विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सैतानी लोक ?

गर्भात मुलीना मारणारे ते देव?
हुंड्यासाठी सुनांना जाळणारे ते देव?
पती मेल्यावर सतीची सक्ती करणारे ते देव ?

दलित स्त्रियांची धिंड काढणारे आणि बलात्कार करणारे ते देव?
पुत्रकामेष्टी म्हणून देवळात मूक बलात्कार करणारे ते देव ??

तसेच हिटलर आनि मोहन गांधी पण शाकाहार करायचे...

सारिका ताई,
तुमच्या मते हिंदुंनी बीफचा काउंटर लावला म्हणुन दंगल करायला हवी होति का?
तर मग मुसलमानांनी पोर्क, जैनांनी कांदा लसुण असा वाद घालुन 'मंगल' कार्यालायाचे 'दंगल' का र्यालय करायला पाहिजे होते का?

पुढच्या वेळेस लग्नकार्य आयोजित करण्याची वेळ आलीच तर मी "पंचगव्य" प्राशन करणार्‍यालाच आत प्रवेश देईन हे नक्की! Proud

limbutimbu त्यामुळेच तुमच्या लग्नात ३० च्या वर लोक येत नाहीत. याहून जास्त लोक तर गावाला लग्नात कामाला असतात.

हेमन्त्,

एके काळी पेशवाईत गावजेवणाच्या वेळेस महारांच्या पंगती वेगळ्या बसायच्या. आजही अन्नछत्रे वेगळीच आहेत. मग फरक कशात पडला? आणि त्यामुळे धर्म व/वा जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक कशी मिळाली?

आ.न.,
-गा.पै.

गामा

आता आलात कि जातीवर.

आजचे लग्न हा selective event आसतो . पाहुणे हे आमंत्रित केले जतन आणि त्यांना सुद्धा जाण्याचा विकल्प आसतो.
अशावेळी हा matter of respect बनतो .As you have honoured and respected me attending the event , I wiil respect your religion and food habits.

जेवण घेवून सर्व जन एकत्र होते . काही हिंदू मित्रांनी बीफ आणि पोर्क चाखले पण असेल . की झाले मग ? आपले जे ब्राह्मण नातेवाईक विदेशात आहेत ते चाखतच असतील ना? तसे पण गोव्यातील लोकप्रिय पदार्थ विंदालू तर दुक्रचाच बनवतात. तसेच माझे अनेक मराठी मित्र घरी bacon- डुकराची खारवलेले मास खातात. बरेच जन तर बीफ पण खातात.

तसेच तिकडे दारू होती . बार counter वर भेदभाव नसतो .

असो माझ्या वडलांचा वेदांचा अभ्यास आहे . त्यात गाई , बैल आणि घोडा खाण्याचा पण उल्लेख आहे . मग कोणीतरी फालतू रूढी बनवण्यासाठी शाकाहार श्रेष्ट आणि गाई त्यात सर्वश्रेष्ट असा काही खुल्चापणा काढला असेल .

असो तुम्ही पण मराठी डबक्यातून आणि या धर्म श्रेष्ठ्वात्च्या बाहेर यायचा प्रत्न करा . बरेच लोक धर्मावरून भांडतात - आणि अनेक श्रीमंत लोक धर्मापलीकडे गेले आहेत . वीर संघवी बघा. संघवी असून काहीही खातो बीफ आणि पोर्क आणि सर्व की , त्यावर लिहितो आणि पैसे हो कमावतो.

असो आपण या विषयावर दारू पीत पीत चर्चा करू शकतो , जर तुम्ही मस्तपैकी सिंगल माल्ट अरण्गे कराल तर. आणि तसा हि मी बराच शाकाहारी आहे - त्यामेले मी मस्त वेज चकणा arrange करतो . कसे वाटले?

हेमन्त्,

१.
>> आता आलात कि जातीवर.

हं ऽऽऽ! जातीचा उल्लेख तुम्ही केलाय. आणि बिल माझ्या नावावर फाडताय? 'धर्मावरून आणि जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक' हे तुमचं वाक्य आहे. माझं नाही.

२.
>> असो तुम्ही पण मराठी डबक्यातून आणि या धर्म श्रेष्ठ्वात्च्या बाहेर यायचा प्रत्न करा .

मराठी डबकं...? हे काय असतं?

असो.

धर्माचं म्हणाल तर तो श्रेष्ठ आहेच. जनावरांहून माणसांत फक्त एकंच गोष्ट जास्ती असते. ती म्हणजे धर्म. धर्मो हि तेषां एको अधिको.

आ.न.,
-गा.पै.

माझं सासर कोकणस्थ व माहेर देशस्थ असल्याने लग्नपद्धतीत जे काही थोडेफार फरक असतील ते सांगा म्हणजे आम्ही तसे करू हे माझ्या आईने साबांना आधी कळवले असतानाही त्या काही बोलल्या नाहीत. लग्नानंतर मात्र 'आमच्याकडे लग्नात मुलाच्या आईला पांढरी साडी देतात' हे वाक्य इतक्यावेळा ऐकवले की शेवटी मंगळागौरीला एक मंगळागौरीची व दुसरी लग्नातली पांढरी साडी दिली व गप्प केले. नंतरही मंगळागौर व इतर पूजेच्यावेळी 'आमच्याकडे हे अमूक एक पद्धत नसते' हे प्रत्येकवेळी बोलून झाले. पण यांच्याकडे बोडण असते व ती पद्धत मला काही आवडली नव्हती त्याबद्दल मी काही बोलले नव्हते. मंगळागौरी पूजनावेळेस एकदा सांगून झालेय की आमच्याकडे आपापली गौर घेऊन दुसर्‍या घरी जात नाहीत तर तेथील गौरीचीच पूजा करतात, ओक्के, मी तसे करायला तयार होते. त्यावर त्यांनी मला "अगं तू तुझी पद्धत कशाला सोडतेस?" असे म्हणाल्या. मला कोणाची कोणती पद्धत याच्याशी तेंव्हा आणि आताही काही घेणेदेणे नाही. पण ऐन मंगळागौरीला सासरच्या इतर नातेवाईकांनी माझे बौद्धिक घेऊन रडकुंडीला आणले. आता तू कोकणस्थ झालीस हे का आम्ही सांगायला हवं? या प्रश्नाचं उत्तर नवीन लग्न झालेली मुलगी असल्याने न देण्याबद्दल आईनं दटावलं होतं (लग्न झाल्यावर नवरा देशस्थ झालाय का? नाही ना? मग मी कोकणस्थ कशाला व्हायला हवय? असे त्यावेळी मत होते). आता जर कोणी काही म्हटलं तर मी मनुष्यप्राणी आहे यापलिकडे त्याबद्दल फारसं काही वाटत नाही असेच म्हणेन.

मैना,

>> पण ऐन मंगळागौरीला सासरच्या इतर नातेवाईकांनी माझे बौद्धिक घेऊन रडकुंडीला आणले.

हा प्रकार बऱ्याच ठिकाणी सर्रास चालतो. नव्या नवरीला रडवल्यानंतर मगंच आपल्यात सामावून घेतात.

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

>> हा पापपुण्याचा मूर्ख हिशोब ज्याने मांडलाय त्याला विचारा.

हे बरोबर बोललात. हा हिशोब पारंपारिक आहे. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यासाठी काउ यांना इतिहासजमा व्हावं लागेल. असेच सुयोग्य सल्ले देत जा.

आ.न.,
-गा.पै.

मैना, तुमची उदाहरणे, "कोकणस्थ" विरुद्ध "देशस्थ" अशा स्वरुपापेक्षाही जास्त "सासुरवास" या सदरातच मोडतात.
>>>> आता तू कोकणस्थ झालीस हे का आम्ही सांगायला हवं? <<<<<<
हेच वाक्य कोकणस्थाची मुलगी देशस्थात गेली तर "आता तू देशस्थ झाली आहेस" असे ऐकायला लागते.
>>>> या प्रश्नाचं उत्तर नवीन लग्न झालेली मुलगी असल्याने न देण्याबद्दल आईनं दटावलं होतं <<<<<
"इग्नोर कले" "अनुल्लेख केला" तरी सासरचे खनपटीला बसतात व गामा म्हणतात त्याप्रमाणे "रॅगिंग सदृश" रडवतातच - हे सर्व ठिकाणी पाहिलय, एखाददुसराच अपवाद. दोन्ही कोब्रा वा देब्रा असले तरी मग माहेरच्या परिस्थितीवरुन/शहरी-गावाकडच्या रितीभातीवरुन/रहाणीमानावरुन छळवाद/टोमणे इत्यादीक होतेच. त्यातुन घरात लग्न न झालेली/होऊ न शकलेली/लग्न करुन परत माघारी आलेली नणंद वगैरे असेल तर या छळवादात अजुनच भर पडते.

हा निव्वळ अन निव्वळ "सासू" नावाच्या एका बाईनेच "नणंदा/जावा" अशा स्त्रीयांच्याच साथीने "सून" नावाच्या एका बाईचाच केलेला छ्ळवाद असतो ज्यास त्या त्या घरातील मठ्ठ "पुरुष" काही काळ तरी मूक समर्थन देत रहातात. नवरा "आईचा बाळ" म्हणुन, तर सासरा "बायकोच्या हातातले बाहुले म्हणून" ... घरोघरी हेच दिसते. नविन लग्न होऊन सासरी गेलेल्या स्त्रीचे जीणे एकविसाव्या शतकातही भयाणच आहे हे वास्तव.
त्याहून भयानक वास्तव म्हणजे सून म्हणून आलेल्या स्त्रीच्या या खच्चीकरणास एक स्त्रीच मुख्यतः जबाबदार असते जिला "आपला हक्काचा" मुलगा "आपल्यापासून हिरावून" घेतला जात असल्याचे महादु:ख होत असते. असो. माझ्याकडून विषयांतर नको. सासरचे छळ असा एक वेगळा धागा काढायला हवा!

>>> मंगळागौरी पूजनावेळेस एकदा सांगून झालेय की आमच्याकडे आपापली गौर घेऊन दुसर्‍या घरी जात नाहीत तर तेथील गौरीचीच पूजा करतात, <<<<
या वरून आठवले....
मी ज्या गृपमधे भिक्षुकी करतो तो सगळा देशस्थ, अर्थात त्यांचे यजमानही बहुतेक देशस्थच !
अशाच एका मंगळागौरीच्या सामुहिक पूजनावेळी, एक कोब्रांकडची कोब्रा सून अर्थातच तिला माहित असलेल्या तिच्या प्रथेप्रमाणे गौर घेऊन न येता केवळ पुजा साहित्य घेऊन आली, तर देशस्थ असलेल्या गुरुजींनी "मागाहून" मुद्दामहून माझ्यापुढेच (कारण मी कोब्रा) इतकेवेळा तिच्या संस्कारांची अक्कल माझ्यापुढे काढली की शेवटी न राहवून मला त्यांचेच मस्तपैकी "रेशन" घ्यावे लागले.
यावरून मी मात्र एक धडा घेतला अन माझ्या कीट मध्ये एक दोन गौर/अन्नपूर्णेच्या मूर्ति राखिव ठेवायला लागलो.

त्याहून भयानक वास्तव म्हणजे सून म्हणून आलेल्या स्त्रीच्या या खच्चीकरणास एक स्त्रीच मुख्यतः जबाबदार असते जिला "आपला हक्काचा" मुलगा "आपल्यापासून हिरावून" घेतला जात असल्याचे महादु:ख होत असते. >>>
याच्यावर एका गांजलेल्या सुनेचे उत्तर - अशा बायकांनी आपल्या मुलाचे लग्नच करू नये. आपणच त्याच्याबरोबर नवीन संसार सुरु करावा .. म्हणजे तिला पण आपला मुलगा कोणी पळवल्याचे दुख वाटणार नाही ..

काउ,

>> त्याने इतिहासाच्या जमेची चिंता करु नये.

नीधप यांच्यासारखे सुयोग्य सल्ला देणारे आहेत म्हणूनच तर मी चिंता करत नाहीये. Proud

आ.न.,
-गा.पै

limbutimbu त्यामुळेच तुमच्या लग्नात ३० च्या वर लोक येत नाहीत. याहून जास्त लोक तर गावाला लग्नात कामाला असतात.>>

लग्नात किती लोक आले यावरुन लग्नसमारंभाची यशस्विता ठरते की कार्य व्यवस्थित पार पडणे आणि निमंत्रितांचा व्यवस्थित पाहूणचार होणे यावरुन ठरते? भरपूर लोक लग्नाला आल्यावर काय होतं हे मी काही विशिष्ठ लग्नात अनुभव घेतलेला आहे. एस.टी.बस मधे अनारक्षित जागा पटकवायला जसं खिडक्यांतून रुमाल आणि पिशव्या टाकण्यापासून ते धक्काबुक्की करत जागा पटकावण्याचे प्रकार घडतात अगदी तस्सेच प्रकार जेवणासाठी जागा पकडताना अशा भरपूर लोक आलेल्या लग्नात बघितलेले आहेत. अशा काही लग्नांतून तर असले किळसवाणे प्रकार पाहून न जेवताच आम्ही निघून आलो होतो. तेव्हा गावाकडे काय होतं ठावूक नाही पण शहरात तरी अशा लग्नांत न जेवण्याकडेच आमचा कल असतो.

लिंब्याच्या धाग्याच्या विषयाशी संबंधित माझ्या लग्नातल्या काही गंमती.
कोकणात किंवा ९६ कुळींमधे किंवा कोकणातल्या ९६ कुळींमधे नवर्‍यामुलीची नथ याला स्पेशल स्टेटस असावे. ऑलमोस्ट मंगळसूत्रासारखे. म्हणजे मंगळसूत्र, जोडवी ही जशी त्या त्या मुलीसाठी नवीन केली जातात सासरकडून तशीच नथ ही नवर्‍यामुलीसाठी माहेरकडून नवीन केली जाते. मग तिने ती लग्नात घातली वा नाही घातली तरी.
हे कोकणस्थांच्यात नाही. किंवा फार पूर्वी असेल पण मी लहानपणापासून जी लग्ने बघत आले त्यात हे नव्हते.
माझ्या लग्नाच्या वेळी साबांनी आणि आईनी दागिन्यांचे काय ते ठरवले. सगळाच आपखुशीचाच मामला होता.
नथीचे काही बोलणे झाले नाही.
माझ्या तेव्हा हयात नसलेल्या आजीची खर्‍या मोत्यांची नथ मी आजोबांकडून पूर्वीच मागितली होती. जुन्या काळातली ती नथ म्हणजे नुसता दागिना नाही. माझ्या दृष्टीने बरेच भावनिक वगैरे महत्वही होते. लग्नात मी नऊवार नेसायची ठरवली मी तेव्हा ती नथ घालायची ठरवली. आणि कौतुकाने साबांना ते सांगितले. त्यांना ते पटेचना. त्या म्हणाल्या ती नथ तू नंतर कधीही घाल पण लग्नात नवरीची नथ तिचीच पाहिजे.
म्हणलं अजून खर्चात नाही पाडणार मी आईबाबांना. जाम डायलॉग्ज मारले मी त्यावरून.
तर म्हणाल्या स्वस्तातली, खर्‍यासारखी दिसणारी खोटी (माझ्या व्यवसायामुळे मला अशी नथ मिळवणे अवघड नाही हे त्यांना माहित झाले होते) चालेल पण तुझीच असायला हवी. आपण एका देवाला वाह्यलेलं फूल दुसर्‍या देवाला परत वहात नाही तसंच हे आहे.
मला ते काय पटायला तयार नाही. तशीही ती नथ मला दिलेली म्हणजे माझीच होती.
शेवटी माझ्याकडे एक खोटी नाटकांच्या प्रयोगांसाठी घेतलेली नथ होती ती मी घालावी असे ठरले.
मग मी 'ती' च नथ घातली Wink

नीरजे, तुझ्या सासूबाईंचे बरोबर होते. (तुला पटणार नाहीच, पण आजीची नथ जितकी तुला भावनात्मक दृष्ट्या प्रिय, तितकेच महत्वाचे नव्या नवरीने स्वतःची नवी नथ वापरणे होय. तुझ्या वापरातील टुथब्रश तू दुसर्‍या कोणाला वापरायला देणार नाहीस, वा दुसर्‍या कुणाचा तू वापरणार नाहीस, किमान तितके तरी महत्व या बाबीला आहे असे माझे मत... Proud )
अगदी थोडक्यात सांगायचे तर विवाहित स्त्रीची "सौभाग्यलेणी" उधारउसनवारीची वापरू नयेत असा अलिखित नियम आहे. (आता ही "सौभाग्यलेणी" कुणी ठरविली, तीच का ठरविली, स्त्रीकरताच का ठरवली, सौभाग्य म्हणजे काय वगैरे प्रश्नात मला पडायचे नाहीच्चे ! ते ज्याला/जिला जसे समजेल/उमगेल त्याप्रमाणे करावे, वा करू नये! )
असे नियम पुरुषांनाही आहेत.... जानवे कुणी दुसर्‍याचे उधारउसनवारीवर तात्पुरते वगैरे वापरीत नाहीत. तेच जपमाळेबाबतही. गृहस्थी पुरुषाने बोडक्या डोक्याने व पांढर्‍या कपाळाने बाहेर जाऊ नये, डोके झाकलेले असावे, व कपाळी गंध असावेच, परस्त्रीशी बोलताना "लक्ष्मणाप्रमाणे" वागावे जसे की उगाचच डोळ्याला डोळा तर भिडवू नयेच, पण बाकि अन्गप्रत्यंग न्याहाळत बसू नये, स्पर्श करू नये, कामाव्यतिरिक्त बोलणे वाढवू नये, उगाचच सलगी दाखवू नये इत्यादि अनेक. [किती जण पाळतात, तो संशोधनाचा विषय! ]

नथी बाबतच नव्हे, तर माझ्या पहाण्यात असेही आहे की स्त्रीया आपला कुंकवाचा करंडा/कोयरी देखिल दुसरीच्या हाती देत नाहीत वा दुसरीच्या हातून तिसरीला लावणे असा प्रकार करीत नाहीत.
धार्मिक विधीमध्ये ओवाळताना, ओवाळणारी यजमान स्त्रीला हळदकुंकू लावते ओवाळणीच्या तबकातले, तर यजमान स्त्रीने, त्याच तबकातून हळदकुंकू उचलून ओवाळणारीला लावू नये असाही संकेत आहे. तिने तिच्या पुढ्यात स्वतंत्रपणे ठेवलेल्या करंडा/कोयरीतून ओवाळणारीला हळदकुंकू लावावे.

टूथब्रश आणि नथीत फरक आहे. मी साडेतीन वर्षांची असताना निवर्तलेल्या आजीची नथ मी अठ्ठाविस वर्षांची असताना घालणे (तेही ती नवीन पॉलिश करून आल्यावर) यात हायजिन इश्यू काही नाही.
एकतरी जुना/आधीच्या पिढीचा दागिना लग्नात अंगावर असावा असे म्हणतात हे मी ऐकले होते. मला तसेही जुन्या दागिन्यांचे प्रेम असल्याने बरेच झाले होते.
माझा जुन्या दागिन्यांचा इनफ अभ्यास असल्याने नथ हे एकेकाळी सौभाग्यलेणे होते हे माहितीये मला पण ते तसे आता समजले जात नाही. जसे कोल्हापुरी साज हे प्रकरण केवळ विवाहितेनेच घालायचे होते पूर्वी पण आता ते संकेत कालबाह्य झालेत आणि त्यातल्या पदकांचे संदर्भही.. तसेच.
मंगळसूत्र आणि जोडवी याच फक्त गोष्टी अजूनही विवाहाशी जोडलेल्या आहेत.
माझ्या आईच्या लग्नातही तिला वेगळी नथ केली/ घेतली नव्हती. त्यामुळे ही माहेरची नथ प्रथा कोकणस्थांच्यात कालबाह्य होऊन किमान ४५+ वर्षे झाली असावीत.
त्यामुळे झालेली गंमत एवढेच या किश्श्याचे महत्व आहे.

बाकी हळदीकुंकू व ते लावणे या प्रकारात स्त्रीच्या स्वतःच्या हातात नसलेल्या गोष्टीवरून डिस्क्रिमिनेशन खूप आहे त्यामुळे त्यासंदर्भातल्या प्रथांबद्दल मला आदर नाही.

नीधप

>> गामा, कृपया माझा उल्लेख तुमच्या पोस्टमधे करू नका.

मान्य. तुम्हीसुद्धा यासारखी विधानं टाळावीत अशी विनंती आहे : >> हा पापपुण्याचा मूर्ख हिशोब ज्याने मांडलाय त्याला विचारा.

पापपुण्याचा हिशोब चित्रगुप्त मांडतो. हिंदू त्याला देव मानतात. देवांची बदनामी करू नये अशी विनंती आहे. तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही तर सरळ शब्दांत युक्तिवाद करा.

आ.न.,
-गा.पै.

ते मी आणि चित्रगुप्त बघून घेऊ.
स्वतःच्या सोयीचे तत्वज्ञान हिंदू धर्माच्या नावावर खपवणार्‍यांच्या मनाप्रमाणे जग चालत नाही.
हिंदू धर्माच्या नावावर खोटेनाटे खपवले गेल्याने माझ्याही भावना दुखावल्या गेल्यात.

तुमच्यासारख्याशी याहून जास्त बोलण्याइतकी माझी पातळी खालची नाही तेव्हा कृपया मला तुमच्या बडबडीत आणू नये.

पतीचे अर्धे पुण्य पत्नीला आणि पत्नीचे अर्धे पाप पतीला याचा हिशोब चित्रगुप्ताने मांडलाय हे कशावरून?
हे लॉजिक कुणा पुरूषाने स्वतःच्या सोयीसाठी मांडलेले आहे. हे स्त्रियांना अवमानकारक आहे. आणि यावर विश्वास ठेवणार्‍यांशी कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद अशक्य आहे. माझ्याकडे इतका रिकामटेकडा वेळही नाही.

पैलवाना ,

१. तीन बायका करुन दशरथाच्या संसाराचा इस्कोट झाला. त्यातुन बोध घेउन रामाने एkच लग्न केले.

२. एकच बायको होती . ती दक्षयद्नात जळुन गेल्याने शंकराची कुचंबणा झाली. त्यातुन बोध घेऊन गणपतीने दोन बायका केल्या.

Proud

तात्पर्य : बापाच्या मूढपणातुन बोध घेऊन मुले शहाणी होतात.

Pages