अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती शुभ्रा खरोखर डोक्यावर आपटलीये.
राजेंसोबत ऑफिसला निघाली डबा घेउन तर बबडूच किती कवतिक . अरे कुठे युरोप टूर ला निघाली आहेस का ? ४ तासात येशील परत .
किती पाणी आणलं डोळ्यात .
आणि मी ? ऑफिसमध्ये?? म्हणजे काय ? ही गेल्या ७-८ वर्शात उंबर्याबाहेर नाही पडलीय का?
सोम्या केबिनमध्ये बसून प्रेमचाळे करतो , कोणी आलं तर पटकनं
मग आमचा गुरु बरा होता म्हणायचा .

कोणी बघतं का सिरियल ? काय चालु आहे ?
मी एकदा शुभ्रा रडत रडत सोम्याचे पाय धूत असते , एक्दा बबड्या द जुनिअर शुभ्राला , ती नेहमी घरात काम करत असते कामवालीच आहे (असचं काहीतरी) बोलतो , सोम्या त्या सुझानला मिठी मारून असतो हे कळल्यावर पण शुभ्राला काही संशय येत नाही - अशा काही तुरळक गोष्टी बघून पूर्ण एपिसोड्स बघायचा कंटाळा केला .
कुठलाही रँडम सीन लावा , एक्तर शुभ्राचा चेहरा किन्वा त्या सुझानचे भयाण कपडे .

कुठलाही रँडम सीन लावा , एक्तर शुभ्राचा चेहरा किन्वा त्या सुझानचे भयाण कपडे . >>>>>>

दादरकर असल्याने इथेही मानबा चालू आहे फरक एवढाच कि शनाया दिसायला (दोन्ही ) तरी धड होत्या। हि शेजवान दिसते हि भयाण नि कपडे त्याहून भयाण .

Pages