२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्याने सचिन ला मी शंभर करू देणार नाही हे जे म्हटलेले ते विनोदाने म्हटले असेल तरी खटकले होते. नेमका त्यानेच कॅच घ्यावा >>

कमॉन असाम्या, ती सिरीज खास १०० साठी अचानक ठेवलेली होती. आणि तो विरुद्ध पक्षाचा कप्तान होता. कुणाचेही १०० तो कशाला होऊ देईल? सचिनचे १०० -१०० ही द्यायची गोष्ट थोडी आहे भाऊ? घ्यायची आहे.

मग कॅच सोडावा की काय? Happy

कुणाचेही १०० तो कशाला होऊ देईल? >> बरोबर आहे पण त्याने खास सचिनबद्दल ते उद्गार काढले होते, परत हे लक्षात घे कि त्याची retirement test आहे तर त्याच्याबद्दल वाईट/कटू बोलणे टाळणे प्रसंगोचित ठरले असते. एव्हढे झाल्यावरही 'नेमका त्यानेच कॅच घ्यावा' नि तोही नव्वदीमधे ही माझ्यासाठी दु:खाची बाब होती. त्याने सोडावा असे मी म्हटलेले नाही. '!' आहे असे समजा तात्या.

सचिनप्रेमामुळें आपल्याकरतां तो सामना म्हणजे एक अपूर्व सोहळा होता असला, तरीही दोन राष्ट्रीय संघातला चुरशीने खेळण्याचाच तो सामना होता. त्या सामन्यातल्या सचिनच्या संभाव्य शतकाचं इतकं भावनिक 'हाईप' झालं होतं कीं सर्वजण जणूं वे.इंडीजला गृहीतच धरत होते. या पार्श्वभूमीवर, सॅमीचं तें विधान आपल्यासाठी औचित्यपूर्ण नसलं तरीही विरुद्ध संघाच्या कर्णधाराकडून होणं अनपेक्षितही नसावं.

[ सचिनला चिथावला तर तो बॅटनेच उत्तर देतो, हें सर्वश्रुत होतं; कदाचित, त्या खास सामन्यात त्याला शतकासाठीं उद्युक्त करण्याच्या सदहेतूनेच सॅमीने त्याला चिथावला असावा ! त्या सदहेतूला प्रतिसाद म्हणून सचिननेही त्याच्याकरवींच स्वतःला बाद करून घेतलं असावं !! Wink ]

बाबो! बॅट्स्मन फिरवायला बघत आहेत हे खरं असलं तरी काय जबरी बॉल टाकून राहिलाय मुस्ताफिझुर!
मला तर वसिम अक्रमचीच आठ्वण येतेय. एकदम बॅलनस्ड अ‍ॅक्शन अन एक्युरेट गूड लेंत पिचिंग. मारायला गेला बॅट्स्मन की हमखास बीट होऊन बॉल बरोबर स्टंपच्या वरच्या बाजूला लागणार.

मुस्ताफिझुर.....५ विकेट्स पैकी ४ त्रिफळाचीत.... फार प्रभावी गोलंदाजी केली या बांगला खेळाडूने. न्यूझिलंडचे ८ बळी झाले...त्यात ६ त्रिफळाचीत आहेत हे विशेषच.

सामन्याच्या निकालाचा न्यूझिलंडच्या पुढील वाटचालीवर काही परिणाम होणार नसला तरी जर बांगलादेशाने विजय मिळविला तर या संघाचे खेळाडू घरी परतताना आनंदाने बहरून जातील.

मुस्तफिझूरने गोलंदाजीवर जे यश मिळविले ते बांगलादेशचे फलंदाज बेतालपणे घालवित आहेत असेच दिसत्ये. दहावे षटक सुरू झाले....३८ धावा आणि मातब्बर असे ४ फलंदाज तंबूत परतलेसुद्धा.

नाउ दॅज इज कॉल्ड स्पिन ! जबरी वाट लावली बांग्लाची. बुंवाच्या भाषेत लिहायचे तर, पुंग्याच टाईट करून टाकल्या. तो सोधीचा बॉल कसला जबरी होता. आणि आत्ताचा ग्रांटचा बॉल. त्यालाही कन्फुज झालं.

NZ खरे तर ह्या पिचेचसा योग्य वापरत करतेय. आपलीही हवा टाईट करून टाकली होती त्यांनी.

भज्जी हवा बॉस. भज्जी, जडेजा आणि अश्विन मिळून मग ऑसीजच्या पुंग्या टाईट करतील. Lol बुमराहला एक मॅच बसवायला हरकत नाही.

This is perfect as Bangladesh has to score the same exact runs as the previous match with India.
Tells us exactly where we fell short and why the match dragged on to the last over. New Zealand has not dropped a single catch (?), the bowlers have been bowling a tight tight line.

८ बाद ५८ अजुन किती वाईट अवस्था !!

त्या मानाने आपल्या गोलंदाजांनी खुप अगदी आपल्या कंठाशी प्राण येई पर्यन्त खेळू दिलेले बिचार्‍यांना!

अर्थात आपण सोडलेल्या किमान ३ झेलांचे योगदान तेवढेच होते!!

भज्जी हवा बॉस. भज्जी, जडेजा आणि अश्विन मिळून मग ऑसीजच्या पुंग्या टाईट करतील. >>>

केदार, ते तुम्हा आम्हाला आणि न्युझिलंडला कळते ते ३-४ क्वालिटी स्पिनर खेळवितात.. आमच्या कर्णधार साहेबांना भज्जी आठवायला हवा ना! बहुतेक फायनलला जर गेलो तर खेळवू तो पर्यन्त हुकमी एक्का झाकून ठेवू असा धूर्त विचार असेल!!

बांग्ला ७० ऑल आऊट!

This is perfect as Bangladesh has to score the same exact runs as the previous match with India >>

बुवा, पहिले म्हणजे लॉजिकच गंडलेले आहे. एकसारखे रन्स असतील म्हणजे एकसारख्या सिच्युएशन्स असतील असे नाही.

बरं ते ही घेतले तर बांग्लाने पहिल्या १२ ओव्हर्स मध्ये ऑलमोस्ट १०० धावा केल्या होत्या. त्यांच्या कॅच सुटल्या हे मान्य आहेच. पण बहुतांश स्ट्रोक्स हे क्लिअर होते.

ells us exactly where we fell short and why the match dragged on to the last over >>

व्हाय? यु नो इट. इन दॅट सिच्युएशन्स आपण पहिल्या काही ओव्हर्स मध्ये नीट खेळलो नाही.
कॅच सोडल्या का? हो. पण केवळ कॅचच सोडल्या हे कारण तर होऊ शकत नाही ना? इटस व्होलसम थिंग
ते आउट झाले असते तर धावा झाल्या असत्या का? नाही.

जसे ..

बॉल टर्न होत होता का? हो.
पिच बांग्ला बॅटिंगच्या वेळी बदलली होती का? नाही.
बांग्ला आपल्या स्पिनला नीट खेळत होती का? (पहिल्या ओव्हर्स मध्ये) - हो.

पण ते आउट झाले म्हणजे आम्ही कमी रन्स केले हे जस्टीफाय कसे करणार? माझा मुद्दा हा आहे. आणि तू दोन्ही वेळी वेगळेच काही तरी लिहित आहेस की त्यांच्या कॅच वगैरे उडाल्या. अरे हो उडाल्या. पण ते वेगळे आहे भाऊ.
--

आय मिन वी आर नॉट दॅट ग्रेट एनिमोअर विथ स्पिन हे लक्षात यायला का त्रास व्हावा. ( बॅरिंग व्हेरी फ्यु बॅट्समन्स)

अ‍ॅपल टू ऑरेंज कम्पॅरिझन मला जनरली आवडत नाही, पण तुमचेच लॉजिक लावायचे तर ..

तीच NZ आपलल्याही लो स्कोअरींग मध्येच हारवू शकली. ह्याचे कारण केवळ त्यांचे स्पीनर्स नाही तर आपली हारकिरी आहे. जस्ट पहिल्या काही विकेट परत एकदा बघ. धवनला बॉल नाही कळाला, रोहित कॅजयुल पुढे गेला अन स्टम्प, रैनाला काय करायचे हे नाही कळाले.

रिपिटेडली मी म्हणतोय की बांग्लादेश आणि ह्या वरच्या मॅच मध्ये आपण अजून जास्त स्मार्ट खेळू शकतो. त्यांनी आपल्याला हारवले ( किंवा बांग्लासोबत आपण जिंकलो) ह्यात आपले मोस्टली बॅटिंग फेल्युअर आहे.

-

नाऊ हॅविग सेड धीस - आपण जनरली बिल्डाप १२ व्या ओव्हर नंतर करतो. पण स्मार्ट टीम्स अ‍ॅडॉप्ट करतात. त्या दोन मॅच मध्ये आपले बॅटसमन अ‍ॅडॉप्ट करू शकले नाहीत.

आणखी एक उदाहरण म्हणजे भारत - पाक बॅटिंग. त्याच विकेट वर कोहली ज्या पद्धतीने खेळला, त्या पद्धतीने कोणीच नाही खेळले. ही वॉज आयदर वेटिंग ( ९०%) ऑर किलिंग द स्पीन. म्हणून त्याची ती खेळी ग्रेट. त्याला ती पीच मुंबई किंवा चंदीगडची "भासत" होती आणि इतर जण चाचपडत होते. अगदी युवी पण पहिले काही बॉल चाचपडला, पण दोघांनी पेशन्स दाखवला.

बांग्ला आणि एन्झी सोबत आपण नीट बॅटिंग केली नाही. हेच काय ते तात्पर्य. खोडायच्या आधी परत एकदा इनिंग ऑब्जेटिक्वली बघ.

होप मी माझा पाँईट दोनदा क्लिअर केला आहे. मी "आपल्या बॅटिंग बद्दल बोलतोय" दोन्ही वेळेस वी कुड हॅव डन लॉट बेटर. पण आधी लिहिल्यासारखे तुला हे मान्य नसेल तरी ओके.

तुला काय म्हणायचे ते तेव्हाच कळलं होतं भौ.
लॉजिक गंडलेलं? Lol कीपरला मंकड कराय्ची घाईच फार हो तात्या तुमची. Proud
आजचं पिच तेव्हा इतकं गंडलेलं नव्हतं तरीयन्झीवाल्यांना १४६ च कसे काय जमले फक्त?
तुम्ही येऊन म्हणालात(बांग्लानी चांगली सुरवात केल्यावर) की बांग्ला खेळू शकले अन आपण नाही, त्यावर मी म्हणत होतो the pitch was difficult to play. We could see our players being surprised with balls not coming on to the bat. When you can't continue to hit the ball around the field, it puts pressure on the players and they look to hit the ball and that's when wickets fall. Some like Kohli still power through but it's still hard.
Now if you look at our bowling. Bangladesh was on the same wicket and we could've finished them off way way early just like NZ did but we failed to capitalize on the opportunities we got and that almost cost us the match. As Asaami and Bhau pointed out, I'd still give credit to our players for holding their nerves at the end and coming out on the top.
How difficult is this to understand? Lol
Your point on our batting failed us is a bit too naive for a guy who watches this much cricket. Proud

कीपरला मंकड कराय्ची घाईच फार हो तात्या तुमची >> काहीही. मी म्हणलं बॉलर करतो मंकड, तुम्ही नीट वाचत नाहीयेत. आणि भलतेच वाक्य माझ्या तोंडात टाकत आहात. असो.

Now if you look at our bowling. Bangladesh was on the same wicket and we could've finished them off way way early just like NZ did but we failed to capitalize on the opportunities we got and that almost cost us the match. >>

How difficult is this to understand

परत तेच ! अहो आपली बॅटिंग आणि आपली बॉलिंग दोन्ही वेगळे आहेत. मी जे म्हणतोय ते .. असो. आय गिव्ह अप नाऊ.

I'd still give credit to our players for holding their nerves at the end and coming out on the top. >>

आर यु सेईंग आय अ‍ॅम नॉट गिव्हिंग? ओके. व्हेअर डीड आय डिनाय? इनफॅक्ट असामीनेच "तात्या तुम्ही मनातून लिहित आहात की कसे? असे विचारले? अ‍ॅन्ड आय वॉज सरप्राईज्ड. म्हणजे परत जे मी लिहित / बोलत नाही ते तुम्ही माझ्या तोंडात टाकता आहात.

आपल्या विकेट पाहा असे मी आधीही लिहिले आहे. आपण कॅज्युअली आउट झालो (आपले मेन बॅट्समन) - हे पचायला खूप अवघड असू शकते. असो.

मी पहिलेही लिहिले होते की इट्स माय पाँईट ऑफ व्हियू आणि आज परत तुम्ही विषय काढल्यावर परत तेच लिहिले की तुला मान्य नसेल तर ओके. पण तरीही OK. you are right.

Your point on our batting failed us is a bit too naive for a guy who watches this much cricket. >>

नाउ सिन्स यु डीड ब्रिंग इट ऑन द टेबल विथ नाईव्ह थिंगी हिअर इज माय आन्सर. Proud

दॅट्स द पाँईट - आय वॉच इव्हरीथिंग आणि त्यामुळेच मी थोडेसे वेगळे मत मांडण्याचे धाडस केले, जे कधी कधी पाहणार्‍याला लगेच कळेल असे नाही. दे माईट नीट टू गिव्ह इट अ थॉट. चांगल्या बॉलला आउट होणे आणि कॅज्युअली आउट होणे हा फरक त्याच त्या बॅटसमनला नेहमी पाहणार्‍याला कळेल. इन दोज शॉट्स ( ज्या मी वर लिहिल्या आहेत) ते कमिटेडच नव्हते. कन्फुज्ड होते. मी बॉलिंगबद्द्ल लिहित नाहीय. त्यामुळे त्यांनी किती धावा केल्या ते गैरलागू आहे.

जुना क्रिकेट बाफ वाचलास तर भाऊंनी देखील लिहिले आहे की "आपण आता तेवढे चांगले स्पीन (अपवाद वगळता) खेळू शकत नाहीत"

- माझ्याकडे अजून ह्यापेक्षा नविन काही नाही. त्यामुळे तुला चर्चा हवी असेल, "तर त्यांना आउट करणे" सोडून बॅटिंग बद्दल चर्चा केलीस तर नक्कीच सहभागी होता येईल. Happy

दॅट्स द पाँईट - आय वॉच इव्हरीथिंग आणि त्यामुळेच मी थोडेसे वेगळे मत मांडण्याचे धाडस केले, जे कधी कधी पाहणार्‍याला लगेच कळेल असे नाही. दे माईट नीट टू गिव्ह इट अ थॉट. चांगल्या बॉलला आउट होणे आणि कॅज्युअली आउट होणे हा फरक त्याच त्या बॅटसमनला नेहमी पाहणार्‍याला कळेल. इन दोज शॉट्स ( ज्या मी वर लिहिल्या आहेत) ते कमिटेडच नव्हते. कन्फुज्ड होते. मी बॉलिंगबद्द्ल लिहित नाहीय. त्यामुळे त्यांनी किती धावा केल्या ते गैरलागू आहे >>>>>

यात "मराठी" कुठले आणि इंग्रजी कुठले याचे मार्गदर्शन कोणी "जाणकार" करू शकेल का?

तात्या, बुवा तुम्हा दोघांना एकच सांगावेसे वाटते, 'शांत गदाधारी भीम शांत' Wink बुवा तुम्ही देहमंडिरामधे जाऊन या, तात्या तुम्ही सायकलवर टाअंग मारा (नि माझ्या मेसेजेस ला रिप्लाय करा जरा). Jokes apart, both of you have valid points and are correct in their own accord.

Alright alright. I won't say I agree with what you say because I don't but I'll be clear, my intent is not to start an argument or anything. Happy
I think, if after 4-5 posts each (they too are a bit too much I think)
if there's still a disagreement, it's a given the only option left is to agree to disagree.
(Also, I was not saying you were not giving them credit, it was only a sentence I wrote in the flow)

असामी Lol

अरे पण आमचे हे फ्रेन्डली आर्ग्युमेंट आहे. ( म्हणजे माझे तरी Wink गदा बिदा कशाला लागतीये?

मायबाप - हो चुकले लिहिण्याच्या ओघात. ज्या वेगात विचार करतो त्याच वेगात लिहिता येत असते तर बरे झाले असते.

it's a given the only option left is to agree to disagree. >> तेच तर. म्हणून कालच्याच पोस्ट मध्ये मी ते लिहिले. पण आज तू परत लिहिलेस Happy

मस्त फाइट दिली श्रीलंकेने!! मॅथ्यूज ला स्ट्राइक शेवटी नेमका कमी मिळालाआणि २-३ विकेट्स पण पडल्या, नाहीतर हवा टाइट केली होती त्याने इंग्लंड ची!!

श्रीलंका जिंकली असती तर लंका आफ्रिका सामना बघायला मजा आली असती..
पण ठिकाय. चांगली टीम पुढे गेली. कॅचेस विन मॅचेस. सेकंडलास्ट ओवरला रूटने त्या नवीन पोराची कॅच पकडली ती निर्णायक ठरली. मॅथ्यूजबद्दल वाईट वाटले, पण त्याला पर्याय नव्हता. त्याला शेवटच्या षटकात धोनी बनायचे होते. वन टू वन करायचे होते. पण त्याला ते जमले नाही. स्ट्रोक्सनेही उत्तम बॉलिंग केली. एखादा डेल स्टेन सारखा असता तर पट्ट्यात चेंडू मिळाले असते.

टी-२०चे सामने पाहिल्यावर मला अधिकाधीक तीव्रतेने असं वाटतं कीं 'खेळाचं कसब + रांगडा आत्मविश्वास [ street smartness]' हीच टी-२० मधील यशाची गुरुकिल्ली असावी ! आपल्या संघांत कमी-अधिक प्रमाणात हे घटक सगळ्याच खेळाडूंत असले तरीही मला तरी धवन व पंड्या यांच्या देहबोलीत व खेळात हे खच्चून भरल्याचं प्रकर्षाने जाणवतं. [ पंड्याच्या बाबतीत याची झलक बंगलाच्या विरुद्ध पहायला मिळाली]. रोहित हा अफलातून फटकेबाज असला तरीही तो ' street smartness'मधे कांहींसा कमी पडत असावा व म्हणून आपली सुरवात चांगली होण्यात खिळ पडत असावी. [ याबाबतींत, रैना हा रोहितपेक्षां सरस वाटतो]. गोलंदाजीलाही हाच निकष लागतो असं मला वाटतं.[ म्हणूनच, टी-२०मधे स्टेन निष्प्रभ ठरतो व गेल महत्वाच्या विकेट घेवून जातो !]. अश्विन हा याबाबतींत निश्चितच सरस आहे पण बुमराह मात्र ' street smartness'मधे कांहींसा कमी पडत असावा. कर्णधार म्हणून धोनी 'खेळाचं कसब + रांगडा आत्मविश्वास [ street smartness]' याचं मॉडेलच आहे [व त्याच्या फलंदाजीचा तर तो कणाच आहे] म्हणूनच तो सातत्याने विजयी होत असावा.
एवढ्या विस्ताराने हें मांडण्याचा उद्देश माझा स्मार्टनेस दाखवणं हा नाही [ निदान, मुख्य उद्देश तरी तो नाही :डोमा:]. मला वाटतं, यापुढील सामन्यांतील स्पर्धक पहातां, आपल्या खेळाडूनी, विशेषतः फलंदाजानी, फक्त तंत्रशुद्ध खेळण्यापेक्षां अधिक रांगड्या आत्मविश्वासानेही खेळणं आवश्यक व अपरिहार्य ठरणार आहे. अर्थात, हें दुधारी हत्यार आहे व तें वापरताना जखमी होण्याचीही शक्यता आहेच. पण आपली सखोल फलंदाजी पहातां, तो धोका आत्मघातकी ठरण्याची शक्यता किमान आहे. पण असा आक्रमक व रांगडा पवित्रा न घेणं मात्र पुढील स्पर्धेत खतरनाक ठरूं शकतं. प्रेक्षक म्हणून आपणही असं खेळणार्‍या खेळाडूंच्या एखाद्या सामन्यातील अपयशाला नेहमीचे निकष न लावतां समजून घेणंही आवश्यक ठरणार आहे.

Pages