अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy आता शुभ्रालाही अहोजाहो म्हणणार का?
पण कशाला ताणताहेत आता....तुटेपर्यंत? महा बोर आहे ऑलरेडी......

अग्गबाई सासूबाई या सीरियल मध्ये ८ वर्षांचं पोटेन्शियल भरलं आहे.
अग्गबाई सासूबाई २ वर्ष चालली. आता पुढची २ वर्ष अग्गबाई सूनबाई.. त्यानंतर २ वर्ष अग्गबाई आज्जे सासूबाई.. त्यानंतरची २ वर्ष अग्गबाई नात सूनबाई..!! त्यानंतर लीड रोल थरथरायला लागले नाहीतर मग अग्गबाई पंजे सासूबाई आणि त्यानंतर अग्गबाई पणती सूनबाई...!!

अख्खा एपिसोड घरात शिरलेला उंदीर शोधणे,पिंजरा आणून पोळी अडकवणे, भजी करून खाणे,उंदीर खिडकीतून बाहेर गेल्यावर हुश्श म्हणणे... !!!
सिरिअसली...?????

वेळकाढूपणा करता करता वाट्टेल ते दाखवण्याचा अट्टाहास किती तो..>>> जोपर्यंत लोक बघत आहेत तोपर्यंत हे असेच चालू राहणार.

बरं..झी च्या सगळ्या हिरोईनी नेहमी खाण्याच्या व्यवसायातच का असतात...? राधिका, आसावरी.... कुठल्यातरी थातूरमातूर पदार्थावर एकदम 300 कोटींची कंपनी उभी करतात..कैच्याकै....
बंद करा ही सिरियल.....

येस...... Biggrin तेजो आणि स्वस्ति...... आणि त्या तुझं माझं ब्रेकअप मधेही खानावळच होती ना....?
खानविलकर मॅडम कोण? Uhoh

माल'विका ...!! "येऊ कशी..नांदायला" मधली हो...
तिच्या आईने दारोदारी जाऊन पदार्थ विकले आणि तायडीने तो बिझनेस कुठल्या कुठे नेला

सगळीच channels फूड बिझनेसमध्ये अडकली आहेत, दुसरं काही सुचत नाही . स्टार प्रवाहवर पण सुख म्हणजे नक्की काय असते मध्ये मसाले वगैरे बिझनेस आहे.

मसाले बिझनेस नाही त्यांचे दुकान आहे किराणा मालाचे आणि सगळेच मोरे त्या दुकानात पडलेले असतात .>>>>ते सहकुटुंब सहपरिवार

आसावरी बाजारातून आल्यावर हात पाय न धुता लगेच पुदिना चटणी बनवायला घेते, ईईई.
असावारीच्या शेजारच्या काकू प्रवाहवर स्वाभिमान मध्ये पण आहेत, तिथे कोकणी बोलताना दिसतात.

ते सहकुटुंब सहपरिवार >>> श्रवु करेक्ट.

मी सुख म्हणजे काय असतं ह्या सिरीयलबद्द्ल लिहीलं.

हो....ह्या सेरीयल्स मधल्या हिरॉइनी हात पाय न धुताच डायरेक्ट किचन मधे जातात. कालही आई कु का क मधे अनघा काल मारे अभि साठी चहा करायला लगेच आत गेली...... हात पाय न धुताच...कोरोना मधे!! आणि गॅसही न पेटवता तिचा चहा झालाही.!

खूपच पाट्या टाकत आहेत
काल झी च फेमस ऑब्सेशन असलेले प्रेझेन्टेशन हे बबड्या देणार होता। काल पर्वा जॉईन झालेला एम्प्लॉयी त्याची पोस्ट काय, शिक्षण काय नि कोणत्या डिपार्टमेंट मध्ये आहे हे बाजूला राहील यांना नेहमीप्रमाणे प्रेझेंटेशन दाखवायची घाई। आई आणि बायकोला टेन्शन म्हणून डायरेक्ट ऑफिसात

आजचा एपिसोड कोबी के नाम... ओळीने 5 दिवस कोबीचे पदार्थ
कोबीची भाजी
पराठा
धिरडे
भेळ
अन अजून यंव-त्यव.. Uhoh

मध्ये एखादा दिवस वेगळं काही करायचं सुगरण आसावरीला
सुचलं नाही ते नाही, शेफ अभिजात ने तरी सुचवावे ना.. Sad Sad Sad

आसाच्या अती लाडिक बोलण्याचा उबग येऊन मी मालिका बघणं बंद केलं पण मातोश्री टाईमपास म्हणून लावतात. येताजाता जे काय कानावर पडलं ते लेखक सुट्टीवर गेल्यामुळे सर्व कलाकारांना करा काय हवं ते असं सांगितल्याचे परिणाम वाटले.

मी आता ८.०० श्रीमंताघरची सून.. सोनी मराठी.. ८.३० ला फुलाला सुंगंध मातीचा स्टार प्रवाह आणि ९.०० वाजता माझा तू होशील ना झी मराठी ऐकते.. ( पाहत नाही कारण किचन मध्ये फक्त ऐकायला येते.) सगळे एकाच माळेचे मणी म्हणून सगळयांना समान संधी देते..

Pages