Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या राजेनाही कणा म्हणून नाही
त्या राजेनाही कणा म्हणून नाही.....>> म्हणुन तर टारलं सफेद होईस्तोवर लग्नाला मुलगी मिळाली नव्हती त्यांना...
झी मराठी खाली आलं हे खरं आहे
झी मराठी खाली आलं हे खरं असावं कारण म टा मधे दरवर्षी नवरात्र रंग प्रेझेंट करायला झी मराठीवरच्या तारका असायच्या, यंदा प्रवाह वरच्या आहेत.
मी तर गेले६६ महिने मटा घेतलाच
मी तर गेले ६ महिने मटा घेतलाच नाही... कोणताच पेपर घेत नाही हल्ली.
आमच्याकडे पण बंद होता, या
आमच्याकडे पण बंद होता, या महीन्यात अचानक पेपरवाल्याने टाकला न मागता. नवरा म्हणाला राहूदे. सॅनिटायझर फवारुन उचलतो. फर्निचर स्प्रे आणून ठेवलाय घरात, तोच फवारतो.
Top 5 marathi channels in
Top 5 marathi channels in week 41 (Mah/Goa)
1. STAR Pravah - 308236
2. Zee Marathi - 256462
3. Colors Marathi - 129599
4. Zee Talkies - 103946
5. Fakt Marathi - 63291
Top 5 marathi shows in week 41 (Mah/Goa)
1. STAR PRAVAH PHULALA SUGANDH MATICHA - 4435
2. STAR PRAVAH RANG MAZA VEGLA - 4253
3.STAR PRAVAH SUKH MHANJE NAKKI KAY ASTA - 3968
4. STAR PRAVAH MULGI ZALI HO - 3637
5. STAR PRAVAH SAHKUTUMB SAHPARIVAR - 3586
या वीकचा टीआरपी.कलर्स खूपच खाली गेल आहे.
पण प्रवाहच्या या मालिकांमध्ये आई कुठे काय करते नाही याच कारण म्हणे त्या दिवशीच्या ओरिजनल आणि रिपिट टाईमचा अँव्हरेज घेतात त्यात ही म्हणे मागे पडते.
मला काही पटत नाही.
पण झीम पण एवढी माती खात आहे,विश्वास नाही बसत.
कलर्स मराठीच खूप वाईट वाटत आहे,ती शुभमंगल काहीतरी कमाल करेल अस वाटल होत,पण ती ही काही खास नाही.
आता बघू भरत आणि सुभाच्या मालिका कमाल करतात का?
मला आवडल्या शुभमंगल आणि
मला आवडल्या शुभमंगल आणि सुंदरा मना मधे भरली मालिका , प्रवाहच्या मालिकांपेक्षा. प्रवाहच्या त्याच त्याच स्टार प्ल्स टाईप सिरियल्स आहेत.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/CGwUowEDApW/?igshid=7rqa78q9g99j
सुभाच्या नवीन सिरियलचा दुसरा प्रोमो.कशाची आठवण झाली?.सांगा बघू.
मी tv वर पहिला नवीन/दुसरा
मी tv वर पहिला नवीन/दुसरा प्रोमो..
@UP~~ कुसुम मनोहर लेले ची आठवण झाली का तुम्हाला?
अगदी अगदी... कुसुम मनोहर लेले
अगदी अगदी... कुसुम मनोहर लेले
कुसुम मनोहर लेले ची आठवण झाली
कुसुम मनोहर लेले ची आठवण झाली का तुम्हाला?
अगदी.सेम कुमले
हो. कुसुम मनोहर लेले. मी फेवु
हो. कुसुम मनोहर लेले. मी फेवु बर पण कमेंट केली प्रोमोवर
वाटत तर कुमले फक्त एक फरक आहे
वाटत तर कुमले फक्त एक फरक आहे की कुमले सायकोलॉजिकल थ्रिलर नाही,यात सुभा वाटत आहे.कुसुममध्ये सगळ प्रिप्लँन होत.पण अगदी तसच नेतील अस वाटत नाही
ओक आणि मोनेंचा व्हिलन अजून लक्षात आहे.
मला गिरिश ओक चा भाच्या खोटे मोनेंपेक्षा जास्त भावला होता.
सुभा गरगरीत दिसतोय. बारीक
सुभा गरगरीत दिसतोय. बारीक हेयरकटमुळे कदाचित.
बाकी बबड्याची दाणादाण ऊडवली शुभ्राने. कधी नव्हे तो आज एपिसोड आवडला. नाहीतर आहे आपलं भिजत घोंगडं रोज रोज. आता आसाने फर्म स्टँड घ्यावा. नाहीतर सिरियलचं नाव 'अग्गंबाई सासूबाई' सोडून 'अग्गंबाई बबड्याची आई' करावं झी ने.सतत बबड्याभोवतीच फिरतंंय कथानक.
अर्चना निपाणकर पण आहे बहुतेक
अर्चना निपाणकर पण आहे बहुतेक सु भा च्या सिरीयलीत. मागे युट्युब का कुठेतरी वाचलं, ती खरी सुमन काळे असणार, सु भाची बायको.
कुसुम मनोहर लेले ची आठवण झाली
कुसुम मनोहर लेले ची आठवण झाली का तुम्हाला? >>>>>>> येस्स. प्रोमो पाहिला आणि देजावू झाल.
म्हणजे पुन्हा एकदा तुपारे?
बादवे, सुखी माणसाचा सदरा कोणी बघतय का? मला पहिला एपिसोड आवडला.
सुंदरा मना मधे भरली मालिका >>>>>> हि सुद्दा माझी फेवरिट
ओक आणि मोनेंचा व्हिलन अजून लक्षात आहे. >>>>>>>> +++++++१११११११११ पाहिलय नाटक झीमवर. सुकन्याचही काम छान झाल होत.
बाकी बबड्याची दाणादाण ऊडवली शुभ्राने. कधी नव्हे तो आज एपिसोड आवडला. >>>>>>>>> अगदी अगदी. फायनली शुभ्रा फॉर्मात आली.
बादवे, सुखी माणसाचा सदरा कोणी
बादवे, सुखी माणसाचा सदरा कोणी बघतय का? मला पहिला एपिसोड आवडला. >>> रिपीट telecast बघितला, पहिला आवडला. भरत जाधव थोडा बोअर झाला मात्र, तोच तोचपणा वाटतोय अभिनयात. श्रुजा जास्त आवडली.
दुसरा मधेच बघितला, गौरी जयदीप सिरीयल एकीकडे बघत होते. तो रो ह आणि नगरसेवक सीन आवडला. बाकी एक बोअर झाला सीन. त्यामुळे हा एपिसोड रिपीट बघेन असं नाही.
सुंदरा मना मधे भरली मालिका
सुंदरा मना मधे भरली मालिका इतर मालिकांपेक्षा छान वाटतेय. जस्ट तिला टीपीकल डायलॉग्स मिळाले की ती फारच टिपिकल टोन मध्ये ते म्हणते अस वाटतं... स्पेशली मनात बोलते ते...
कुमले च्या लेखिका विनिता
कुमले च्या लेखिका विनिता ऐनापुरे इथे निगडीतच राहतात.
नाटकात जो शेवट दाखवला आहे तो सुखांत म्हणता येईल. पण खरे तसे झालेले नाहीये. यू ट्युबवर नाटक आहे त्यात शेवटी सर्व उलगडा केला आहे. रडायला येत खरेतर !
अर्चना निपाणकर पण आहे बहुतेक
अर्चना निपाणकर पण आहे बहुतेक सु भा च्या सिरीयलीत.
ती ही सिरियल नाही.ती शुभमंगल ऑनलाइन जी सुभाचीच निर्मिती आहे.
दे जा वू म्हणजे काय?
दे जा वू म्हणजे काय?
दे जा वू म्हणजे काय? >>>>>>
दे जा वू म्हणजे काय? >>>>>> एखादी अशी घटना जी तुम्ही आता अनुभवताय मात्र तुम्हाला असं वाटतंय की याअगोदर देखील ति अनुभवलीये.
ती ही सिरियल नाही.ती शुभमंगल
ती ही सिरियल नाही.ती शुभमंगल ऑनलाइन जी सुभाचीच निर्मिती आहे. >>> अच्छा हो का, मला वाटलं या सिरीयलमधे. धन्यवाद.
पुन्हा एक फसवा प्रोमो. थाड्
पुन्हा एक फसवा प्रोमो. थाड्-थाड्-थाड. तीन कानाखाली बबड्याच्या. ये सपना है या सच.
तो रो ह आणि नगरसेवक सीन आवडला
तो रो ह आणि नगरसेवक सीन आवडला. >>>>> +++++१११११११
अर्चना निपाणकर पण आहे बहुतेक सु भा च्या सिरीयलीत.
ती ही सिरियल नाही.ती शुभमंगल ऑनलाइन जी सुभाचीच निर्मिती आहे. >>>>>>>> ही 'स्वामिनी' मध्ये सुद्दा आहे ना आनन्दीबाई म्हणून
पुन्हा एक फसवा प्रोमो. थाड्-थाड्-थाड. तीन कानाखाली बबड्याच्या. ये सपना है या सच. >>>>> ऑ?
सु भा म्हणजे काय?
सु भा म्हणजे काय?
सुबोध भावे
सुबोध भावे
देजावू च्या अर्थासाठी आभारी
देजावू च्या अर्थासाठी आभारी आहे. हा खराखरा मराठीतला शब्द आहे का माबोनिर्मित?
दे जा वू फ्रेंच वाक्प्रचार
दे जा वू फ्रेंच वाक्प्रचार आहे बहुतेक. (meaning- already seen)
तसे माबोवर खूप शॉर्टफॉर्म्स वापरले जातात म्हणा. पण हा त्यातला नाही.
देजा - ऑलरेडी
देजा - ऑलरेडी
Voir (French) = to see ; past perfect tense of voir is vu, म्हणून देजा वू चा शब्दशः अर्थ आधीच पाहिलेलं.
असावरीचा पहीला डाव यशस्वी
असावरीचा पहीला डाव यशस्वी झालाय. अभिजीत आचार्या ची प्राॅपर्टी बबड्या च्या नावावर झालीय. आता हा राजे बरोबर फिरवून बोर मारतोय. राजेला ऊडवायचा डाव तिच्या डोक्यात शिजतोय.
Pages