हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
>>>> स्वाती२, माझ्या एका
>>>> स्वाती२, माझ्या एका मैत्रीणीने इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस चालू केल्यावर दोन तीन वर्षांनी लग्नाचे काम घेणे पूर्णपणे थांबवले. पैशापेक्षा डोक्याला त्रास जास्त असं ती कायम म्हणते. <<<<
नंदिनी, मी अन माझे सासरे, लग्न लावायला सहसा जात नाही... तिथले गोन्धळ्/बेशिस्त/अधार्मिकता बघवत नाही, सहन होत नाही, अन बदलता त्याहून येत नाही. (लग्न लावणारे ब्राह्मण पराकोटीचे "स्थितप्रज्ञ" असावे लागतात, जे असतात, तेच तो तमाशा सहन करु शकतात, अन तरीही इमानेइतबारे समंत्रक विधी करू पहातात.)
अवांतर पोस्ट: (विषयांतर होतय,
अवांतर पोस्ट: (विषयांतर होतय, पण इलाज नाही)
>>>>> कुणाकडे पार्टीला जाताना आपण रिकाम्या हातांनी जात नाही. एकादी वाईनची बाटली, किंवा डेझर्ट्साठी केक किंवा तत्सम काहीतरी नेले जाते. हे झाले 'पाश्चात्यांचे अंधानुकरण'
"आपल्यात", कुणाकडे पाहुणे जाऊन पाहुणचार स्वीकारल्यानंतर निघताना त्या घरातल्या लहानग्यांच्या हातात 'खाऊचे पैसे' देण्याचा प्रघात आहे. <<<<<
इब्लिसा, बेसिकमधेच लोचा आहे. आपल्याकडे, रिकाम्या हाताने कुणाकडेच जाऊ नये असाच प्रघात/नियम्/रुढी/परंपरा इत्यादी आहे जी शाळेत शिकवलीच जात नसल्याने तुम्हालाही कदाचित माहित नसेल, पण अगदि देवळातल्या वा कुठल्याही देवाकडेही जायचे तरीही रिकाम्या हाताने जाऊ नये, अगदी "सुदाम्याचे पोहे" असले बरोबर तरी चालतील अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.
पण हल्ली काये ना की असले काही हे सर्व "बामणान्नी" लादलेले आहे असे म्हणायचा प्रघात आहे.... तेव्हा... ज्याचे त्याने ठरवावे काय करायचे नि काय नाही.
>>>>> आता किमान बर्यापैकी पगार असणार्या दोघांचे एका महिन्याचे उत्पन्न ६०-७० हजार तरी होईल. असे एक दोन महिन्यांचे उत्पन्न एखाद्या सामाजिक संस्थेला देणे एखाद्या सुस्थित दांपत्याला अवघड नाही.<<<<
मी मायबोलीवरुन लांब व्हायचे बर्यापैकी एक कारण हे देखिल होते/आहे की येथिल बहुसंख्य सभासद कोणत्याही गोष्टीचा (स्वतःच्या वा जवळपासच्या) मंथली पन्नाससाठ हजारांच्या इन्कमग्रुपमधुन विचार करतात जेव्हा मी अजुनही आठदहा हजारांमधेच खेळतो आहे, अन त्यामुळे वैचारिक दरी निर्माण होतेच होते. इथेच मायबोलीवर नाही, तर वैयक्तिक जीवनात प्रत्यक्षातील लोकांमधेही जी लोक पूर्वी माझे समान उत्पन्नाची होती, ती वाढून पन्नाससाठ हजारांवर पोहोचली अन त्यांच्या अन आमच्या दैनंदिन बोलीभाषा/गरजा इत्यादीबाबतचे संवाद अर्थातच मिसम्याच होत असल्याने आपोआप्/जाणून्बुजुन दुरावा तयार झाला.
हा परिणाम इथे तरी कुणाकडून मुद्दामहून होतो असे अजिबात नाही, पण प्रत्येकाच्या वैचारिकतेवर त्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रभाव जबरदस्त असतोच असतो, नसणारे विरळा/अपवाद. अन अशा वेळेस "जमवून घेणे" अवघड होते. एक वेगळी "जाणिव" म्हणूनच केवळ हा विषय मांडला, कुणाकडेही बोट वा दोषारोप करीत नाहीये.
लिंबूभाऊ मी आधीच
लिंबूभाऊ
मी आधीच सागितल्याप्रमाणे मला धार्मिक विधींची माहिती नाही आणि जाणून घ्यायचं स्वारस्यसुद्धा नाही. मला माहिती नसल्यामुळे माझ्या जाणत्या काकाला मी मध्ये उभा केला होता पण आपल्या वर्तुणिकेने तो आडवा पाडला. त्या महाशयांनी आपला जात्यंध अभिमान जपण्यासाठीच हि खेळी केली होती आणि त्यांनी भर मंडपात तसे बोलूनही दाखवले. त्याच नशीब एव्हढंच कि मुलीकडची मंडळी जातींच्या उतरंडीवर एक स्तर खाली असून सुद्धा सामाजिक जाणीवेच्या मात्र उच्चतम स्तरावर होती नाहीतर याला साफ आडवा केला असता.
आणखी एक, त्या महाशयांना आणि त्यांना साथ देणाऱ्या इतर लोकांना आपण ज्या परंपरांचा अभिमान वगेरे बाळगतोय त्या परंपरेशी आपल्या समूहाचा काही संबंध तरी आहे का याचा पाठपुरावा करावा अस कधी वाटलेलंसुद्धा नाही. पण आजोबाने बापाला सांगितले, बापाने मुलाला सांगितले यावर यांची अंधश्रद्धा.
आमच्याकडे एक म्हण आहे, ''पाणी घाल म्हटला काय घालायचा, लोंबता काय ता इचारू नको''. अर्थात पाणी घालायला सांगितले कि फक्त पाणी घालायचे, काय लोंबते आहे ते विचारू नको. या म्हणीचा मला गवसलेला अर्थ विशद करून सांगतो.
एखाद्या वृद्ध माणसाला आजारपणात त्याचा नातू ढुंगणावर पाणी घालताना कुतुहलाने विचारतो, ''आजोबा हे लोबतेय ते काय हो'', तेंव्हा आजोबाला काहीही न सुचल्याने वरील उद्गार काढतो.
टीप: इथे खूप सारे मालवणी लोक असल्याने याचा एखादा वेगळा अर्थ असल्यास सांगावा. यातील अश्लीलतेकडे दुर्लक्ष करून चांगलाच अर्थ घ्यावा.
''बुद्ध वाचला पाहिजे''!
सुनटुन्या, माझ्या
सुनटुन्या, माझ्या पोस्टचा/मजकुराचा राग येऊ देऊ नका बर का...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याचमुळे मी या धाग्यावर प्रतिपादन करतोय परत परत कि लग्नात ज्यांचे लग्न आहे त्यांनी केवळ बाहुलाबाहुलिप्रमाणे अंतरपाटासमोर उभे रहाणे व नटणे थटणे याव्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहारातही तितकाच धडाडीचा सहभाग दाखविला पाहिजे... वर बर्याच उदाहरणात एक वाक्य रिपिट होतय, आशय असा की "आमच्याकडे अजुनही मोठ्यांच्या शब्दाबाहेर जात नाहीत",, तर वाढल्या वयाच्या घोडनवरे अन घोडनवर्यांकडून रास्त कारणांकरता थोडीफार मोठ्यांच्या शब्दाबाहेर जाण्याची अपेक्षा वावगी ठरणार नाही.
तुमच्या वेळचा प्रसंग अवघड खराच. कसे काय तोंड दिले असेल तुम्ही उभयतांनी, तुम्हालाच ठाऊक. मला तर वाचूनही अंगावर काटा उभा रहातो, अन हात शिवशिवतात. फक्त दोघान्नीही हे विसरून जाणेच श्रेयस्कर.
लग्नात ज्यांचे लग्न आहे
लग्नात ज्यांचे लग्न आहे त्यांनी केवळ बाहुलाबाहुलिप्रमाणे अंतरपाटासमोर उभे रहाणे व नटणे थटणे याव्यतिरिक्त प्रत्यक्ष व्यवहारातही तितकाच धडाडीचा सहभाग दाखविला पाहिजे.>>>> +१११११११११११११११११
कधी नव्हे ते या आणि
कधी नव्हे ते या आणि हेल्मेटसक्तीच्या बीबी वर लिंबूटिंबूची मतं पटतायत.
वरदा, ती पोस्ट लिहीताना
वरदा, ती पोस्ट लिहीताना माझ्या मनात एक ठुसठूस होती, ती म्हणजे ज्या मुली स्वकष्टाने नोकरी वगैरे करीत आईबापान्ना विवाहखर्चाला हातभार लावतात, त्यांना या पोस्टमधुन अपवाद कसे करू ! तरीही, बहुतांश ठिकाणी बघण्यात असेही आले आहे की मुलगी कमावुन पैसे साठवून लग्नखर्चाची तजवीज करते पण आपला तथाकथित समाज व कुटुंबव्यवस्था प्रत्यक्ष लग्नाचे बैठकीत या वधुस घेतच नाही. मी तर असेही बघितले आहे/अनुभवले आहे की "आमच्यात ना, बायका या व्यवहारात बोलत्/भाग घेत नाहीत, तशी पद्धत नाही" असेही आहे. आता या कर्माला काय म्हणावे? बरे तर बरे, ही लग्ने पूर्वीसारखे आठदहा वर्षे वयाच्या मुलामुलिंची होत नसतात, चांगल्या पंचवीशीतीशीपर्यंत वाढलेल्यांची असतात.
नंदिनी, धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे घोळात घेऊन केले नव्हते तर
हे घोळात घेऊन केले नव्हते तर आमंत्रितांना पुर्व कल्पना देऊन सांगण्यात आले होते की आहेर म्हणून जे काही द्याल ते 'मैत्री' ला जाणार आहे. >>>>>>
त्यापेक्षा रीसेप्शनच न करता, ते पैसे दान देणे सोप्पे नाही का?
तुम्हाला पटणार नाही पण थोथांड आहे हे.
टोचा , असं नाहीये ,तुम्ही
टोचा ,
असं नाहीये ,तुम्ही म्हणताय तसं थोतांड नाही म्हणता येणार.कारण कीतीही सार्वजनिक रीत्या केली तरी लग्न ही खाजगी बाबच असते.त्यांना रिसेप्शनही करायचे असु शकते आणि पैशाची संस्थेला मदतही. थोतांड हा शब्द जर का कुठ्ल्या उदा. वापरायचा असेल तर तो या उदा.चिनुक्स यांच्या << बातमी छापायची आणि पुन्हा सगळ्या डामडौलात स्टेजवर हारतुरे स्वीकारायचे, या दांभिकपणाची चीड येते .>> याला सुट होतो. मदत नसेल करायची तो त्या व्यक्तीची अडचण असु शकते.मदत करायची भावना मात्र असते.म्हणुन त्याही व्यक्तीला दांभिक म्हणु शकत नाही आपण. केवळ मदतीचं सामाजिक भान असणे ही सुद्धा मदतच होते पैसेच दिले पाहिजेत असं नाही. माझं चुकत असेल तर सांगा.
नंदिनी + १![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझं काही खरं नाही मला कधी कधी दोन्ही बाजु पटतात. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लिंबुटिंबुजी + १
मला रजिस्टर लग्न करायचं
मला रजिस्टर लग्न करायचं नव्हतं. विधिवत करायचं होतं. आणि विधी कुठले, का हे समजून घेऊन मग त्यातले योग्य ते निवडूनच करायचं होतं. तसंच केलं.
विवाहविधी, विवाहाची संकल्पना यासंदर्भाने मिळेल तेवढं वाचून काढलं. कन्यादान हे कंपलसरी नाही हे ही त्यात कळले.
राजवाडेही वाचून काढले. विवाह शब्दाचा अर्थच मुलगी पळवून नेणे आहे इथपासून सगळे समजून घेतले.
मैत्रिणीच्या रजिस्टर लग्नामधे पाह्यले होते त्यात 'मी इकरार करते की...' वगैरे शपथ घेताना ऐकले होते. त्यापेक्षा मला अश्मारोहण आणि सप्तपदीमधल्या सात ह्या एकमेकांना दिलेल्या सहजीवनाच्या शपथा जास्त आवडल्या.
समजून घेऊन ते केले होते त्यामुळे आमच्या दोघांच्या दृष्टीने त्याला अर्थ होता.
आयुष्यातली महत्वाची आनंददायक घटना यादृष्टीने बघत असल्याने थोड्याफार सेलिब्रेशनला अजिबात हरकत नव्हती माझी.
पण...
एवढं सगळं वाचून काढलं त्यात हिंदू मॅरेज अॅक्ट वाचायचा राह्यला. हल्लीच एकदोन वर्षांत एका मैत्रिणीकडून हिंदू मॅरेज अॅक्ट संदर्भाने काही डोळे उघडणारा मुद्दा कळला जो विधीवत लग्नालाच लागू होतो. रजिस्टर/ कोर्ट मॅरेजला नाही. हिंदू मॅरेज अॅक्टप्रमाणे मुळात पत्नी ही पतीच्या मालकीची वस्तू, संपत्ती असे काहीतरी समजले जाते. जे मला नीट एक्स्प्लेन करता येणार नाही.
पण हे समजल्यानंतर विधीवत लग्न केल्याचा पश्चात्ताप झाला थोडासा. पण लग्नाला आता बरीच वर्षे झालीत आणि आमच्या दोघांच्यात हे मालक, संपत्ती प्रकरण कधीच येऊ शकत नाही त्यामुळे जाने दो!
सूनटून्या | 1 December, 2014
सूनटून्या | 1 December, 2014 - 11:37 >> प्रचंडच पटली पोस्ट!!
कधी नव्हे ते या आणि हेल्मेटसक्तीच्या बीबी वर लिंबूटिंबूची मतं पटतायत.>> +१११
''पाणी घाल म्हटला काय घालायचा, लोंबता काय ता इचारू नको''>> खूप हसले!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बहुतांश ठिकाणी बघण्यात असेही आले आहे की मुलगी कमावुन पैसे साठवून लग्नखर्चाची तजवीज करते पण आपला तथाकथित समाज व कुटुंबव्यवस्था प्रत्यक्ष लग्नाचे बैठकीत या वधुस घेतच नाही. मी तर असेही बघितले आहे/अनुभवले आहे की "आमच्यात ना, बायका या व्यवहारात बोलत्/भाग घेत नाहीत, तशी पद्धत नाही" असेही आहे. >> हे माझ्या बाबतीत झाले होते! फक्त ते बोलून दाखवले नव्हते! नवरा व मी दोघांनाही हेतुपुरस्सर लांब ठेवले! तुमचं तुम्ही ठरवलंत आता बैठकीचं काय वेगळं ठरवायचं म्हणून! आणि मग असंच म्हणून आई बाबांना भेटायला बोलावून मग बाकीचे मुद्दे लावून धरले. फॉर्मल मिटींग असल्याने आई बाबा अनभिज्ञ! अचानक काही बोलताही / नाकारताही आलं नाही!!
वर : आता तुम्हाला जमणार नसेल तर घाटावर याद्या करून फाडतात तश्या फाडायच्या का? हे पालुपद!
तुम्ही म्हणताय तसं थोतांड
तुम्ही म्हणताय तसं थोतांड नाही म्हणता येणार.>>>>
@सिनि - थोथांड म्हणायचे कारण एकच की दीड लाख ( कमीतकमी ) रीसेप्शन वर खर्च करुन, आलेल्या पाहुण्यांकडुन १ लाख २० हजार जमवुन दुसर्यांना देणे हे माझ्या साध्या बुद्धीला पटत नाहीत.
तसेही जवळची माणसे आहेर देणारच, त्यांना हा डबल भुर्दंड.
हर्पेन, तुमच्या उदाहरणातील
हर्पेन, तुमच्या उदाहरणातील प्रकार मला थोतांड वाटत नाही.
काहीच न देण्यापेक्षा हे असले
काहीच न देण्यापेक्षा हे असले थोतांडसुद्धा (काही लोक्स ज्याला थोतांड म्हणत आहेत ती देणगी) परवडले.
जी शाळेत शिकवलीच जात नसल्याने
जी शाळेत शिकवलीच जात नसल्याने तुम्हालाही कदाचित माहित नसेल,
<<
शाळेत शिकविलेल्या व तुम्हाला माहीत नसलेल्या, तसेच न शिकविलेल्या पण मला माहित असलेल्या अनेक गोष्टी या जगात आहेत, लिंबाजीराव.
मोकळ्या हाताने जाऊ नये हे मला ठाऊक आहे, त्याच्याबद्दलच इंग्रजीत लिहिलंय तिथे. तेव्हा तुमच्या त्या परिच्छेदाचा अर्थ व मार्मिकता समजली नाही
>>> तेव्हा तुमच्या त्या
>>> तेव्हा तुमच्या त्या परिच्छेदाचा अर्थ व मार्मिकता समजली नाही <<< उठसुठ प्रत्येक बाबीस "परदेशातील" दाखले देण्याच्या वाईट्ट खोडिस उत्तर म्हणुन ती पोस्ट होती.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तुम्हाला कळली नाही यात नवल नाही वाटले.
लग्नाला बोलावलेल्या
लग्नाला बोलावलेल्या लोकांमधल्या ३७० पेक्षा जास्त माणसांनी रक्तदान केले.
http://timesofindia.indiatimes.com/india/Guests-donate-blood-organs-at-G...
आता बोला...:)
लिंटि - विवाहाच्या निमित्ताने
लिंटि - विवाहाच्या निमित्ताने असला तरी वरचा प्रतिसाद स्वानुभवावर आधारित नसल्या कारणाने इथे अस्थानी वाटत असेल तर उडवेन, हाकानाका.
तुम्हाला कळली नाही यात नवल
तुम्हाला कळली नाही यात नवल नाही वाटले. >>![Smiley](http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing014.gif)
एकसेएक भंकस मुली पाहून जाम
एकसेएक भंकस मुली पाहून जाम वैतागलो.
>>>>
पैलवान हे तुमचे विधान नि:संशयपणे बेशरमपणाचे आणि निंदनीय असून तुमची सांस्कृतीक पातळी दर्शविणारे आहे. तुमचा निषेध.::राग:
बेफी, औरंगाबाद-रत्नागिरी
बेफी, औरंगाबाद-रत्नागिरी किस्सा अचाट आहे!
हो आणि तो किस्सा बेफिकिरांनी
हो आणि तो किस्सा बेफिकिरांनी मस्त रंगवुन लिहिलाय.
एकसेएक भंकस मुली पाहून जाम
एकसेएक भंकस मुली पाहून जाम वैतागलो.>>>>
थर्डक्लास मेंटॅलीटी! त्या मुली तुला (हो, "तुला"च! उगा काय म्हणुन अहो जाहो करायचे?) बघून कित्ती वैतागल्या असतील हे त्यांना कधी विचारले असते तर आपली स्वतःची लेव्हल कळाली असती. सुटल्या त्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ईथे इतके संयत प्रतिसाद देणारे
ईथे इतके संयत प्रतिसाद देणारे लि.टि. तिथे बुवा बाबांच्या धाग्यावर असे वेड पांघरून का बोलतायत कळत नाही.
का फक्त स्वतः काढलेल्या धाग्यांवरच नीट बोलायचे असते?
अरे लग्नातल्या गमतीजमती असा
अरे लग्नातल्या गमतीजमती असा एक धागा आहे तिथे पण भन्नाट किस्से आहेत.
नीरजा, प्लिज लिन्क दे की इथे.
नीरजा, प्लिज लिन्क दे की इथे.
लग्नातल्या गमतीजमती :
लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
aashu29, >> थर्डक्लास
aashu29,
>> थर्डक्लास मेंटॅलीटी! त्या मुली तुला (हो, "तुला"च! उगा काय म्हणुन अहो जाहो करायचे?) बघून कित्ती वैतागल्या
>> असतील हे त्यांना कधी विचारले असते तर आपली स्वतःची लेव्हल कळाली असती. सुटल्या त्या
अगदी माझ्याही मनात मीही सुटलो असाच विचार आला होता. ज्याअर्थी दोन्ही पक्ष सुटल्याच्या अवस्थेस आले त्याअर्थी थर्डक्लास मेंट्यालिटी अधूनमधून ठेवलेली बरी पडते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आ.न.,
-गा.पै.
रॉबिनहूड, >> पैलवान हे तुमचे
रॉबिनहूड,
>> पैलवान हे तुमचे विधान नि:संशयपणे बेशरमपणाचे आणि निंदनीय असून तुमची सांस्कृतीक पातळी दर्शविणारे
>> आहे. तुमचा निषेध.
तुम्ही असं म्हणताय की जणू या जगात भंकस मुलं (मुलींचं पुल्लिंगी रूप) अस्तित्वातच नसावीत. त्याबद्दल धन्यवाद हां!
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आ.न.,
-गा.पै.
अवांतरः गामा पैलवान यांनी जरा
अवांतरः
गामा पैलवान यांनी जरा जास्तच अनौपचारिक भाषा वापरल्याने समस्तांचा गैरसमज झाला. त्यापैकी अनेक जण बहुतेक गामा यांच्याकडून एखादा वेगळा शब्द कधी येतो याची वाटच बघत असल्यासारखे वाटले आणि 'भंकस' शब्दाच्या निमित्ताने त्यांनी 'गामा पैलवान बॅशिंग' ची हौस पुरवून घेतली.
गामा तुम्हाला काय म्हणायचे आहेत ते इथे नेहमी औपचारिक आणि बाळबोध भाषेत लिहावे (बाळबोध भाषा म्हणजे बाळांनाही बोध होईल अशी). नाही तर मग असा प्रसंग ओढवतो. "अनेक स्थळांचे फार विचित्र अनुभव आले" असे लिहीले असते तर अधिक योग्य ठरले असते.
हाच शब्द एखाद्या माबोमधे वर्ल्ड फेमस असलेल्या पुरुष किंवा विशेषतः स्त्री आयडी कडून आला असता तर पुढील प्रकारची प्रतिक्रिया येऊ शकली असती:
"हँ हँ हँ हँ हँ हँ! अगदी, अगदी. अगं तुला सांगते, अशा भंकस मुलांना अद्दलच घडवायला हवी यु नो. माजली आहेत.......हँ हँ हँ हँ हँ हँ."
Pages