Submitted by Admin-team on 10 June, 2009 - 15:41
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही चर्चा या कवितेवरून सुरु झाली.
सकाळचा पहिला चहा
"तोच एक
"तोच एक प्रकार 'ओंगळ' शब्दांच्या बाबतीत. वास्तविक हे तथाकथित ओंगळ शब्द मी 'एल्गार' पासून सर्रास वापरत आलो आहे. 'रथचक्र'वर टीका होईपर्यंत आपण ओंगळ शबद वापरीत आहोत ह्याचाही मला पत्त्ता न्हवता! त्यानंतर मी विचार करू लागलो तेंव्ह माझ्या लक्षातं आलं की कलेच्या संदर्भात वायफळ येणारे शब्द हेच ओंगळ होऊ शकतात. वस्तुतः शब्दांना स्वतःचा असा अर्थ फा थोडा असतो. त्यांना धार येते, तेज चढतं, सामर्थ्य प्राअप्त होतं, ते त्यांचा वापर होतो तेंव्हा. हे सामर्थ्य, तेज प्राप्त करुन देणं सर्वस्वी प्रतिभेचं काम. शब्दांकडे पाहण्याची ही माझी दृष्टी आहे. त्यांचाशी कोणाचा मतभेद होइल; पण एखाद्या प्राध्यापकाने टाळ्याला जीभ लावून त्याला पोरकट म्हणावं हा काय प्रकार आहे? 'अश्लीलता' 'ओगंळपणा' ह्याविरुद्ध काही मान्यवर पण ललित साहित्यनिर्मितीचा अनुभव नसलेल्या लोकांनी सध्या आघाडी उघडली आहे. त्या आघाड्यांशी मला कर्त्यव्य नाही; पण सर्वज्ञतेचा आव आणून हे लोक शेरे मारतात तेंव्हा परिस्तिथी काळजी करण्यासारखी आहे असं वाटत. लेखकांना प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडण्याचीसुद्धा सोय उरणार नाही, असं विषारी वातावरण निर्माण होईल की काय अशी भीती वाटते.
माझ्या ओंगळ शब्दानां घाबरणारे हे लोक खालील ओळी वाचून काय म्हणतील?
लांब लोंबताती अंड --परपरा वाजे गांड
तोंड खाये फार --पादे बोचा करी मार. "
अनेक परिच्छेद खर्ची घालूनही सामान्य लेखकाला 'जरे'चा भेसूरपणा उभा करता आला नसता तो ह्या ठिकाणी कवीने दोन ओळीतं उभा केला आहे. पण त्याकरिता त्याला कलाबाह्य सोवळेपणा झटकावा लागला.
ही पुस्तकी माणसं 'ओंगळ' 'ओंगळ' असा आक्रोश करीत राहणार. त्या कडव्यांतले नको ते शब्द बाहेर काढून चिवडीत बसणार. संदर्भामुळे शब्दांना वेगळं सामर्थ्य येतं ही आम्हालां वाटणारी वस्तुस्थिती त्यांना पोरकट वाटणार.
श्लील्-अश्लील ठरवायंच कोणी? सौदर्यांचे कितीही नियम सांगीतले तरी शेवटी हे ज्यांच त्याला जाणवावं लागतं
विज्ञानासारखं गणितात बसवता येईल असं हे शास्त्र नाही. अशा स्थितीत 'मला वाटतं' असं म्हणत हे लोक कुर्हाडीचे पट्टे फिरवू लागले तर त्यांना कोण आवरणार?
---- श्री. ना. पेंडसे. 'रथचक्र' प्रस्तावना.
प्रत्येकाला विचार करण्यासारखे आहे म्हणून लिहून काढले. काही महिन्यांपुर्वीचा निखीलराव ह्याच्या कथेवरिल वाद आठवला.
सुरेख
सुरेख चर्चा आणि त्यासाठी चर्चा करणार्या सगळ्यांचं आणि मुळात कवीचं अभिनंदन.
ही कविता वाचली तेव्हा - पहिल्या खर्या चहाच्या घोटाऐवजी, वेगळ्याच "अमृताची" तल्लफ यावी आणि मग ती कशी बरं पूर्णं व्हावी... ह्या विचारात कवीने केलेलं हे स्वप्नंरंजन वाटलं.
मला तरी कविता पहिल्या वाचनात शेवटी "धूसर" वाटली. अशासाठी की, शहाण्या बाळासारखं का बरं? नक्की काय म्हणायचय ह्या कवीला ते कळेना.
वैभवची पोस्ट वाचल्यावर कळलं - अवेळी केलेला हट्टं पुरवला गेल्यावर अजाणाला कसं शहाणपण येतं....
वैभवची दृष्टी अमाप (कायतरीच शब्दं) आहे. कवीला नक्की हेच म्हणायचय का, ते माहीत नाही. पण वैभवाच्या नजरेतून कळलेला अर्थं लागल्यावर मन निवांत झालं.
आधीही अश्लील खरच नाही वाटली कविता. आता अर्थं कळल्यावर तर, ही कविता मी माझ्या सासूबाईंना वाचून दाखवू शकते....
ही कविता अस्थानी आहे का? ह्याला माझं उत्तर - नाही. मला तसं वाटत नाही. कदाचित वक्षस्थळांचा मायबोलीवर इतरत्र झालेला उल्लेख मला खटकेल... आणि त्याची कारणं तेव्हा वेगळी असतील.
आणि बो-विश म्हणतोय तसं "साहित्यिक मान्यतेचं" वर्तुळ ह्या कवीच्या भोवती अजून नाही...
सुबोध, तुमच्या अजून कवीता येऊद्यात. तुमची अधिक ओळख होण्याची आवश्यकता आहे.
नेहमी
नेहमी सारखीच मला कविता काहीच कळली नाही. असो, मला एक प्रश्न आहे, इथे ४ लोकांनी या कवितेचे ४ वेगळे अर्थ लावले काहींना आवडली काहींना नाही. मी आधीही हा प्रश्न स्लार्टींच्या "मार्टिन ऑयर" च्या कवितांच्या प्रतिक्रियांमध्ये विचारला होता. कवी कविता मुद्दाम ओपन एंडेड बनवतात का? हा काही ठराविक काव्य प्रकार आहे का? पुर्वी शाळेत असताना काही ख्यातनाम कविंच्या कविता आम्हाला इंग्रजी च्या अभ्यास्क्रमात होत्या. त्यांचं सिनॉपसीस, पुर्ण अर्थ वगैरे लिहायचे छोटे छोटे प्रोजेक्ट्स असायचे. तेव्हा सगळ्या कवितांना एक ठराविक आशय, अर्थ असायचा. तो अर्थ अगदी नवनीतच्या गाईड पासुन ते २१ प्रश्नसंचात सारखाच असायचा. आता आपले शिक्षण खाते आणी पुस्तक प्रकाशक अगदीच मेंढ्र टाइप आहेत असं तुम्ही म्हणाल तर मग सगळा प्रश्नच मिटतो. कवितेतले शब्द अवघड असायचे, पण शब्दांचा अर्थ कळल्यावर आशय व्यवस्थित कळायचा. कविता वगैरेच काय, माझे वडिल मुकेशची, महंमद रफीची गाणी ऐकायचे, मला असला कंटाळा यायचा ऐकायचा पण थोडं वय वाढलं आणी अर्थ समजायला लागले आणी तीच गाणी ऐकायला काय मजा यायला लागली म्हणुन सांगु.
थोडक्यात म्हणजे, कवि जेव्हा कविता करतात तेव्हा डोक्यात एक "ठोस" विषय किंवा भावना असायला पाहिजे हे खर आहे का ? किंवा एखादा ठोस विषय नसला तरी काही कवि लोकं मनातला चाललेला कोलाहल सुद्धा इतक्या सुरेख शब्दांत मांडतात की अगदी आपण त्यांच्या कानातुन शिरुन त्यांच्या डोक्यात बसुन मनातले विचार सिनेमाच्या पडद्यावर बघतोय असं वाटावं. तरी ही मनातला कोलाहल मांडायचा हा आपोआप "ठोस" विषय होतो.
कविता लिहील्यावर अगदी लगेच जरी त्याचा अर्थ साध्या शब्दात नाही मांडला तरी एकदा पुष्कळसे प्रतिसाद आल्या नंतर अर्थ टाकायला काय हरकत आहे? प्रतिसाद बघायची कुठल्याही कविला उत्सुकता असणारच. खरा अर्थ सांगितल्यावर लोकं वाईट म्हणतील याची काळजी असेल तर मग कविता इथे टाकुन काहीच अर्थ नाही. कवितेचा आशय, अर्थ सांगितल्यावर कदाचित ही वरची काही मंडळी म्हणतायत तसं त्यात वापरलेले शब्द कदाचित चपखलही असतील आणी उगाच विजय कुळकर्णी म्हणतात तसं "शॉक इफेक्ट" करता काही शब्दांचा बळच उपयोग केलाय असं वाटणार नाही.
वा केदार..
वा केदार.. करेक्ट उतारा..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
जोशी
जोशी साहेब, तुम्ही उद्धृत केलेला उतारा हा श्लील-अश्लील शब्दांच्या बाबतीतील मराठीमधले अत्यंत सुंदर विवेचन आहे. रथचक्रच्या प्रस्तावनेतला हा उतारा (मला वाटते ह्याचा उल्लेख अनेकदा तुझ्या-माझ्याकडून झाला होता) इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
अजून जास्ती काय लिहिणार.
केदार,
केदार, अत्यंत समर्पक व समयोचित उतारा. धन्यवाद.
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
बावळट,
बावळट, जल्ला मला पन चाय नाय भेटला..... तुम्ही असा आय डी का हो घेतला? डु आय आहे का? तुम्ही तर लय हुश्शार दिसता!
जोक अपार्ट, वक्षस्थळाचा उल्लेख मला तरी अश्लिल नाही वाटला, कारण तो ज्या पद्धतीनं आलाय ते तसं संयमीत आहे. कुठल्याही कला - प्रकारांत हे चालतेच. चित्रकला असो, काव्य असो, लेख असो. वाचनात बर्याचदा अगदी थोर लोकांच्या लिखाणातुन हे आलंय. आम्हाला चित्रकला शिकताना प्रथम ह्युमन अॅनाटोमी मध्ये शरिर अवयव चित्रीत करायला शिकवात, हाडांचे, स्नायुंचेही डायमेंशन्स शिकवतात. कपडे नंतर. सुरुवातीला टारगट लोक पांचटपणा करित पण नंतर हाच अभ्यासाचा विषय असल्यानं गंभीरपणे करीत. एखाद्या निष्णात डॉक्टर ने जर असे संदर्भ्/जागा टाळायच्या ठरवल्या तर! आपणही इथे कवि/वाचक म्हणुन हे टाळु शकत नाही. पण तरिही मला ही कविता झेपलेली नाही. कारण त्यात एक सुसुत्र धागा मला तरी मिळाला नाही. कल्पना चांगलीय पण ती मांडताना चूक झाली असं वाटलं. दालचिनी मध्येच कुठुन आली? शहाण्या बाळासारखे>> हे विधान निट विचार केला तर खूप गोड आहे. सतिशजींच्या कवितेचा उल्लेख करण्याची ही जागा नाही मात्र शरिर अवयवांचा दोन्हीकडे संदर्भ आहे म्हणुन बोलते, सतिशजींची कविता टोकाची बिभत्स मला वाटली. हेच उमेशच्या एका कवितेत इतका अप्रतीम वापर केला आहे त्याने..>>अजूनही भोग्य का मी? तुझे फक्त रिते होणे!>> डायरेक्ट-इनडायरेक्ट पद्धतीने त्याने अप्रतीम परिणाम साधला आहे. सॉरी उमेश, तुझ्या कवितेचा इथे संदर्भ वापरल्याबद्दल.
पण ह्या चर्चेने ज्ञानात भर पडली. आधी घाबरले होते हे सगळं पाहुन. पण मग हळुहळु विचार करायला लागले आणि वाटलं, का नाही? का घाबरायचं अशा चर्चेला किंवा अशा उल्लेखांना? असो.
हे माझे वैयक्तिक मत आहे. कुणालाही दुखवायचा हेतु नाही. कुणी दुखावले गेल्यास क्षमस्व.
वैभव तुमचे
वैभव तुमचे शहाणे होण्याबाबतचे विवेचन अगदी तंतोतंत मला सुचली तेव्हासारखेच. तुमचा फार फार आभारी आहे. भुकटी होण्यात उत्कटतेशिवाय आवेग आहे. बो-विश, तुम्ही वर्तुळ असण्यानसण्याबाबत आणि अन्याय होण्याबाबत मांडलेला मुद्दा महत्त्वाचा.
अगदी ह्याही युगात एखाद्या कवितेने केवळ स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या गुह्य भागांचा उल्लेख होऊ शकतो किंवा त्यांच्यातील शारीर व्यवहाराचे वर्णन होऊ शकते म्हणून जाहीर होण्याचे टाळावे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
नयनीश अगदी दुर्बोध न होता ओपन एंडेड असणे चांगल्या कवितेचे लक्षण असावे. दाद धन्यवाद. जमेल तशा कविता टाकीनच. पल्ली दालचिनी ही सावळ्या तनूला म्हटलेले आहे.
या कवितेच्या निमित्ताने झालेल्या चर्चेत सहभागी होणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.
केदार-
केदार- उतारा सहिये! इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.
पल्ली, हा
पल्ली,
हा माझाच आयडी आहे. डुप्लिकेट वगैरे नाही. सगळे मला बावळट समझतात म्हणुन.
आणि हो.. मला वाटत हा कवि वेगळात चहा पित आहे. जास्त नाही कळत आपल्याला. असो.
माझ्या
माझ्या कडुन चर्चेला पुर्ण विराम. मत मांडुन झाली की ती पुसुन टाकावित कारण मत काल सापेक्ष असतात.
मायबोलीवर तुमचे स्वागत. सुबोध तुझ्या इतर कवितांची वाट पहात आहोत
सुबोध,
सुबोध, तुमच्या पहिल्याच कवितेवर झालेली चर्चा माझ्यासाठी तर फक्त निमीत्तमात्र होती. पण आता ती इथेच होत आहे.त्याबद्दल दिलगीर आहे! तुम्हाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा !
...........................................................................................................
हो हो प्रकाशजी, तुमच्या त्या म्हणण्याचा आदर करूनच ही इतकी चर्चा होत आहे>>>>
स्वातीजी, आनंद आहे! पण चर्चा कोणत्या निकषांपर्यंत आलीये नक्की हे अजुनही नक्की कळाले नाहीये !
लेखकाचे/कविचे लेखनस्वातंत्र्य जिंदाबाद! हाच निकष आहे का ?(चुकीचा असल्यास मला दुरुस्त करा!)
तसेच दाद यांचे हे म्हणने,
ही कविता अस्थानी आहे का? ह्याला माझं उत्तर - नाही. मला तसं वाटत नाही. कदाचित वक्षस्थळांचा मायबोलीवर इतरत्र झालेला उल्लेख मला खटकेल... आणि त्याची कारणं तेव्हा वेगळी असतील.>>>
मला हे निटसे समजले नाहीये ! दाद हे समजावून सांगाल अशी अपेक्षा करतो.
शरद पाटील यांनी लिहीलेल्या पत्र या कथेतल्या पात्राच्या तोंडचा, " भडव्या" हा शब्द इथे बर्याचजणांना खटकला होता.
त्यांना तो बदलायला लावला गेला. आणि त्यांनीही तो मायबोलीवरच्या सुजाण वाचकांच्या आग्रहाखातर बदलला होता.तिथे लेखकाचे लेखनस्वातंत्र्य महत्वाचे नव्हते का ?
पु. लं च्या ती फुलराणी नाटकात ,नायीकेच्या तोंडी "रांडीच्या" ही शीवी आहे! तीही खटकते काय लोकांना ?
हे लेखकसापेक्ष असते का ?
"पुलंनीच ते लिहू जाणे" असे आहे का ?
केदार जोशी, शाब्बास ! तो उतारा इथे दिल्याबद्दल !
त्या दोन ओळींमधला बिभत्सपणा इथल्या वाचकांना खटकला कि नाही ?
कि फक्त प्रोंची कविता बिभत्स वाटली होती ?
तीच्यात तर कोणत्या अवयवांचा उल्लेखही नव्हता!
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि
फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी
हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती
सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी
सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय
तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी
तुकाराम महाराजांच्या या अभंगासारखे साहित्य इथे मायबोलीवर चालेल का ?
कि त्याकाळी तुकारामांना जसा विरोध झाला होता, तसाच आज मायबोलीवरही होईल ?
अजुन देण्यासारखी बरीच उदाहरणे आहेत.
.............................................................................................
अश्लिल, बिभत्स, बंडखोर विषयांवर पण वास्तव साहित्ये आजवर अनेक लेखकांनी लिहीली आहेतच.
त्यापेक्षाही पुढे जावून मी तर म्हणेन कि, बाजारात एकाच कट्टयावर आरतीसंग्रह आणि आणि बिभत्स
पुस्तकेही विकली जातात. माझ्या मते या भिषण वास्तविकतेशी अनभिज्ञ इथे कुणीही नसावे !
मायबोली हाही तसाच बाजार आहे का ?? (खूप प्रामाणिक प्रश्न आहे हा!)
मला एक कळते कि आपल्या घरांत, देवघरांतली गोष्ट देवघरांत ठेवावी, संडासमधली संडासात आणि बेडरुममधली बेडरुम मधे ! यातले काहीही इकडचे तिकडे करू नये..नाहीतर अनर्थ होईल
यात डबल स्टँडर्ड असे मला तर काहीही वाटत नाही. अक्ख्या जगातल्या कुठल्याही घरात असेच चित्र असते!
शेवटी हा प्रश्न अजुनही आहेच कि,
इथे लेखकाच्या/कविच्या लेखनस्वातंत्र्याला काही मर्यादा असावी कि, असु नये ?
जर सेन्सॉरशीपच नसेल आणि उद्या अजुन कुणाला बिभत्स कवितेचा अर्जंट कॉल आला आणि त्याने ती इथे केली.तर इथल्या पांढरपेश्या वाचकांचे डिफेन्स मेकॅनिझम(सुरक्षा तंत्र) काय असावे ?
प्रकाशजी,
प्रकाशजी, माझ्या समजुतीनुसार तुमच्या प्रश्नांची उत्तरं :
पण चर्चा कोणत्या निकषांपर्यंत आलीये नक्की हे अजुनही नक्की कळाले नाहीये !
चर्चा नेमकी ज्या कारणासाठी सुरू झाली होती (लिखाण अश्लील वाटलं म्हणून त्यात मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष व्हावं का / त्यावर बंदी आणावी का) त्याच निष्कर्षाला आली आहे असं मला वाटतं.
म्हणजे :
१. श्लीलाश्लीलतेच्या मर्यादा सर्वानुमते ठरवणं अवघडच नाही, तर अशक्य आहे. याच कवितेच्या उदाहरणावरून तुमच्या ते लक्षात येईल.
२. जर आशय विचार करण्याजोगा असेल आणि तो परिणामकारकपणे मांडण्यासाठी तथाकथित 'अश्लील' संदर्भांची गरज असेल तर ते जरूर दिले जावेत.
३. दुसरा मुद्दाच थोडा पुढे नेऊन - लिखाण चांगलं आहे की वाईट हे त्यात मांडलेले विचार/आशय आणि ते मांडण्यातली सुसूत्रता आणि नेमकेपणा यावरूनच ठरावं. ('सभ्य' शब्द वापरलेलं सगळंच लिखाण दर्जेदार असत नाही आणि केवळ 'अश्लील' शब्द वापरल्यामुळे लिखाण वाईट ठरू शकत नाही.)
लेखकाचे/कविचे लेखनस्वातंत्र्य जिंदाबाद! हाच निकष आहे का ?(चुकीचा असल्यास मला दुरुस्त करा!)
हो. आणि त्याचबरोबर त्यावर मत देण्याचे वाचकाचंही स्वातंत्र्य. या दोहोंपैकी कोणीच कोणाला मत मांडायची बंदी करू नये. (Voltaireचं "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it." हे सुभाषित ऐकलं असालच.)
शरद पाटील यांनी लिहीलेल्या पत्र या कथेतल्या पात्राच्या तोंडचा, " भडव्या" हा शब्द इथे बर्याचजणांना खटकला होता.
त्यांना तो बदलायला लावला गेला. आणि त्यांनीही तो मायबोलीवरच्या सुजाण वाचकांच्या आग्रहाखातर बदलला होता.तिथे लेखकाचे लेखनस्वातंत्र्य महत्वाचे नव्हते का ?
नक्कीच होते. हे आशयाऐवजी 'अश्लीलतेच्या कारणावरून' घडलं असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. आणि तसं करायला लावणार्या वाचकांना सुजाण म्हणावं का असा मला नवीनच प्रश्न पडला आहे.
पु. लं च्या ती फुलराणी नाटकात ,नायीकेच्या तोंडी "रांडीच्या" ही शीवी आहे! तीही खटकते काय लोकांना ?
नाही खटकत. नायिकेच्या पात्राने तसे शब्द वापरले नाहीत (आशयाशी बेईमानी केली) तर उलट ते असभ्य ठरेल.
हे लेखकसापेक्ष असते का ?
"पुलंनीच ते लिहू जाणे" असे आहे का ?
तसं असतं तर इथे नवीन कवीच्या कवितेसाठी इतकी चर्चा झाली नसती.
केदार जोशी, शाब्बास ! तो उतारा इथे दिल्याबद्दल !
त्या दोन ओळींमधला बिभत्सपणा इथल्या वाचकांना खटकला कि नाही ?
मला नाही खटकला. वरच्याच कारणासाठी. आणि खटकला तरी पेंडश्यांच्या या लिखाणावर बंदी आणावी असं मी म्हणणार नाही.
कि फक्त प्रोंची कविता बिभत्स वाटली होती ?
तीच्यात तर कोणत्या अवयवांचा उल्लेखही नव्हता!
पुन्हा : बीभत्स वाटली तरी त्यासाठी तिच्यावर बंदी आणावी असं मी म्हणणार नाही.
फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि
फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी
हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोळितां लागे माती
सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी
सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोळिसी काय
तुका म्हणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी
तुकाराम महाराजांच्या या अभंगासारखे साहित्य इथे मायबोलीवर चालेल का ?
का नाही?
कि त्याकाळी तुकारामांना जसा विरोध झाला होता, तसाच आज मायबोलीवरही होईल ?
विरोध होईल, पण बंदी यावी का हा प्रश्न आहे. या अभंगासकट तुकोबाची गाथा तरली (लिखाण टिकलं) यावरून बरंच शिकण्यासारखं आहे.
अश्लिल, बिभत्स, बंडखोर विषयांवर पण वास्तव साहित्ये आजवर अनेक लेखकांनी लिहीली आहेतच.
त्यापेक्षाही पुढे जावून मी तर म्हणेन कि, बाजारात एकाच कट्टयावर आरतीसंग्रह आणि आणि बिभत्स
पुस्तकेही विकली जातात. मायबोली हाही तसाच बाजार आहे का ?? (खूप प्रमाणिक प्रश्न आहे हा!)
मायबोलीच का, हे जीवनाचंच सत्य आहे. बीभत्स पुस्तकं विकणार्या स्टॉलवरून तुम्ही आरतीसंग्रह घ्याल की नाही?
शेवटी हा प्रश्न अजुनही आहेच कि,
इथे लेखकाच्या/कविच्या लेखनस्वातंत्र्याला काही मर्यादा असावी कि, असु नये ?
ही मर्यादा कशी ठरवावी हे तुम्ही स्पष्ट केलंत तर त्यावर विचार करता येईल.
जर सेन्सॉरशीपच नसेल आणि उद्या अजुन कुणाला बिभत्स कवितेचा अर्जंट कॉल आला आणि त्याने ती इथे केली.तर इथल्या पांढरपेश्या वाचकांचे डिफेन्स मेकॅनिझम(सुरक्षा तंत्र) काय असावे ?
माझ्या मते दुर्लक्ष हा एक उपाय असू शकतो. या किंवा चौधरींच्या कवितेला एकही अभिप्राय न आल्यामुळे ती ४-५ पानं मागे गेली असती, आणि कवी समजायचं ते समजून गेला असता.
सहज आठवले
सहज आठवले म्हणून लिहिते,वादाचा हेतू नाहीये, भडव्या शब्दाविषयी झालेला प्रकार त्यावेळी मी वाचला होता. मायबोलीवर हरामखोर, साला, च्यायला ही मी वाचलेत शब्द कुठल्या ना कुठल्या गोष्टी/पोस्टी संदर्भात(नक्की आठवत नाही गोष्ट का पोस्टी) पण तेव्हा असा गोंधळ न्हवता झालेला? का बरे?
का भडव्या पेक्षा हराम्खोर कमी वाईट आहेत का?
मग फक्त कुठले शब्द वापरावे व वापरू नये कविता,कथा,लेख लिहिताना असे काही नियम आहेत का इथे?
का ते शब्द कोणी वापरले व कोणत्या संदर्भात ह्यावरून ठरवले जाते का वापरावे की नाही?
हे इथे लिहायचे कारण मला तो भडव्या शब्दावरून लोकांनी इतका गोंधळ का घालावा कळला नाही. तो एका गोष्टीत आलेला उल्लेख होत. लोक तर अशी react करत होते की बाई बाई काय हे आम्हाला एकायला वाचायला लागतय.. आम्ही नाही बाई असे शब्द एकत. आमचे कान खराब होतात.....
जे वाटले ते लिहिले, पुन्हा वादाचा हेतू नाहीये पण मला तर अजूनही double standard पण दिसतो बर्याच गोष्टीतून. असो
>>> मला एक
>>> मला एक कळते कि आपल्या घरांत, देवघरांतली गोष्ट देवघरांत ठेवावी, संडासमधली संडासात आणि बेडरुममधली बेडरुम मधे ! यातले काहीही इकडचे तिकडे करू नये..नाहीतर अनर्थ होईल
यात डबल स्टँडर्ड असे मला तर काहीही वाटत नाही. अक्ख्या जगातल्या कुठल्याही घरात असेच चित्र असते!
मग मला वैभवच्या पहाट रंगली तशी या गीतावर तुम्ही 'सुंदर' असा अभिप्राय का दिला आहे ते ही समजावून सांगा. पहाटेची मिठी घरातल्या कुठल्या खोलीत रंगणं योग्य वाटतं तुम्हाला? या गीतावरही मायबोलीने बंदी आणावी का? 'मिठी'चा उल्लेख अश्लील नाही का हो?
नाही !
नाही ! मिठीचा उल्लेख तुम्ही तुमच्या पहिल्या पोस्टमधे उदाहरणांत दिलेल्या कवितांइतका अश्लिल नाहिये ! त्या सुंदर कवितेच्या मी काढलेल्या अर्थांमधे मला काहीही आक्षेपाहार्य वाटले नाही. पण हे माझे वैयक्तिक मत आहे.
तीच कविता काय मला प्राजुची ही कविताही आवडली होती!
http://www.maayboli.com/node/6534
ही उमेशची कविताही आवडलीच !
http://www.maayboli.com/node/6723
यात शृंगार रस भरलेला असला तरी या कविता कुठेही मी अपेक्षा ठेवत असलेल्या मर्यादा उल्लंघन करत नाहीत. हे सापेक्ष आहे का तर ? हो आहेच. कुणाला या कविताही अश्लिल वाटू शकतात!
हे बघा स्वातीजी. मला स्वतःला काय पटते आणि तुम्हाला काय पटते या गोष्टी वेगळ्या असु शकतात.
पण अशा काही गोष्टी असु शकतात कि, त्या दोघांनाही बिलकूल नाही पटणार.सिमारेषा खुप पुसट असली तरीही.........ती सिमा आहे. कुठल्या तरी एका ठीकाणी या श्लील आणि अश्लिल गोष्टी अगदी ठळकपणे वेगळ्या होतात. प्रत्येकाच्या परिमाणा प्रमाणे यात तफावत असेल भले !
मला अजुन नेमके खरेच एक्स्प्लेन करता येत नाहीये(माय फॉल्ट! ) पण तरीही इथे लिहीणार्या लेखकावर काहीतरी मर्यादा असावी अन्यथा वातावरण उगाचाच दुषीत होते असे मला वाटते.
बाकी तुमची इतर उत्तरे मला पटली.
ज्यांना
ज्यांना रुची असेल त्यांच्यासाठी.
सहित्यातील अश्लीलता: ख-या समस्येचा एक मुखवटा- प्रा हातकणंगलेकर.
पुस्तकाचे नाव:साहित्यातील अधोरेखिते (श्रीविद्या प्रकाशन)
>>> यात
>>> यात शृंगार रस भरलेला असला तरी या कविता कुठेही मी अपेक्षा ठेवत असलेल्या मर्यादा उल्लंघन करत नाहीत. हे सापेक्ष आहे का तर ? हो आहेच. कुणाला या कविताही अश्लिल वाटू शकतात!
इथेच येऊन थांबली होती चर्चा प्रकाशजी. हीच मर्यादा ठरवणं अशक्य आहे.
मायबोलीचं वातावरण दूषित होऊ नये याबद्दलची तुमची कळकळ समजते मला. आणि केवळ खिल्ली, उखाळ्यापाखाळ्या वा अपमानास्पद लिखाणा/प्रतिसादांपेक्षा अशा कळकळीच्या चर्चांतूनच यावर सापडला तर काही उपाय सापडेल. बाकी no hard feelings.
बाकी no hard
बाकी no hard feelings. >> छे छे..hard feelings काय त्यात ?
माझी ती स्मायली माझ्या स्वतःच्या दुर्बळतेबद्दल आहे.
अशा चर्चामधुनच काहीतरी मार्ग सापडेल असे मलाही वाटतेय.
थोडं
थोडं मुळातूनच बघूया..
एखादे लिखाण एखाद्या ठिकाणी नको असे वाटण्याची काय काय कारणे असू शकतात?
आता कुणाला कुठलं कारण महत्वाचं वाटेल आणि कुणाला कुठलं हा मुद्दा व्यक्तिनिशी बदलत जातो. मग कुणाचं खरं?
जर मायबोलीवर दर्जाचा आग्रह धरायचा नाहीये तर मग श्लीलतेचा आग्रह धरणं हेही अयोग्यच..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नीधप, nail on the
नीधप, nail on the head.
बाकी ही चर्चा योग्य जागी हलवण्याची विनंती अॅडमिन टीमला केली आहे.
रैना, ते पुस्तक मिळवेन आता. धन्यवाद.
ह्य कवितेत
ह्य कवितेत मला खटकलेली गोष्ट म्हणजे स्त्रिदेह, प्रणय ह्या दोघांकडे बघण्याची कविची द्रुष्टी. स्त्रि ही भोग्य वस्तू आहे आणी तिचा कसा भोग हवा आहे हे आणि हेच केवळ कविता सांगते. ह्या व्रूत्तीवर कुणालाही भाष्य करावेसे वाटले नाही? का ?
जेंव्हा प्रणायासरखा अनुभव एकांगी रंगवला जातॉ. मी कसा केला, मला कसा हवा वा कसा असला तर मजा येइल तेंव्हा त्याला वासनेचे रुप येते असे मला वाटते... ह्य कवितेत ही एकांगी वासना दिसली नाही कोणाला?
प्रणयाचा कविला आलेला उत्कट अनुभव असे स्वरूप आहे ह्या कवितेचे? मग अस उत्कट अनुभ जो बलात्कार करतो त्यालही येतो! त्याचा अनुभव शब्दबद्धकेल्यावर केवळ उत्कट आहे म्हणुन त्याला कला मानायचे?
अश्लीलता कुठेही बघता येते हे मान्य! पण वासनेचे असे एकांगी प्रदर्शन अश्लील समजायला नको?
जया, ती जी
जया,
ती जी काय वस्तू आहे ती कविता म्हणून बकवास आहे पण अश्लीलतेच्या मुद्द्यावर तिला विरोध नको हे म्हणणं आहे
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
दिसली,
दिसली, भासली पेशवे. पण अर्धेअधिक (खरंतर जवळजवळ ९०%) साहित्य तर स्त्री ही भोग्यवस्तू आहे ह्यावरच खल्लास होते.
वावगे वाटतेच, पण तोच एक मुद्दा घेउन चालले तर फारच फेमिनीस्ट दृष्टीकोण होतो आणि पुढे वाचवतच नाही. त्या काळाची ती मर्यादा होती असं समजून सोडून द्यावं लागतं.
उदा- तुंबाडचे खोत. यातली गोदा/श्रीमती सोडल्या तर कणा असलेली स्त्रीपात्र कमीच. म्हणून पेंडश्याचा दृष्टीकोन असाच आहे असं धरून टिका सुरु केली की त्याचा आत्माच हरवतो.
आणि नुसत्या फेमिनीस्ट लिखाणाच्या सुद्धा त्याच मर्यादा आहेत. त्या दळणाचाच कंटाळ येतो कधीकधी.
ह्याबाबतीत खरंच फार गोंधळ होतो. कोणी यावर प्रकाश टाकु शकेल का ?
साहित्य तर
साहित्य तर स्त्री ही भोग्यवस्तू आहे ह्यावरच खल्लास होते.<<
या मुद्द्यावर बाद करायचे तर ते एक 'सखी' म्हणून गाजलेले गुर्हाळ आहे ना ते पहिलं बाद करावं लागेल.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
पेशवा,
पेशवा, रैना मला ही कविता अजिबात तशी भासत नाही आहे.
चांगल्या चर्चेबद्दल आभार. नीधप तुमचा मुद्दा अगदी बरोबर.
असं मला या
असं मला या कवितेबाबत अजिबातच वाटलं नाही पेशवे. मुळात इतका कुठला stand घेणारी कविताच नाही ही.
कालपासून
कालपासून हा बाफ वाचतेय, स्वातीची मते मोस्टली पटली. मला कवितेतले फारसे कळत नाही म्हणून असेल बहूदा, पण खरच एवढी प्रव्हॉकेटीव नाही वाटली.
नीधपा,
नीधपा, चौथा मुद्दा लिहीलाच नाहीत! "उथळ नि पांचट" का? लिहून टाका.
असलेच काहीतरी वादविवाद एम एफ हुसेनच्या चित्रांच्या संदर्भात झाले होते मागे. त्या चित्रांची लिंक पण इथे दिली होती. काही जणांना ते अश्लील वाटले होते, काही जणांना ते चित्रकलेच्या दृष्टीने श्रेष्ठ वाटले होते. काही जणांना त्यात हिंदू देवतांचा अपमान केला असे वाटले होते, कुणि सांगितले की पूर्वी भारतात जे नवरस होते, त्यातल्या "बीभत्स" या रसाचा तो अविष्कार आहे.
संस्कृत साहित्यात तर याहून स्पष्ट शब्दात वर्णने आहेत, त्यांचा निर्देश शृंगारिक म्हणून केला जातो. गीतगोविंद नावाचे काव्य प्रसिद्धच आहे. भर्तृहरीचे शृंगारशतक आहे. आणि माहित नसेल तर वेदांत सुद्धा! हो. पुस्तकच आहे - वेदांतील शृंगारस्थळे!! (पन्नास वर्षांपूर्वी नागपूर विद्यापीठाच्या वाचनालयात होते!)
एकंदरीतच समाजात सभ्यपणे बोलणारे वागणारे लोक नि असभ्यपणे वागणारे लोक ओळखता येतात, त्यांच्या वर्तनावरून नि भाषेवरून. आपण कसे वागावे ते आपणच ठरवावे. मला तरी भेसूरपणा, वास्तववाद या नावाखाली लेखनात ओंगळ भाषा वापरलेली आवडत नाही. कदाचित् काही लोकांना चांगली भाषा माहितच नसेल!
आजकाल अमेरिकेत कित्येक टी व्ही सिरियल्स, सिनेमे यातून "Toilet humor" (भारतात नि इंग्लंडमधे त्याला humour म्हणतात.) नावाचा प्रकार बोकाळला आहे! तसे पण आता वाचावे लागणार का इथे?
मायबोलीवर
मायबोलीवरची एखादी साहित्यकृती रुचली नाही, रटाळ, बिनडोक, दर्जाहीन, बिभत्स किंवा अश्लील वाटली तर सोडून देऊन पुढे जाताच येत नाही का? त्यावर पानं भरभरून चर्चा करण्याने काय साध्य होणार आहे? उपरोधाने नाही तर प्रामाणिकपणे विचारतेय.
Pages