हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
>>> एक म्हणजे पुरोहित
>>> एक म्हणजे पुरोहित -भटुकडे (अस्सल ब्राह्मण नाही . ब्रह्मज्ञान असणारा तो ब्राह्मण ) <<<<
यावरील चर्चेकरीत वेगळा धागा उघडाल का? स्पेसिफिकली भटुकडे/भटुरडे याकरीता?
काये ना, की असले "ब्रिगेडी" शब्द मला चालत नाहीतच, अन हा धागा याकरता नाहीये.
ह्यावर आधीच लई धागे झालेत .
ह्यावर आधीच लई धागे झालेत . आता बास झालं .बास करा . काय तरी विंटरेस्टींग धागा काढा . लई बोर होतंय
माझ्या एकाच पोस्टीवर इतकी झील
माझ्या एकाच पोस्टीवर इतकी झील तोडून झाली?![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ज्या चाली हिंदू धर्मात नाही
ज्या चाली हिंदू धर्मात नाही आहे त्या चिटकवण्याचा वेडगळ प्रयत्न लिंबू सोडा>>>
समजले नाही. लिंबू सोडा पिणे धर्मनिषिद्ध आहे का??
कानपिळीचा (पगडीचा) आहेर...
कानपिळीचा (पगडीचा) आहेर...
म्हणजेच, हल्लीचा वधुच्या भावाने वराचा कान पिळण्याचा..असा फेमस झालेला विधी.
विवाहसंस्कारातला हा एक शब्दानुनय केला गेल्यामुळे हास्यास्पद झालेला आचार आहे. मूलतः (मी ऐकलेले आहे..)... ते असे.
विवाहहोमाचे वेळी:- मुलिचा भाऊ वराला, "माझ्या बहिणीचा नीट सांभाळ कर .." , इत्यादी इत्यादी गोष्टींची ताकिद देतो ..ह्यामुळे वर ह्या मुलिच्या भावाला कानाजवळ पीळवटा येणार्या भरजरी पगडीचा आहेर करतो. त्याला गंध लावून ही कानपिळीपगडी त्याचे डोक्यावर चढवतो. व त्यावेळी त्याला , "तू तुझ्या बहिणीच्या पाठिशी काळजीने उभा आहेस,ह्या कारणाने माझे सहजीवनंही सुरळीत रहाण्यास मदत होणार आहे. (धन्यवाद)" असा आशय व्यक्त करितो.
पुढे काळानुसार पगड्या गेल्या,टोप्या आल्या. नंतर टोप्याही गेल्या. आणि कुणाकडून तरी हे ताकिद देणे व कानपिळी पगडी मधल्या कानपिळी, ह्या अर्थाशी/आशयाशी संगती लावणारा हा वराचा कान पिळण्याचा प्रकार गमतीजमतीत जन्माला आला(असावा.) (असा माझाही कयास आहे.)असो!
आता.. हे सर्व सांगण्याचं कारण काय? गेल्या पन्नास वर्षात हा विवाह संस्कार योग्य अयोग्य कश्याही कारणानी का असे ना? पण एका धम्माल एंटरटेनमेंट प्रोग्रॅमच्या स्वरुपात रुपांतरीत झालेला आहे. अश्या वेळी उत्साहाच्या भरात वराचा कान पिळायला तीन तीन चार चार भाऊ (मॅनेज करून) आणवणे. कान खरच लालेलाल होईपर्यंत पिळणे. इत्यादी गाढवचाळे केले जातात. प्रसंगी यावरून वादंही उद्भवतात. आणि त्यात मग हवा तो सापडला नाही. की हंपायर सारख्या उभ्या असलेल्या आंम्हा पुरोहितांना पकडले जाते.
विवास संस्कार योग्य/अयोग्य,हवा/नको,चूक/बरोबर असा कसाही असला..तरी तो सोहळा(एंटरटेनमेंट) म्हणूनच करायला हवा असेल..तर तसाही घ्यावा. पण विवाहविधी फक्त रन-करायचे(च) अधिकार असलेल्या पुरोहिताला असल्या गोष्टींकरता तिथे ऑनस्टेज जबाबदार धरु नये. असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. आणि हे कानपिळी पुरतच मर्यादीत नाही.
१)लग्नमाळा घालताना वधूवरांना उचलणे,त्यात पडापडी होणे,जखमी होणे.
२)माळा घातल्या घातल्या चमकीचे फटाके फोडणे..ते दाढीच्या फेसासारखं(डोळ्यात गेल्यावर भयंकर झोंबणारं) फुसफुसं उडवणे.
३)रुखवतात मांडलेले..सप्तधान्य,सांडगे,वाटाणे अश्या वस्तू अक्षतांमधे घेऊन/मिसळून..वधूवरांना मागून फेकुन मारणे.(मुंजीला मुंज मुलाला रडे पर्यंत हे मारतात...आणि बरेचदा कोणिच ह्या बटू मित्रांच्या ह्या व्रात्य कारवाया थांबवित नाही. मी पर्वाच्या एका मुहुर्ताला .एका मंगल कार्यालयात ह्या बटुच्या मागे असलेल्या अक्षाता फेकून मारणार्या मित्र टोळक्याला..मंगलाष्टकं थांबवून हाकलून लावलं..आणि "यांचे पालक कुठे आहेत? " असं म्हणून त्यांचिही माफक धिंड काढली. )
४)सप्तपदीला सहाव्या अगर सातव्या पावलावर वधुचा आंगठा दाबायला येणे..आणि तिथेच वाट्टेल त्या रकमेचा आहेर मागून विधी थांबविणे..टोल पोस्ट वर वहान अडवतात..तसा!
५)वरपित्याने - व्याहीभेटीला आख्खा मांडव बोलावून*...पुरोहितासह सगळ्यांचा वाट्टेल तेव्हढा वेळ खाणे. ( * :- ही अतिशयोक्ती जाणिवपूर्वक केलेली आहे.)
६) यजमानाकडून पुरोहितांना - अर्धा अर्धा एकेक तास मंगलाष्टके चालू राहू देण्याचा आग्रह करणे..आणि तो अमलातंही आणवून घेणे.
७) लग्न/मुंज मुहुर्तावर न लागल्याबद्दल (खास करुन..आलेल्या निमंत्रितांनी) पुरोहितांना जबाबदार धरणे.
अश्या एक ना अनेक गोष्टी या हल्लीच्या एंटरटेनींग विवाह सोहळ्यांमधे घडत असतात. ज्यांना हे सगळं एंटरटेनींग आहे ,असं वाटत असेल..त्यांना आंम्ही समजावू शकत नाही. पण ज्यांना ह्या एंटरटेनींगचं भान आणि मर्यादा मान्य आहेत. त्यांनी (तरी) आपल्याकडे होणार्या अथवा आपण सहभागी असाल अश्या विवाहसोहळ्यात हे प्रकार होणार नाहीत याची दक्षता बाळगण्यास सुरवात करावी..असे सुचवावेसे वाटते. कारण आपणच मंडळी अशी आहात ,की जी आपल्याकडल्या कार्यांमधे ह्या गोष्टी कटाक्षानी टाळण्यात यशस्वी होऊ शकता.
आता अजुन एक पुढचा प्रकार म्हणजे ,हल्ली काहि इव्हेंटमॅनेजमेंट कंपन्याही ह्या विवाह सोहळे साजिरे-करवून देण्यात उतरत आहेत. ते तर धंद्यासाठी शंभर टक्के लोकानुनय करणार,हे गृहीतच आहे. तेंव्हा आपण त्यांनी सुचविलेल्या कोणकोणत्या गोष्टी "घ्यायच्या" ,आणि आणखिही कोणकोणत्या त्यांच्याकडे "मागायच्या" हे ही अत्तापासूनच ठरविलेलं बरं!
.
.
आंम्ही (मंगल कार्यालयांना वाहुन घेतलेल्या..)पुरोहितांनी तर काय...पोटासाठी ह्या मांडवात उभं रहायचा निश्चय नम्र आणि स्विकार्य भुमिकेतून केलेला आहेच. त्यामुळे जोपर्यंत मंगल कार्यालयात येणारा यजमान ठाम भूमिकेनी आमच्या पाठिशी उभा रहात नाही,तोपर्यंत आंम्ही या एंटरटेनमेंट मधे विशेष हस्तक्षेप करु शकत नाही.. कारण मंगल कार्यालयांच्या पॅकेजमधे-येणार्या पुरोहितांना तो अधिकारच नाही. बर्याचश्या मंगलकार्यालयांच्या-मॅनेजमेंट,यजमानांना "हवं ते" करु द्यायला कटीबद्ध असतात. मग तिथे आंम्हाला कसला असणार अधिकार? तिथे आंम्ही फक्त सर्कशीतले जोकर.. !
==================
प्रतिसादातील भाषा, तीव्र वाटली असल्यास (आधीच..) क्षमस्व.
=========================================
आज या निमित्तानी मी पूर्वी लिहिलेली एक कविता इथे देतो.. जी या प्रतिसादाच्या दृष्टीनी अन्वर्थक आहे.
@कार्या लयाचा- गुरूजी!@
"कार्यालयाचा गुरुजी"म्हणजे
कार्यालयाचा असतो नोकर
त्याहुन खरं सांगायच तर
सर्कशीतला अस्सल जोकर
कधी घोड्यावर कधी रिंगणात
यावा लागतो प्रत्येक खेळ
जोकर नेहेमी तयार असता...
यजमान चुकवतात त्याची "वेळ"
ट्रॅफिकच्या त्या कारणांनिही
त्यांची बाजू लाऊन धरतात
पण उशिरा येऊन कार्या-लयात
नुस्तेच खुर्चीत' येऊन बसतात
तेव्हढ्यात त्यांना अठवण होते.
आपल्या मुलीचं लग्न आहे.
मुलगि खोलित जाऊन पहाता..
मेक-अप मध्ये मग्न आहे.
मग...हा ही येतो, तो हि येतो
जो येतो..गुरुजिंना धरतो
जोकर वेळेवर "तयार"असुन
उशीर का?...म्हणुन रागे भरतो.
तेव्हढ्यात मुलगी कावरी बावरी
धावत/पळत--स्टेजवर येते
आवरा..उरका घाई करत
यजमानस्वारी गुरुजिंना पिडते
मग सर्कस सुरु होते
एकेक कार्यक्रम पुढे जात
एका हतात माइक धरून
एस्कॉर्टिंग करताना दुखतो हात
इकडून टोला तिकडून टोला
चिडलात तरी हरि-नाम बोला
तेव्हढ्यात गर्दी शांत झाली
का???..तर म्हणे...नवरदेव आला
सगळा खेळ संपता येतो
जिवघेणा झोक्यांचा खेळ
गुरुजी खालच्या 'जाळ्यात' पडून
झुलवा/झुलवीचा साधतो मेळ
असल्या सगळ्या सर्कशीत
गुरुजि खरच जोकर असतो.
मला(ही) अठवतं अधून मधून
मी कार्या-लयाचा नोकर असतो.
=====================
मला तर ते कुबुल कुबुल क्य्बुल
मला तर ते कुबुल कुबुल क्य्बुल आणि तलाक तलाक तलाक बेष्ट वाटते.
४)सप्तपदीला सहाव्या अगर
४)सप्तपदीला सहाव्या अगर सातव्या पावलावर वधुचा आंगठा दाबायला येणे..आणि तिथेच वाट्टेल त्या रकमेचा आहेर मागून विधी थांबविणे.. <<<
हे असे काही असते का?
@ हे असे काही असते का? >>
@ हे असे काही असते का? >> तुरळक पणे जिवंत असलेली ही प्रथा आजही आहे.
ज्या चाली हिंदू धर्मात नाही
ज्या चाली हिंदू धर्मात नाही आहे त्या चिटकवण्याचा वेडगळ प्रयत्न लिंबू सोडा>>>
समजले नाही. लिंबू सोडा पिणे धर्मनिषिद्ध आहे का??![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>>>> हा हाईट होता
>>> प्रतिसादातील भाषा, तीव्र
>>> प्रतिसादातील भाषा, तीव्र वाटली असल्यास (आधीच..) क्षमस्व. <<<
या आख्ख्या पोस्टशी सहमत. तुम्ही फारच सौम्य भाषेत लिहून परत माफिही मागताय... मला जमणार नाही तसे.
पब्लिकच्या नालायकपणाला देखिल "ब्राह्मणालाच" जबाबदार धरण्याची टूम गेल्या काही वर्षातीलच.
मी लग्न/मुंजीचे उद्योग घेत नाही. कारण तिथे माझ्यासारख्या शीघ्रकोपी ऐवजी अतिशयच "स्थितप्रज्ञ" माणुस हवा असतो. अन तिथे लग्न/मुंजीच्या नावाखाली पब्लिकची चाललेली "थेरं" मला बघवत नाहीत, अन माझ्या अखत्यारीत घडताना बघणे/घडू देणे तर शक्यच नाही.
तुमच्या वरच्या मुद्यांमधे खूप भर घालता येईल... जसे की पंगतीत बसल्यावर वर अथवा वधू यांना नेमका न आवडणारा पदार्थच तथाकथित नातेवाईक/मित्रांनी भरभरून भरवणे, इतका की वर/वधुला शेवटी ओकारी यावी.....
विनाकारणच आग्रह करकरून लोकांच्या पानात अन्नाचे ढीग ओतणे... वाया गेले तरी जाणारे कुणाचे? पोरीच्या बापाचेच तर आहे, करा वसूल हे असे धोरण!
या असल्या घाणेरड्या प्रथा "धर्मात/विधीत" सांगितलेल्या नाहीत, धर्मशिक्षित ब्राह्मणांनीही सांगितलेल्या नाहीत. हे सर्वस्वी "पब्लिकचे" स्वतःचेच स्वतःच्या मनाचे थेरचाळे असतात.
याव्यतिरिक्त, लग्न/मुंजीच्या निमित्ताने मागिल "हिशेब" चूकते करत भांडणे काढणार्यांच्या कथा तर औरच! हे असे करा हे ब्राह्मण वा हिंदू धर्म सांगत नाही, पण "पब्लिक" ते करते.
हे असले पब्लिकच हिंदू धर्माचे खरे गुन्हेगार व शत्रू आहेत असे माझे मत.
एग्झॅक्टली लिंबूकाका. घुसलेली
एग्झॅक्टली लिंबूकाका. घुसलेली थेरं हे धर्मात सांगितलेल्या प्रथा आहेत असं भासवून धर्माला बदनाम करण्याचा काही लोक प्रयत्न करीत असतात.
४)सप्तपदीला सहाव्या अगर
४)सप्तपदीला सहाव्या अगर सातव्या पावलावर वधुचा आंगठा दाबायला येणे..आणि तिथेच वाट्टेल त्या रकमेचा आहेर मागून विधी थांबविणे.. <<<
हे असे काही असते का?>>>> नवरीची बहिण येवून नवरीच्या पावलाचा अंगठा दाबते. तिलाच अहेराचं पाकिट देतात तिथे. माझ्या आणि नात्यातल्या सगळ्या लग्नांमध्ये पाहिलं आहे हे. माझ्या लग्नात माझ्या आत्तेबहिणीने माझ्या पावलाचा अंगठा दाबला होता. अहेर मागताना व त्यासाठी विधी थांबताना दिसला नाही कधी.
-----
काउ, फक्त मुलालाच 'तलाक तलाक तलाक' म्हणून बायकोला सोडायचा अधिकार असावा असं तुम्हाला वाटतं की बायकोनेही तिला नवर्याचा वैताग आल्यावर असं म्हणून नवर्याला सोडणं अॅक्सेप्टेबल आहे?
केश्वे, हे अजिबातच माहिती
केश्वे, हे अजिबातच माहिती नव्हतं. कधी पाह्यलंही नाही लहानपणापासून कुठल्या लग्नात. माझ्याही लग्नात नव्हता झाला हा प्रकार.
दोघानाही अधिकार असला पाहिजे.
दोघानाही अधिकार असला पाहिजे.
मग तुम्ही आता तसे आंदोलन करा.
मग तुम्ही आता तसे आंदोलन करा. लवकर.
अगं २-३ सेकंदात आटपतं ते.
अगं २-३ सेकंदात आटपतं ते. त्यामुळे लक्षात आलं नसेल तुझ्या कधी. तुझ्या लग्नाचा अल्बम काढून बघ. सप्तपदीच्या वेळी तुझी एखादी बहिण गुरुजींनी पुढे बोलावली असेल. तू अशी तांदुळाच्या सात ओळीत मांडलेल्या छोट्या ढिगांपैकी एका ढिगावर अंगठा ठेवून आणि ती खाली बसून अंगठा दाबते. तिला अहेराचं पाकिट मिळतं. की झालं सुद्धा
ते पाकिट मुलीकडले देतात की मुलाकडले ते आठवत नाही. ह्या विधीला अडवाअडवी हल्लीच सुरु झाली असावी, नॉर्थमध्ये (आणि त्याची कॉपी करुन आपल्याकडेही) नवर्याचे बूट लपवून अडवाअडवी करतात तशी.
अत्रुप्त, त्या विधीचा अर्थ काय आहे?
काउ, मग घराघरात अधुनमधुन भांडण झालं की आणि भांडण मिटलं की कबूल कबूल कबूल आणि तलाक तलाक तलाक ऐकू येतील![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अतृप्त, तुमच्या वरील संदेशास
अतृप्त,
तुमच्या वरील संदेशास पूर्ण अनुमोदन. मुंज, विवाह हे संस्कार आहेत याचं भान उरलेलं दिसंत नाही.
माझं मत असंय की मूळ विधी पुरेश्या गांभीर्याने करून घ्यावेत. फक्त जवळच्या नातेवाईकांना बोलवावे. जी मौजमजा करायची आहे त्यासाठी स्वतंत्र स्वागत समारंभ योजावा.
आ.न.,
-गा.पै.
अत्रुप्त , अनुमोदन . लग्नात
अत्रुप्त , अनुमोदन .
लग्नात , डोक्यात जाणारे प्रकार :
लग्नमाळा घालताना वधूवरांना उचलणे
आता हल्लीच माझ्या दीराच्या लग्नात , सगळ्या काक्या , आत्या , वैन्या पण उत्साहाने - अरे उचला हां , जरा दणकट माणसाला बोलवा , अरे त्याला बोलाव , ह्याला बोलाव - भाग घेत होत्या . जाम चीड आली .
माळा घातल्या घातल्या चमकीचे फटाके फोडणे..ते दाढीच्या फेसासारखं(डोळ्यात गेल्यावर भयंकर झोंबणारं) फुसफुसं उडवणे.
नवर्या मुलाला किन्वा त्याच्या आजूबाजूला उभे असणार्या धेडे आणि करवल्या याना अक्शता जोर्दार फेकुन मारणे
लग्नघरातील कोणीतरी हवशी गायक्/रचनाकार , मंगलाष्टके रचून गातात , गुरुजी ताटकळत रहातात .
सप्तपदीचा अहेर घेण्याचा प्रकार नाही/बघितला नाही , किन्वा आता आठवत नाहिये.
माझ्या भावाच्या लग्नात,
माझ्या भावाच्या लग्नात, मुलीकडच्याच (काहि हवशे नवशे गवशे गये गुजरे पिलेले वाटत होते) अशा टोळक्याने नवरा-नवरी जेवायला बसल्यावर त्यांच्या आमटीच्या वाटीत बचकभर मीठ घातलेलं पाहिलं मी आणि भांडण केल तिथल्या तिथे. हे म्हणे ते टोळक नेहमी करायच सगळ्या लग्नात. आणि हे त्या मुलीचेच चुलत भाउ लागत होते.
लग्न व्यवस्था मुलीची मन्डळी बघत होती (म्हणे). लग्नाच कार्यालय आमच्या घराच्या जवळ असल्याने बरीच काम आमच्याच अंगावर त्यांनी ढकलली गोड गोड बोलत (आमच्या गावापासुन दुर पडत वै वै). तेव्हा ह्या टोळक्यातील एकही जण कामाला आला नव्हता.
आणि हो मंदिरात लग्न करुयात असा आग्रह आमचा होता मात्र हॉल मध्ये लग्न लावण्याची हौस मुलीकडच्यांचीच होती.
पॅथेटिक.............
इतरांच्या लग्नत्ले माहित नाई
इतरांच्या लग्नत्ले माहित नाई पण माज्या लग्नात नक्के नव्हतं झालं असंकाए.
>>> आणि हे त्या मुलीचेच चुलत
>>> आणि हे त्या मुलीचेच चुलत भाउ लागत होते <<< झकोबा, एकतर अट्टल असतील किंवा पोरीच्या आईबापाकडचे जुने हिशेब चुकते करीत असतील, धरुन बदकले पाहिजेतच, शिवाय त्यांच्याच तोंडात मुठभर मीठ कोंबायला हवे तिथल्या तिथे....
@ अतृप्त | 12 May, 2015 -
@ अतृप्त | 12 May, 2015 - 00:15 आणि @ limbutimbu | 12 May, 2015 - 10:30 ह्या दोन्ही प्रतिसादांशी शंभर टक्के सहमत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=iU6qI92Nt-Q
https://www.youtube.com/watch?v=O9bv6U6EDak
पचतय का बघा!
इतरांच्या लग्नत्ले माहित नाई
इतरांच्या लग्नत्ले माहित नाई पण माज्या लग्नात नक्के नव्हतं झालं असंकाए.
>> माझ्याही. गुजरात साईडला आहे बहुतेक हि प्रथा.
>>> पचतय का बघा! <<< आधी
>>> पचतय का बघा! <<<
आधी दिसायला तर हव.... यूट्यूब ब्यान हे आमच्याकडे!
>>>> इतरांच्या लग्नत्ले माहित
>>>> इतरांच्या लग्नत्ले माहित नाई पण माज्या लग्नात नक्के नव्हतं झालं असंकाए. <<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी दचकून परत परत बघुन खात्री करुन घेतली.... आयडी कोणती आहे...!
नीरजे, तुझे असे काय झाले? की रॉन्ग आयडीचा/ने नम्बर लागला?
लिंबूकाका, AIB च्या लिंका
लिंबूकाका, AIB च्या लिंका आहेत त्या युट्युबच्या. यावरुनच काय ते समजा.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
फोनवरून टाइप करताना होते असे.
फोनवरून टाइप करताना होते असे.
की रॉन्ग आयडीचा/ने नम्बर लागला? <<<
माझा एकमेव डुप्लिकेट आयडी आहे. हाच आयडी रोमन अक्षरांमधे असला प्रकार आहे.
वादात, राड्यात सहमती किंवा आपल्याच लिखाणाची वाहवा यासाठी अजून १०० आयडी घ्यायची गरज मला पडलेली नाही.
नीरजे, ते माहिते आहे ग मला,
नीरजे, ते माहिते आहे ग मला, उगाच आपली गम्मत! ....
(नैतर तशी सहजासहजी सापडत नाहीस तू...)
आगावा, ते एआयबी चे ऑनेस्ट
आगावा, ते एआयबी चे ऑनेस्ट वेडिंग वाले आहेत का? जबरी धमाल आहेत ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्पा, लिंबू - ते एआयबी चे आहेत म्हणून डिसमिस करू नका. ती खिल्ली (फारच सौम्य शब्द झाला) संस्कृती वगैरेची उडवलेली नाही. लोकांच्या स्वभावाची, वागण्याची उडवली आहे. विनोद बराच व्हल्गर आहे, पण अनेक ठिकाणी ब्रिलियंट आहे.
Pages