हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
>>>> मामेमावसचुलत <<<< मला हे
>>>> मामेमावसचुलत <<<< मला हे मामे-मावस-चुलत नाते कळलेच नाही..... म्हण्जे मामाच्या मावशीच्या चुलतीची मुलगी असे काही आहे का हे?
लिंबुभाउ त्यावर एक उपाय
लिंबुभाउ त्यावर एक उपाय वडिलांकडच्यांना सगळ्यानाच काका-काकी म्हणायचे आणि आईकडच्यांना मामा-मामी. विषयच संपुन जातो
ह्याला काही अर्थ नाहीये, खरे
ह्याला काही अर्थ नाहीये, खरे तर हे चुकीचेच आहे.
लोकांना असे बोलावुन मग घोळात घेउन दान करायला लावणे चुकीचे आहे. भीडे पाई लोकांना देणग्या द्याव्या लागल्या असतील.
त्यापेक्षा स्वागत सभारंभ न करता ते पैसे गपचुप "मैत्री" ला दिले असते तर १ लाख २० हजार सहज देवु शकले असते. पण तसे केले असते तर त्यांच्या सामाजिक जाणीवांचे प्रदर्शन करता आले नसते.
>>>>>> हे टोचा यांचे मत मला काही अंशी पटले.
माझ्या मुलानेपलग्नात पाय
माझ्या मुलानेपलग्नात पाय धुवून घेतले होते हे एक चांगले झाले व दुसरे म्हणजे नागपूर प्रसिध्द पेशवाई (नाॅट भोसलेई) विहीणीच्या पंगतीला दिल्या गेलेला फाटा! नागपूरची विहीणीची पंगत हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे...
मामी, >> तुमच्या या
मामी,
>> तुमच्या या विधानावरून तुम्ही माणूस म्हणून किती भंकस आहात हे दिसतंय.
चुकलो! भंकस स्थळं म्हणायचं होतं. लग्नाचा बाजार असतो. बाजारात भंकस चालतेच. त्या स्थळांनी काय भंकस केली ते मी इथे सांगत नाही.
मेहुणीच्या लग्नाच्या वेळेस भंकस मुलं पाहून आम्ही सगळेच वैतागलो होतो.
आ.न.,
-गा.पै.
>>>>>> उगाच सारवासारव करू नका. ही पोस्ट देखिल अतिशय दयनीय आहे. जमल्यास विचार सुधारा.
एका लग्नात (लग्न मुहूर्त
एका लग्नात (लग्न मुहूर्त १२.१५ चा असताना) वराच्या मावशीनी अचानकच सकाळी लग्न धार्मिक पद्धतीनेच झाले पाहिजे म्हणून डिक्लेअर केले . सर्व विधी लग्नानंतर ! इतर वराकडील मंडळीही गप्प राहिली. लग्नात वधूच्या आईने हौसेने एका बेडशीट्वर कशिदा काम केले होते रूखवतासाठी . तर शेवटी त्याच बेड्शीट मधे इतर सामान गाठोड्यासारखे भरले आणि तसेच प्रवासासाठी पाठवले. ( लग्नातला सर्व खर्च वधूकडचाच) तरी शेवटी वधूकडील नातेवाईक ` माणसे तशी समजुत्दार वाटतात ' अशी चर्चा करत होती.
रावी, खरय, हे धार्मिक की
रावी, खरय, हे धार्मिक की वैदिक पद्धतीचा घोळ तर सर्वदूर घातला जातो, अन जे घालतात त्यान्ना त्या विधीतील काडीचीही अक्कल नसते, तसे का करावे हे ही माहित नसते, केवळ मिरवणे वा चालु बाबीत खोडा घालण्यास निमित्त म्हणून हा फरक उकरुन काढला जातो असे माझे मत.
याबाबत मी बराचसा जहाल होतोय, कारण "आम्च्यावेळी नौत बै वैदिकनीफैदिक" असे मानेला हेलकावे देत समोरच्याचा कचरा करणारे बोल मी जेव्हा ऐकले तेव्हा मी देखिल माझ्याही शेन्डीला उभे आडवे हेलकावे देत देत लग्नविधीन्वर एक असे काही सनसनाटी बौद्धिक आख्खा एक तास घेतले, अन वर परत अप्रत्यक्ष दम भरला की एक तर एकाही विधीच्या वेळेस कोणीही नातेवाईक हजर नस्ते... नुस्ते इक्डेतिक्डे मिरवणे, ना त्या विधीची माहिती पुढल्या पिढीला, ना त्या मंत्रांची, अन नुस्ते वरवधु अन भटजी यात विधी चालू अस्तो, अन बाकी साळकायाम्हाळकाया पुरुष गप्पांचे अड्डे लावुन भलतीकडेच बसलेले अस्तात.... मग कशाला हव्यात धार्मिक की वैदीक लग्न या बयादी ? तरी पालुपद चालूच होते..... शेवटी झाल-झेन्डा -वधुमुखदर्शन अन लक्ष्मीपूजन नंतर करायचे या तडजोडीवर सुटलो.... तर साडेबाराला लागलेल्या लग्नानंतर देशस्थी गोंधळात, झाल्-झेन्डा/लक्ष्मीपूजनाला दुपारचे साडेचार्-पावणेपाच वाजले, अन ते बघायलाही कोणी पाहुणे उरले नाहीत, तेव्हा नंतर मी हे देखिल ऐकवले, की मी वयाने लहान असलो तरी ज्योतिषीदेखिल आहे, व पुढे कशाने काय घडेल हे जसे मी दोनतिन महिन्यांपूर्वी आधी वर्णिले होते तसेच झाले की नाही पहा आता.... काय उपयोग त्या इतक्या हौसेने खपुन केलेल्या झाल-झेन्डा /लक्ष्मीपूजन अन पायघड्यांचा?
असो. मी प्रत्येक गोष्टच एन्जॉय करतो... ते देखिल मस्त मजेमजेत एन्जॉय केले.... उलट देशस्थी गोन्धळ एन्जॉय करायला मजा येते, जोवर मी त्यात सहभागी नस्तो .
(इकडे कोकण्/पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणांत झाल-झेन्डा वगैरे नसते. मराठवाडी देशस्थात हे सर्व इतर जाती व समाज व धर्म यांच्या रितींची सरमिसळ झाली असल्याचे जाणवते.... दोष त्यांचा नाही, शेकडो वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर दुसरे काय होणार? अर्थात बौद्धिकात हे देखिल समजावले होते बर्का... अगदी उदाहरण सनावळ्या इतिहासाचे दाखले देऊन... वैतागले अस्तील बिचारे ... )
पायघड्यांचा नाही का कुणाचा काही अनुभव?
साता-याला एका लग्नाला गेलो
साता-याला एका लग्नाला गेलो होतो मुलीच्या बाजुने. तिथे नवरानवरीचे रिसेप्शन एका बाजुला चालले होते आणि त्या स्टेजच्या बाजुला उभे राहुन एक गृहस्थ हातात माईक घेऊन आलेल्या प्रत्येक माणसाने काय आहेर दिलाय ते जाहिर करत होता. आधीच आम्ही मुलीच्या आईबाबांनी अग्दी चमचा, वाटी, गादी, उशीपासुन दिलेला आहेर, जो तिथे प्रदर्शनात मांडुन ठेवलेला, तो पाहुन चक्करलो होतो, त्यात लग्न झाल्याझाल्या माईकवाला आणि त्याच्या अनाऊण्समेंट पाहुन 'आजवर आपण कुठल्या जगात होतो?हे असले वेगळे कुठले जग आहे?" या प्रश्नांमध्ये गरगरत राहिलो
हे झाल-झेंडा व्.व. काय असते?
हे झाल-झेंडा व्.व. काय असते? शक्य असेल तर लिहा ना. आम्हला असले अनुभव येणे आता अशक्य आहे.
लग्नात काय विधी चाललेले असतात
लग्नात काय विधी चाललेले असतात आणि ब्राम्हण काय बडबडत असतो याकडे कोणाचेही लक्ष नसते याचा अनुभव एका लग्नात घेतला.
मित्राच्या लग्नासाठी नाशिकच्या एका तालुक्याला गेलो होतो सहकुटूंब. तिथे गेल्यावर आम्हाला काहीच काम नसल्याने आपली लग्ने (म्हणजे कोकण्यांची ) आणि ही नाशिकची लग्ने (म्ह्णजे आमच्या भाषेत घाटवळांची :दिवे घ्या: ) यात काय काय फरक आहे, आमची लग्ने कशी विधींना धरुन असतात याची चर्चा चाललेली. अंतरपाटाची वेळ आल्यावर पाहतो तर चक्क गुढग्या एवढ्या उंचीवर अंतरपाट धरलेला. मी मुलीला ते दाखवुन "आपल्यात अंतरपाट खुप उंच धरतात, मुलामुलीला एकमेकांचे तोंड दिस्सता कामा नये असा दंडक आहे" असे सांगत होते. तेवढ्यात भटजींनी एक मंगलाष्टका म्हटली, जी अर्थात मराठीतच होती आणि त्याचा मतितार्थ साधारण "अंतरपाट इतक्या उंचीवर धरा की एकमेकांना मुखदर्शन नको" असा होता. आम्ही ते ऐकल्यावर हसुन लोटपोट. म्हटले तुम्हाला माहित नसेल तर भटजी काय सांगताहेत ते तरी ऐका आणि अंतरपाट योग्य अंतरावर धरा अर्थात आमच्या ह्या गंमतीजंमती लांब बसुन चाल्लेल्या. स्टेजवरच्या गोंधळाला आमच्या कमेंट्स ऐकु जाणे शक्य नव्हते.
पायघड्यांचा नाही का कुणाचा
पायघड्यांचा नाही का कुणाचा काही अनुभव?>>>माॉझे आजोळ बुलढाण्या जिल्ह्यातले. तिकडे सावजी ब्राम्हण एक जात आहे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पण धोबीणी धोतर्याच्या पायघड्या घालायच्या व मोलकरणी डोक्यावर छत्री धरायच्या आता प्रथा चालू आहे की नाही माहीत नाही. पण इकडे फुलांच्या पायघड्या असतात़ परातीत कुंकवाच्या पाण्यात पाय बुडवून फुलांच्या पायघड्यांवरुन चालत सजवलेल्य मखरीत जेवायला बसते.
पायघड्यांचा नाही का कुणाचा
पायघड्यांचा नाही का कुणाचा काही अनुभव? "आमच्यात" फुलांच्या घालतात. सतिशकडे असले फालतू सोस अजिबात नाहीत. तस्मात, आम्ही केले नाहीत. पण सासरी गेल्यावर मला मात्र सतिशच्या आत्येबहिणीने फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या (ते पाहून मध्येच माझे सासरे "पोरांच्या हातात फुलं दिलीत तर कशी चोळामोळा करत फिरतायत बघा" असं म्हणालेले!)
माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नांत घडलेला हा अल्टिमेट किस्सा. एक तर मुसलमानांच्यात नवरीला सहरा म्हणून निशीगंध, गुलाब जाई (जी काय सापडेल ते) घेऊन गजरा टाईप डोकंभर् बांधलेलं असतं. वर परत हातभर घूंघट. तशीपण ही लग्न होऊन त्याच कॉलनीत दुसर्या टोकाला रहायला जाणार होती, पण जाताना रडायचंच म्हणून सगळ्या बाया तल्लीन होऊन "सांबालून र्हा बाय" करत अश्रूपुरामध्ये. ही तर जोरात रडाय्ला लागली. रडता रडता सर्वांच्या गळ्यांत पडून रडणं चालू झालं ते मध्येच बाजूला तिचाच नवरा उभा होता त्याच्या गळ्यंत पडून (लिटरली मिठी मारून) रडायला लागली. बाकीचे रडणारे हसणार्यांच्यात कन्व्हर्ट. नवरा टोटल "मै कहा हू" एक्स्प्रेशनमध्ये आम्ही मित्रमैत्रीणी एकीकडे टवाळक्याकरत उभे होतो ते बघून हहपुवा. त्यांच्या लग्नाच्या सीडीमध्ये अजूनपण तो प्रसंग आहे (व्हीडीओवाल्यानं पण एडिट केला नाही )
बापरे... नवरा "मै कहा हु" तर
बापरे... नवरा "मै कहा हु" तर रडुन झाल्यावर नवरी वळून 'हे कुठे गेले आता या वेळेला" या एक्प्रेशनमध्ये असेल..
माझ्या एका मैत्रिणीचे लग्न गावी झाल्याने आम्हाला फक्त फोटोच पाहता आले. शेवटचे काही फोटो फक्त रडारडीचे. आणि तीही अगदी महापुरवाली रडारड. तिचे वडील आई भाऊ आणि ती स्वतःही अगदी बांध फुटुन रडतेय आणि प्रत्येक फोटोत नवरा शेजारी कसनुसा चेहरा करुन उभा. ते फोटो पाहुन मी तिला म्हटले की बाई मी जर तुझ्या नव-याच्या जागी असते तर तुला तिथेच परत पाठवले असते. इतके दु:ख होतेय सर्वांना तर तु राहा तुझ्या घरी. मी करेन काहीतरी दुसरी व्यवस्था.
साधना ताई, माईक वरुन आहेर
साधना ताई, माईक वरुन आहेर देणार्याचे नाव उच्चारले गेले नाही तरी रुसवेफुगवे होतात.
माईकवरुन नाव उच्चारुन किती आहेर दिला हे सांगण्यामागिल कारणे मला अजुनही अज्ञात आहेत.
माझ्या नणंदेचा नवरा बंगाली
माझ्या नणंदेचा नवरा बंगाली आहे आणि ती मंडळी गुवाहाटीला राहतात. लग्न गुवाहाटीलाच झाले. लग्नानंतर नवरी तिच्या नव्या घरी गाडीतुन उतरली तेव्हा कॉटनच्या बंगाली साड्या अंथरल्या होत्या पायघड्या म्हणुन. गाडीच्या दरवाजापासुन ते जिन्यावरुन थेट बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरच्या सोफ्यापर्यंत. आणि एका खोलीत चक्क सिनेमात दाखवतात तसा एक पलंग खोलीच्या मध्यभागी ठेवलेला आणि त्याला पानाफुलांनी प्रचंड मढवलेला. आतली गादी बाहेरुन दिसत नव्हती इतक्या दाटिवाटीने फुले सोडलेली. ह्या फुलांच्या वासाने माश्या आणि चिलटे गोळा झाली भोवती तर काय करावे हा प्रश्न मला तितक्यात पडलाही
माझ्या बहिणीच् लग्न पुण्यात
माझ्या बहिणीच् लग्न पुण्यात झाल तिचा नवरा युपीचा. त्यांच्या लाखातल्या मागण्या , नॉर्थच्या लग्नाच्या ऐकिवातल्या कथा याचा सुदैवानी काहीच अनुभव आला नाही. मध्यरात्रीचा मुहुर्त हे मात्र झेपल नाही . लगन लागायच्या आधी रिसेप्श्न , त्याच्याबाजूचे २५ जण आमचे निदान ३०० असे लोक . प्रत्यक्ष लग्नाला त्यांचे अन आमचे मिलून ५० जण होते. उर्वरीत लग्नाआधीच कस काय जेवायच याचा विचार करत शेवटी जेउन रवाना. (अशीच पद्धत असते म्हणे. )
बाकी सगळे विधी वगैरे सेमच होते. इथला खर्च आम्ही अन त्याच्या घरी झालेल्या रिसेप्शन वगैरेचा खर्च त्यानी केला. (आमच्या शेजारच्या पंजाबी काकू नी वहांकी लडकी होती तो कमसेकम ... लाख मांग सकते थे अशी टिप्पणी केली. )
हे झाल-झेंडा व्.व. काय असते?
हे झाल-झेंडा व्.व. काय असते? >> अत्माबुवाजीचे अनुभव वाचा की. त्यात लिहिलय त्यानी एका लेखात.
आता हे अत्माबुवाजी कोण??
आता हे अत्माबुवाजी कोण?? कोणी प्रसिद्ध महापुरूष वगैरे असतील तर त्यांच्या चाहत्यांनी माफ करा ह्या अज्ञ भगिनीला ....
मुहुर्त न बघता, त्या काळच्या
मुहुर्त न बघता, त्या काळच्या सर्व प्रचलित प्रथा पद्धतींना फाटा देऊन झालेल्या लग्नाची ही सुरेख कहाणी वाचनात आली.
माझा प्रेमविवाह वेगवेगळ्या
माझा प्रेमविवाह वेगवेगळ्या जातीतील. मी सिंधुदुर्गातला तर बायको राजापूर, रत्नागिरीची.
माझा लहान भाऊ व बहिण दोघांचेही प्रेमविवाह आणि रजीस्टर्ड पद्धतीने झालेले. घरातला मी मोठा असल्याने मला रजीस्टर्ड पद्धतीने लग्न करायला विरोध झाला, प्रेमविवाह करण्यास नाही. दोघांच्याही घरचानी हसत खेळत परवानगी दिली, अट फक्त एकच लग्न मुलीच्या गावी होईल. (सिंधुदुर्गात आमच्या जातीमध्ये लग्न मुलाच्या गावी होते, आता गावी लग्न करण्याच प्रमाण कमी झाले आहे आणि मुंबईलाच जास्त होतात). धामधुमीने लग्नात खर्च करण्यासाठी माझ्या स्वतःकडे कवडी सुद्धा नव्हती म्हणून मी रजीस्टर्ड पद्धतीने लग्न करण्यास जोर देत होतो, पण बायकोनेच जास्त तगादा लावला कि तिला तिच्या गावातच लग्न करायचे आहे आणि माझ्या कडील वऱ्हाड तिच्या गावी आणायचा अर्धा खर्चसुद्धा स्वतःच्या कमाईतून दिला, बाकीचा खर्च मी ऑफिस मधून कर्ज काढून भागवला (नशिबाने अशी बायको मिळते :हहगलो:). देणाघेण्याच आणि मानपान असे काहीही करणार नाही अस आम्ही दोघांनी ठरवलं होत. माझ्या घरी आई, काका वगैरेनी थोडी धुसफूस केली, फक्त लग्न देव ब्राह्मणांच्या साक्षीने व्हावे एव्हढीच अपेक्षा ठेवली. धार्मिक बाबतीत माझा गाढा अभ्यास असल्याने दोन्ही बाजूंकडील पद्धतीबद्दल सगळा आनंदी आनंद होता.
तो पर्यंत एक तारीख ठरवून मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला, कारण आईवडिलांव्यतिरिक्त कोणीही मुलीला पाहिले नव्हते. माझ्या काकाला मी यजमानपद दिले होते कारण समाजात याचा वावर जास्त आणि घरामध्येसुद्धा सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि कोकणी लग्नातल्या रीतभात जाणणारा. लग्न मुलीच्या गावी त्यांच्या पद्धतीने करायचे ठरले आहे याची पुर्वकल्पना मी आधीच काकाला देऊन ठेवली होती आणि तुला विवाह पद्धतीबद्दल काही सांगायचे असेल तर सांग मुलीकडील मंडळी मान्य करतील हे हि सांगितलं. यथावकाश दोन्हीकडील मंडळी भेटली, पण काकाने लग्नातल्या धार्मिक विधींबाबत चकार शब्दही काढला नाही उलट नवरा नवरी दोघानीच सगळ ठरवलं आहे तर आम्ही काय बोलणार अशी टिप्पणी केली. पण प्रत्यक्ष लग्नात धुडगूस घालायचा तो मात्र घातलाच.
इकडे मुलीच्या गावी पोहोचल्यावर आम्हाला शेजारच्या घरात बसवण्यात आले आणि फक्त दहाच मिनिटात मला थेट ग्रहपूजनाला बसवले. त्या दगड गोट्यांवर फुल बिल घालून झाली तोपर्यंत भटजीबुवा देवाच्या नावाने शिव्या कि ओव्या काहीतरी पुटपुटत होते. आमची मंडळी फक्त पाहत बसली होती, हि वादळापूर्वीची शांतता होती. त्या दगड गोट्यांची पूजा झाल्यावर मला मग थेट मांडवात आणण्यात आले आणि अंतरपाट धरून मंगलाष्टक चालू झाल्या. त्यातही माझा एक लांबचा काका थांबायचं नाव घेत नव्हता, सर्वजण तो कधी थकतो याची वाट पाहत एकमेकांशी गप्पागोष्टी करण्यात रमले होते. शेवटी तो थकल्यावर हार-तुरे घालण्याचा कार्यक्रम झाला आणि अचानक मुलीकडील माणसांची झुंबड एकदम अंगावर येऊन आपटली. आहेर देण्यासाठी सगळ्यांची चढाओढ लागली होती, मी मनात म्हटलं यांच्याच गावात लग्न तरी घरी जाण्यासाठी एव्हढी का धडपड.
इकडे आमची मंडळी एकदम अवाक कारण सप्तपदी, होम याचा काहीच पत्ता नाही. मला स्वतःला याच काहीच सोयरसुतक नव्हत. मग काकाने तावतावाने भांडायला सुरुवात केली, त्याला माझ्या आईने पण तेव्हढ्याच जोरकसपणे साथ दिली, माझ्या गावातले आणखीही काही स्त्री पुरुष आता आखाड्यात उतरले. तर दुसरीकडे माझे बाबा कडेला बसून सर्वाना शांत राहण्याचा आग्रह करीत होते पण त्यांचा क्षीण आवाज कुठल्या कुठे गडप झाला होता. काकाच्या या रुद्रावताराने मी आणि बायको दोघेही अवाक कारण या लोकांनी आधी सर्व मान्य केल होत. पण खरतर काकाला मुलीकडच्या लग्नातील धार्मिक पद्धती माहितीच नव्हत्या.
मुलीकडच्या लोकांना सप्तपदी, होमहवन याची आधीच कल्पना दिली असती तर त्यांनी ते मान्य केलं असत, त्यांची त्याला ना नव्हती. आमच्या मंडळीना तसे भांडताना पाहून आता मात्र माझा बांध फुटला होता, त्यातच आता मुलीकडच्या लोकांचासुद्धा संयम सुटायला लागला आणि बायकोचा काका मैदानात उतरला. भर मांडवातच हमरीतुमरी सुरु झाली. मी स्वतः वरपासून खालपर्यंत अक्षरशः थरथरत होतो, एकेकाला बुकलून काढायचं मनात येत होत. मी बायकोला जरा रागावूनच म्हणालो, ''घे, तुला पारंपारिक पद्धतीने लग्न करायचं होत ना''. अरे, ज्याचं लग्न आहे त्याना कोणी विचारणार आहे कि नाही?
शेवटी मीच मध्ये पडलो आणि सर्वाना निक्षून सांगितलं, झाले तेव्हढे विधी पुष्कळ झाले आता यापुढे काहीही होणार नाही. यापुढील कार्यक्रमात आमच्या मंडळीनी बहिष्कार घातला. त्यामुळे बायकोच्या आईची ओटी मी स्वतःच भरली आणि साडी देण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हढी लवचिकता बायकोच्या मंडळीनी दाखवली.
आमची वरात जाण्यासाठी निघाली तेंव्हा एव्हढ सगळ होऊनसुद्धा बायकोच्या गावातील मंडळी आपली वाद्ये घेऊन आम्हाला गावाच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी आमच्या वरातीत सामील झाली. पण या लोकांची नगारे वाजवण्याची हौस एव्हढी दांडगी कि वरातीला पुढे जाण्यास वाटच देत नव्हते. अक्षरशः दोन तास भर उन्हात उभे राहण्याची शिक्षा सहन न झाल्याने मी तिरमिरीत बायकोचा हात पकडला आणि त्यांना ढकलून गाडीत जाऊन बसलो.
वरात जेंव्हा आमच्या गावात आली त्यावेळेस शाळेतून सुटल्यावर मुले जशी घरी पळत सुटतात तसेच सगळे वऱ्हाडी आपापल्या घरी पळत सुटले त्यात माझे आईवडील आणि नातेवाईक सुद्धा. मागे मी, बायको, तिला सोडायला आलेले तिचे १०-१२ नातेवाईक आणि वाजंत्री (बिचाऱ्यांना कोणाच्या बाजूने जावे हेच कळत नव्हते). माझ्याच घरच्यांनी मला तोंडघशी पाडल होत. थोड्या वेळाने माझ्या चुलत भावाने पुढे होऊन आलेल्या पाहुण्यांची सरबराई केली.
या सगळ्यात मला आणि बायकोला एव्हढा मनस्ताप झालाय कि सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लग्नाच्या आठवणी आम्ही अजिबात काढत नाही, आम्हाला त्या विसरून जायच्या आहेत. यापुढे कोणताही धार्मिक पूजा विधी, कर्मकांड करणार नाही अशी शपथच घेतली आहे. याआधी तळ्यात मळ्यात होतो, पण आता इरादा एकदम पक्का.
लिम्बुभाऊचा एक गिऱ्हाईक कमी झाला.
धन्यवाद मंजूडी. पु. लं. नी
धन्यवाद मंजूडी. पु. लं. नी गणगोत मधे त्यांच्या सासर्यांचे जे व्यक्तीचित्रण दिले आहे त्यातही त्यांच्या लग्नाचा किस्सा लिहिलाय.
माझ्या भाचीने इवेंट मॅनेजर
माझ्या भाचीने इवेंट मॅनेजर म्हणून मुंबईच्या लक्झरी होटेलमधे काम करतानाचे किस्से सांगितले. बड्या घरची लग्ने. पण त्यातही वधूपक्षाची ऐनवेळी अडवणूक करायचीच म्हणून आयत्यावेळी कायचाकै मागण्या केल्या जातात. उसगावातील एमबीएची डिग्री मिरवणारे नवरदेवही आमच्याकडे मोठ्यांसमोर बोलत नाहित असा पवित्रा घेतात. वधूपक्षाची पैसे खर्च करायची तयारी असली तरी आयत्यावेळी बर्याचशा गोष्टी शक्य नसतात. अशावेळी काही वेळा समजावून तर काही वेळा ठणकावून 'हे शक्य नाही ' असे सांगायचे काम भाचीला आणि तिच्या टीमला करावे लागते.
एकुण लग्नातले सगळे रितीरिवाज
एकुण लग्नातले सगळे रितीरिवाज हे समोरच्याला हाणुन खाली पाडण्यासाठी बनवलेत बहुतेक. जिथे दोन्ही बाजु एकमेकांना सामिल आहेत तिथे कुठला रिवाज झाला आणि कुठला नाही याचे कोणाला सोयरेसुतक नाही पण जिथे दोन्ही बाजु एकमेकांचे शत्रूपक्ष तिथे जमेल तितका आडमुठेपणा. कोपरापासुन दंडवत या लग्नपद्धतींन आणि त्यातल्या पात्रांना.
लग्नच करायचे नाही लीव्ह अँड
लग्नच करायचे नाही लीव्ह अँड रिलेशनशिपच बरी मग
लीव्ह अँड रिलेशनशिपच>> लिव्ह
लीव्ह अँड रिलेशनशिपच>> लिव्ह इन रिलेशनशिप!
सुनटुन्या, काका एकदम भारी दिसतोय तुमचा!
स्वाती२, माझ्या एका मैत्रीणीने इव्हेंट मॅनेजमेंटचा बिझनेस चालू केल्यावर दोन तीन वर्षांनी लग्नाचे काम घेणे पूर्णपणे थांबवले. पैशापेक्षा डोक्याला त्रास जास्त असं ती कायम म्हणते.
मला वर बऱ्याच जणांनी उल्लेख
मला वर बऱ्याच जणांनी उल्लेख केलेली कोकणातली लग्न पद्धती सोपी, सुतसुटीत आणि वाजवी खर्चाची वाटते. तशा पद्धतीने लग केल्यास थोडीफार हौसमौजही होऊ शकते.
बाकी हल्ली बोकाळलेल्या संगीत, नाच गाणे इत्यादीबद्दल न बोललेलच बरं! नात्यातल्या एका लग्नात हे सर्व अर्धवट प्रकार बघुन चांगलीच करमणूक झाली. अन्न संपल तर म्हणे बोलावलेली सगळेच लोक आल्याने गोंधळ झाला. बोलावल्यापैकी ७० ते ७५% लोकं येतील असा त्यांचा अंदाज होता म्हणे! मग आधी एव्हढ़या पत्रिका छापायच्याच कशाला आणि आमंत्रण करण्यात वेळ घालवायचाच कशाला? आमंत्रित २००० हां आकड़ा ऐकून माझ्या ऑस्ट्रलियन मैत्रीणीला चक्कर यायचीच बाकी होती.
खरे आहे नंदिनी. कार्पोरेट
खरे आहे नंदिनी. कार्पोरेट इवेंट्स, शुटिंग्ज वगैरे बाबतीत नाही इतका त्रास लग्नाचा होतो. वरपक्षाबरोबर आधी तीन मिटिंग्ज घेऊनही हे चालते. मात्र मॅरीऑट्चे बॅनर पाठीशी असल्याने ठणकावता येते.
सुनटुन्या , नंदिनी भारी
सुनटुन्या , नंदिनी भारी किस्से !
इवेंट मैनेजर पद्धती वरून अनुष्का सिंग आणि रणवीर सिंगचा बैंड बाजा बारात आठवला .नीट आठवत नाही पण त्यातल्या एक डायलोग असा काहीसा आहे " चाहे कुछ भी हो जाए शादी का बिझनेस तो इंडिया मै चलेगा ही चलेगा "
चुभूदेघे
इतके दु:ख होतेय सर्वांना तर
इतके दु:ख होतेय सर्वांना तर तु राहा तुझ्या घरी. मी करेन काहीतरी दुसरी व्यवस्था.
<<
सुनटुन्या तुफान लिहीलय
सुनटुन्या तुफान लिहीलय तुम्ही.:हहगलो: तुम्हाला झालेला मनस्ताप कळतोय.
Pages