निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो शशांक त्याच त्या.

सूकी... एकास एक या प्रमाणात हे मिश्रण घ्यायचे एवढेच. त्यावेळी टिटवाळ्याला भाताच्या गिरण्या होत्या, तिथून तूस मिळायचे. बांधकामात तारेच्या जाळीवर रेती गाळून घेत, त्यावर राहिलेला गाळ पण फुकटच मिळायचा. शेणखत कुर्ल्याच्या गोठ्यातून आणायचे.. अश्या भरलेल्या कुंड्या मग काँक्रीटच्या जमिनीवर ठेवल्या, तरी चालत. झाडे म्हणजे भाजीपाला, शोभेची झाडे अशीच लावायचो, पण ती छान वाढायची.

सुकी, बी आणि मधु-मकरंद सर्वांचेच फोटोज मस्त आहेत....

सुकी तुम्ही त्या तांदळाचे पोहे पण करता का?

कमलाबाईंनी स्वतः संशोधन करुन मग लिहिलेय, त्यामुळे त्यांनी लिहिलेय ते खरेच असणार Happy
त्यांचे आहारगाथा हे पुस्तक आहे माझ्याकडे.

कमलाबाईंनी स्वतः संशोधन करुन मग लिहिलेय, त्यामुळे त्यांनी लिहिलेय ते खरेच असणार
त्यांचे आहारगाथा हे पुस्तक आहे माझ्याकडे.>> धन्यवाद. त्यांची अजून काही पुस्तके सांग ना प्लीज!

रच्याक्याने काल मी भृंगराजचा रस डोक्याला लावला. दाट हिरवा काळाकुट्ट रस खूपच छान आहे. जरुर केसांवर प्रयोग करुन बघण्यासारखा आहे.

बी, बहुतेक एकच पुस्तक आहे त्यांचे. त्यांनी संशोधनावर जास्त भर दिला, फार उशीरा लिहायला लागल्या त्या.
काही मासिकांतून त्यांचे लेख वाचले होते, पण त्यांचे संकलन झालेले दिसले नाही.

दाट हिरवा काळाकुट्ट रस खूपच छान आहे. जरुर केसांवर प्रयोग करुन बघण्यासारखा आहे.

भृंगराज थंड असेल ना?? इथे सध्या थंडी पडलीय.. त्यात माका घातला डोक्यात तर वाट लागेल.

मेंदी इतके थंड नाही वाटले पण चेहर्‍यावर ओलसरपणा उतरला होता.

दिनेशदा, भृंगराज वनस्पतीचा रस पितात का? मी पिऊन बघेन चालत असेल तर. आपल्याकडे भृंगराजचे टॉनिक मिळते दुकानात.

माका घेतात पोटात, पण खरेच एखाद्याचा सल्ला घेतल्याशिवाय नकोच. मात्रा / पथ्य वगैरे जाणकार वैद्यच सांगू शकतात. त्यापेक्षा ब्रम्ही खात जा, श्रीलंकन लोक नियमित खातात आणि त्यांचे केस, बघतच असशील कसे, सुंदर असतात ते !

सुदुपार,
दिनेशदा, सुकि छान माहिती !

सुकि,
भात पिकाबद्दल अधिक माहिती मिळाली..

साधना,
आपल्याकडे गावाकडे आता हे 'गोवर्धन' कमी झालं आहे, कर्नाटकातल्या गावामध्ये मात्र अजुनही जास्त दिसुन आलं,

सगळ्यांचे फोटो अप्रतिम आहेत.

वा सुकी छान वाटले. पुर्वी सगळे अनुभवलेले मनात दाटले.

माझी आजी पुर्वी भाताच्या तुसाचीमशेरी करायची. तिच आमच्या घरात दंतमंजन म्हणून सगळे वापरायचे. एका घमेल्यात तुस ठेवायची आणि एक जाडा ओंडका अर्धवट जाळून फुंकर मारुन तो त्या घमेलात मध्ये धुमसत ठेवायची. मग दुसर्‍या दिवशी सगळा तुस करपलेला असायचा. तो तुस चुरुन आजी एका बरणीत भरुन ठेवायची. चरचरीत असल्याने दात अगदी स्वच्छा निघायचे.

तांदूळ गिरणीत दळायला नेले की त्यापासुन कोंडा निघे तोही पुर्वी पोत्यात भरुन घरी आणत. त्याचे आजी गुळ घालून पेले करत असत. ईडली पात्राऐवजी तेंव्हा घरातील पेल्यात ते मिश्रण वाफवत असत. ह्यांची चव थोडी कडवट असे.

झोडणीसाठी खास जागा तयार केली जात. म्हणजे मध्ये एक रुंद खळगा (खड्डा) करुन खळगा व बाजुचा परिसर शेणाने सारवला जात. त्या खळग्यात जाते किंवा मोठा दगड ठेवुन त्यावर भाताच्या गुंड्या आपटल्या जात. हे करताना हात भरुन यायचे. रात्री अंग दुखायचे. तरीपण मी मजा म्हणून हे करायचे. गुंड्या आपटल्या की त्यातील तांदूळ खळग्यात जमत असे. मग तो तांदूळ सुपात घेउन बाहेरील अंगणात एका रेषेत सुपातुन वरुन खाली रचत. खाली रेषेत टाकला की सुपाने त्याला जोराजोराने हवा घालत त्यामुळे पोंजके दाणे म्हणजे तुस वगैरे हवेने बाहेर येत. मग पुन्हा खडे वगैरे असतील तर काढून ते पोत्यात भरुन ती पोती खटार्‍यात भरुन गिरणीत नेली जात. ह्या प्रक्रियेला मळणी म्हणत.

जागू खूप छान. ह्या सगळ्या गोष्टी शहरात दिसणं दुर्मिळ आहे. ईन्डोनेशियात पाकाचा गुळ मिळतो. म्हणजे गुळाचा पाक मापानी विकतात. तसेची गुळाची लापशी विकतात. ते बघून मला पुर्वीचा भारत आठवला.

अरे काय भाग्यवान लोक आहात तुम्ही - शेतातले काम प्रत्यक्ष करायला, पहायला मिळाले - त्यासारखा अनुभव नाही - बर्‍याच वर्षांपूर्वी माझ्या मावशीच्या घरासमोरील मोठ्या प्लॉटमधे - माझा एक लांबचा काका व मी असे मिळून फ्लॉवर, कोबी, वांगी, भुईमूग लावले होते त्याची आठवण झाली - खूपच मजा येते शेतीचे काम करायला - कष्ट असतातच पण हे सर्व करताना जो काही आगळावेगळा आनंद असतो त्याची तुलना कशाचीही करता येणार नाही. आपण लावलेले बी कसे अंकुरते, त्याला फुल-फळ कसे धरते, त्याची निगा राखताना व मग चव चाखताना जो आनंद मिळतो त्यापुढे इतर सुखे काहीच नाहीत असे वाटते.

फारच भारी, भाग्यवान मंडळी आहात ज्यांना शेत, बागा, झाडे, पशू, पक्षी यांबद्दल प्रेम आहे, त्याकरता काही करण्याची तळमळ, प्रेम आहे.

दिवाळी शुभेच्छेच्या कवितेला दिलेल्या प्रतिसादा बद्दल धंन्यवाद मित्रांनो.

सगळ्यांचेच फोटो मस्त.

आपल्या दिवाळी अंकात माझा
http://vishesh.maayboli.com/node/1197
हा लेख आला आहे पहा.

आपण लावलेले बी कसे अंकुरते, त्याला फुल-फळ कसे धरते, त्याची निगा राखताना व मग चव चाखताना जो आनंद मिळतो>>> खरेय.

दिवाळीच्या सुट्टीमुळे रिकामटेकडा बसलेला माझा लेक परवा काय करु काय करु म्हणुन सतावत होता. सरळ उठले व वाटीत थोडी मोहोरी देउन त्याला खिडकीशी उभे केले थोड्या मोकळ्या कुंडीत सगळी मोहोरी पेरली त्याने. तेवढाच १५-२० मिनिटांचा उद्योग व माझी सुटका झाली. Happy

सरळ उठले व वाटीत थोडी मोहोरी देउन त्याला खिडकीशी उभे केले थोड्या मोकळ्या कुंडीत सगळी मोहोरी पेरली त्याने. तेवढाच १५-२० मिनिटांचा उद्योग व माझी सुटका झाली. >>>> किती वयाचा मुलगा आहे तुमचा माहित नाही - पण चित्रकला, वाचन, वादन, बागकाम, स्वयंपाक, नर्तन -असे कुठलेही त्याला आवडेल, ज्यात तो रमेल, ज्यात त्याला क्रिएटिव्हीटीचा आनंद मिळेल असे शोधा - सतत नवनवीन खेळायला, शोधायला, करायला मुलांना आवडतेच - त्यांच्यात जबरदस्त उर्जा असते - त्या उर्जेला थोडेसे (आपल्या नाही पण त्याच्या मनासारखे) वळण लावायचा प्रयत्न करा - बघा त्याला आवडेलच, तुम्हालाही खूप बरे वाटेल..

तो साडे पाच वर्षांचा आहे. आवड सगळीच आहे पण कोणतीही गोष्ट १५-३० मिनिटांचावर करत नाही. मग काही काही नवनवीन पर्याय सतत शोधावेच लागतात.

मी शास्त्र विषयांचा ४-५ पुस्तकांचा सेट, छोटे माहितीग्रंथ, अ‍ॅटलास इ. आणले आहेत. माझ्यात जेव्हा पेशन्स असतील तेव्हा त्याला (त्यातील वा इतर कोणतेही) पुस्तक देते व तुला वाटेल ते पान काढ यातुन आपण ते वाचुया सांगते. मग त्यात थोडा वेळ जातो आमचा. पण हे सर्व मी घरात असेल तेव्हाच. इतर दिवशी आजी आजोबांचा पेशन्स संपतोच ना Sad मग आहेच डोरेमॉन.

मी काल माझ्या घरच्या मूळ्याचा खुडा केला. मिनरल वॉटरच्या बाटलीत, खिडकीत ठेवूनच वाढवला होता. ( उपटताना खरेच वाईट वाटत होते ) कोथिंबीर पण, उपटण्यापेक्षा, जेवढी पाने हवीत तेवढीच काढून घेतो.
००

इथे सध्या उन्हाळा आणि पावसाळा, दोन्ही एकदम सुरु आहेत. गरमही होतेय आणि पाऊसही पडतोय. आता ४/५ महिने असेच वातावरण असणार आहे. शिरिषाचा बहर ओसरलाय, आंबे बाजारात आलेत. गोरखचिंचेला भली मोठी फुले लागली आहेत. ( आपल्याकडच्या फुलांपेक्षा, बरीच मोठी आहेत हि फुले ) हे फुल तर मूळातच देखणे असते, पांढर्‍या पाच मोठ्या पाकळ्या, त्यातून खाली लोंबणारा एक पु़ंकेसर आणि त्याला परत लोकरीच्या गुंड्यासारखा गोळा.

इथली झाडे एवढी प्रचंड मोठी आहेत, कि ज्यांच्या अंगणात आहेत त्यांनी त्या झाडाच्या खोडातच, साठवणीच्या खोल्या, कोरून काढल्यात !

बियांसाठी लावतात ते आणि त्याहून छोटे, असे दोन प्रकार आहेत. तेलबियांसाठी लावतात ते अगदी ९/१० फूट वाढू शकते. त्याच्या फुलांचा व्यास १० ते १० इंच असू शकतो. ते लावायचे असेल तर कुंडी मोठी हवी.
छोटी जात लावायची असेल, तर लहान कुंडी चालेल.
बिया, कुठल्याही चांगल्या बी / बियाण्यांच्या दूकानात मिळतील.

इथे सध्या उन्हाळा आणि पावसाळा, दोन्ही एकदम सुरु आहेत. गरमही होतेय आणि पाऊसही पडतोय.
दिनेशदा,
काय छान वातावरण असेल, इंद्रधनुष्य देखील नेहमी पाहायला मिळत असेल
त्यामानाने आपल्याकडे जुनी झाडे कमी होत आहेत्,तोडली जात आहेत,शेतकर्‍यांना देखील जमीनीचे अनेक तुकडॅ झाल्यामुळे जमीन कमी पडु लागली अहे,मोठ्या झांडासाठी जमीन पडु देणं हल्ली परवडत नाही.
(तुम्ही काढलेल्या तिकडच्या अनेक फोटोची आम्ही वाट पाहातोय)

अरे काय भाग्यवान लोक आहात तुम्ही - शेतातले काम प्रत्यक्ष करायला, पहायला मिळाले - त्यासारखा अनुभव नाही
शशांकजी,
शेतकरी बहुधा कुणाचा गुलाम नाही या अर्थाने तो भाग्यवान असेल ही, पण याच शेतकर्‍याची, शेतीची अवस्था चांगली नाही,पत कमी झाली आहे, ५-१० एकर बागाईत शेती असणार्‍या तरुणाला लग्नाला मुलगी मिळत नाही पण ५-१० हजार पगार असणार्‍याला लगेच मिळते, ५ एकर पेक्षा कमी शेती असणार्‍याला त्यात जिराईत शेती असणार्‍याला तर मुलगी बघायला देखील मिळत नाही हे वास्तव आहे,शेतकर्‍यां कडे खायला-प्यायला खुप आहे पण रोख पैसा, बंगला, आधुनिक सोयी नसल्यामुळे, मुलींना शारिरिक कष्टाचा कंटाळा यामुळे हे असं झाल असेल

शेतकरी बहुधा कुणाचा गुलाम नाही या अर्थाने तो भाग्यवान असेल ही, पण याच शेतकर्‍याची, शेतीची अवस्था चांगली नाही,पत कमी झाली आहे, ५-१० एकर बागाईत शेती असणार्‍या तरुणाला लग्नाला मुलगी मिळत नाही पण ५-१० हजार पगार असणार्‍याला लगेच मिळते, ५ एकर पेक्षा कमी शेती असणार्‍याला त्यात जिराईत शेती असणार्‍याला तर मुलगी बघायला देखील मिळत नाही हे वास्तव आहे, >>> अरेरे रे, किती विचित्र परिस्थिती आहे ही.......

<<इथली झाडे एवढी प्रचंड मोठी आहेत, कि ज्यांच्या अंगणात आहेत त्यांनी त्या झाडाच्या खोडातच, साठवणीच्या खोल्या, कोरून काढल्यात !
<<

कसली सही आयडीया आहे!! Happy नॅचरल स्टोरेज!

अनिल, एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी... असा वाकप्रचार होता, आता अगदी उलटे झालेय.

हो आर्या, आमचा बाजार पण अश्याच एका झाडाखाली ( प्लीज नोट, एका झाडाखाली, सगळा बाजार ) भरतो.
तिथल्या विक्रेत्यांचे पण असे फुटकळ सामान, झाडात असते.

<<( प्लीज नोट, एका झाडाखाली, सगळा बाजार ) <<
ग्रेट!!

असं निसर्गरचनेला धक्का न लावता माणसाने कामं केली तर पर्यावरणाची हानी होणार नाही.

आर्या, आपल्याकडे पण अशी पार बांधायची पद्धत होती. गोव्याला अनेक बसस्टॉपची नावे वडाकडे, पिंपळाकडे अशी आहेत, आणि ती झाडे खरीच आहेत तिथे. कोल्हापूरला, अंबाबाईच्या देवळाच्या आवारात पण एक मोठा वड आहे.

मुंबई / पूण्यातल्या प्रत्येक बसस्टॉपवर एखादे सावली देणारे झाड असते तर !

नायजेरियात, आपल्या वडासारखे पण पारंब्या नसलेले एक झाड असते. माझ्या वाटेवर अशी दोन झाडे होती.
विश्वास बसणार नाही. पण एकेका झाडाखाली, किमान ८ गाड्या, आरामात पार्क करता येत, आणि केल्याही जात.

खरय दिनेशदा...आता ते 'पार' ही गेले, आणि पारावर बसलेले लोक ही फारसे राहिले नाहीत.

<<पण एकेका झाडाखाली, किमान ८ गाड्या, आरामात पार्क करता येत, आणि <<
खुप जुनी झाडं असतील ना दिनेशदा ती?

काही वर्षांपुर्वी पुण्यात एम्प्रेस गार्डनला उन्मळुन पडलेला एक जुना दुर्मिळ वृक्ष ठेवलेला पाहिला होता...अगदी गलबलुन आलं होतं त्याच्याकडे पाहुन.

Pages