अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय फालतुगिरी लावलीय यार! किती चिडताय तुम्ही लोक माझ्यावर. तुमच्यापेक्षा ती प्रज्ञा परवडली. बरं ते जाऊ द्या.. आज आपल्याकडून पार्टी बरं का सर्वांना.. सर्वांनी या आपल्या अभिज खानावलमध्ये.. झकास पैकी कॉकटेल पार्टी आहे. पण पैसे घेऊन या बरं

सॉरी फोक्स.. काल आम्ही म्हणजे मी आणि शुभ्रा जरा मूड मध्ये होतो. आधीच तो अभिज्जीत राजे आल्यापासून हि शुभ्रा अखडूनच वागत होती.. तुम्ही तर पाहिलंच असेल, लै हौस तुम्हाला! शुभ्रा दिवसा मांजरासारखी नखं काढून फिरत होतीच, रात्री तर जवळ गेलो तरी गुरगुरायची.. शेवटी गेल्या २ दिवसात चांगलं वागायचं नाटक सुरु केलं. फॅनवर पाकळ्या वगैरे फालतुगिरी करावी लागली मला.. पण मजा आली काल. त्या मूर्ख लेखकाला सांगून हे असे सिन अधून मधून टाकत जा म्हणावं लागेल. TRP ची गणितं मीच सांगावी लागणार बहुतेक या लोकांना. जाऊ द्या फार झालं A ग्रेड..

वर कुणीतरी अभिचा काटा काढायची भारी आयडिया दिली आहे. तसा मी नालायक असलो तरी खून वगैरे फारच जास्त होईल. पण बघू पुढेमागे कसं जमतंय ते.

खरंतर मी आज जो आहे तो माझ्या आईमुळे.. मला तिने कधी जग पाहूच दिले नाही. सतत आपलं बबड्या बबड्या. मग मी पण ठरवलं, बबड्या तर बबड्या. आता असा वागेन कि कुणी आई आपल्या मुलाला बबड्या म्हणणार नाही. अर्थात खऱ्या जगात पण अश्या आया असतातच, पण त्या नव्या नव्या आया. आणि त्यांचे बबडे सुद्धा लहान आहेत अजून. लग्न झालेल्या मुलाला खाऊ घालणारी आमची एकमेव आहे. एकूण माझी चंगळ आहे.

सॉरी फोक्स.. काल आम्ही म्हणजे मी आणि शुभ्रा जरा मूड मध्ये होतो. >>>>>>>>> तरीच, 'बबडयाज किचन' न म्हणता अभिज खानावळ म्हणतोयस तू. Wink

असो. एका दिवसात कसा नफा करुन देणार 'बबडयाज किचन' चा तेही सान्गून टाक आता. तेवढच आम्हाला इन्स्पिरेशन मिळेल तुझ्याकडून.

स्पॉईलर्स द्यायचे नाहीत हि अट टाकूनच लेखकाने मला अकाउंट काढण्याची परवानगी दिली आहे. आगे आगे देखो होता है क्या!

स्पॉईलर्स द्यायचे नाहीत हि अट टाकूनच लेखकाने मला अकाउंट काढण्याची परवानगी दिली आहे. आगे आगे देखो होता है क्या! >>>>>> ओह तर मग ठिक आहे, चालू दे तुझी बबडयागिरी!

काल थोडा वेळ ही शिरेल दिसली. तेजश्री प्रधानने दुसरे लग्न केले का? मला ती प्रेग्नंट वाटली. की स्वतःकडे नीट लक्ष न दिल्यामुळे झालेय तिचे असे काय माहीत. पण चेहरा थोडा सुजलेला अन पोट पण सुटल्यासारखे वाटले

बबड्या शर्ट काढून म्हणतो, बायका असं करू शकतात का.???? >>>>>>>>> हम दिल दे चुके सनम मधल्या सीन ची कॉपी.

VB जाड झालीय ती, तुम्ही त्या निळ्या सलवार सूटमध्ये बघितलं का? मलाही ती काल जाड वाटली, कुर्तीच्या बाह्या चांगल्याच घट्ट दिसत होत्या.

असावरीला आज खुप टेंशन आले होते. अभिजीत राजे घर सोडून निघून गेला तर प्राॅपर्टी हडप कशी करायची त्याची?? कितीदिवस मी मंद असल्याचे नाटक करायचे?? कधी एकदाचं अभीस किचन बबड्याच्या नावावर होते आणी कधी एकदाचा ह्या राजेचा मुडदा पाडते असं झालंय असावरीला.

कधी एकदाचं अभीस किचन बबड्याच्या नावावर होते आणी कधी एकदाचा ह्या राजेचा मुडदा पाडते असं झालंय असावरीला.>> Rofl

दोन्ही मायलेक प्रेम करून माणूस फसवण्यात निष्णात आहेत.
अभिजीत राजेला हळूहळू असावरीचा डाव लक्षात येत असावा. असावरी मंद असल्याचं नाटक करतेय आणी बबड्यासाठीच मंद बनून मला प्रेमाच्या जाळ्यात फसवलंय. म्हणुन अभीस किचन मी असावरी आणी शुभ्राच्या नावावर करेन असं राजे बोलला. असावरी ने वर दाखवलं नाही पण आतून प्रचंड संतापली असावी. माझ्यानावावर ठिकाय पण मध्ये शुभ्राला का घातलं ह्या मेल्या राजेने. काहीही करून प्राॅपर्टी बबड्याच्या नावावर करायला राजे तयार नाही. आपला प्लॅन ऊधळला जातोय ह्याचा प्रचंड मनस्ताप होतोय असावरीला. किती दिवस झेलायचं आणखी ह्या राजेला?? कर की मुडद्या ते अभिस किचन बबड्याच्या नावावर.

मम्मी कृपेने हल्ली दिसते ही शिरेल (अन राधीकाची पण)
मला सगळ्यात जास्त राग शुभ्राचा येतो. काय गरज आहे त्या मठ्ठ असाच्या मागे मागे करायची. तो राजे दुसरा महामुर्ख, सोडुन द्यायचे दोन्ही मायलेकरांना, तर हा मुर्ख रडत खोटे वागतो Angry
अन किती ते अवाजवी महत्व दिलेय मंगळसुत्राला? कुठल्या काळात राहतात हे लोक. जिथे नात्यात विश्वास , प्रेम नाही तिथे का ऊगाच मिरवायचे तो दागीना घालुन Angry

काल मी बोल्ले मम्माला, या वेळेत IPL बघु आपण, पण हे नको, एकवेळ भैताड राधिका परवडली पण आसा नको

त्या राजेंचे किचन कि हॉटेल कुठल्या अँगलने ३ कि ५ स्टार वाटते?
ईतका जगविख्यात शेफ काय विकतो तर घारगे? सिरीअसली?
अन टेबलावर पणत्या की दिवे लावले होते मध्यंतरी. फायर सेफ्टी नॉर्मस काय असतात माहीत नाही का ह्यांना? अन एवढ्या हायफाय महागड्या हॉटेलचा स्टाफ हा असा?

कॉर्पोरेट वाल्यांची वाट लावतातच हे लोक रोज मिनीटाला प्रेझेंटेशन देत आता हॉटेल ईंडस्ट्रीची पण लावली Angry

जोक्स apart..पण खरच ही आसावरी इतकी कावेबाज असेल काय? शक्य आहे...छान ट्विस्ट मिळेल कथानकाला>>>> हो.

माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. तुला पाहते रे वेळी ही मी हा अंदाज वर्तवला होता की विक्रांत सरंजाम हा फ्राॅड आहे. काहीतरी लबाडी करून श्रीमंत झालाय आणी हा अंदाज खरा ठरून सिरीयल ला वेगळं वळन आलं होतं. झेंडे आणी विक्रांत मध्ये अनैतिक संबंध आहेत, हा एकच अंदाज चुकला होता फक्त.

त्या राजेंचे किचन कि हॉटेल कुठल्या अँगलने ३ कि ५ स्टार वाटते?
ईतका जगविख्यात शेफ काय विकतो तर घारगे? सिरीअसली?>>>>

राजेने कुठेही जगविख्यात शेफ आहे असा दावा केलेला नाही.
फक्त विदेशातील भरभक्कम पगाराची नोकरी सोडून स्वत:च हाटेल सुरू केलंय. विदेश म्हटलं की तुम्हाला अमेरिका, ईंग्लंड, फ्रांस आठवला असेल. पण असु शकतं की राजे बांग्लादेश, श्रिलंका, टांझानीया किंवा युगांडा मध्ये असेल. तिथल्या चलनाप्रमाणे पगार भरभक्कमच असणार.

Pages