अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

It is a fact please inform the director producer of your anger.

श्रवु, VB माबोवर कुठल्याही धाग्यावर गप्पा मारुन चालतात. Happy
आणि बबड्या बिचिंगमधून थोडा टाईमऑफ हवाच ना.

बादवे गोड बातमी नक्की कळवली जाईल हो. Happy

चिन्मयी ☺️

अमा, it's not fact it's about your mentality. Your vision

म्हणजे दृष्टी तशी सृष्टी , मला तरी तिचे कपडे चार चौघी सारखे वाटले, अन जरी खटकले असते तरी कुठल्याही स्त्रीच्या कपड्यांवर टीका करणे निदान मला योग्य वाटत नाही

असो....

पण असावरी ही vamp आहे. अभिजीत राजेची प्राॅपर्टी आपल्या मुलासाठी हडप करण्याचा तिचा डाव आहे. ती आणी बबड्या मिळून हा प्लॅन केलाय. एकदा की अभीजीत राजेची संपत्ती ताब्यात आली की अभिजीत राजेचा खुन करून त्याचा मृतदेह अभीस किचन खाली गाडून टाकतील. हे शुभ्रा ला कळल्यावर ती कोर्टात केस लढून अभिजीत राजेला न्याय मिळवून देईल आणी सिरीयल चा शेवट होईल.

असावरी ही vamp आहे. अभिजीत राजेची प्राॅपर्टी आपल्या मुलासाठी हडप करण्याचा तिचा डाव आहे. ती आणी बबड्या मिळून हा प्लॅन केलाय. एकदा की अभीजीत राजेची संपत्ती ताब्यात आली की अभिजीत राजेचा खुन करून त्याचा मृतदेह अभीस किचन खाली गाडून टाकतील. हे शुभ्रा ला कळल्यावर ती कोर्टात केस लढून अभिजीत राजेला न्याय मिळवून देईल आणी सिरीयल चा शेवट होईल.>>>>बरोब्बर. कारण अभिजीत राजेंकडे पैशांचे झाड आहे. बबड्याने लाखो रुपये ढापले तरी त्यांच्याकडे अजून लाखो रुपये तयार असतात. Mady सतत discounts देत असते तरीही restaurant ची उलाढाल खूप आहे. तसेच sports bike च्या एका आंतरराष्ट्रीय brand ने फुटबॉल खेळाडू,हाॅलिवूड ॲक्टर्सना वगळून शेफ अभिजीत राजेंना brand ambassador केले होते. असे त्यांचे अनेक जोडधंदे असतील. शिवाय तो बंगलापण आहे.राजेंची वडिलोपार्जित मालमत्ता सुद्धा आसावरी आणि सोहमला हवी आहे. खून केल्यावर राखेचा सारखे दाखवून ही मालिका रंजकपणे वाढवता येईल.

मंद आसा एक दिवस दाखवण्यापुरती बबड्याशी वाईट वागली. परत पहिले पाढे पंचावन्न
या बबड्यापेक्षा ही बाईच कधी सुधारणार आहे याची वाट बघतेय.
डबड्याची नाटकं कोणीच कशी ओळखत नाहीत. डोक्यावर पडलेत सगळे.

ही शिरेल बघत का अजून कोणी?????

आश्चर्य म्हणजे माझ्या मम्मा ने गेल्या आठवड्या पासुन बातम्या बघणे चालू केले पण ही भंगार शिरेल नको म्हणाली.

राजेंनी काय प्रश्न विचारला? आसा जाम तणतणत होती ड्बड्याला भांडी बडवावी म्हणजे घासावी लागली. वरतुन या मंदबधीर बाईने डबड्याला जेवण भरवले. हद्द झाली मुर्खपणाची. ज्या माणसाशी धिंगाणा करुन लग्न केले त्याचे काहीही ऐकुन न घेता, लेकी बोले सुने लागे असे वागत त्यांना धुत्कारले. मीअरकॅट तोंड्या हे एंजॉय करत होता.

Pages