Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती आसा तर बत्थ्ह्तड डोक्यात
ती आसा तर बत्थ्ह्तड डोक्यात जाते..... काय ती अॅक्टिंग, काय त्या मुद्रा, काय ते ध्यान.....
कोबीपेक्षा जास्त नाॅशिआ
कोबीपेक्षा जास्त नाॅशिआ आसावरीचा आलाय हे समजतंय का त्यांना?
कोबीपेक्षा जास्त नाॅशिआ
.
अगदी अगदी मेधावी....डोक्यात
अगदी अगदी मेधावी....डोक्यात जाते ती आसावरी...सारखं ते लाडे लाडे बोलणे ..सात्विक संताप होतो चार जरी तिचे dailouge कानावर पडले तर
म्हणून मी सिरीयल बघायचेच
म्हणून मी सिरीयल बघायचेच सोडून दिले.. एक दिवस उंदीर.. एक दिवस कोबी.. आता काय नवीन काय माहित..
सगळे एकाच माळेचे मणी म्हणून
सगळे एकाच माळेचे मणी म्हणून सगळयांना समान संधी देते.. >>>
नवीन एपिसोड पहिला नाही का
नवीन एपिसोड पहिला नाही का कोणी?
आसा हेलिकॉप्टर मधून ऑफिसला येते !
आसा हेलिकॉप्टर मधून ऑफिसला
आसा हेलिकॉप्टर मधून ऑफिसला येते ! >>>>>>>> आसा स्वत: ला विक्रान्त सरन्जामे समजते की काय?
एपिसोड बघितला नाहीये. पण अस ऐकलय की बबडयाच नाव बदललय, सोहम बदलून शुभम ठेवलय. तर हा नवीन बबडया उर्फ शुभम आसासमोर सोज्वळतेचा मुखवटा घालून फिरतोय. बाहेर मात्र तो गुण्डासारखा फिरत असतो. त्याच बाहेर अफेअर असत म्हणे. म्हणजे हा मानबाच्या गुरुची गादी चालवणार आहे.
राजेन्ची बाईकवरुन एण्ट्री होते आणि त्या एण्ट्रीवर मुली फिदा होताना दाखवल्यात एपिसोडमध्ये म्हणे.
पण अस ऐकलय की बबडयाच नाव
पण अस ऐकलय की बबडयाच नाव बदललय, सोहम बदलून शुभम ठेवलय. >>> नाही नाही, ते बबड्या नी शुभ्रा काकूंचे चिरंजीव आहेत.
बबड्या चा घरातला लुक इतका चम्पू की शक्तिमान मधला गंगाधर बरा आणि बाहेरचा लुक जणू सर्कस च्या खेळातून बाहेर पडल्यासारखा... अफेअर तर सोडाच पण कोणी पोराटोरांना गम्मत म्हणून ही दाखवणार नाही असा!!
शुभ्रा तर स्वामिनी मधून टाईम मशिन मध्ये बसून कुलकर्ण्यांकडे आली असावी इतकी अगबाई अगबाई करतेय.
राजे म्हणे आसाच्या कमाईवर गुजराण करताहेत!
आणि आसा फाडफाड इंग्रजी बोलत लोकांना सुनावते आहे!!
डोळ्यांचे पारणे फिटावेत नि कान तृप्त व्हावेत असा एपिसोड!
लोकसत्तेत या नव्या मालिकेची
लोकसत्तेत या नव्या मालिकेची पानभर जाहिरात होती. त्यातला अद्वैत दादरकरचा चेहरा (आणि कपडे ) पाहून, एखाद्याला पाहून उगाचच त्याच्या कानाखाली सणसणीत वाजवावीशी वाटते - हे वाक्य आठवलं.
वरचा प्रतिसाद वाचून कळलं की ती कॅरॅक्टरायझेशन चांगलं जमलंय.
वेगवेगळ्या प्रकारे वांगं
वेगवेगळ्या प्रकारे वांगं आवडायला लावण्याचे प्रयत्न वाटतात. निवेदीताला वेगवेगळे रोल करता यावेत म्हणून सिरीअल काढल्यासारखं वाटतं.
ते मुलगा क्लास ला जात नाही
ते मुलगा क्लास ला जात नाही म्हणून बाप खिशा त पैसे सोडतो मुलाच्या हे बघून लहान मुलगे आता मनी प्लीज कराय ला लागतील. बाकी
हेलि कॉप्टर वगैरे फारच विनोदी. साडी वर काळा कोट!!! पर्स?!!! अभि व सोहम ह्यांना लाल पिवळे गॉगल काब्रे दिले आहेत. त्या अगदी अनुरक्त होणार्या बाय्का पण कैच्याकै आहेत. अभिला रजनिकांत बनवा यचा प्रयत्न केला आहे.
ती जाहिरात काय कशीतरी होती.
हेलि कॉप्टर वगैरे फारच विनोदी
हेलि कॉप्टर वगैरे फारच विनोदी. साडी वर काळा कोट!!! पर्स?!!! अभि व सोहम ह्यांना लाल पिवळे गॉगल काब्रे दिले आहेत. त्या अगदी अनुरक्त होणार्या बाय्का पण कैच्याकै आहेत. अभिला रजनिकांत बनवा यचा प्रयत्न केला आहे.>>

एका प्रोमोत बघितलं , शुभम
एका प्रोमोत बघितलं , शुभम जेवत नाही म्हणून शुभ्रा मागे लागलेली असते . आसावरी तिला सांगते , त्याला नसेल जेवायच तर राहू दे , भूक लागल्यावर जेवेल . आणि मग बबड्याच्या समोरची जेवणाची भरलेली प्लेट उचलते . कित्ती वाईट्ट . मला कोणाच्या समोरची रिकामी प्लेट उचलायची तरी मन होत नाही , मी उचलून हातात द्यायला सांगते किन्व्हा पुढे ढकलायला सांगते.
पहिल्या भागात आसा शुभ्राला म्हणते मी माझ्या मुलाला सुधरवलं आणि तुला ७ वर्शाचा मुलग नाही सांभळता येत .
तु सुधरवायला ३० वर्ष घेतलीस ग बयो !
नाही नाही, ते बबड्या नी
नाही नाही, ते बबड्या नी शुभ्रा काकूंचे चिरंजीव आहेत. >>>>>> हो ते आज कळल मला.
आजचा भाग इन्स्टावर पाहिला. मॅडी स्लिम झालीये. आसाचे लाम्ब केस विग आहेत ते स्पष्ट दिसत.
ती जाहिरात काय कशीतरी होती. >>>>>>> अगदी अगदी. तो फुड कम्पनीचा लोगो आणि शेवटी जाहिरातीत आजोबा येतात ते एम डी एच मसाले वरुन ढापलेल आहे.
बादवे ,आजोबा इतके तरुण कसे काय झाले?
आसा आणि शुभ्राने रोल रिव्हर्स केले आहेत वाटत. पण आसा उगाचच रुड वागते सगळयान्शी.
बबडया सुधारला होता ना, पुन्हा कसा बिघडला?
पहिल्या भागात आसा शुभ्राला म्हणते मी माझ्या मुलाला सुधरवलं आणि तुला ७ वर्शाचा मुलग नाही सांभळता येत .
तु सुधरवायला ३० वर्ष घेतलीस ग बयो ! >>>>>>>> +++++++ हे तिच नेहमीचच. आधी बबडयावरुन तिला झापायची, आता नातवावरुन. एकतर सुनेला घरी बसवून स्वत: मात्र बिझनेसवुमन बनली. अशी सासू सुनेला कशी ' इण्डिपेडण्ट' बनवणार हे देव आणि झीमच जाणे.
Davil wears Prada ची घाणेरडी
Davil wears Prada ची घाणेरडी कॉपी केलेला एक सीन बघितला. झीमधल्या लोकांच्या कल्पना दारिद्र्य ाची कीव वाटली.
ती नवीन आलेली शुभरा अतिशय
ती नवीन आलेली शुभरा अतिशय वेंधळी आणि कणाहीन वाटते.
काल एक टिझर पाहिला त्यात तो युझलेस सोहम तिला सारखा फोन करू नकोस म्हणून ओरडत असतो. आणि ही बया निमूटपणे ऐकून घेते . असला वैताग आला ! म्हटलं बाई, तोंडात जीभ आहे ना , बोल की काहीतरी. मूर्खपणाचा कळस आहे
ही शुभ्रा अतिशय वैताग आहे.
ही शुभ्रा अतिशय वैताग आहे.
तिला तिचा 7 वर्षाचा मुलगा , श्वास रोखू ?म्हणून धमकी देतो आणि गाल फुगवून उभा राहतो ही घाबरून गयावया करायला लागते.
नवरा हीच्याशी फोनवर बोलताना , बाजूला त्याच्या गफ्रेला 'change ' करुन तयार रहा सांगतो तर ही बाई 70 सालातल्या हिरवणीसारखी reaction देते आणि मग संध्याकाळी साडी नेसून जेवणासाठी वाट बघत बसते.
नवरा रात्री उशिरा येउन , मला काम असतात , आज तुझ्यामुळे मला पोलिसांनी पकडलं , मी जेवून आलोय वगैरे वगैरे बरेच काही ऐकवतो , ही रडतं बसते.
नवरा जाउन बिछान्यावर पडतो तर ही त्याचे बूट काढते .
असं मुस्काट फोडावं वाटतं तिचं.
सासू सारखं उठसूठ बोलत असते ,मुलाला शिस्त लावण्यावरून ही हो आई हो आई करून ऐकून घेते.
कित्ती छान!
कित्ती छान!
अशाच मालिका हव्यात.
तिकडे शुभांगी गोखलेबाई संवाद म्हणताहेत, घरात नोकरचाकर असले तरी ही ही कामं सुनेनेच करायची.
शुभ्राची व्यक्तिरेखा काहीतरीच
शुभ्राची व्यक्तिरेखा काहीतरीच दाखवलीय. आधीच्या सीझनमध्ये शुभ्राच तेवढी कणखर वाटत होती. मग ७ वर्षांत तिची आसावरी कशी झाली? तेही आसावरीला बदलवण्यात शुभ्राचाच सहभाग असताना? आसावरी बिझनेसवुमन झाली, तर त्या बदल्यात शुभ्राला सोशिक गृहिणी करून ठेवली. आसावरी मारे म्हणत असते, मी माझ्या मुलाला शिस्त लावली. मग घरात जरा स्वतःची काम स्वतः करायची शिस्त नाही लावता आली? शुभ्रा सगळ्यांना सगळं हातात नेऊन देते. त्याविषयी कोणालाही काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त बबडू तिचं ऐकत नाही, ह्यावरून आसावरी सतत टोमणे मारत राहते. आणि सोहम फ्रॉड आहे, हे अजून हिच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे ती पूर्वीसारखीच मंद वाटतेय. राजे तर सगळं सोडून घरी बसलेत आसावरीच्या मागे मागे करायला.
आधीची शुभ्रा इतकी वेंधळ्यासारखी वागतेय , हे पटतंच नाहीये. त्यामुळे बघवत नाही आता सिरीयल. आधीचाच गोंधळ बरा होता, असं वाटायला लागलंय.
बबडु आता चांगलाच गुन्हेगार
बबडु आता चांगलाच गुन्हेगार झालाय.
तरीच तेप्र सिरियल सोडून गेली.
तरीच तेप्र सिरियल सोडून गेली. गुड डिसीजन. गृहिणी ह्या बावळट असतात असा (गैर) समज का असतो सिरियलवाल्यान्चा तेच कळत नाही.
शुभ्राची व्यक्तिरेखा काहीतरीच
शुभ्राची व्यक्तिरेखा काहीतरीच दाखवलीय. आधीच्या सीझनमध्ये शुभ्राच तेवढी कणखर वाटत होती >> तेच तर . काल book launch च्या कार्यक्रमात पण , खरचं लग्नाला जातात तशी तयार होऊन आली होती. उगाच नाही सोम्या वैतागला. आणि किती बावचळते उगाचच . आजोबांकडे भाषणाचा कागद होता तर बघून बोलायचं , त्या बबडूला कशाला सांगायचं.
सुझान भयाण आहे.
परवा आसावरी सकाळी जी साडी नेसून निघाली होती तिच साडी रात्री जेवताना दिसली. दिवसभरात बदलायला वेळ नाही मिळाला. बरं घारगे करण्यासाठी अर्ध्या रस्त्यातून परत आली तर दुपारीच का नाही केले ??
नव्या सीझनमध्ये दाखवले जाणारे
नव्या सीझनमध्ये दाखवले जाणारे असह्य प्रसंग आणि पात्रं डोक्यात नऊ लागली म्हणून आम्ही पाहणं बंद केलं फायनली. अतिशय फालतूपणा चालू होता.
मालिका भयाण आहे. पहिला सीजन
मालिका भयाण आहे. पहिला सीजन बरा होता असं वाटायला लागलंय आता. नक्की काय दाखवायचंय तेच कळत नाही. एक मात्र नक्की की आसावरी मूर्ख होती आणि आता शतमूर्ख आहे. शुभ्राच्या डोक्यावर बाळंतपणात परिणाम झाला का.
book launch च्या कार्यक्रमात
book launch च्या कार्यक्रमात >>>>>>>>> book launch ? आसा पुस्तक सुद्दा लिहायला लागली?
हो. एक पुस्तक प्रकाशित झालं.
हो. एक पुस्तक प्रकाशित झालं. ती all rounder super woman झाली आहे.
एवढा मोठा business सांभाळते , पुस्तक लिहिते,नातवाला क्लास ला सोडायला जाते , सुनेला जमत नाही म्हणून नातवाला शिस्त लावते , आजोबांसाठी घारगे करते
एवढा मोठा business सांभाळते ,
एवढा मोठा business सांभाळते , पुस्तक लिहिते,नातवाला क्लास ला सोडायला जाते , सुनेला जमत नाही म्हणून नातवाला शिस्त लावते , आजोबांसाठी घारगे करते >>>>>> मग राजे काय करतात?
राजेंनी स्वखुशीने घरची
राजेंनी स्वखुशीने घरची जबाबदारी स्वीकारली आहे,रोज सकाळी शायनींग मारत ताजी भाजी घेऊन येणं(4 बायका ओळीने त्याच्या दर्शनासाठी उभ्या असतात,त्यांचा काळजाचा ठोका चुकवणे)मग प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता, आसवरीला साग्रसंगीत डबा,फ्रूट व्यवस्थित कापून वगैरे, दिवसभर आजोबांकडे लक्ष देणं,रात्रीचा स्वयंपाक वगैरे ...अगदी सगळ्ळी कामे हसतमुख राहून करतात..
कारण शुभ्रा बिचारीला सतत बबडू च्या मागे धावत राहण्यातून 1 क्षण मिळत नाही
काल तर राजे भाजी घेऊन आले आणि
काल तर राजे भाजी घेऊन आले आणि दारातच हात वगैरे न धुता शुभ्रा च्या हातातील डिश मधला तूप -साखर रोल खायला सुरू केला

तो रोल कुणासाठी माहीत आहे का,छोट्या बबडू साठी नाही तर मोठ्या बबड्या ला ऑफिस ला जाताना उशीर होतोय म्हणून..
Pages