म्हणी, वाक्प्रचार आणि त्यांचा उगम व अर्थ.

Submitted by कोदंडपाणी on 10 February, 2019 - 06:07

ग्रामीण बोली भाषांतील शब्द येथे वाचता येतील.

मला ग्रामीण भाषेतले शब्द आवडतात. रोजच्या बोलण्यामध्ये, ऐकायला छान वाटतात. त्यासाठी मी एक धागा काढला आणि त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे मला फक्त शब्द अपेक्षीत होते पण येथे शब्दांबरोबर त्यांचे अर्थ, त्या वस्तुचा उपयोग आणि साधारण स्वरुप वगैरे खुप माहिती तर मिळालीच पण खूप जुन्या आठवणीसुद्धा जागवल्या गेल्या. प्रत्यक्षात मला मात्र यात शब्दांची, माहितीची जास्त भर घालता आली नाही. कुणा कुणाचे नाव घेऊ? सगळ्यांचेच खुप आभार. खुप सुंदर आणि नविन शब्द कळाले तुम्हा सगळ्यांमुळे.

त्या धाग्यावर भरत यांनी सुचवले की वाक्प्रचारांच्या चर्चेसाठी वेगळा धागा काढा. या अगोदर असा काही धागा असेल तर मला सापडला नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण आपल्याला माहित असलेल्या सुंदर, मजेशीर, विनोदी अशा म्हणी देऊयात. शक्यतो त्या म्हणींचा उगम आणि अर्थ माहित असेल तर वाचायलाही खुप छान वाटेल.

त्या धाग्यावर अप्पाने (शाली) दिलेल्या दोन म्हणींनेच सुरवात करुयात.

पुर्वी ऐनवेळच्या लढाईला सैनिकभरती व्हायची. सैन्य युध्दकुशल असण्याची आवश्यकता नसायची फक्त समोरच्या सैन्यावर दबाव टाकन्यासाठी संख्या महत्वाची असायची. त्यामुळे मिळेल त्याला सैन्यात भरती करत. त्यांची मोजदाद व्यक्तिनुसार न करता घोड्यानुसार करत. म्हणजे किती खोगीर जमा झाले हे पहात. (खोगीर म्हणजे घोड्याच्या पाठीवर बसण्यासाठीचे चामडी आसन.) त्यामुळे मुर्खांच्या किंवा अकुशल लोकांच्या भरतीला 'खोगीर भरती' नाव पडले. जे आपण आजही वापरतो. तसेच सैन्यामुळे मिळालेले अनेक वाक्प्रचार आजही वापरात आहेत. जसे पाचावर धारण बसणे. पाचावर धारण जाणे किंवा बसणे हा धान्याचा बाजार भाव आहे. साधारण एक ते सव्वापर्यंत धारण असेल तर सैन्यात धान्य स्वस्त आहे असे समजले जाई. पण अगदी पाचाच्या वर धारण गेली याचा अर्थ सैन्याला फाके पडणार हे नक्की. त्यामुळे सैन्य घाबरुन जाई. त्यामुळे घाबरण्यासाठी "त्याची पाचावर धारण बसली" म्हणतात. या मोजमापाविषयी जाणकार सांगतीलच.

गाशावरुन एक आठवले. घोड्यावर खोगीर घालायच्या अगोदर एक चामड्याचे तुकडे जोडुन तयार केलेले आच्छादन घोड्याच्या पाठीवर घालायचे. त्याचा बराचसा भाग हा घोड्याच्या दोन्ही पुठ्यांवर येई मग खोगीर आवळत असत व त्यावर गाशा टाकत. या चामडी आच्छादनाला पाखर म्हणत. त्यामुळे घोड्याच्या पुठ्यांना काट्याचा, झुडपांचा त्रास होत नसे. आपण "मायेची पाखर घालणे" असं म्हणतो ती हिच पाखर. मायेची पाखर घालणे हा वाक्प्रचार नसुन ती उपमा आहे. माझ्या आजोबांच्या घोड्याची पाखर आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत आमच्याकडे होती.
(वरील तिनही म्हणींची माहिती शाली यांनी दिली आहे.)



तुमच्याकडे म्हणींचा उगम असेल तर उत्तमच नाहीतर फक्त म्हणी आणि वाक्प्रचार लिहिल्यातरी चालतील.
करुया सुरवात?... ... ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनुष्याचा एक प्रकार. कोदंडपाणी रामाचं नाव आहे. धनुर्वेदामध्ये नऊ जोड असलेल्या धनुष्याला कोदंड म्हटलंय. मंगोल लोकांच्या कंपोझिट बो सारखे असावा.

कोदंड हा धनुष्याचा प्रकार नसुन ते श्रीरामाच्या धनुष्याचे नाव आहे. ज्याच्या हातात कोदंड आहे असा राम म्हणजे कोदंडपाणी.
शंकराच्या धनुष्याचे नाव पीनाक आहे म्हणून पीनाक हातात घेतलेले महादेव म्हणजे पीनाकपाणी.
कृष्णाच्या धनुष्याचे नाव शारंग. कृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने हे धनुष्य मु विष्णूचे. म्हणून तो सारंगपाणी.

अर्जुनाच्या धनुष्याचे नाव गांडीव होते हे प्रसिध्दच आहे. तसेच कर्णाच्या धनुष्याचे नाव विजय.
(चुकभुल द्यावी घ्यावी)

पीनाक हे शिवधनुष्याचे नाव आहे. आणि ते ज्याच्या हातात असते तो शंकर. पीनाकपाणी. जसे चक्रपाणी.
पिनाकीनचा अर्थही तोच होतो असे मला वाटते देवकी. पण पीनाकपाणी आणि पिनाकीन हे पुर्ण वेगळे शब्द आहेत.
चिडकू तुम्ही म्हणता तसे वेदांमध्ये धनुष्याचे प्रकार सांगीतले असतील आणि कोदंड हे धनुष्य नऊ जोड असलेल्या प्रकारचे असेल. पण कोदंड हे त्या धनुष्याला दिलेले नाव आहे अशी माझी माहिती आहे. जसे भवानी हे राजांच्या तलवारीचे नाव होते. तो तलवारीचा प्रकार नव्हता.
चिडकू, लिंक मिळाली की नक्की द्या. मला सापडली नाही. इंट्रेस्टींग असेल माहिती.
(मराठीइतकीच संस्कृतही अस्खलित आली असती मला तर काय बहार आली असती! Happy )

शशिराम भारी.

बारा गाव सासर आणि आधीच भोकाड पसर!>>> हे तर फारच भारी. Lol Lol

बाप भीक मागू देईना आई जेवू घालिना.
आपला तो बाब्या दुसऱ्या चा ते कार्टं.
चोराच्या मनात चांदणं.
पायीची वहाण पायी बरी.
तीन तिगाडा काम बिगाडा.
एक हात लाकूड दहाहात ढलपी. - लंब्याचौड्या बाता मारणे.
गरीब गाय पोटात पाय.
गर्जेल तो बरसेल काय.
हातच्या कांकणाला आरसा कशाला.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली.

शाली जी आमच्या कडे शेंगदाण्याच्या बेसणाला झिरकं असे म्हणतात. भाजीला काही नसेल तर याच्यावर काम चालवले जाते.

शाली जी पुर्वी खेडेगावात आण्हे म्हणजे कोडे घालण्याचा खेळ खेळत. त्याविषयी माहिती आहे का. उदा. झावरा कुत्रा देवावर मुत्रा. म्हणजे नारळ.

तुम्हाला पिकॉक म्हणायचं आहे का?>>> नाही पिनाक म्हणायचं होते.शालेय जीवनात बाईंनी सांगितलेले ते लक्षात होते.पिनाक म्हणजे मोर आणि पिनाकी/पिनाकिन म्हणजे शंकर.
आता गुगलकाका वेगळंच सांगताहेत.असो.धाग्याशी अवांतर होतंय.

माहिती मिळत असेल तर थोडेफार अवांतर झाले तरी हरकत नसावी.
लहानपणी अनेक गोष्टी चुकीच्या शिकवल्या जातात हे खरय अगदी. आम्हाला “लहानपण देगा देवा” याचा अर्थ बालपण फार रम्य असते. ते पुन्हा परतुन येत नाही असे शिकवले होते. Lol नंतर समजले की तुकोबा देवाकडे लहानपण म्हणजे नम्रता मागत आहे.

नाऱ्याने केले केशाला प्रायश्चित्त. आमच्या गावात नारायण व केशव हे दोन भाऊ आहेत. मला ही म्हण जवळची वाटत असे. चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवणे अशा अर्थाची म्हण आहे.
केशवचे नाव केशव माधव जाधव असे आहे म्हणून मी केशवा माधवा जाधवा.. असे गाणे रचले होते.

कोदंड हा धनुष्याचा प्रकार नसुन ते श्रीरामाच्या धनुष्याचे नाव आहे. ज्याच्या हातात कोदंड आहे असा राम म्हणजे कोदंडपाणी.
शंकराच्या धनुष्याचे नाव पीनाक आहे म्हणून पीनाक हातात घेतलेले महादेव म्हणजे पीनाकपाणी.
कृष्णाच्या धनुष्याचे नाव शारंग. कृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने हे धनुष्य मु विष्णूचे. म्हणून तो सारंगपाणी.

अर्जुनाच्या धनुष्याचे नाव गांडीव होते हे प्रसिध्दच आहे.
>>> म्हणजे अर्जुन गांडीवपाणी.

च्रप्स तसे म्हणता येणार नाही कारण ईश्वर किंवा त्यांच्या अवतारांनाच शस्त्रांवरुन संबोधले जाते. आणि तसेही त्याने फार क्वचितच मनापासून गांडीव उचलले. राम कृष्णादींचे चित्रे किंवा वर्णन् नेहमी शस्त्रे धारण केलेली अशी आहेत आणि अर्जुनाचे गांडीव नेहमी धरनीवर, शमीच्या झाडावर नाहीतर बेडरुममधे असे.

शालीजी, तुम्ही जिथे जिथे पाणी हे सफिक्स वापरले आहे तिथे तिथे पाणि असे हवे. पाणि म्हणजे हात.
चक्रपाणि, शारंगपाणि, कोदंडपाणि असे हवे. धागालेखकाच्या नावात सुद्धा. अर्थात विशेषनाम म्हणून सूट मिळू शकेल असे वाटते.

धन्यवाद पुंबा. पण माझा जरा गोंधळ होतोय आता. गुगल करुन पाहीले, माझ्याकडील एका पुस्तकावर डॉ. शारंगपाणी यांचे लेखक म्हणून नाव आहे. अगदी मुखपृष्ठावर देखील शारंगपाणी असेच लिहिले आहे.

Pages