अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

This serial is fairy tale for adults. Everything happens fast fast. Babdya rich Avatar is pathetic. Shubhra is meaning less. But best employee in office. With promotion waiting . Mhatara boss ms.na. ba madhla aahe.

Nobody transfers property in this manner. At least ek house ek car credit card debit card tar sign off nahi karat. They could have easily gone to a hotel for the night and thought things through. Pan mag romance kasa honar. Raje should have enough friends business colleagues who can help him out. Botox queen just puts together kande batate Tomato but boss says rassa chhan jhala aahe Wink

आणि Shubhra अभिज किचन मध्ये जाऊन अत्यंत innovative सोल्युशन्स देत होती आपण आणखी एकदा भाजी संपली आहे का बघू आठवड्यात नि संपली की आणू वगैरे...
आणि हिला ऑफीसचं काम नाही वाटत आता...

हो ना काय ते शुभ्रा काय ते अगदी भारी जगावेगळे सल्ले दिल्यागत चाललं होतं आणि ती येडी मॅडी वॉव वॉव करत बसली.
राजे तर कॉलेजकुमाराला शोभावं असं वागत आहेत. त्यांच्याही अभिनयाची मर्याद संपली आहे. फक्त डोळे बारीक करतात किंवा बंद करतात आणि वाकडं तोंड आवडत नाहीये अशा अर्थाचं. आसा तर कहरच आहे. नुसतं आता बोलेल मग बोलेल असं तोंड हलवायचं, रागाने बघायचं पुढच्या क्षणाला पुन्हा बावळटासारखा चेहरा करुन उभं राहायचं!

बॉयबाळ इज ब्याक Lol

सिरियल बागबानच्या वाटेने चाल्लेय की स्वर्गच्या काही कळेना.
राजेनी प्रॉपर्टी नावावर केली बबडेयाच्या. पण खिशातले पैसेपण देऊन टाकले का? करोडपतीच्या खिशात पाण्याची बाटली घ्यायला पैसे नाहीत, हे काही झेपलं नाही ब्वा. आणि बबड्याकडे राजेंचं घर पण आलं ना, मग चम्या जुन्याच घराचं रिनोवेशन कशाला करत बसला?

सगळं का बरं दिलं ..... >>बबड्याने स्वत:ला जाळून घ्यायची धमकी दिली म्हणून.
पण खिशातले पैसेपण देऊन टाकले का>>> बबड्याच्या नावावर सगळं झाल्यावर आसावरीला एकदम मोकळं, हलकं, मस्त वाटायला लागतं. मग ती रिक्क्षा/टॅक्सी करून कुठेपण फिरूया म्हणते. फिरल्यावर भेळ खाते मग तिखट लागल्यावर बाटलीतले पाणी घेईपर्यंत पैसे संपून जातात. तिथेपण ती ‘अगंबाई! तुमच्याकडचे पैसे संपले का? मला कळलंच नाही’ म्हणत बावळट असल्याचा पुरावा देते.
मग ते रस्त्यावर राहणाऱ्या माणसाकडे जेवतात. तिथून जाताना एक दुसरा माणूस आसावरीच्या समोर येऊन उभा राहतो. ती घाबरते. मग राजे अमीर खान अवतार धारण करून त्याला मिठी मारून घाबरवतात. ..अगदी स्वस्त दिल चाहता है बघितल्यावर माझी सहनशक्ती संपली आणि मी मालिका बंद केली.

अगदी स्वस्त दिल चाहता है बघितल्यावर माझी सहनशक्ती संपली आणि मी मालिका बंद केली. >>> Lol

बबड्याने स्वत:ला जाळून घ्यायची धमकी दिली म्हणून. >>> ओहह. धन्यवाद सोनाली.

हिंदी सेरिअल्स पासून प्रेरणा घेतलेली दिसते आहे... राजे तर त्यामानाने कमी श्रीमंत आहेत.. हिंदी सेरिअल्स मध्ये तर अब्जाधीश लोकांसोबतही कोणाकडून धोखा झाला, किंवा त्यांनी हा असा त्याग वगैरे केला तर त्यांचे ही डायरेक्ट खाण्यापिण्याचेही वंदे होतात...

बबड्याच्या नावावर सगळं झाल्यावर आसावरीला एकदम मोकळं, हलकं, मस्त वाटायला लागतं. मग ती रिक्क्षा/टॅक्सी करून कुठेपण फिरूया म्हणते.>>>

तिचा पहीला डाव यशस्वी झाला त्याचं सेलिब्रेशन होतं ते. आता दुसरा डाव अभिजीत राजे चा खुन करून नामोनिशान मिटवायचं. आणी नंतर बबड्या कडे राहून राजेच्या पैशावर आयुष्यभर मजा करायची

बबड्याने स्वत:ला जाळून घ्यायची धमकी दिली म्हणून. >>> काहीही हा.

सध्या हे राजे पतिपत्नी विश्वासच्या चाळीत राहतायत. त्याची आई खाष्ट दाखवलीय.

तिचा पहीला डाव यशस्वी झाला त्याचं सेलिब्रेशन होतं ते. आता दुसरा डाव अभिजीत राजे चा खुन करून नामोनिशान मिटवायचं. आणी नंतर बबड्या कडे राहून राजेच्या पैशावर आयुष्यभर मजा करायची >>>>>>> लेडी विक्रान्तच आहे ही आसा.

राजे आणि त्यांच्या राणी (आसा) चाळीत राहायला आलेत. पण इथे सुद्धा त्यांचा मंदपणा चालूच आहे. तिथे एक पीडा आहे त्या विश्वासाची आई, इतकी फालतू ऍक्टिंग करते कि तिच्यापेक्षा बॉय बाळ बर वाटू लागलंय ( डायलॉग कमी आहेत त्याला म्हणून) . हा स्टॉक बहुदा त्या महाराष्ट्राचा सुपरस्टार मधून आलाय.

ती जी बाई आहे ..ती बहुतेक.. होसुमीयाघ मधील jaanhaviच्या भावाची , पिंट्याची बायको आहे तिचं naav विसरले

ती जी बाई आहे ..ती बहुतेक.. होसुमीयाघ मधील jaanhaviच्या भावाची , पिंट्याची बायको आहे तिचं naav विसरले >> सुनीता
राजे कित्ती अनैसर्गिक गोड आहेत ना अगदी आसावरी च्या पावलावर पाऊल टाकलंय त्यांनी !

ती जी बाई आहे ..ती बहुतेक.. होसुमीयाघ मधील jaanhaviच्या भावाची , पिंट्याची बायको आहे तिचं naav विसरले >>>>>>> ती विश्वासची आई? होसुमीयाघ मध्ये लहान होती. इतकी म्हातारी कशी काय झाली?

भातुकली खेळायची ना लहान मुले, कल्पनाशक्तीखैच्या खै असायची, तशा वाटतात या सिरियल, आता मध्येच गरीबी काय, चाळ काय

तीच आहे ना? >> नाही दुसरी आहे.

नवीन Submitted by मी_गार्गी on 26 November, 2020 - 21:57

>>>>>> ती त्या दारू पिणाऱ्या माणसाची बायको दाखवली आहे का ???

भयाण सुरु आहे सगळे >>>

झी मराठीच्या सिरियल्सचा trp खाली जाऊन, मागे त्यांची एकही सिरीयल पहिल्या पाचात नसून असं दाखवायचं डेरिंग करतात, ग्रेट.

आता कलर्स मराठी पण पुढे जाऊदे ह्यांच्या मग कदाचित डोळे उघडतील.

भातुकली खेळायची ना लहान मुले, कल्पनाशक्तीखैच्या खै असायची, तशा वाटतात या सिरियल, आता मध्येच गरीबी काय, चाळ काय >>>>> बबडयाचा डोळा जेव्हा राजेच्या हॉटेलवर होता तेव्हाच वाटल होत की एक न एक दिवस राजे नक्कीच रस्त्यावर येतील बबडयाला ओव्हरप्रोटेक्ट करुन. 'आखिर यह कभी न कभी होना ही था.'

त्या Shubhra च्या पर्समध्ये एक दोन गोष्टी तरी का ठेवत नाहीत काय माहिती... सतत ती चपटी पर्स घेऊन फिरत असते... काही नाही तर दोन चार पेपरचे बोळे तरी भरायचे म्हणजे थोडी खरी तरी वाटेल...

<<<बबड्याने स्वत:ला जाळून घ्यायची धमकी दिली>>>
आणि हा गोल्डन चान्स सोडून दिला अ. रा. नी ???????????
अरेरे. ..
आपल्या या वागण्याचा प्रेक्षकांना किती मनस्ताप होईल हा विचार करायला हवा होता त्यांनी..

सोहमला स्वतःचं सर्व देताना राजेंनी स्वतःचे कपडे पण देऊन टाकले का? सध्या नवीन कपडे दिसतात त्यांचे आणि आसावरीचेही...

Pages