रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो धुसर आहे >>>>> अस लिहु ने सायुतै, स्पेशल इफेक्टच्या नावावर खपवावा हा फोटो.. बाकी रांगोळी न्हेमीप्रमाणेच सुंदर.

सायु मागच्या पानावरील सगळ्या रांगोळ्या सुंदर.. चिऊ ची तर फारच क्युट आहे रांगोळी..नेहमीप्रमाणे रंगसंगती खूपच छान...
अतृप्त सप्तपदी ची रांगोळी खूपच छान

@मुग्धटली >> जमेल की.. दरवर्षी लग्नाच्या वाढदिवशि (आमच्याकडून Wink ) फ़क्त अशी सप्तपदी करवुन घ्यायची..!

अतृप्त तो फक्त कंसात लिहायचा होता ना तुम्हाला Proud आणि मी आयुष्यभर ३६५ दिवस म्हणतेय हो अश्या सप्तपदी बद्दल. ३६४ दिवस काटे आणि एक दिवस फुल... बहुत नाइंन्साफी हय

रावी, हेमा ताई आभार, नक्की प्रयत्न करिन.
अ.आ, मैथीली,शशांक जी खुप खुप आभार...
आत्मबंध (नाव आवडले..:)) सप्तपदी भारीच... खुप फुलं लागले असतील ना!

अग हो, पुण्यात थंडी सुरु झाली की असल भारी वाटत ना. मागच्या महिन्यात आमच्या शाळेत फनफेअर होते तेव्हा सकाळी ७:३० रिपोर्टींग ठेवल होत. ७:०० वाजता घरातुन बाहेर पडले, धुक्यातुन जाताना असल भारी वाटल ना एकदम यश चोप्राची हिरॉईन झाल्यासारख वाटल... Lol

काय एकसोएक रांगोळ्या आहेत.

सायु तुझे कौतुक ग रोज रांगोळ्या काढतेस हे.

आत्मबंध तुमच्या रांगोळ्या खासच असतात.

टिना तुझ्या रांगोळ्या आणि रंग लाजवाब.

काही माझ्या दिवाळीत काढलेल्या रांगोळ्या.

खालची रांगोळी झटपट जवळचीच पाने आणि रानफुले घेऊन मध्ये थोडा रंग टाकून काढली. मी अशीच डिझाईन महणून काढली. पण जेव्हा श्रावणीने पाहीली तेव्हा म्हणाली आई ही महालक्ष्मी काढलीस ना आज? मग मला जाणवले की साधारण तसा आकार झाला आहे.

धन्स ग जागु..
तुझ्या रांगोळ्या पण गोड आहेत, दुसर्‍या रांगोळीतल्या पणत्या खुप आवडल्या.
रानफुल, पान वापरुन काढलेली रांगोळीची कल्पना आवडली.

धुक्यातुन जाताना असल भारी वाटल ना एकदम यश चोप्राची हिरॉईन झाल्यासारख वाटल... Rofl

सायु- फ़ारच सुंदर!
वेगवेगळे प्रयोग सुंदर!.

अ. आ. उर्फ़ आत्मबंध---नाव बदललेत तर तुम्ही! हे नाव मस्तय!
तुमच्या फ़ुलकारी रांगोळ्या नाहिच दिसत मला... नुसती लींक दिसते. छान असणारच!

नेहमी प्रमाणेच अप्रतिम . सायु खरेच स्टेप बाय स्टेप फोटो बघायला आवडेल .मीही रोज रांगोळी काढायचा प्रयत्न करते आहे. फोटो कसा टाकायचा ते कळत नाहीये?

अ. आ. उर्फ़ आत्मबंध---नाव बदललेत तर तुम्ही! हे नाव मस्तय! >> धन्यवाद . Happy

@तुमच्या फ़ुलकारी रांगोळ्या नाहिच दिसत मला... नुसती लींक दिसते. छान असणारच! >> अरे बाप रे! नाहीच का
दिसतेत.. तुम्ही एक काम करा .. फेसबुकावर Parag divekar Hindu Purohit या नावानी सर्च द्या . तेथे मी सगळ्या रामगोळ्या पब्लिकली शेअर दिलेल्या आहेत.

निरा, धनश्री आभार...
धनश्री,स्टेप बाय स्टेपरांगोळी लौकरच सांगीन..:)
फोटोस पिकासा तुन टाकता येतील.

Pages