हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
हो फारेंडा, तेच आहेत. आणि तू
हो फारेंडा, तेच आहेत. आणि तू योग्य वर्णन केले आहेस.
अर्थात ओढूनताणून 'हा आमच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे' असेच बोंबलायचे असेल तर त्यासाठीही ते उपयोगी आहेतच.
फारेन्डा, माझ्याकडे दिसतच
फारेन्डा, माझ्याकडे दिसतच नाही रे यूट्यूब![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
फारेन्ड, विनोद काही ठिकाणी
फारेन्ड, विनोद काही ठिकाणी ब्रिलियंट आहे म्हणून ओव्हरॉल जो संदेश जातो ते वाट्टेल ते निदान मला तरी नाही पटू शकत.
फारएण्ड | 13 May, 2015 -
फारएण्ड | 13 May, 2015 - 08:17 >>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कुणाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात याचे काही भान ठेवा
Pages