म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Only that fishermen returns from the sea who goes to fill his boat, not the one who goes to fill his stomach.
या अर्थाची कोकणी म्हण शोधत आहे... कोणी सांगू शकेल का?

ढुंगणाला नाही लंगोटी अन् मला म्हणा डिपुटी

(गावाकडे एक deputy पदावर अधिकारी असायचा, त्याचा सगळ्यात वर मान असायचा

म्हणीचा अर्थ: आपल्या अंगी काही कसब नसताना उगाचच फार मोठी असामी असल्यासारखी अरेरावी करणे)

भन्नाट Lol
जिद्दु आणि फलक से जुदा.

१. "आरून फिरून गंगावेस" किंवा "इरून फिरून गंगावेस"
=> चर्चा फिरून फिरून शेवटी त्याच एका मुद्द्यावर येत असेल तर हे म्हणतात (कोल्हापूर भागातला वाक्प्रचार. गंगावेस, कोल्हापुरातला एक भाग)

२. "मुका सांगतोय आणि बहिरा ऐकतोय" किंवा
"सांगतंय कैरं ऐकतंय बहिरं" (ग्रामीण: मुकं सांगतंय आणि किवंडं ऐकतंय) किंवा
"कानडं बोलतंय आणि मराठं ऐकतंय"
=> सांगणारा एक सांगतोय आणि ऐकणारा तो काय बोलतोय हे नीट न कळल्याने दुसराच काहीतरी अर्थ लावतोय

३. "डोक्यावर पडणे"
=> समोरची व्यक्ती विचित्र वागायला किंवा बोलायला लागली कि म्हणतात, डोक्यावर पडलास/पडलीस का?
(लहानपणी व्यक्ती डोक्यावर पडली असल्यास पुढे तिच्या वागण्या बोलण्यावर परिणाम होतो या समजातून आलेला वाक्प्रचार )

४. "त्याचा बाप तोच" (ग्रामीण: तेचा बा त्योच)
=> एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगितली किंवा एखादे काम वेगळ्या प्रकारे केले, पण अखेर परिणाम/अर्थ एकच होत असेल तर हे म्हणतात

५. धू म्हटलं कि धुवायचं
=> सांगितलेलं काम एखाद्याने गुलामासारखे मुकाट्याने करावे अशी अपेक्षा असते तेंव्हा.

६. खांद्यावर बसवलं तर कानात मुततो
=> अधिकार दिले पण त्याचा गैरफायदा घेतला जातो तेंव्हा

७. नावाजलेला गुरव देवळात हागला
=> अतिशय आदर सन्मान असलेली व्यक्ती घृणास्पद काम करते तेंव्हा.

८. वाघ पडला बावी, केल्डं गांड दावी
=> बलवान व्यक्ती जेंव्हा अडचणीत येते व असहाय होते, तेंव्हा दुबळे लोक सुद्धा तिचा अपमान करू शकतात

९. लाखाशिवाय बात नाही आणि भजाशिवाय खात नाही
=>"बडा घर पोकळ वासा" याच अर्थाची हि म्हण

१०. जेवायला आधी, झोपायला मधी, अन कामाला कधीमधी
=> जेंव्हा चैनीच्या/आरामाच्या गोष्टी असतात तेंव्हा पुढे, पण काम/कष्ट करायची वेळ आल्यावर मात्र मागे राहणारी व्यक्ती.

११. आयडिया केली आणि गांXत गेली
=> एखादी शक्कल वा क्लुप्ती जेंव्हा अंगलट येते व फजिती होते तेंव्हा हे म्हणतात

१२. आपलीच मोरी अन् मुतायची चोरी
=> जी कृती एरवी खाजगीत आपण सहजपणे करतो पण कधीकधी काही कारणास्तव ते शक्य होत नाही

"उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नये" या धर्तीवर मराठीत आता "हत्तीच्या पाठीवर योगासने करण्याचा प्रयत्न करू नये" अशी नवीन म्हण रूजू करावयास हरकत नाही Proud
संदर्भ - https://youtu.be/YsFZ_htV-TM

कौन कहता है आसमां में सुराख नहीं हो सकता...
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...
वरील हिंदी शायरी मधला एक पत्थर तो तबियत से उछालो यारों... याचा अर्थ काय होतो. तबियत म्हणजे हेल्थ ना?

"पर्वतीच्या पायऱ्या अन शोखमिऱ्याचा डोला" अशी एक म्हण आहे जिचा अर्थ '' कशाला काही पत्ता नाही '' अशा प्रकारचा आहे. कोणाला व्युत्पत्ती माहित आहे का ?
"आठ पुरभय्ये, नऊ चौके" असा एक अतिशयोक्ती वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ कुणाला माहित असल्यास सांगा. चौके म्हणजे चूल आहे बहुतेक

गवत गोंडाळ, बायको तोंडाळ आणि शेत धोंडाळ अशी एक ग्रामीण म्हण आठवली.
खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला , एवढा अनर्थ खिळ्याने केला अशी मूळ म्हण आहे " विद्येविना ...... " च्या मागे.

इथे खसखस हा ध्वनिवाचक असावा. पिक ह्या अर्थाने नव्हे.
सर्वांनी एकत्र सौम्य हसताना खसखस (ध्वनी)ची निर्मिती झाली (पिकली)

ते पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे काय ? प्रहर , वेळ यांच्याशी काही संबंध आहे का ?

हरताळ म्हणून एक पिवळी पावडर मिळायची. शाईने लिहिलेले खोडायचे असेल तर ती पावडर त्या शब्दावर लावली जायची. आणि दिसत असले तरी तो शब्द खोडलाय असा मानले जायचे. हे एक प्रकारचे आर्सेनिक चे मिनरल आहे. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरतात.

नाकदुर्‍या काढणे याचा शब्दशः अर्थ काय ? एखाद्या देवळाfunction at() { [native code] }अ केला जाणारा विधी वगैरे ?

बरेचदा वाक्प्रचाराचा अर्थ माहित असतो पण मूळ माहित नसते. आम्ही अमेरिकेत Did you cover all the bases ? वगैरे वापरतो.

परवा एक वाक्प्रचार ऐकला "लग्न आमचे आणि मांडवझळा यांना"
यापैकी मांडवझळा शब्द माझ्यासाठी नवीन होता.
अर्थ असा कि एखाद्या कामाचे कष्ट घेणारे जे प्रमुख लोक असतात, त्यांना त्या कामाचा शीण येण्याऐवजी बाकीचेच थकून जातात तेंव्हा हा वाक्प्रचार वापरतात.

आमच्याकडे नवी नवरी सारखी पेंगायला (जांभई/जांभळी द्यायला) लागली की म्हणतात हिला मांडवझळा लागल्या आहेत.

नाकदुर्‍या काढणे याचा शब्दशः अर्थ
>>> पश्चात्ताप-प्रदर्शनार्थ नाक घासणे / नम्रपणाची विनवणी

नाकदुरई : https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6%...

आज दुसर्‍या एका धाग्यावर चर्चा सुरू झाली, तिथून इथे आलो. 'युद्धस्य कथा रम्या' हे वचन फारच ऐकिवात आहे. मुळात इथे 'युद्धाच्या कथाच तेवढ्या रम्य असतात, प्रत्यक्ष युद्ध हे भयानक असतं, ते तितकं रम्य वगैरे अजिबात नसतं' - असा अर्थ अध्याहृत आहे. एका संस्कृत सुभाषितात ते येतं -
दूरस्था: पर्वता: रम्या: वेश्या च मुखमंडने |
युद्धस्य तु कथा रम्या त्रीणि रम्याणि दूरतः ||

पर्वत दुरूनच छान दिसतात, वेश्या मेकप केल्यानंतरच, युद्धाच्या फक्त कथाच रम्य; आणि हे तिन्ही लांबूनच रमणीय वाटतात. 'दुरून डोंगर साजरे, जवळ जाता दरी-खोरे' या म्हणीशी फारच साधर्म्य वाटलं.

सोयरसुतक नसणे

यातील सुतक शब्द सर्वांना माहित आहे. "सुतक असणे" म्हणजे नात्यात कोणाचा मृत्यू झाला की काही दिवस काही गोष्टी वर्ज्य करणे. पण "सोयर असणे" म्हणजे काय? ते कदाचित काहींना माहित नसेल म्हणून नोंदवून ठेवतो. मला ज्यांनी सांगितले ते तसेच त्यांच्याच शब्दांत:

जवळच्या नात्यात कोणास बाळ झाले म्हणून सोयर पाळतात. ते रक्ताचे नातेवाईक व मुलगा असेल तर ११ दिवसांचे असते. त्यामध्ये रोजचा सोवळ्यातील नैवेद्य, देवपूजा, तुळशीची पूजा नसते. १२ व्या दिवसापासून अंघोळ करून देवपूजा करायची. रोजचा सोवळ्यातील नैवेद्य करायचा. कारण, पूर्वी बाळंतपण घरी व्हायची. घरातील बाई त्यात अडकली जायची तेव्हा, पूजेच्या तयारीत, नैवेद्य करण्यात तिचा वेळ जाऊ नये म्हणून.

'बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.'
याची माझ्या आजीने सांगितलेली गोष्ट पुढील प्रमाणे:-
एक भट आणि म्हणजे ब्राह्मण आणि त्याची बायको खूप कंजूस असतात आणि आळशी सुद्धा!

एका दिवशी घरातलं सगळं खाण्याचं संपतं आणि ब्राह्मणाची बायको तेव्हा त्याला बाजारात जाऊन, वरण(आमटी) करण्यासाठी तुरीची डाळ आणण्यास सांगते तर आळसामुळे तो ओसरीवर पडलेला भट बायकोलाच ' तूच जाऊन ते आण', असं तो सांगतो आणि वरून ते तुरीच्या डाळीचे वरण तू केल्यानंतर मीच खाणार असं सांगतो.
त्यावर ती बायकोही 'तुम्ही ते आणा आणि माझा त्यावर पहिला हक्क असेल', असं सांगत राहते आणि न आणलेल्या तुरीच्या डाळीच्या वरणावरून त्यांचे भांडण सुरू होते. तेव्हा भट त्याच्या बायकोवर हात उगारतो.

यावरून ही म्हण पडली की, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

धाड पडावी पण चीत पडू नये

चित्रा नक्षत्र आणि ही म्हण यांचा संबंध माहिताय का?

टोळधाड पडली तरी चालेल पण चित्रा नक्षत्रात पाऊस पडू नये कारण तो पिकाला जास्त मारक असतो !

Pages