दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मला अनुपम खेर चा आचरट भरपूर ट्रेलर जाहिरात होत असलेला पिक्चर आठवला.त्यात गाणं होतं डॉक्टर डॉक्टर, दिल का डॉक्टर

सॉरी तुम्हाला खंग्री नको होते ना आज.... पण ए_श्रद्धा चे सोडवताना हे सापडले.
कॄष्णधवल जमाना. स्त्रीपात्र मुख्य नायिका नाही... इथे आणि अन्य चित्रपटात देखील. बहीण सहनायिका नृत्यदृष्य क्वचित खलनायिका अशा कारकीर्दीची.

मला अनुपम खेर चा आचरट >>>> नहीं हम अरसों पहले की बात कर रहा हूं. रंग न्हायती.

दि अ प्री प म्हणताय? गाणं आहे का त्यांचं? असेल तर वॅलीड पण माझे ते नाही
अ रूणा इराणी नाही

नाही

जुने क्ल्यू
कॄष्णधवल जमाना.
२ स्त्रीपात्र मुख्य नायिका नाही... इथे आणि अन्य चित्रपटात देखील.
३ बहीण सहनायिका नृत्यदृष्य क्वचित खलनायिका अशा कारकीर्दीची.
४ अ रूणा इराणी नाही शशिकला?? नाही

नवे क्ल्यू
५ स्त्रीपात्राच्या मूळ नावाचा अर्थ देव जिच्या पाठीशी / सोबत आहे अशी स्त्री. सिनेमासृष्टीतील नाव वेगळे.
६ नायक अनेक सुरेख गाणी पडद्यावर फुकट घालवणारा पण निर्मात्यांना न डुबवणारा

राजेंद्रकुमार?? >>> बरोबर

भारत भीषण...
भगवान. बिचारी गीता बाली.
दिल एक मंदिर >>> काहीच नाही

जुने क्ल्यू
१ कॄष्णधवल जमाना.
२ स्त्रीपात्र मुख्य नायिका नाही... इथे आणि अन्य चित्रपटात देखील.
३ बहीण सहनायिका नृत्यदृष्य क्वचित खलनायिका अशा कारकीर्दीची.
४ अ रूणा इराणी नाही शशिकला?? नाही
५ स्त्रीपात्राच्या मूळ नावाचा अर्थ देव जिच्या पाठीशी / सोबत आहे अशी स्त्री. सिनेमासृष्टीतील नाव वेगळे.
६ नायक अनेक सुरेख गाणी पडद्यावर फुकट घालवणारा पण निर्मात्यांना न डुबवणारा

नवे क्ल्यू
७ तुम्ही जे अंदाज बांधलेत कृ/ध सिनेमांचे त्यातील नायिकाच इथे आहे पण स्त्रीपात्र ती नव्हे
८ गायिका मनाने चांगली; संगीतकार सत्त्वांश वेगळा काढण्यात माहिर
९. स्त्रीपात्र कलाकाराचे नामकरण या सिनेमाच्या नायिकेनेच केलेय.

काय हे....सगळी काळी पिवळी लाल जांभळी माकडं बोकडं सापडतात. मला वाटलं मी पण सुटेन २ मिनीटात....
मानव, लंपन, श्रद्धा, स्वरूप ....बाकी जुनेवाले --- कोणी आहे का?

Biggrin अग व्हिज्युअल मेमरी आहे मला थोडीफार. पण अशी व्हर्बल अजिबात नाही. तुला सोडवायचं म्हणून राजेंद्रकुमारची विकी पाहिली - ३ सिनेमे आहेत डॉक्टरचे - पतंग, दिल एक मंदिर आणि अमन!!

शोधतो वेळ लागेल, लंच टाइम नंतर.
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर >>>> ओके,
राजेंद्रकुमार?? >>> बरोबर --- इतके क्लिअर झालेय. बाकी क्ल्यू दिलेत.

@ अनु तोपर्यंत दुसरे घेऊन पुढे जा वाटल्यास. ते प्रयत्न करणार तर मी उत्तर फोडत नाही. पण तुमचे सुरू राहील.

पतंग, दिल एक मंदिर आणि अमन >>>> और भी हय....इथे पण डॉ नर्स सन्दर्भच आहे.

१० पतंग ? --- माझा वाला सिनेमा हा नाही पण हा सुद्धा क्ल्यू होऊ शकतोय.

अब तो आंख लड चुकी है.. मूवी चिराग कहा रोशनी कहा..
नवीन Submitted by श्रवु् >>>>>> Happy बरोबर....
उठा उठा सीमंतिनी ... नव्या कोड्याची वेळ झाली

Pages