हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.
प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.
तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्या घडणार्या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.
काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.
चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?
(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)
या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676
नंदिनी.... अग मी धसकलो पहिले
नंदिनी.... अग मी धसकलो पहिले वाक्य वाचून की पुढे वाचायला लागतय की काय की नवर्यामुलाला नविन कोट/सुट घेऊन द्यावा लागला की काय म्हणून... !
बागला कोट भारीच!
एकसे एक भंकस मुली >>>
एकसे एक भंकस मुली
>>> गामा, अत्यंत आढ्यतापूर्ण आणि महाबिनडोक शेरा! तुमची कीव कराविशी वाटते. शिकूनही हीच मेंटॅलिटी आहे का? तुम्हाला त्या भावी जीवनसाथी म्हणून पसंत नसतील म्हणून लगेच कोणत्याही मुलीला भंकस बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या या विधानावरून तुम्ही माणूस म्हणून किती भंकस आहात हे दिसतंय.
आम्ही नणंदेचे लग्न नागपुरात
आम्ही नणंदेचे लग्न नागपुरात जाउन करून दिले. तेव्हा एकाच मांडवी दोन लग्ने होती तिचे व तिच्या दिरांचे. भावजईचे बाबा मी सर्व अरेंजमेंट करतो म्हटले व खर्च शेअर करू म्ह्णाले. आमच्या अहोंचा हा पहिलाच अनुभव. तर लग्न पार पडले. हैद्राबादेस आल्यावर नंदेच्या दिराच्या व्याह्यांचे पत्र आयटेम वाइज एक्क्षट्रा खर्च व ते पैसे १४००० चेंज पाठवून द्या म्हणून. ह्यात आम्ही पहिले मंजूर केलेले काहीच आयटम नव्हते. १९८७ ची गोष्ट. तेव्हा आमचे पगार ३००० - ४००० च्या रेंज मध्ये होते. तर काटकूट करून ते पैसे पाठवावेच लागले होते.
आता ह्या बेरकी म्हातार्यचा मुलगा गड गंज कमावता झाला आहे. तेव्हा शाळेत असेल. तेव्हापासून नागपुरी दे ब्रा. लोकांचा धसका घेतला आहे.
आमचे लग्न ४०००० त झाले हे आता ऐकून कसे वाटते. टिपिकल पुणेरी लग्न. पंगत व संध्याकाळी रिसेप्शन इत्यादी. आता बारशी डोजे होत नाहीत इतक्यात. साखरपुडा तर घरगुतीच झाला.
बेफी, तुमचा किस्सा आणि
बेफी, तुमचा किस्सा आणि वर्णन वाचून प्रचंड हसले. धमाल लिहिलंय.
सुरेख, अनुभवातून शहाणे झाले
सुरेख, अनुभवातून शहाणे झाले तर लग्नच कशाला करतील! दिवा घ्या बरे
असो मागच्या वर्षी झालेले एक लग्न
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17849124.cms
एका सोशल लग्नाची लाखाची गोष्ट! (ह्यांचे वेगळे आहे)
तो आणि ती दोघेही उच्चशिक्षित...मनात आणले असते तर धूमधडाक्यात लग्न करू शकले असते. पण त्यांनी असे वाजतगाजत लग्न करण्यापेक्षा आपल्याप्रमाणेच इतरांची स्वप्नपूर्ती कशी होईल , याचा वस्तुपाठ घालून दिला.
लग्नात आपल्याला आहेर न करता मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी काम करणाऱ्या ' मैत्री ' या संस्थेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी नातेवाइकांना केले आणि अवघ्या पाच तासात तब्बल एक लाख २० हजार ७०० रूपयांचा निधी जमला.
गायत्री आणि प्रसाद यांच्या लग्नाची ही गोष्ट. गायत्री ही अमेरिकेतील ओहायो युनिव्हर्सिटीतून केमिस्ट्रीत पीएचडी झालेली. तर प्रसादने आयआयटी मुंबईतून अॅडव्हान्स डिझायनिंगमध्ये पीएचडी केलेली. गायत्रीने आयआयटी कानपूरमध्ये शिकत असताना प्रसादही काही काळ तेथे शिकत होता. तेथेच महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सूर जुळले आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही विवाहबंधनात अडकले.
लग्नानिमित्त पुण्यात आयोजित स्वागत समारंभात एखाद्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना बोलावून आपल्या मित्र-मैत्रिणींना त्या संस्थेला मदत करण्याचे आवाहन करायचे , असे प्रसाद आणि गायत्रीने ठरविले. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पाठिंबा दिला. मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी काम करणाऱ्या ' मैत्री ' संस्थेलाच बोलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ' मैत्री ' च्या स्वयंसेवकांनीही होकार दिला आणि या स्वागत समारंभावेळी ' मैत्री ' चे तीन स्टॉल तेथे उभारण्यात आले.
' मैत्रीचे प्रकल्प आणि काही वस्तू आम्ही तेथे मांडल्या होत्या. त्यांना भेट देत उपस्थितांनी उपक्रमांची माहिती घेतली आणि मदतीचा हातही पुढे केला. दिवसअखेर आमच्याकडे एक लाख २० हजार ७०० रूपये इतका निधी जमा झाला ,' असे मैत्रीच्या स्वयंसेवक जयश्री शिदोरे यांनी सांगितले.
' आमच्या आवाहनाला कसा प्रतिसाद मिळेल , याची आम्हाला काहीशी धास्तीच होती ; परंतु प्रत्यक्षात अपेक्षेपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी देणगी तर दिलीच शिवाय मेळघाटातील समस्या आणि तेथे मैत्रीच्या माध्यमातून चालणारे कामही त्यांना समजले , ही बाबच आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे ,' असे गायत्री आणि प्रसादने सांगितले.
समाजकार्याची शपथ
' आम्ही समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत वैभवाची फळे पोचावीत यासाठी अनुकूल भूमिका घेऊ. निर्भयतेने जगण्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्यासारखा विचार करणाऱ्यांच्या नेहमी संपर्कात राहू ,' अशी शपथ गायत्री आणि प्रसादने उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने घेतली.
लग्न हा एक सोशल इव्हेंट आहे. त्याचा आधार घेऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करावे , या कल्पनेतून आम्ही हा निर्णय घेतला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
- गायत्री आणि प्रसाद
एकसे एक भंकस मुली >>> गामा,
एकसे एक भंकस मुली
>>> गामा, अत्यंत आढ्यतापूर्ण आणि महाबिनडोक शेरा! तुमची कीव कराविशी वाटते. शिकूनही हीच मेंटॅलिटी आहे का? तुम्हाला त्या भावी जीवनसाथी म्हणून पसंत नसतील म्हणून लगेच कोणत्याही मुलीला भंकस बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमच्या या विधानावरून तुम्ही माणूस म्हणून किती भंकस आहात हे दिसतंय. >>
+११११११११११११११११११११११११११११११११११
वा हर्पेन! अतिशय स्तुत्य!
वा हर्पेन! अतिशय स्तुत्य!
सुरेख तुमच्या प्रश्नातच
सुरेख तुमच्या प्रश्नातच तुम्ही विचारत आहात त्याचे उत्तर आहे.
हर्पेन, खूप छान बातमी. ही
हर्पेन, खूप छान बातमी. ही बातमी गेल्यावर्षी मटामध्ये वाचल्यावर माझ्या एक दिराने स्वत:च्या लग्नाप्रीत्यर्थ काही देणगी अश्याच एका प्रकल्पाला दिली होती.
लिंबूभाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर देतच नाहीयेत.
बागल कोट! भारीच.
बागल कोट!

भारीच.
हर्पेनजी , तुम्ही लिहिलेलं
हर्पेनजी ,
तुम्ही लिहिलेलं उदा मलादेखील पटते. जसे की डॉ.प्रकाश आमटे म्हणाले होते की आमच्यात कोणाचेच वाढदिवस साजरे करत नाहीआणि गिफ्ट्स पण देत घेत नाहीत,पण माझ्या वाढदिवसाला आई जे ओवाळते त्याला काय करु शकत नाही मी.(मला ते आवडते हं)त्यामुळे ज्याची त्याची आवड असं मागे लिहिलय मी.
हर्पेन यांचा प्रतिसाद
हर्पेन यांचा प्रतिसाद सर्वोत्तम आहे.
सर्वोत्तम प्रतिसाद सगळ्यात वर तारांकित कसा करतात?.
>>> लिंबूभाऊ माझ्या प्रश्नाचं
>>> लिंबूभाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर देतच नाहीयेत. <<<< ऑ? आता कोणते प्रश्न?
आधी उत्तर दिलय की केव्हाच..... पान क्र. ३ वर.
पुन्हा देतो इथे हव तर.... घ्या..
limbutimbu | 27 November, 2014 - 14:39
>>>>> या चालीरितींची इथे चर्चा करून आपण त्यातून काय घेणार आहोत? <<<<< आपणही उद्या सूनेचे (सासू)सासरे झाल्यावर वा सून-जावई झाल्यावर कसे वागू नये याची उदाहरणे प्रबोधन म्हणून वाचायला हरकत नाही.
>>>>> जे आपल्याला पटत नाही, झेपत नाही, आवडत नाही ते आपल्यावर प्रसंग आल्यावर न करण्याचं धाडस कितीजण दाखवतील? <<<<< हा भविष्याचा पोपटाचा धागा नाही, असले अंदाज बांधणे व्यर्थ आहे, त्यापेक्षा कितीजण धाडस दाखवायला प्रवृत्त होतील. गेला बाजार विचार तरी करतील हे बघितले पाहिजे. पी हळद हो गोरी अशा गत परिणाम केवळ एखाद्या क्रीमचा असू शकतो. व्यावहारिक जगात हळू हळू विचार झिरपवायला लागतात.
>>>>> मुलीच्या लग्नात झालेला मनःस्ताप, अपमान हे प्रसंग दुसर्यावर येऊ नयेत यासाठी मुलाच्या लग्नात कितीजण लवचिकता दाखवतील? <<<<< मी नक्कीच दाखवेन, किंबहूना माझ्या स्वतःच्याच लग्नात माझ्याइतका "लवचिक" जावई पूर्वी बघितला नाही अजुनही बघायला मिळत नाही असे माझ्या सासरकडचे आजही म्हणतात.... !
>>>>> अगदी साधं विचारायचं तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाचा खर्च वधूपक्षाबरोबर निम्मा वाटून घेण्याची तयारी कितीजण दाखवतील? <<<<< सगळेजण दाखवतील, जेव्हा "मागणी तसा पुरवठा" यातिल पुरवठा ठामपणे रोखला जाईल.
अहो यातिल मागणि तसा पुरवठा यावरही शेरेताशेरे झडलेत, तुमचीच कॉमेण्ट आहे, आहात कुठे तुम्ही? डोळ्यात तेल घालून वाचून लिहून लक्षात नाही ठेवत वाटते हल्ली !
असो, वयपरत्वे माझेही हल्ली अस्सेच होते हो... ! 
डोळ्यात तेल घालून वाचून लिहून
डोळ्यात तेल घालून वाचून लिहून लक्षात नाही ठेवत वाटते हल्ली ! फिदीफिदी
पान क्र. ४ वर तुमच्या ताशेर्यांवर मी प्रश्न विचारला आहे.
तुम्हीच डोळ्यात तेल घालून वाचत नाही असं दिसतंय..
आधीही आठवण करून द्यावी लागली होती, आणि आताही आठवण करून द्यावी लागली.
लग्नानिमित्त पुण्यात आयोजित
लग्नानिमित्त पुण्यात आयोजित स्वागत समारंभात एखाद्या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना बोलावून आपल्या मित्र-मैत्रिणींना त्या संस्थेला मदत करण्याचे आवाहन करायचे , असे प्रसाद आणि गायत्रीने ठरविले. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पाठिंबा दिला. मेळघाटातील कुपोषित बालकांसाठी काम करणाऱ्या ' मैत्री ' संस्थेलाच बोलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ' मैत्री ' च्या स्वयंसेवकांनीही होकार दिला आणि या स्वागत समारंभावेळी ' मैत्री ' चे तीन स्टॉल तेथे उभारण्यात आले.>>>>>>>>>
ह्याला काही अर्थ नाहीये, खरे तर हे चुकीचेच आहे.
लोकांना असे बोलावुन मग घोळात घेउन दान करायला लावणे चुकीचे आहे. भीडे पाई लोकांना देणग्या द्याव्या लागल्या असतील.
त्यापेक्षा स्वागत सभारंभ न करता ते पैसे गपचुप "मैत्री" ला दिले असते तर १ लाख २० हजार सहज देवु शकले असते. पण तसे केले असते तर त्यांच्या सामाजिक जाणीवांचे प्रदर्शन करता आले नसते.
अरे बापरे काय धमाल प्रसंग
अरे बापरे काय धमाल प्रसंग आहेत एकेकांचे!! सावकाशीने पुन्हा वाचते!!
बेफी, तुमचा किस्सा आणि वर्णन वाचून प्रचंड हसले. धमाल लिहिलंय. >> +१११
@ ड्रीमअगर्ल - लिंबू भाऊंचे हे विधान वाचा <<<शेळपट/पुचाट वर-पुरुषांमुळे परिस्थिती इतकी बिघडली की सरसकट मुली नकोतच व्हायला असा सरळ सरळ अन्यायी स्त्रीविरोधी भुमिकेचा प्रचार होऊन स्त्रीभृणहत्येत भर पडत राहिली आह<<< शेळपट/पुचाट वर-पुरुषांमुळे परिस्थिती बिघडली इतकंच पटलं... पुढचं फारसं नाही पटत
मुलीला दिलेले सामान >> मृदुला, ज्या लग्नात गाद्या उश्यांपासून भांडी कुंडी सगळं दिलं जातं ते त्या दोघांच्या नव्याने वेगळ्या थाटलेल्या संसाराला उपयोगी पडतं. शक्यतो उपयोगी पडणार्याच गोष्टी असतात त्यात. जर जास्तीच्या वस्तू असतील तर सासरच्याच जवळच्यांना दिल्या जातात जसं नणंद किंवा जाऊ!
बर्याच माहेरी परत पाठवल्या उरलेल्या एक दोन फ्रेम्स आठवणी म्हणून हट्टाने स्टोरेज मध्ये ठेऊन घेतल्या! कन्यादानात भावनांसकट सगळं मागे सोडून यायचं असतं का? 
कोकणात आंदणाची भांडी आणि रूखवताच्या गोष्टी व आमंत्रितांच्या भेटी सोडल्या तर बाकी पसारा तसा कमी असतो. पण सासरचं दोन मजली घर असूनही "हा कचरा" कुठे सांभाळू असे म्हटल्यामुळे माझ्या रूखवताची भांडी व शोभेच्या वस्तू आम्हाला मुंबईला परत आणाव्या लागल्या होत्या! भाड्याचे घर असूनही!
साधना काळ बदलतो. फक्त आपणच बदलत नाही.>> अगदी बरोब्बर!!
कोकणात खालील प्रथा असतात
कोकणात खालील प्रथा असतात का?
सापु ला सासू उपस्थित राहत नाही.
जेवणाच्या पंगतीमध्ये मुलाचे आईवडील बसत नाहीत! कारण येणार्या पाहुण्यांच्या अगत्यात बिझी असतात. त्यामुळे आमच्या लग्नाच्या आणि दिराच्या लग्नातही नवरा-नवरी व एक दोन मित्र सोडले तर बाकी गोतावळा जेवायला नव्हता.
मुंबई-पुण्याच्या लग्नात घरचे लोक नवरा-नवरीच्या पंगतीसाठी थांबतात असा अनुभव आहे.
माझे आणि भावाचे दोघांचेही
माझे आणि भावाचे दोघांचेही लग्न सगळा खर्च निम्मा निम्मा करुन झाले.
माझ्या लग्नात नवर्याने पाय धुऊन घेणार नाही अस सांगितले होते, तसेच झाले.
भावाच्या लग्नातही अगदी डेकोरेशनपासुन सगळा खर्च निम्मा निम्मा केला. साड्या, कपडे दोन्ही लग्नात आपले आपणच केले. दागिने विचारुन केले म्हणजे रिपिट होऊ नयेत म्हणुन. सगळी खरेदी आम्ही एकत्रच केली पण पैसे ज्याचे त्याने द्यावेत या बोलीवर.
भावाच्या लग्नात एक नवीन गोष्ट केली म्हणजे माझ्या वडिलांनी सक्त ताकिद दिली होती अक्षता वाटायच्या नाहित. स्टेजवर एका ताटात ठेवल्या होत्या अक्षता, ज्यांना इच्छा असेल त्यांनी तिथेच वधु वराच्या डोक्यावर टाकाव्यात. आणि लग्न लागताना भटजींनी मोठ्या आवाजात सगळ्यंना सांगितले की स्टेज्वर चप्पल बुट घालुन यायचे नाही आणि कोणीही वधु वरांना उचलायचे नाही.
>>> बरं, हे ठीक आहे. >>>
>>> बरं, हे ठीक आहे.
>>> तुमच्या मुलाच्या लग्नात लग्नखर्च तुम्ही वधूपक्षाबरोबर अर्धा-अर्धा वाटून घेणार ना?
>>> अर्धा-अर्धा नाहीतरी किमान तुमच्या वर्हाडाचा?
ओह हा प्रश्न म्हणतेस का? सुटला बरका नजरेतून....
मी मूळात त्यान्ना खर्चिक लग्न करूच नका असे सांगणार... घराच्या अंगणात देवब्राह्मण व अग्नि आणि दहावीस माणसांच्या साक्षिने यथासांग सर्व विधी करुन लग्न लावा म्हणणार... माझ्याकडून मोजुन दहा ते वीस माणसे येतिल. यातिल खर्च निम्मा निम्मा वाटून घेणार.
मी माझ्या पोरीच्या लग्नातही मोजुन ३० माणसे नेली होती. (एकतीसाव्वा फोटोग्राफर, व बत्तीसाव्वा ब्राह्मण होता... व त्यांचा खर्च देऊ का हे विचारले होते.... त्यांनी अर्थात नाकारले, त्यांची साडेपाचशे माणसे झाली. मी ३०० चा खर्च दिला होता. तो दिल्यावर मला माझी माणसे आणणे शक्यच नव्हते, सबब बैठकीतच आधीच सान्गुन सवरून ३०सच माणसे. )
माझ्या एका मित्राचे लग्नाच्या बैठकीत मित्राचे घरच्यांचे गळी उतरविले होते की केवळ २० माणसे लग्नाला हवीत तुमची. (अर्थात मुलिकडच्यान्नीच घोळ घालून मोठ्ठे लग्न करुन मला तोन्डघशी पाडले तो भाग अलाहिदा.. तेव्हा पासून लग्नात मध्यस्थी करणे मी सोडून दिलय. )
बायदिवे, मंजुडी, विसरला असलात तर परत सांगतो, मी अनुभूती व अनुभव याशिवाय काहीही बोलत नाही.
वरपक्षातील असल्यामुळे 'हे असे
वरपक्षातील असल्यामुळे 'हे असे असे वागू शकतो' असे दाखवणे! >> कित्येक अनुमोदन!! यावेळी वर पक्षातील दूर दुरच्या आत्या-माम्या-काक्यांना चांगलाच चेव येतो!
सगळे व्यवस्थित होत आहे हे काहींना बघवत नाही. >> हे बर्याचदा जवळच्याच नातेवाईकांकडून अनुभवायला मिळते.
तुमच्या स्टोरीचा शेवट हॅपी झाला हे महत्वाचं. >> सिनी, दुर्दैवाने नाही!! लग्नापासूनचे ताणलेले प्रसंग इतक्या विकोपाला गेले की आई बाबा त्यानंतर कधीच सासरी आले नाही!
सुरूवातीला मी गप्प बसायचे की नवर्याला ऐकून घ्यावं लागू नये बघीतलंस यासाठी आम्ही जातीतली मुलगी कर म्हणत होतो. तो काही बोलायला गेला की बायकोचा बैल! नंतर नंतर गोष्टी इतक्या हाताबाहेर गेल्या मग माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर मी सुद्धा येणं जाणं कमी केलं. सासरे असेपर्यंत त्यांच्यासाठी जायचे. आता ते गेल्यावर पूर्ण बंद!! कितीही प्रयत्न केला तरी "फुलायच्या काळातील" कडवट आठवणी आणि ती अढी मनातून कायमची जात नाहीच!! आणि नाही म्हटलं तरी मग दोघांच्या संसारातही कधी कधी ही अढी अचानक डोकावून जाते!
अवांतर : यासाठीच मुलगा वयात आला आणि लग्नाचा निर्णय स्वतःचा स्वतः घेतला तरी त्याला, त्याच्या भावी वधूला आणि वधू च्या आई वडीलांना घेऊन विवाहपूर्व समुपदेशनाला आम्ही दोघं नक्की जाणार!! आपापसात बसून गोष्टी सामोपचाराने घ्याव्यात हे जरी खरं असलं तरी काही समज चुकीचे असू शकतात, त्यावर थोडं ब्रेन वॉशिंग हवंच! आणि याबाबत सोनारानेच कान टोचलेले चांगले.. कोणीही एकाने काही नवीन सांगायचा प्रयत्न केला तर भावना लक्षात घेण्यापेक्षा आमच्याकडे-तुमच्याकडे असा इगो आधीच जागा घेतो. ज्या प्रसंगाने दोन आयुष्य आणि दोन कुटुंब कायमची जोडली जाणार तिथे आधीपासूनच अशा एखाद्याच्या हट्टीपणामुळे, गैरसमजामुळे, अहंकारामुळे मुलांचे फुलण्याचे क्षण कोमेजून जाऊ नये आणि त्याचे सावट पुढच्या आयुष्यावर कायम राहू नये हे तरी सगळ्यांनी लक्षात घ्यावं.
>>>> पण सासरचं दोन मजली घर
>>>> पण सासरचं दोन मजली घर असूनही "हा कचरा" कुठे सांभाळू असे म्हटल्यामुळे माझ्या रूखवताची भांडी व शोभेच्या वस्तू आम्हाला मुंबईला परत आणाव्या लागल्या होत्या! <<<<
परत आणु शकलात वा जास्तीच्या माहेरी पाठवू शकलात, बर्याच नशिबवान आहात....
बाकी सर्रास ठिकाणी वधुला आलेल्या गोष्टींचे दर्शनही होऊ शकत नाही, व मोठेपणाचा मान मिरविण्याकरता व आधीची देणीघेणी निस्तरण्याकरता सहसा सासू तिच्या मुलामुलीनातेवाईकांमधे त्या वस्तू/खाण्याचे जिन्नस वाटून टाकते.
कधी उलटेही बघायला मिळते, लिम्बीच्या हातात आलेला आहेर तिच्याकडचे गोळा करत होते, त्यात त्यांच्या प्रथेप्रमाणे बरीचशी भांडीकुंडी, पिंपे वगैरे होती. अन लिम्बीला त्यातील काहीच दिले गेले नाही, बहुतेक सर्व वाटले, अन अशांमधेही वाटले ज्या व्यक्ति लिम्बीला अजिबात आवडत नाहीत, म्हणून लिम्बीने लग्नानंतर दहा वर्षांनी भांडून एक पिम्प हक्काचे/वहिवाटीचे म्हणून (मी नको म्हणत असतानाही) घेऊन आली.
माझ्या लग्नातही आमची माणसे पन्नासचे आत होती. तर लिम्बीकडची साताठशेच्या पुढे गेली.
)
एक वेळ अशी आली की आचारी स्वयंपाक वाढवून वाढवून कंटाळले, जास्तीचे आणलेले पीठही संपले जिलेबीकरता, शेवटच्या वरवधुच्या पंगतीकरताही काही उरले नाही, तेव्हा आमच्या सासर्यांनी बाहेरून टोपलेभर जिलेबी मागवली व टोपले सरळ माझ्याच हातात देऊन आत नेऊन द्यायला सांगितले. मी काय समजायचे ते समजलो, आत नेऊन दिले. इतका समंजस जावई मिळणे भाग्याचे असते असे म्हणतात म्हणे... खरे खोटे देव जाणे, अन लिम्बीच्या माहेरच्यान्ना आजही ते जाणवले आहे वा नाही हे तेच जाणे...
तर आमच्या लग्नाच्या फोटोत आमच्या पंगतीत, घास भरविण्यापुरती जिलेबी वाट्याला आली, बाकी बरेचसे ताट रिकामेच होते, फोटोतही तसेच आलय. (मी त्याकाळी पट्टीचा पैजेवर जिलबी खाणारा... अन... माझ्याच लग्नाची गरमागरम जिलेबी खायचे शेवटी राहूनच गेले की हो....
माझ्याच लग्नाची गरमागरम
माझ्याच लग्नाची गरमागरम जिलेबी खायचे शेवटी राहूनच गेले की हो.. > ५०वा लग्नाचा वाढदिवस दणक्यात साजरा करा आणि जिलेबी किलोभर मागवा . हायकायनायकाय
मामी, >> तुमच्या या
मामी,
>> तुमच्या या विधानावरून तुम्ही माणूस म्हणून किती भंकस आहात हे दिसतंय.
चुकलो! भंकस स्थळं म्हणायचं होतं. लग्नाचा बाजार असतो. बाजारात भंकस चालतेच. त्या स्थळांनी काय भंकस केली ते मी इथे सांगत नाही.
मेहुणीच्या लग्नाच्या वेळेस भंकस मुलं पाहून आम्ही सगळेच वैतागलो होतो.
आ.न.,
-गा.पै.
शेवट हॅपी झाला हे महत्वाचं.
शेवट हॅपी झाला हे महत्वाचं. >> हे मी लग्नाबद्दल म्हणत होते .कारण कधी कधी लग्न मोडावं म्हणुनच असं करतात जवळचे नातेवाईक अगदि पालकही. त्यामुळे तुम्ही लकी आहात.
आणि जे तुम्ही आता लिहिलय <<आई बाबा त्यानंतर कधीच सासरी आले नाही!>> त्याला हे- कधी कधी स्वभावाला औषध नसते . पुढच्या पिढीचे नक्कीच तुमच्या हातात आहे.
माझ्या लग्नात नवर्याने पाय
माझ्या लग्नात नवर्याने पाय धुऊन घेणार नाही अस सांगितले होते, तसेच झाले. >> मस्तच! भावी वर-वधूंनीच या बाबत ठाम राहावे! त्यातही वराने बर्याच गोष्टी समजूतीने घेतल्या आणि आपल्या घरच्यांनाही शांतपणे पण ठाम पणे समजावून सांगितल्या तर कोणाचेही मन न दुखावता प्रसंग आनंदाने साजरा केला जाऊ शकतो. हा क्षण वधू वरांसाठी आणि त्यांच्या आई वडीलांसाठी खूप स्पेशल अस्तो, त्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात मग त्या फक्त आणि फक्त चांगल्याच असाव्यात यासाठी दोन्ही बाजूंनी विशेष प्रयत्न घेणं गरजेचं आहे.
भावाच्या लग्नात एक नवीन गोष्ट केली म्हणजे माझ्या वडिलांनी सक्त ताकिद दिली होती अक्षता वाटायच्या नाहित. स्टेजवर एका ताटात ठेवल्या होत्या अक्षता, ज्यांना इच्छा असेल त्यांनी तिथेच वधु वराच्या डोक्यावर टाकाव्यात. >> प्रसंशनीय!! काळानुसार न पटणार्या चुकीच्या वाटणार्या बर्याच प्रथा समजूतीने बदलण्याची खरंच गरज आहे!
लग्न लागताना भटजींनी मोठ्या आवाजात सगळ्यंना सांगितले की स्टेज्वर चप्पल बुट घालुन यायचे नाही आणि कोणीही वधु वरांना उचलायचे नाही.>> अगदीच योग्य!! भटजींकडूनच अशी अनाऊंसमेंट होत असेल तर ते नक्कीच चांगले आहे. अर्थात तरीही काही अति उत्साही प्राणी सगळी कडे असतातच!
बर्याच नशिबवान आहात.... बाकी
बर्याच नशिबवान आहात....
बाकी सर्रास ठिकाणी वधुला आलेल्या गोष्टींचे दर्शनही होऊ शकत नाही, व मोठेपणाचा मान मिरविण्याकरता व आधीची देणीघेणी निस्तरण्याकरता सहसा सासू तिच्या मुलामुलीनातेवाईकांमधे त्या वस्तू/खाण्याचे जिन्नस वाटून टाकते.>> अनुमोदन
हे मी लग्नाबद्दल म्हणत होते .कारण कधी कधी लग्न मोडावं म्हणुनच असं करतात जवळचे नातेवाईक अगदि पालकही. त्यामुळे तुम्ही लकी आहात. >> हो याबाबत नक्की लकी आहे
तरीही कधी कधी दोघांनाही वाटून जातंच की जातीमध्ये लग्न केलं असतं तर हा मनस्ताप टळला असता की काय! पण शेवटी त्याही जर-तर च्या आणि बिनभरवश्याच्या गोष्टी! पदरी पडलं पवित्र झालं म्हणायचं!
पुढच्या पिढीचे नक्कीच तुमच्या हातात आहे.>> हो!! वर लिहील्याप्रमाणे यासाठीच मुलगा वयात आला आणि लग्नाचा निर्णय स्वतःचा स्वतः घेतला तरी त्याला, त्याच्या भावी वधूला आणि वधू च्या आई वडीलांना घेऊन विवाहपूर्व समुपदेशनाला आम्ही दोघं नक्की जाणार!! ज्या प्रसंगाने दोन आयुष्य आणि दोन कुटुंब कायमची जोडली जाणार तिथे आधीपासूनच अशा एखाद्याच्या हट्टीपणामुळे, गैरसमजामुळे, अहंकारामुळे मुलांचे फुलण्याचे क्षण कोमेजून जाऊ नये आणि त्याचे सावट पुढच्या आयुष्यावर कायम राहू नये यासाठी!!
सर्वात भारी गोष्ट :- लग्नात
सर्वात भारी गोष्ट :- लग्नात येणारे पाकिट भेटवस्तु इ. तिथल्यातिथे उघडुन माईक वरुन अनाउंन्समेंट केली जाते. हा प्रकार अस्सा काही डोक्यात जातो. स्टेजवरुनच "अमुक यांनी पाकिटात ५१ रुपये रोख दिले आहे." " तमुक यांनी पितळेची कळशी न देता स्टीलची कळशी दिली आहे"''' " तमुकमामांनी पाकिट दिलेले आहे पण त्यात काहीच टाकले नाही बहुतेक विसरुन गेले. ओ मामा पाकिट मोकळच दिले की राव तुम्ही"
असल्या घोषणा १ -२ मित्रांच्या लग्नात ऐकलेल्या आहेत
लिंबूभाऊ, <<< limbutimbu | 28
लिंबूभाऊ, <<< limbutimbu | 28 November, 2014 - 12:37 नवीन >>>
या प्रतिसादाबद्दल अत्यंत मनःपूर्वक धन्यवाद!
वधूपित्याचा वरपिता झाला की त्यांच्यात अमूलाग्र बदल होतो याची अनुभूती घेतली आहे, म्हणून मुद्दाम हा असा प्रश्न इथे उपस्थित केला होता. याला अपवाद आहेत हे या निमित्ताने कळले.
लग्नविधींबद्दल सोप्या शब्दांत तपशीलात लिहा. मुद्दाम वेळ काढा त्यासाठी.
आमचे लग्न झाल्यानंतर भटजी
आमचे लग्न झाल्यानंतर भटजी माईक घेऊन म्हणाले, "सर्वांनी कृपया इकडे लक्ष द्या" आणि मग मला आणि सतिशला स्टेजवरच सर्व पाहुण्यांना वाकून एकदाच नमस्कार करायला लावला होता. नंतर कुणालाही नमस्कार केला नाही तरी चालेल.
माझ्या मामेमावसचुलत बहिणींच्या लग्नामध्ये त्यांच्या साडीला ती गव्हाची ओटी बांधली होती आणि त्या वजनसकट जो दिसेल त्याला नमस्कार करायला भटजी सांगत होते. तिची हालत पारच खराब झाली होती.
मला आणि सतिशला स्टेजवरच सर्व
मला आणि सतिशला स्टेजवरच सर्व पाहुण्यांना वाकून एकदाच नमस्कार करायला लावला होता. नंतर कुणालाही नमस्कार केला नाही तरी चालेल. > हे आम्ही स्वतःच केले.
Pages