रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायु ,
मीपन आज कमळ काढले..
टाकेल नंतर रांगोळी..
सर्व रांगोळ्या छानच Happy

सुंदर आहेत नव्या रांगोळ्या.

टीना, ठिपक्यांच्या रांगोळ्या रंगवायच्या आधी पण एक फोटो काढशील का? म्हणजे एक-एक आकार कसे बनवत जायचे याची आयडिया येइल.

आधीच्या पानावर तू दिलेली ९ ते १ (पणत्या आणि भोवती महिरप) ट्राय केली वहीवर. पण बरोबर ९ ते १ मध्ये नाही बसली Sad फोटो टाकेन घरी गेल्यावर.

रच्याकने, लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत कागदाला उदबत्तीनं भोकं पाडत घरगुती स्टेन्सिल बनवायचे उद्योग केलेत का कुणी? Happy

डिटेल टाकायचा प्रयत्न करेल मी नक्की..

१५ ते १ कमळाची ना ?

कावा, मस्तच डिझाईन्स..
कंचन, तुम्ही आम्ही नकोच..

bagz, छोटूशी सुंदरच जमलीए..

सिंडी, आम्ही सुईने करायचो हे उद्योग Wink

१५ ते १ पण छान आहे. ट्राय करेन काढायचा.

९ ते १ वालीत केलेली चूक माझ्या लक्षात आली, ती पण सुधरते Happy

bagz पिटुकली रांगोळी छानच...

टीना, धन्स. एका गोड रांगोळी बद्द्ल...:)

मला जाम मज्जा आली, समयां वर समया काढायला...
माझा मो.खराब झालाय, या मो.ची पीक्चर क्वालीटी तेवढी खास नाहिये...

रच्याकने, लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत कागदाला उदबत्तीनं भोकं पाडत घरगुती स्टेन्सिल बनवायचे उद्योग केलेत का कुणी? >> मी करते अजूनही..
Happy Happy

सायु,
कम मे बम्म केलं तू तर..मस्तच जमलयं..

व्हिटी,
भाचीचे उद्योग छान..
तो आकाशकंदील लय्यच्च क्युट .. Happy

Pages