अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती स्पर्धा लोल होती. त्या बबड्याने आणलेल्या शेफने वॅनिला आईस्क्रीम सारखं काहीतरी बनवलं होतं आणि हिने उकडीचे मोदक. स्पर्धेमध्ये घटक पदार्थ सारखेच देतात आणि त्या ठराविक साहित्यातून तुम्ही किती वेगळा आणि चविष्ट पदार्थ बनवतात ते बघतात. हे म्हणजे एकाने बिर्याणी बनवली तर दुसर्याने पंचामृत सारखं झालं >>> Lol

इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल आणि पानकोबीत सर्व्ह करेल. >>> सही एकदम Lol

अन्नपूर्णा ची शेफ(आसा)आणि ऑर्डर घेणारा वेटर(राजे) प्रत्येक गिर्हाईक पहिला घास कधी घेतंय आणि खूप छान झालंय असं म्हणे पर्यंत तोंडाकडे पाहत राहतात...
अवघड आहे!!!

मोहन जोशी गिरीश ओक यांचे मोठे भाऊ वाटतील फार तर. >>>>>>> ++++++११११११११ रवी पटवर्धनच शोभत होते आजोबासाठी. त्यान्च ' कोम्बडीच्या, चप्पलचोर' कुणीच विसरु शकणार नाही. Happy

पैसा... पैशांसाठी सर्वकाही सहन करावं लागतं.....!! Biggrin

ती टीनपाट माझ्या नवर्‍याची तीसरी बायको ८.३० च्या प्राईम स्लॉटवरून ६.३० च्या ढुस्स प्लॉटवर फेकली गेली तरी पैशांसाठी अनिता दाते, अभिजीत खांडकेकर, अद्वैत दादरकर यांसारखे करोडपती अजुनही दात काढत सिरियल मधे कामं करत आहेत यावरुन पैसा किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. Wink

मानबामध्ये मिलिन्द शिन्देची एण्ट्री झालीये. सोनी मराठीवरची आई माझी काळूबाई आणि हि मालिका, दोन्हीमध्ये ह्याच चालण, बोलण, पात्र सारखच आहे.

दोन्हीकडे एकच कॅमेरा लावून शुटिंग्/अ‍ॅक्टिंग्/रायटिंग/प्रॉडक्शन्चे पैसे वाचवत असतील. सोनी मराठी अन झी मराठी ने टिव्ही इंडस्ट्रीत प्लॅटफॉर्म शेअरिंगचा नवीन पायंडा पाडला म्हणायचा..!! Biggrin

दोन्हीकडे एकच कॅमेरा लावून शुटिंग्/अ‍ॅक्टिंग्/रायटिंग/प्रॉडक्शन्चे पैसे वाचवत असतील. सोनी मराठी अन झी मराठी ने टिव्ही इंडस्ट्रीत प्लॅटफॉर्म शेअरिंगचा नवीन पायंडा पाडला म्हणायचा..!! >>>>> अगदी अगदी. आई माझी काळूबाईची प्रोडयुसर अलका कुबल आहे.

नवीन प्रोमो झी वर, अगबाई सुनबाई..! राजे,आसावरी अन नवीन शुभ्रा, म्हणून उमा ऋषिकेश( स्वामींनी मधल्या पार्वतीबाई )कडेवर मूल घेऊन...

मार्च मध्ये अग बाई सासूबाई बंद होऊन, अग बाई सुनबाई सुरु होणार त्यात शुभ्रा चेंज होईल
राजे मूछवाले होतील जे किचन सांभाळतील आणि शुभ्राच्या कडेवर त्यांचा नातू असेल। आसावारी मोठी बिझिनेस वुमन होणार। बहुदा डबड्या पण चेंज होईल
IMG_20210224_140447.jpgIMG_20210224_140500.jpgIMG_20210224_140517.jpg

नवीन व्हिलन उगवायला असा किती वेळ लागतो ... त्या मानबा मध्ये कसं, जिथे राधक्का जाते , व्हिलन असतोच पुढच्या 100 एपिसोड ची सोय करायला

Zee च्या साईट वरून साभार ---

काही काळानंतर कुलकर्णी घरात बरेच बदल दिसून येतात. आसावरी मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे . पूर्ण आत्मविश्वासाने तिने आता office successfully हातात घेतले आहे

तीच्या सोबत तिचा सोहम आता Right hand म्हणून काम बघतोय. तसेच अभिजित राजेंनी त्यांच्या style ने स्व खुषीने घर सांभाळायला घेतले आहे .

शुभ्रा ने आई पण स्वीकारून तिच्या मुलाची म्हणजे बबडूची जबाबदारी सांभाळत नव्या संसाराला सुरुवात केली आहे .

अश्या ह्या कुलकर्णी कुटुंबात शुभ्राला संसाराच्या काही Tips देत आसावरी पुन्हा शुभ्राला Independent करण्यच्या मार्गावर हे कथानक आधारले आहे.
Grrrrrrrrrrrrrrrrr
Angry Angry

तेप्र नाही आहे.तिला आईचा रोल करायचा नव्हता म्हणून तिने मालिका सोडली अशी चर्चा आहे.कदाचित दुसर प्रोजेक्ट मिळाल असेल.पण झीमच्या फेबु वरचे आणि इंन्स्टावर मात्र ती नसल्याने प्रेक्षक नाखूष आहेत.बबड्या तोच आहे की वेगळा माहीत नाही.

सगळ्या बायकांना बिसनेस वुमन करायचा चंग बांधला आहे वाटतं झी ने... काय बावळटपणा आहे... बरं झालं सोडली तेप्र ने मालिका... आसा भाव खाताना बघत बसण्यात हिला काय इंटरेस्ट असणार आहे...

कसलं ऑफिस >>> Lol

झीचं पारंपारीक ऑफिस, पारंपारीक कॉर्पोरेट कल्चर सगळं असणारे ऑफिस असेल Wink . पण नवीन नि जो छान दिसतेय.

नवीन शुभरा गोड आहे एकदम. उमा पेंढारकर नाव आहे. युट्युबवर इंटरव्ह्यू बघितला तर फार इम्प्रेस झाले. शास्त्रीय संगीत प्रवीण, कथक नृत्यांगना, मानसशास्त्रात मास्टर्स आणि कौंसेलर म्हणून काम आणि अभिनय असं सगळं ही एकच मुलगी करते.

Pages