Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
dhoni is really street smart
dhoni is really street smart and so down to earth.... as always!
पोस्ट मॅच मध्ये पण मस्त बोलला तो!
या टीममध्ये सगळ्यांना से आहे हे जाणवत होते शेवटच्या काही ओव्हर्समध्ये...... नेहराला एव्हढा involve मी कधीच बघितले नव्हते
आज आपण जिंकलो म्हणण्यापेक्षा
आज आपण जिंकलो म्हणण्यापेक्षा बांग्लादेश आपल्या कर्माने हरले म्हणणं जास्त योग्य वाटतंय.
शेवटच्या ओव्हर मधे दोघं जण हिरो बनायचा प्रयत्न करण्यात गेले.
हे आउट मंकड रुलचे नाही >>
हे आउट मंकड रुलचे नाही >> तात्या, अहो धोनी मंकड नव्हता करणार, पंड्या करणार होता.
>>हे आउट मंकड रुलचे नाही >>
>>हे आउट मंकड रुलचे नाही >> तात्या, अहो धोनी मंकड नव्हता करणार, पंड्या करणार होता.<<
तात्या, अहो धोनी मंकड नव्हता
तात्या, अहो धोनी मंकड नव्हता करणार, पंड्या करणार होता.
>>>
अरे अश्विनने पंड्याला सांगितले की तू मंकड कर फार पुढे निघाला नॉनस्ट्राइकर तर.
मित +१ ! अगदी नेलबाईटिन्ग
मित +१ ! अगदी नेलबाईटिन्ग मॅच, शेवटच्या ३ बॉल मधे मॅच अशक्य फिरली...
चिते की चाल बाज की नजर और
चिते की चाल
बाज की नजर और .......
.
.
.
.
धोनी की स्टंपींग पर कभी संदेह नही करते. कभी भी मात दे सकती है.
- whatspp
dhoni is really street smart
dhoni is really street smart and so down to earth.... as always!
+ 786
कमालीची चतुराई प्रसंगावधान टेंपरामेंट जजमेंट आणि बरेच काही दाखवले त्याने त्या शेवटच्या चेंडूला.
आणि त्याचे स्टंपिंग म्हणजे फलंदाजांसाठी एक सापळाच असतो.
जेव्हा भारतासाठी काहीही घडत नसते आणि काहीतरी घडण्याची प्रचंड गरज असते तेव्हा त्याची एक स्टंपिंग विकेट येते. तो फलंदाजाच्या कानात काही कुजबुजून तर त्यांना चूक करायला भाग पाडत नाही ना अशी शंका येते
द्धा | 23 March, 2016 - 11:30
द्धा | 23 March, 2016 - 11:30 नवीन
मंकड म्हणाजे काय ? >> non striker बॉल टाकायच्या आधी बाहेर निघाला start घेऊन तर त्याला बॉलरने बॉल न टाकता run out करणे. विनू मंकडने पहिल्यांदा केले म्हणून मंकडींग म्हणतात त्याला.
<<<<<
खरेतर हे पहिल्यांदा कॅप्टन रसेलने केले आहे. टिपू म्हणजे पर्यायाने इस्माईलला आऊट करताना. फिदीफिदी
<< Shra,
spot on
ओह! कॅप्टन रसल! माझी आता
ओह! कॅप्टन रसल! माझी आता ट्युब पेटली.
माझ्या एका मायबोलीकर फ्रेंडनी टाकलेला जोक आठवला.
इंटरव्युअर: कॅन यु डु अ ब्रिटिश अॅक्सेंट
कँडिडेटः यपः
इंटरव्युअरः से समथिंग
कँडिडेटः डूगना लगान डेना पडेगा!
मायबाप, तुमचे विचार सई
मायबाप, तुमचे विचार सई ताम्हणकर सारखे आहेत. ती सुद्धा एबीपी माझाच्या क्रिकेट चर्चेला आली होती तिथे असेच बोलत होती. की आजच्या विजयाने तिला निराशच केले.
असो, बांग्लादेशला लिंबूटिंबू समजायचे दिवस केव्हाच लोप पावलेत. भारतीय उपखंडात तर तसे करणे गुन्हा ठरेल.
उलट बांग्लादेश प्रतिस्पर्ध्यांना जास्त टेंशन देते. एकतर तिला सहज हरवणे आता तितकेसे सोपे राहिले नाही. पण हे पब्लिक समजून घेत नाही. त्यामुळे होते काय तर त्यांना हरवले तरी कोणी कौतुक करत नाही. पण हरलो तर शिव्या नक्की पडतात. हा एकप्रकारचा दबावच असतो.
इंटरव्युअर: कॅन यु डु अ
इंटरव्युअर: कॅन यु डु अ ब्रिटिश अॅक्सेंट
कँडिडेटः यपः
इंटरव्युअरः से समथिंग
कँडिडेटः डूगना लगान डेना पडेगा!
<<
श्र च्या जोक नंतर " मां , दीपू काहे वापस आ रहा है' आठवून जाम हसु आलं !
२००३ च्या वर्ल्डकपमध्ये
२००३ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात ऑस्ट्रेलिया रडतपडतच हरले होते. ऑस्ट्रेलियाचे सर्व मोहरे फेल गेले असताना अँडी बिचेलने अवचित अष्टपैलू खेळ करून विजय मिळवून दिला होता. तरीही ती टीम चँपियनच होती. कधीकधी असे दिवस येतात. आज तर आपल्या लोकांनी ऐन मोक्याच्या क्षणी विजय खेचून आणला. बांग्लादेश विल बी स्कार्ड बाय धिस व्हिक्टरी फॉर अ लाँग टाईम. असे असताना आपण स्वतःसाठी का बरे दु:खी व्हावे? शारजामध्ये पाकिस्तान लास्ट बॉलवर जिंकल्याने ते दु:खी झालेले का? भारतीय टीम विजयासाठी झगडून अखेरच्या क्षणाला तो मिळवते आहे, हे बघून मला तर खूपच आनंद झाला.
झालेच तर १९९९ सेमी
झालेच तर १९९९ सेमी ऑस्ट्रेलिया-आफ्रिका पण आहेच.
श्र ते विस्डेन ने अजून
श्र ते विस्डेन ने अजून रेकॉर्ड मधे घेतले नाही. माजोरडे कुठले. स्वतः हरले होते ना, म्हणून. असा एक व्हॉअॅ मेसेज तयार करून पाठवून देतो.
धोनीची लास्ट बॉल ट्रिक जबरी होती. स्टंपिंग मात्र मटका होता. कारण त्याच फक्त सेकंदाला दोन्ही पाय हवेत होते. त्या आधी व त्या नंतर जमिनीवर होते. धोनीने एकाच स्पॉण्टेनियस अॅक्शन मधे बॉल स्टंपला लावणे व त्याच वेळेला दोन्ही पाय हवेत, हा योगायोग. तरीही धोनीने मुळात वेगात अॅक्शन घेणे आवश्यक होते आणि त्याशिवाय तो आउट झाला नसता हे खरे.
भा - सहमत. उलट मला वाटते की टफेस्ट टेस्ट झाली आता. पुढच्या मॅचेस मधे सगळ्यांचे फॉर्म्स परत येतील. तेवढी पिचेस जरा लाइव्हली बनवा म्हणावं.
नेहरा दिसतो त्याच्यापेक्षा
नेहरा दिसतो त्याच्यापेक्षा बराच भक्कम असावा. तो एवढा तमीम येउन धडकला व खाली पडला तरी हा जेमतेम अर्धा फूट फक्त हलला
फा, तुला राजभोग च्या
फा, तुला राजभोग च्या चंद्रकलेचा एक पुडा, टावेल टोपी देइन बघ हे सग्ळं खरं ठरलं तर!
भाचा, प्वाईंटेय तरी भिती वाटते, काय करु?
बुवा . मोहाली ला सहसा स्विंग
बुवा :D. मोहाली ला सहसा स्विंग व बाउन्स वाली विकेट असते. पण इतक्यात कधीतरी स्लो विकेटही पाहिली होती. होपफुली तो अपवाद असेल.
हौ, पाक विरुद्ध ईडन गार्डनला
हौ, पाक विरुद्ध ईडन गार्डनला पण टर्न होता पण अशी विचित्र नव्हती विकेट. मस्त फास्ट पाहिजे! सपासप बॉल आले पाहिजेत, मग शर्मा, युवराज ला खेळायला जरा फ्लो येइल.
बुवा, ओव्हरकॉन्फिडन्स नकोच.
बुवा, ओव्हरकॉन्फिडन्स नकोच. सुधारणा व्हायला हवी, पण विजयाने निराश होणे हे जरा उगाच वाटते. अश्विनने शाकिबची विकेट काढणे, बुमराहची ओव्हर, शेवटचा बॉल, हे सगळे की मोमेंट्स होते, ते आपण सिझ केले, हेही खरेच आहे. तेवढे प्रेशर सोक करणे सोपे काम नाही. टीम स्पिरीट खूप दिसली. विशेषतः गेल्या काही वर्षांतील भारतीय टीम ही मोक्याच्या क्षणी खेळ उंचावते. एकहाती मॅच जिंकवणारे मोहरे आहेत. पुढच्या मॅचेससाठी चांगले पिच येऊन टॉप ऑर्डरला सूर गवसला, की खेळ अजूनच चांगला होईल, अशी आशा तर नक्कीच अस्थानी नाही.
बुवा, आता जरा पुडे इकडे पण
बुवा, आता जरा पुडे इकडे पण येऊ द्यायचं जरा ...
हो त्या झोपाळू बुमराला जबरी
हो त्या झोपाळू बुमराला जबरी सपोर्ट करत होते.
बाय द वे - आश्विन पेक्षा जडेजा जास्त लायक होता ना मॅन ऑफ द मॅच ला? त्यानेही आश्विन इतकीच चांगली बोलिंग केली, आणि भन्नाट फिल्डिंग व कॅच ही. चेंडू मुळातच हातभर वळत होता, त्यामानाने आश्विन चे एवढे कौतुक नाही. कॅच ही सोडला त्याने एक.
धोनी सुद्धा बेस्ट कॅण्डिडेट होता.
हौ भाऊ! तुलाही पाठवतो पुडे.
हौ भाऊ! तुलाही पाठवतो पुडे.
तिकडे इंग्लंडचा पण आपल्या सारखाच थोड्क्यात बँड वाजायचा राहिला वाटत. ओझरती बातमी पाहिली मी.
हौ, मलाही आश्चर्य वाटलं. आय टू थॉट जडेजा वुड गेट इट. रन पण काढले ना?
धोनी, टोटल रिस्पेक्ट!
फा, त्यांनी मुशफिकुरचा कॅच
फा, त्यांनी मुशफिकुरचा कॅच घेणार्या (न सोडणार्या) धवनला दिले असते, तरी काही हरकत वाटली नसती.
मला तरी अश्विनच जास्त आश्वासक वाटला. कधीही रनरेट प्रमाणाबाहेर जायची भीती वाटली, की अश्विन येत होता. त्यामानाने जडेजाच्या ओव्हर्स ह्या न्यूकमर्सना आणि काहीशा अश्विनच्या छायेत धोनी पटपट काढून घेत होता असे वाटले.
धोनी पण चांगला कँडिडेट होता. त्याने शेवटी पिचला ओळखून ज्या रन्स काढल्या त्याही महत्वाच्या ठरल्या.
कालची सोडी कॅच सोडी मॅच असे
कालची सोडी कॅच सोडी मॅच असे होता होता टळले!
आता ऑसी विरुद्ध हा एकमेव पर्याय शिल्लक!
माझ्या मतें एक महत्वाची गोष्ट
माझ्या मतें एक महत्वाची गोष्ट -
सामन्यापूर्वी प्रत्येक तज्ञ [ सेहवाग, लक्ष्मण इ.इ.] हेंच सांगत होता कीं विकेट बॅटींगसाठी आदर्शवत आहे व रोहित, धवन, रैना व युवी याना फॉर्ममधे येण्यास सुसंधी देणारी आहे. या अपेक्षेनेच मैदानात उतरलेल्या रोहित व धवनला अचानक विकेट नेमकी उलट 'बिहेव्ह' करतेय हें लक्षांत आल्यावर तीच्याशीं जुळवून घेण्यात अडचण आली व त्यांतच कांही षटकं गेलीं हें स्पष्ट होतं. त्यामुळे धांवसंख्येवर परीणाम होतोय हें लक्षांत येतांच त्यानी धोका पत्करून शॉटस मारणं अपरिहार्य होतं व त्यांतच त्यांच्या विकेटस गेल्या. कोहलीचंही तेंच झालं. उलटपक्षीं, बंगलादेश बॅटींगला उतरला , तो खेळपट्टीची पक्की जाणीव ठेवूनच व त्यामुळे 'पॉवरप्ले'मधेच फटकेबाजी करून घ्यायची हें ठरवूनच. बंगलादेशला हा मोठाच अॅडवांटेज होता हें लक्षांत घेतल्यावर भारताचा विजय कौतुकास्पदच ठरतो.
कालच्या माझ्या पोस्टीवरुन
कालच्या माझ्या पोस्टीवरुन पुढे..
संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त बांगलादेशचीच होती. त्यांच्या बॅटिंगच्या १९ व्या ओवरपर्यंत ! शेवटच्या ओव्हरमधेही त्या दोघांनी भावनेच्या आहारी न जाता, धोनी स्टाईल ने चौकार-षटकार मारुनच सामना संपवायचा असा अट्टाहास धरला नसता तर ते आरामात जिंकले असते. ह्याच वेळी संपूर्ण मॅच मधे अभावाने दिसलेले भारताचे टीम स्पिरीट दिसले . बांगलादेशने भारताच्या दिग्गज फलंदाजांना अचूक गोलंदाजी आणि कमालीचं क्षेत्ररक्षण करुन मोठी भागीदारी करण्यापासून तर रोखलंच, ठराविक अंतराने विकेटस काढत धावफलकावर ब्रेक लावला आणि प्रेशर राखून ठेवलं. नंतर बॅटिंगला उतरल्यावर सुद्धा १ बॉल - १ रन ही मायकल बेवन टेक्निक वापरुन सतत धावफलक हलता ठेवला, आणि अधून मधून चौकार-षटकार मारत गोलंदाजांवर आणि क्षेत्ररक्षकांवर प्रेशर बनवत राहिले. त्यात दिशाहीन गोलंदाजी, सोपे झेल सुटणे असले प्रकार झाले.
शेवटच्या बॉलवर मात्र धोनीने तो काय चीज आहे, हे दाखवून दिलं !
येणार्या पुढच्या सगळ्या सामन्यात भारताला बेसीक गोष्टी वर परत अभ्यास करावा लागणार. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आपल्या संघाने नोंदवल्या असतीलच. त्यानुसार पुढच्या अतितटीच्या सामन्यात खेळतील अशी अपेक्षा ठेऊया.
बंगलादेशला हा मोठाच
बंगलादेशला हा मोठाच अॅडवांटेज होता हें लक्षांत घेतल्यावर भारताचा विजय कौतुकास्पदच ठरतो.>>>
भाऊ, तुमचे म्हणणे पहिल्या मान्य! पण जे कॅच सोडले त्यामुळे मॅच प्रचंड अवघड करुन घेतली! तमीम ला दोन जीवदाने! नंतर एका षटकात त्याने घेतलेला खरपूस समाचार अश्विन ने सोडलेला हातातला पेढा! ह्यावर मात करणे अत्यावश्यक काराण काल मोठ्या फरकाने सामना जिंकणे आवश्यक होते रण रेट साठी...
अनिश्चितता हा क्रिकेटचा भाग म्हटले तरी आयपीएल सह अनेक सामन्यांचा अनुभव असलेल्या भारतीय खेळाडूंकडून अपेक्षित नाही! जर फिरकीला अनुकुल खेळपट्ट्या आहेत तर नेहरा ऐवजी भज्जी संघात असणे जास्त श्रेयस्कर!
<< पण जे कॅच सोडले त्यामुळे
<< पण जे कॅच सोडले त्यामुळे मॅच प्रचंड अवघड करुन घेतली! तमीम ला दोन जीवदाने! >> हें तर अक्षम्यच !
कुठे लिहू हे न समजल्यामुळे
कुठे लिहू हे न समजल्यामुळे इथे लिहितोय.
इपिक चॅनेल वर सोम. ते शुक्र. रात्री १० वाजता 'मिड विकेट टेल्स' नावाचा कार्यक्रम लागतो त्यामध्ये नसिरूद्दीन शहा भारतीय क्रिकेट मधील ऐतिहासिक घटना दाखवतो. मस्त कार्यक्रम आहे. अवश्य बघा!
Pages