच लिहीली नसावी कारण मग "तुझ्या वक्षस्थळांवर माझे शहाणे डोके ठेवू" हा उल्लेख आला नसता.
"अगदी तुझ्या बाळासारखे...." इथे कविता पुर्ण गंडते
हे सगळं तुझं मत आहे सत्यजित, आणि ते माझ्या मताशी जुळत नसलं तरी ते असण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. कविता मला आवडली नाही (निराळ्या कारणांसाठी) हे मीही म्हटलंच आहे.
>>> आईच्या उराशी निवांत झालेल्या बाळाचा निवांतपणा व सुरक्षितपणाची भावना लाभावी ही कल्पना छान आहे. मांडणी सौम्य असावी अशी वाचकांची मागणी दिसतेय. शरीराच्या अवयवांचा सरळ उल्लेख आला की कविता भडक वाटणे साहजिकच आणि त्यातही तो स्त्री देहाचा
ही पोस्ट पहा. 'कविता/मांडणी पटली/आवडली नाही' हे म्हणणं निराळं आणि 'मांडणी सौम्य असावी अशी वाचकांची मागणी' असणं निराळं.
प्रश्न 'अशा कवितांवर बंदी आणावी' हा विचार योग्य आहे की नाही, हा आहे.
यावर मतं मांडली जात आहेत, चर्चा होत आहे ही आनंदाचीच बाब आहे.
कविता(?)
कविता(?) किंवा जे काय आहे त्यात काही अर्थ नाही पण यात काहीही अश्लिल वाटलं नाही. स्वाती आणि ट्यु शी सहमत.
पण यावरची चर्चा वेगळीकडे व्हायला हवी. साहित्यिक अनाचाराला (धन्यवाद स्वाती! संदर्भ पार्ले बाफ) उगाच टिआरपी मिळतोय या चर्चेने.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
मलाही कळत
मलाही कळत नाही की एवढा उहापोह का? एखाद दुसरा असा शब्द (उदा: वक्षस्थळ,बांधा वगैरे वगैरे)जो जनसामान्यांच्या मताप्रमाणे लिहिताना व बोलताना चटकन वापरात नाही आणि एकूणच त्याच्याकडे बघायचा दृष्टीकोन वेगळा असल्याने लोक तूटून पडतात का?
आपल्याला सवय नसते असे काही एकायची म्हणून आपण react करतो समजू शकतो. पण जर कविता खरोखरच काही सांगायचा प्रय्त्न करत असेल,त्याची मांडणी चांगली असेल तर फक्त असे शब्द वापरले म्हणून कविता अश्लील ठरत नाही असे मला वाटते.
तसे बघायला गेलो तर शृंगारीक गोष्टी विषयी उघड उघड च्रर्चा केली तेही असे शब्द(वरील काही उदा:) वापरून केली तर ते वाईट अशी जवळपास mentality असल्याने होत तर नाही ना? हे चांगले ,ते वाईट असे व्यक्तीसापेक्ष प्रमाण असले तरी hypocrisy दिसतेच एकूणात.
मला स्वताला वरची कविता अजिबात कळली नाही प्रथम वाचली तेव्हा. दालचीनी,वेलची वगैरे उपमा म्हणून दिल्या आहेत हे नंतरचे रसग्रहण वाचून कळले, इतके काय विचित्र व आक्षेपार्ह तर वाटले नाही. पण कविता खूप छान आहे असे मात्र वाटले नाही रसग्रहण वाचल्यावर. असो.
मांडणी
मांडणी सौम्य असावी अशी वाचकांची मागणी दिसतेय. शरीराच्या अवयवांचा सरळ उल्लेख आला की कविता भडक वाटणे साहजिकच आणि त्यातही तो स्त्री देहाचा.>>>
स्वातीजी, आपण माझ्या पोस्टमधील या वाक्यांचा उल्लेख केलात म्हणून पुन्हा चर्चेत नाक खुपसतोय. पहिल्या दोन प्रतिसादानंतर (विशेषत: ... ए हाकला रे याला.... ) मला जे जाणवलं ते मी मांडलय. सत्याने म्हटल्याप्रमाणे त्याच्या कवितेतील उल्लेख त्यावेळी रास्त वाटलेत. आपण दिलेल्या उदाहरणातील कविच्या प्रतिभेवर शंका घेण्याची माझी कुवतच नाही.
कवितेचा जो अर्थ मला कळला वा कळला नाही तो मी माझ्या परिने नमुद करून रितसर रसग्रहणाची कविकडे मागणी केली. कविता नीट कळावी हा हेतू.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
गंमतच आहे
गंमतच आहे सगळी!
एक नवीन माणूस येतो, त्याला एका उत्कट क्षणी जे काही वाटलं ते बहुतेक त्याला अपेक्षित असलेल्या काव्यस्वरूपात लिहितो, आणि त्याच्यावरती एवढा गदारोळ!
इथले बरेच पांढरपेशे लोक कधीच वक्षस्थळ हा शब्द न ऐकल्यासारखं का करत आहेत ते कळलं नाही. मुळात ही कविता आहे की नाही, ती चांगली आहे की नाही, याच्यावर भाष्य होण्याऐवजी तिची मांडणी किती अश्लील आहे हे सिद्ध करण्याचा इतका अट्टाहास का? ती मांडणी जर इथल्या लोकांना अभिप्रेत असलेल्या अभिजात शब्दांच्या सहाय्याने झाली असती तर जळफळाट होण्याऐवजी गुलाबी गुदगुल्या झाल्या असत्या काय? आपण आपल्या घरात ’तरुण आहे रात्र अजुनी’, ’मालवून टाक दीप’, ’तुज्या उसाला लागंल कोल्हा’ ही गाणी लागल्यानंतर आपल्या आयाबहिणींचे कान वा डोळे झाकतो का?
माझं मत विचाराल तर उत्कट प्रणयानंतर प्रेयसीच्या वक्षस्थळावर डोकं ठेवणे ही तर प्रणयाची यशस्वी परिणिती असते. त्या क्षणी ह्रदय, ऊर, किंवा तत्सम डीसेंट शब्द ज्याला सुचत असतील तो तिच्याशी, स्वतःशी, आणि नुकत्याच घडून गेलेल्या प्रणयाशी प्रतारणाच करत असेल. कुठलीही कलाकृती म्हणजे कलाकाराचं त्या क्षणी उमटलेलं प्रामाणिक प्रतिबिंब हा निकष जर मान्य असेल तर या कवितेतली भाषा कलाकृतीशी प्रामाणिक आहे. रोज वाचनात येणार्या वरवरच्या चंद्र-चांदण्या-श्वास-स्पंद-गंध यांनी भरलेल्या कवितांपेक्षा ही अभिव्यक्ती मला अधिकच प्रामाणिक वाटते.
मला विचाराल तर आणि जर शोधायचीच असेल तर यात खरी अश्लीलता (उत्कटता?) वक्षस्थळापेक्षा ’माझ्या बाहुपाशात तुझ्या सावळ्या दालचिनीची भुकटी व्हावी’ याच्यात आहे, आणि मला त्याबद्दलही आक्षेप नाही. तथाकथित अवेळी व अस्थानी प्रणय म्हणजे प्रचंड मोठं पाप, काही गोष्टी अंधारातच करायच्या आणि ठेवायच्या असतात अशा मानसिकतेत वाढलेले आपण, आणि त्याच मानसिकतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे ’नंतर शहाणा होणारा’ या कवितेतला नायक.
सकाळचा पहिला चहा पिण्याची उर्मी मान्य करणारेही आपण, आणि सकाळी उर्मी येऊन झालेल्या प्रणयाला अश्लील म्हणणारेही आपणच. वाकड्यात शिरायचेच आणि अश्लीलता शोधायचीच झाल्यास ती सत्यजितच्या ’किंवा चहातल्या महत्वाच्या जिन्नसाचा संबध आहे? ’ या वाक्यातसुद्धा सापडू शकते. कवीने वेळीअवेळी केलेल्या मागण्या प्रेयसी, बायको किंवा तिच्यातली आई कशा पूर्ण करते आणि त्या पूर्ण झाल्यानंतर निरागस मनालाही आलेलं शहाणपण व्यवस्थित व्यक्त केलेलं असताना केवळ वक्षस्थळांचा उल्लेख वाचून छाती बडवणार्या लोकांची कीव करावीशी वाटते. आणि हेच ते लोक का, जे ’कोंबडी भुंकाया लागली’सारख्या कवितांवरती महिनोन् महिने टाईमपास करत होते? - असा प्रश्न पडतो.
कमाल म्हणजे त्याच सतीश चौधरींची काल तासाभरासाठी मायबोलीवर उपलब्ध असलेली आणि नंतर (बहुतेक) अश्लीलतेमुळे अॅडमिनने डिलीट केलेली कविता आज दिवसभरात कितीतरी जणांनी चवीचवीने मला ऐकवली तेव्हा तिचे हजारो पांढरपेशे आर्काईव्हज तयार झालेले असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.
या कवितेचा मला कळलेला अर्थ हा रसग्रहण समजून ही कविता उगाचच उच्च पातळीवर जाऊ नये आणि सामान्य वाचकांनी घाबरून जाऊ नये. माझ्या मते ही एक अशी कविता आहे, जिच्यातून निदान कवीने काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हा जर ड्युप्लिकेट आयडी ठरत असेल तर अशा अनेक ड्युप्लिकेट आयडीजच्या कविता मला रोज वाचायला आवडतील.
सांगणे न लगे, हे माझे स्वाती, चिनूक्स, शोनू, असामी, रैना, ट्यूलिप इ. सगळ्यांना अनुमोदन आहे.
वेदनायुक्त आठवणभरल्या, मोगर्याने गंधाळलेल्या विकल अबोली विरहदग्ध चांदणरात्रींनंतर आणि माझ्या स्वत:च्या काव्यात आलेल्या ओल्या पहाटेच्या कोवळ्या मिठीवर पडलेल्या गुडी गुडी प्राजक्तसड्यानंतर समोर आलेला हा फक्कड चहा तरतरी आणणारा होता.
मी या ड्युप्लिकेट किंवा ओरिजनल आयडी असलेल्या कवीचं त्याला त्या क्षणी वाटलं तेच लिहिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो.
मुळात ही
मुळात ही कविता आहे की नाही, ती चांगली आहे की नाही, याच्यावर भाष्य होण्याऐवजी तिची मांडणी किती अश्लील आहे हे सिद्ध करण्याचा इतका अट्टाहास का? >>>>>>..
बरं! आणि आम्ही काहीतरी वेगळे सांगायचा प्रयत्न करतोय असे म्हणायचेय का तुम्हाला ??
आय मीन सगळ्यांचे प्रतिसाद निट वाचले आहेत का तुम्ही ......ती कविता अश्लिल आहे किंवा नाही, हा मुद्दा आलाच कुठुन ??
तुम्हाला आवडली असेल तर आम्हालाही आवडावी असा अट्टहास आहे का ? का ? ते स्पष्ट करा ते म्हणजे आम्हालाही कळेल नक्की ! आणि आम्हीही कविचे अभिनंदन करतो मग ! हा का ना का
चु. भू द्या घ्या !
प्रकाश
प्रकाश, तुम
प्रकाश,
तुमच्याच पहिल्या पोस्टमधे तुम्ही ह्या कवितेच्या अश्लिल असण्या नसण्याचा उहापोह नाही का केला?
त्यापेक्षा मूळ वस्तू, काय म्हणायचंय यावर विचार व्हायला नको का?
आवडण्या नावडण्याचा संबंधच कुठे येतो? आवडणे आणि नावडणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. पण म्हणून मुळातल्या वस्तू पेक्षा सांस्कृतिक फुटपट्ट्यांचाच खेळ करायचा का?
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
वरील
वरील कवितेतील आशय, विषय आणि शब्दयोजनेच्या अनुषगांने भट, ग्रेस व त्यांच्या कवितांचा संदर्भ देतांना मुद्दा तोच श्लीलाश्लीलतेचा असला तरी भट आणि ग्रेस यांनी कवितेवर वादातीत प्रभुत्व, काव्यरसांचे इत्यंभूत प्रकटीकरण, मानवी भावभावनांची सुस्पष्ट जाण, विचारांची प्रगल्भता, त्या विचारांना न्याय देणार्या चपखल शब्दांचा वापर, अपेक्षित परिणामांचे दर्शन आणि रसिक वाचकाला द्यायच्या अनुभवांचे बेमालूम सादरीकरण अशा गुणांचे वर्तूळ आपल्या कलाकृतीभोवती रसिकांमध्ये तयार केले होते किंवा त्यांच्या इतर अप्रतिम कलाकृतीतून ते तसे तयार झाले होते. हे वर्तूळ काही पहिल्या कवितेतून किंवा कलाकृतीतून तयार होत नाही आणि दुर्दैवाने वरील कवितेच्या कवीभोवती असे कुठलेही वर्तूळ नाही.
प्रगल्भतेचे असे वर्तूळ असणार्या कवींची/लेखकांची सवंग पण प्रामाणिक, वादजन्य पण उच्च साहित्यमुल्य असलेली कलाकृती शक्यतो वाचकांकडून्/रसिकांकडून तडकफडकी किंवा अविचाराने झिडकारली जात नाही. त्यातील साहित्यमूल्ये शोधण्याचा प्रयत्न हमखास केला जातो आणि जन्मतःच उच्च दर्जा आणि भावनांशी प्रामाणिक असणारी ती कलाकृती त्यातील दुर्लक्षिल्या गेलेली साहित्यमुल्ये कळताच अथवा इतरांनी प्रयत्नपूर्वक ती शोधून मांडताच स्वीकार्ह्य होवून, त्या कलाकाराला आणि कलाविष्काराला लोकाश्रय लाभतो, पण हे भाग्य नवोदित कवी/लेखकांच्या किंवा त्यांच्या कलाकृतीच्या वाट्याला येईलंच असे नाही आणि प्रत्येक कलाकृतीत अशी साहित्यिक आणि भावनिक मुल्ये दडलेली असतील असेही नाही.
कविता अश्लील आहे या अर्थाने प्रतिसाद देणारे त्यांच्या मताशी प्रामाणिक असले तरी त्यात प्रतिसाद देतांना बाळगायचे तारतम्य सोडलेले दिसते. असे प्रतिसाद एखाद्या थोडा वेळ देऊन विचार करण्याजोग्या अथवा ज्यातील साहित्यिक व भावनिक मुल्ये उमजण्यास जाणकारांच्या सहाय्याने अधिक यत्न करावा लागेल अशा कलाकृतींवर कायमचा अन्याय करून ठेवतात.
एखाद्या कलाकृतीची जीव तोडून निर्भत्सना करतांना आपण त्यातील सवंगता सापेक्ष आहे हे लक्षात घेतो का?
आपल्या प्रतिसादामुळे कलाकृतीबद्दल इतरांच्या त्या कलाकृतीचा आपल्यापरीने अन्वयार्थ लावण्याच्या हक्कावर गदा तर येत नाही ना हे आपण पाहतो का?
>> ती कविता
>> ती कविता अश्लिल आहे किंवा नाही, हा मुद्दा आलाच कुठुन ??
अश्लील नाही वाटली तर
>> होय ! मला ते अश्लील वाटते. 'जर तुम्ही एखादे साहित्य तुमच्या आईला वा बहीणीला वाचुन दाखवू शकत नसाल तर ते साहित्य अश्लिल ! ' अशी माझी साधी सरळ व्याख्या आहे याबाबतीत. जर मी अमेरिकन कुटुंबात वाढलो असतो, तर कदाचित मलाही ते तसे वाटले नसते.
....
पण एका सार्वजनिक स्थळी वावरताना, लेखकाने वा कविने ते भान ठेवावे असे माझे वैयक्तीक मत आहे!
ही पोस्ट काय होती?
आणि,
१. ही कविता मला आवडली असं मी कुठे म्हटलं आहे?
२. आणि समजा माझ्या पोस्टमधून तो अर्थ ध्वनित होतही असला तरी ती इतरांनाही आवडायलाच हवी असा अट्टाहास मी कुठे केला आहे?
आता कृपा करून 'बरं, तुम्हाला नसेल आवडली तर आम्हालाही नाही आवडली. हाकानाका!' असं म्हणू नका.
कवितेत
कवितेत अवयवांचे स्पष्ट उल्लेख, काही सूचक शब्द आले तर काही जणांना अश्लील वाटेल, काही जणांना नाही. हे जाणून ही कविता मागे न घेतल्याबद्दल सुबोध यांचे अभिनंदन करतो.
माझ्या अश्लीलतेच्या कल्पना अजूनही स्पष्ट नाहीत. त्या बदलत आहेत अजूनही. पहिला धक्का बसला भाऊ पाध्ये यांचे 'वासूनाका' वाचल्यावर. त्यावर अत्र्यांनी लिहिलेले संपादकीय वाचल्यावर दुसरा धक्का. मग स्वातीने उल्लेख केलेल्या कविता इ. एवढे बदलते आणि अस्पष्ट स्वरूप असताना त्यासंबंधी काहीही ठाम धोरणे मी ठेवावीत का ? केवळ बदलतेच नव्हे तर काही प्रमाणात सातत्याचा अभाव असलेलेसुद्धा. सॅंकीने एका अर्धअनावृत्त तरुणीचे चित्र काढले होते. ही किंवा कालची कविता अश्लील वाटणार्या किती जणांना ते चित्र अश्लील वाटले नाही ?
आणि 'वाटले नाही' याचा अर्थ आपला वैचारिक गोंधळ आहे असे मुळीच नाही. हे माणूसपणाच्या गुंतागुंतीचे द्योतक आहे. पण मुद्दा असा की थोडे अस्पष्ट, सापेक्ष, गुंतागुंतीचे अशी ही बाब असताना सेन्सॉरशिपचे 'हे श्लील, हे अश्लील' असे काळेपांढरे धोरण इथल्या सुजाण वाचकांनी स्वीकारावे का ? ते धोरण अंमलात येऊ लागल्यावर 'नैतिक विजया'चा आनंदोत्सव साजरा करत राहू ("मायबोलीवर 'असल्या-तसल्या साहित्यास स्थान नाही बरे !"), पण त्यात वाहवत जाऊन एकेक झापडे बसत जातील आणि बधिरता यायला सुरूवात होईल, त्या धोक्याचे काय करायचे ?
कोणी म्हणेल, अहो, याचा अर्थ मग वासूनाकाछाप साहित्य, 'बया' मासिकातील साहित्य असा प्रवास करत इथे शृंगार हैदोस निर्माण होईल... हो, हेही शक्य आहे. 'मायबोली' या जागेवर माझी मूल्यव्यवस्था असलेल्यांचीच मिरासदारी होती, आहे, पण ती तशीच रहावी असा नियमही नाही. मला पटणारे, आवडणारे साहित्य इथे येणारच आहे. पण मला न पटणारे, न आवडणारे, कारण काहीही असो, असे साहित्य इथे येऊच नये असा आग्रह धरणे म्हणजे मीच माझ्या पायावर धोंडा मारणे नव्हे काय ?
एक मुद्दा मात्र कालपासून त्रास देत आहे... श्लीलाश्लीलतेच्या व्याख्या सापेक्ष आहेत हे जाणूनही स्वतःच्या कवितेशी ठाम व प्रामाणिक राहणे आणि असला काहीही विचार न करता स्वतःची कविता लोकाग्रहास्तव मागे घेणे/पुढे आणणे यात अधिक बाजारू/सवंग काय वाटते ? (कविता आहे की महानगरपालिकेचा दिवा ?) की जे अधिक बाजारू/सवंग वाटते त्यावरच आता आपण चर्चा करत आहोत ?
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
स्वातीजी
स्वातीजी इथे काहीही लिहायची इच्छा नव्हती!
पण तुमची पोस्ट आणि विचारलेल्या प्रश्नांच्या अनुशंघाने लिहीतोय!
(मूळ कवितेवर नो कमेंट्स!)
पण तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत त्याबद्दल बोलायचे झाल्यास.
होय ! मला ते अश्लील वाटते. >>>>
माझी पोस्ट मी बदललेली नाहीये ! ती जशी आहे तशीच आहे!
ती व्याख्या माझी माझ्यासाठी आहे.
मी या कवितेवर काहीही कमेंट केलेली नव्हती.
फक्त एकच कमेंट होती तीही माझ्या तिसर्या पोस्टमधे कि, मला ही अस्थानी वाटतेय...इथे मायबोलीसारख्या सार्वजनिक संकेतस्थळावर !
तीथेही मी माझे मत अॅडामंटली कुणावर लादायचा अट्टहास करत नाहीये.
मी हे एका सार्वजनिक स्थळाच्या फ्रेम ऑफ रेफरंसने बोलतोय. इथे काय चालु शकेल आणि काय नाही त्याबद्दल माझे जे वैयक्तिक मत आहे ते मी मांडले.
यावर इतरांची मतेही जाणुन घ्यायला आवडेल.>>>
मी एवढेच म्हंटले कि, या विषयावर चर्चा व्हावी.
मला असेही म्हणता आले असते कि,
तुम्ही तुमच्या आयाबहीणींना काय ऐकवायचे तो तुमचा प्रश्न आहे. आणि मी काय तो माझा! "
पण हे असे मुर्खपणाचे वैयक्तिक स्टेटमेंट मी, टाळले होते. नुसता वाद घालायचे प्रयोजन असते तर तसेही बोललो असतो. पण नाही ! आता बस करतो ! माझा तो पिंड नाही !
>>>>इथले
>>>>इथले बरेच पांढरपेशे लोक कधीच वक्षस्थळ हा शब्द न ऐकल्यासारखं का करत आहेत ते कळलं नाही. मुळात ही कविता आहे की नाही, ती चांगली आहे की नाही, याच्यावर भाष्य होण्याऐवजी तिची मांडणी किती अश्लील आहे हे सिद्ध करण्याचा इतका अट्टाहास का? ती मांडणी जर इथल्या लोकांना अभिप्रेत असलेल्या अभिजात शब्दांच्या सहाय्याने झाली असती तर जळफळाट होण्याऐवजी गुलाबी गुदगुल्या झाल्या असत्या काय? आपण आपल्या घरात ’तरुण आहे रात्र अजुनी’, ’मालवून टाक दीप’, ’तुज्या उसाला लागंल कोल्हा’ ही गाणी लागल्यानंतर आपल्या आयाबहिणींचे कान वा डोळे झाकतो का?
कमाल म्हणजे त्याच सतीश चौधरींची काल तासाभरासाठी मायबोलीवर उपलब्ध असलेली आणि नंतर (बहुतेक) अश्लीलतेमुळे अॅडमिनने डिलीट केलेली कविता आज दिवसभरात कितीतरी जणांनी चवीचवीने मला ऐकवली तेव्हा तिचे हजारो पांढरपेशे आर्काईव्हज तयार झालेले असावेत की काय अशी शंका आल्यावाचून राहिली नाही.<<<<<
सहमत वैभव तुम्हाला. म्हणूनच मला ही एकूणात hypocrisy च वाटते वरच्या माझ्या लिहिलेल्या पोस्टप्रमाणे.
>> मी एवढेच
>> मी एवढेच म्हंटले कि, या विषयावर चर्चा व्हावी
हो हो प्रकाशजी, तुमच्या त्या म्हणण्याचा आदर करूनच ही इतकी चर्चा होत आहे.
साला अपुन
साला अपुन काय जास्त लिवते नाय काय.. पन साला हा कविता चाय वर हाय ना. मग आक्ख्या कवितेमधे चाय कुठे हाय. पचास टाईमला वाचल पण चाय नाय भेटला. मग काय.. शेवटी जोडुन टाकला... चाय पित...
साला अपुनला बावळट समजते काय..
कविता
कविता अश्लील वाटली नाही.. मला कवितेतले कळत नाही.. पण सार्वजनिक फोरमवर अशी कविता येण्यास मला आडकाठी घालाविशी नाही वाटत.. शृंगार हाही नवरसातला एक रस आहे..
मनस्विनी, वैभवची मते पटली..
मात्र कविता अजुन चांगली होऊ शकली असती असे वाटते...
www.bhagyashree.co.cc
Pages