निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुधीर, खूप मस्त कविता!!

मानुषी, ग्रेट आहे गं तुझी भाचेसून! खरंच तिची मुलाखत घेऊन इथे दे बरं!!

दिनेशदा, नेहेमीप्रमाणेच केळ्यावरचीही माहिती मस्त!

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! ही दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची,समृद्धीची आणि भरभराटीची जावो.....:स्मित:

http://vimeo.com/vorobyoff/flowers लिन्क चेक करा तुम्हाला नक्किच आवडेल

सगळ्या निसर्ग प्रेमिसाठी माझ्या कडुन दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा ...!!!!!

तृप्त होवोत डोळे तेव्हा, पाहून ते सोहळे >>>> सुधीर, तुझी अतिशय सुरेख कविता वाचून डोळे, मन अगदी तृप्त झाले बघ. फारच सुंदर कविता.

प्रकाश यावा दिवाळीत या अंतर उजळून जावे
सुंदर, निर्मळ विश्व आघवे लख्ख पुढे ठाकावे

आशा चिंता काळज्याही त्या निघून जाव्या इच्छा
तृप्तताच मग भरुन रहावी दिपावली शुभेच्छा..

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

जगुतै, राधा नाव फार मस्त आहे.

सद्ध्या एका गोड कामात गुंतले आहे, त्यामुळे इथे यायला अजिबात जमत नाहीये. इथे बघा त्याविषयी माहिती: http://mokale-aakash.blogspot.in/2012/11/blog-post.html

असे गुलाब खरे असल्याचे कुठेतरी वाचलेले..

असे कलरफुल गुलाब मी ब-याच वर्षांपुर्वी फोटोत पाहिलेले. आता गुगलले तर ही माहिती मिळाली..

http://www.hoax-slayer.com/multicoloured-roses.shtml

सगळ्या निगवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा.....

मागे एकदा दिवाळीआधी ऑफिसातल्या एका भोपाळवासीय मैत्रिणीसोबत बोलताना तिने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे गोवर्धन करतात म्हणुन सांगितलेले आणि वर तुमच्याकडे करत नाही म्हणुन आश्चर्य व्यक्त केलेले.

मी कायम मुंबईतली दिवाळी पाहिलीय, गावची दिवाळी कधीच पाहिली नव्हती. कधी कोणाच्या तोंडुन हे गोवर्धन प्रकरण ऐकले नव्हते. त्यामुळे मी तिला आमच्याकडे असला गोवर्धन वगैरे काही नसतो हे ठासुन सांगितले.

गेल्या वर्षी मी पहिल्यांदा दिवाळीला गावी गेले. दिवाळीच्या दिवशीच भल्या पहाटे पोचले. आंघोळ वगैरे करुन गावात फेरी मारायला निघाले. आधी लागले माऊलीचे देऊळ. म्हटले दर्शन घेऊया. दाराकडे चपला काढताना खाली पाहिले तर दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजुला शेणाचे पाच लहान गोळे आणि त्यावर फुले वाहिलेली. देवळात भावीण काहीतरी करत होती. तिला शेणाच्या गोळ्यांबद्दल विचारले तर ती म्हणाली गोवर्धन आहे. मला धक्काच बसला. म्हटले हा गोवर्धन काय प्रकार आहे. तिला माहित नव्हते. ती पाच पांडव व.व. काहीतरी सांगु लागली. गावात काकाकडे गेले तर तिथे सगळ्यांच्या दारात गोवर्धन.. Happy मला मैत्रिणीबरोबर झालेली चर्चा आणि मी अगदी ठासुन सांगितलेले माझे मत आठवले :).

पण जरी गोवर्धन सगळ्यांच्या दारात असला तरी त्या मागची कथा मात्र कोणालाही माहित नव्हती.

गावी दिवाळीच्या पहिल्या दिवशी नव्या धान्याचे पोहे करतात. मला शेजारपाजा-यांनी आग्रहाने बोलावुन नेले आणि पोहे खायला घातले. इतर मंडळीही एकमेकांच्या घरी जाऊन प्रसादासारखे थोडे थोडे पोहे खात होते. मला दोन घरी पोहे खाल्ल्यावर तिस-या घरी जायचेही जीवावर आलेले पण गावकरी मंडळीनी बहुतेक ती पुर्ण सकाळ अख्ख्या गावातले पोहे खाण्यात घालवली.... Happy

गोवर्धनाचे फोटोही आहेत पण सध्या हार्ड्डिस्क काढुन ठेवलीय त्यामुळे आता टाकता येणार नाहीत. नंतर कधीतरी टाकेन.

तोवर हा गोवर्धन काय प्रकार आहे हे कोणाला माहित असल्यास इथे लिहा Happy

शेणाचे पांडव दिवाळीनंतर करतात ना? नंतर पांडव पंचमीला गुळपोळीचे जेवण करतात आणि त्याना घालवतात.. हे सगळे बहुतेक दिवाळीनंतर करतात.

मी पण मालाडला असताना काही घरात गोवर्धन केल्याचे बघितलेय. या दिवशी शेर ( चौधरी निवडुंग) कोरून त्यात तेल घालून, दिवे लावल्याचे पण बघितलेय. आजोळी दिवाळी जोरात साजरी होते. मालवण / गोव्याला मात्र खास जाणवायची नाही.

दिनेश, कोकणात गणपती जोरात असतात.

दिवाळी त्यामानाने एकदम ठंडी.. हल्ली हल्ली तिकडचे लोक मुंबईकरांचे पाहुन फराळ करायला लागले.

दिवाळीचा पहिला दिवस पोह्यांनी साजरा करतात. संध्याकाळी लक्ष्मिपुजन. मग थेट भाऊबिज.

आधीच कोकणातले जीवन खडतर, त्यातून शेती आणखीनच ... मग हे सुगी / बळीराजा संबंधित सण, तिथे रुजतील कसे ?. त्यामानाने गौरी गणपतित, निसर्ग कसा बहरलेला असतो. त्यातलेच घेऊन, माटोळी सजवायची.

शिमगो मात्र जोरात !

शिमग्याची मजा न्यारीच.

तुम्ही पाहिलीत का? अजुन एक काहितरी असते तेव्हा, पुरूष मंडळी सोंगे काढतात, नाव विसरले मी त्याचे.

आता आठवले, शबय म्हणतात त्याला. आमच्या गावी राधा म्हाणतात. पुरुष बाईचे सोङंग घेऊन दारोदार हिंडतात, लोकांची खुप गंमत करतात.. खुप मजा येते.

मी या दिवाळीत देशी वृक्ष, भटकंती आणि मुशाफिरी हि पुस्तकं घेतली. Happy

"हिरवाई" अजुनही मॅजेस्टिकमध्ये नाही आणि गेल्यावर्षी घेतलेलं "वृक्षगाणं" आता उपलब्ध नाहीये. बित्तुने सुचवलेली सखा नागझिरा आणि एका रानवेड्याची शोधयात्रा पण नव्हते. आता परत एक चक्कर मारायलाअ पाहिजे.

चकवा चांदण, रातवा घ्यायचय. आता पुन्हा दादरला एक फेरी मारावीच लागेल. Happy

माझे भोपळे आणि दोडके किड्यांनी खाल्ले .. Sad आता भोपळ्याच्या पानांचीच भाजी करुन खाणार...

गोव्यात शिगमो म्हणायचे...

जिप्सी,,, मराठीत पुस्तकातला मजकूर चांगला असतो पण फोटोंची मारामार. अगदी वर नावे लिहिली आहेस त्यातही, हाच प्रकार आहे.

साधारण तेवढ्याच किमतीत मिळणार्‍या इंग्लीश पुस्तकात मात्र सुरेख फोटो असतात. ( गोव्याला अशी पुस्तके मिळायची. माझी बहुतेक तिथेच घेतलेली आहेत. मुंबईत पण मिळतील. खास करुन फोर्ट मधे मिळायला हवीत.)

मराठीत पुस्तकातला मजकूर चांगला असतो पण फोटोंची मारामार. >>>>अगदी अगदी दिनेशदा. त्यामानाने श्रीकांत इंगळहळीकरांचे "आसमंत" आणि श्री. द. महाजन यांच्या "देशी वृक्ष" या पुस्तकात खुपच सुंदर फोटोज आहेत. Happy "आसमंत" मधला "उर्वशीचा" (फुलांचा हो :फिदी:) फोटो पाहुन वेडा झालो. इतका सुरेख फोटो काढलाय.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पाहिलेले हे सुंदर फुलपाखरू .
बहिणीने just one click फोटो काढला आहे.
मायबोली परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेछा ....!!!!

2012-11-13 13.18.27-1.jpg

जिप्सी, श्रीशंचे बहर म्हणून एक पुस्तक होते, त्यातले फोटो छान होते, पण ते पण आता मिळणार नाही. देशी वृक्ष मधले फोटो ठिक आहेत, पण क्रॉपिंग, वाईट आहे.

ऑकलंड मधे पुस्तकांच्या दुकानात, काही पुस्तके मुद्दाम स्वस्त दरात ठेवलेली असतात. मी अर्थातच गार्डनिंग विभागातली बघतो, पण त्यातही पानोपानी सुंदर फोटो असतात.

अनुप, छान आहे फोटो.

अनुप फोटो सुंदर आलाय!
पण दा, डॉ.डहाणूकरांच्या पुस्तकांचा याला जरा अपवाद आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी इतकं सही वर्णन केलंय की तो वृक्ष जणू डोळ्यांसमोर उभा रहातो. कितीतरी वृक्ष मी त्यापूर्वी कधीही न पाहता, केवळ ते वर्णन आठवल्याने ओळखले आहेत. पण त्या एकमेव अपवाद आहेत हं या गोष्टीला!(हे मात्र माझं वै.म.) इतरांच्या पुस्तकात फोटो पाहिजेतच! इंगळहळीकरांच्या सर्वच पुस्तकांमधले फोटो छान आहेत. आणि श्रीश क्षीरसागरांच आहे ते बहर पुस्तक, इंगळहाळीकरांनी आसमंत लिहिलंय.:स्मित:

जिप्सी, माझ्याकडे आहे "एका रानवेड्याची शोधयात्रा" आणि "चकवा चांदणं". हवे तेव्हा देइन.

सगळ्या निगकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.....

DSCN8246.JPG

बहर बाबत सुधारणा करतो.

डॉ. डहाणुकरांच्या शब्दकळेबद्दल मात्र अगदी अगदी... त्या म.टा. मधे लिहित असत त्यावेळी, आमच्या कॉलनीतल्या, मृदुला नाडगौडाने काढलेले फोटो असत. पण पुस्तकात मात्र ते नव्हते.

Pages