निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेव आणि पेंव
पेंव (मुळातला अनुस्वार गेल्या पन्नास वर्षांतल्या शुद्धलेखन नियमबदलामुळे उडाला आहे) म्हणजे चारी बाजूंनी शेणमातीने लिंपलेले धान्य वगैरे साठवण्याचे कोठार. हे बहुधा तळघरात किंवा जमिनीखाली असे. सांगलीवगैरे भागात जमिनीखाली खड्डे खणून ते व्यवस्थित लिंपून त्यात हळकुंडे भरून ठेवण्याची पूर्वापार प्रथा होती. त्यात वर्षभर हळद सुरक्षित रहाते .विकताना अख्ख्या पेवांचाच लिलाव होत असे. पेवे भाड्याने देण्याचीही पद्धत होती/आहे. पेव म्हणजे एक प्रकारचे अंडरग्राउंड गोडाउनच म्हणता येईल. कृ. पां. कुलकर्णीं व्युत्पतीकोशात ह्या शब्दाचा उगम खड्डा या अर्थीच्या पेयडु/पोयडु (किंवा तत्सम; व्युत्पत्तिकोश आत्ता हाताशी नाही पण स्मरण पक्के आहे.) कानडी शब्दापासून दिलेला आहे. सांगलीचा भाग कर्णाटकाला जवळ आहे. पेव फुटणे म्हणजे हे शेणामातीने लिंपलेले कोठार फुटणे आणि त्यातून धान्य भसाभस बाहेर सांडणे, धान्याची लयलूट होणे. दामाजीपंतांची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्यांनी दुष्काळ पडला असताना बादशहाच्या परवानगीशिवाय पेवे फोडली होती आणि लोकांना धान्य वाटले होते.
पेव ही वनस्पती फक्त पावसाळ्यात उगवते, तीही कोंकण आणि घाटमाथ्यावर्,जिथे पाऊस खूप असतो. देशावर ही वनस्पती फारशी दिसत नाही. ती महाराष्ट्रात सार्वत्रिक नाही. तिच्यावरून 'पेव फुटणे' हा वाक्प्रचार आलेला नाही. अलीकडे निसर्गभ्रमणाविषयी आवड निर्माण झाल्यावर ही वनस्पती मासेसच्या नजरेत आली. सगळे वनस्पतिशास्त्रज्ञ हे भाषाशास्त्रज्ञ नसतात.त्यामुळे अशी चुकीची माहिती प्रसृत होते. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात तर ह्या वनस्पतीचे चित्र व त्याखाली 'पेव फुटणे हा वाक्प्रचार या वनस्पतीवरून आला' अशी तद्दन चुकीची माहिती लिहिलेला फलकही लावलेला आहे.याविषयी एका वर्तमानपत्रात पत्रही पाठवले होते. आता उद्यानाधीक्षकांना हा फलक बदलण्याविषयी लिहिण्याचे मनात आहे.
कळलावी ह्या नावाविषयीही असेच झाले आहे.वास्तविक हिची नागकांडी, नागलखडी अशी नाग या शब्दाशी संबंधित नावे जास्त प्रचारात आहेत. पण 'बाळंतपणात कळा येण्यासाठी हिच्या मुळांचा उपयोग होतो म्हणून ही कळलावी' ही माहिती नव्याने निसर्गभ्रमण करणार्‍यांना अधिक चमत्कृतिपूर्ण आणि सनसनाटी वाटते. बाळंतपणात हिचा उपयोग फारतर एखाद्या रीमोट आदिवासीपाड्यात केला जात होता असेल कदाचित पण तिच्या विषारी गुणधर्माची चांगलीच माहिती असल्याने गावातले फारसे कुणी तिच्या वाटेला जात नसत. दासबोधातही या वनस्पतीचा उल्लेख नागकांडी या नावानेच आहे.गोव्यातही नाक्कट्टा,नाक्किट्टा म्हणतात.
असो. मूळ कृष्णाकाठच्या पेवावर यायचे तर २००५ सालच्या प्रलयात काठापासून दूरवर असलेली पेवेही दीर्घकाळ पाण्याखाली राहिली. जिथे पूर पोचला नाही तिथल्या जमिनीतही खालून पाणी झिरपले. आणि आता अधिक चांगली जमिनीवरची गोदामे उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यामुले ही पेव पद्धत लोप पावत चालली आहे. आत्ताची परिस्थिती काय,याची आकडेवारी मात्र हाताशी नाही.

हल्लो....
अनिल, पुण्याहून पाचगणी ला येताना अतिशय सुंदर हिरवी पोपटी हळदीची शेतं लागली होती. पहिल्यांदाच पाहिल्यामुळे अगदी गाडीतून उतरून फोटो घेण्याचा मोह अजिबात टाळला नाही..
याशिवाय बाजूलाच लागलेल्या ऊसाच्या भरगच्च मळ्यातून ताजे ऊस आणून तिथल्यातिथेच रसवंती चालवणार्‍या मळेवाल्याकडे बसून रस प्यायचा आनंद लुटला.. मज्जा म्हंजे त्याने त्याच दिवशी रसवंतीचे उद्घाटन केले होते. चरक लावलेल्या टेबलाभोवती रांगोळी काढलेली होती. नुकतीच पूजा ही आटोपली होती...
जागुले तुला फोन करायच अराहून जातोय पण इथे वनराई,झाडं,झुडपं,पक्षी,फुलं पाहून तुझी सतत आठवण येतेय, Happy

हीरा, छान दिलीत माहिती.

शोभे(आज्जे)...कितीवेळा आयडी बदलशील गं? रच्याकने फोटो मस्तच आलाय! फुलं कस्ली सह्ही आहेत!

अनिल, नक्की आणा हा हळदीचं बी! आणि बाजारात मिळणारी ओली हळद लावली तर कुजून जाईल का ? दिनेशदांपासून प्रेरणा हळदीच्या पानाचा वापर करून काही पदार्थ (प्रयोग) करायची इच्छा आहे, त्यामुळे मला हळद लावायचीय. Happy
हीरा, मस्त माहिती. मागे आलमाट्टी वादात कृष्णेच्या पुराच्या वेळी पेवांमध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या वाचल्या होत्या. पण हे फक्त अंडरग्राऊंड स्टोरेज असतं हे माहित नव्हतं.
वेडा रघू, पेव, शेवंती, फुलपाखरू सगळे फोटो मस्त!

मी टब मध्ये लावली आहे हळद. आता चांगलीच पाने झाली आहेत.

हीरा आमच्याइथे त्या कोठाराला कणगी म्हणतात. पण आता कुठेच दिसत नाही ती.

कळलावईला आम्ही नागदौणा म्हणतो.

आम्ही माझ्या दुसर्‍या मुलीचे नाव राधा ठेवायचा विचार करतोय. कसे वाटते ?

"राधा" नाव मला फारच आवडतं गं...मस्त नाव...कशी आहात दोघंही?

पेव बद्दलची माहिती छान आहे....पैकी
>>सगळे वनस्पतिशास्त्रज्ञ हे भाषाशास्त्रज्ञ नसतात.

वाचून बरीच हसले Happy

धन्स धन्स धन्स सगळ्यांचे.

आज्जे. खर वाटणार नाही पण दिड महिन्याची असल्यापासुनच ती हुंकारे देते मोठया मोठ्याने. काही विचारल की सरळ स्पष्ट हो म्हणते. मी मिस्टरांना आहो म्हणते कदाचीत ते ऐकून ती आहो आहो करत असते. गाण म्हण सांगितल की गाण म्हणते आ आ आ आ करुन.

पण दिड महिन्याची असल्यापासुनच ती हुंकारे देते मोठया मोठ्याने. काही विचारल की सरळ स्पष्ट हो म्हणते. >>> काये की, सगळ्ळ्ळ्या मुली सॉल्लीड स्मार्ट असतात ना - जन्मतःच .... (स्वानुभव - आमच्याकडे तीन आहेत, एक सासरेबुवांकडून आलेली आणि नंतरच्या दोन आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून आलेल्या...). मुलं / पोरगे बिच्चारे मुलखाचे बावळ्ळट्ट. त्यामुळे आधी आई आणि मग बायको असे सांभाळून घेतात त्यांना.. (कृपया सर्वांनीच - दिवे घेणे, हलके घेणे..)

शशांकजी... Lol
आजच्या नविन जनरेशनचं काही सांगता येत नाही! पटकन पिक अप करतात बाळं.

राधा... किती सुंदर नाव.. मीही अजुन एक मुलगी नशीबाने मिळाली तर हेच नाव ठेवायचे नक्की केले होते. Happy

आज्जे. खर वाटणार नाही पण दिड महिन्याची असल्यापासुनच ती हुंकारे देते मोठया मोठ्याने. काही विचारल की सरळ स्पष्ट हो म्हणते. मी मिस्टरांना आहो म्हणते कदाचीत ते ऐकून ती आहो आहो करत असते. गाण म्हण सांगितल की गाण म्हणते आ आ आ आ करुन.>>>>>>>(आज्जे) मावशीच्या वळणावर गेलेय अगदी. Lol

मीही अजुन एक मुलगी नशीबाने मिळाली तर हेच नाव ठेवायचे नक्की केले होते>>>>>>>होते की आहे? Wink

आजच्या नविन जनरेशनचं काही सांगता येत नाही! पटकन पिक अप करतात बाळं.>>>>>>१००० मोदक. Happy

शोभे(आज्जे)...कितीवेळा आयडी बदलशील गं? >>>>>>>>>म्हातारी झाले ना आता? Lol
रच्याकने फोटो मस्तच आलाय! फुलं कस्ली सह्ही आहेत!>>>>>शांकली, अग ८-९ फुलं आलीत. Happy
किती दिवसानी भेटतेयस ग? Happy

हिरा, मला हीच माहिती अपेक्षित होती.. पेंव मधला अनुस्वार मात्र माझ्याही लक्षात नव्हता..

अनिल, हळदीच्या फुलोर्‍याचे पण फोटो अवश्य काढ.. दिवाळीच्या दिवसात कुठल्यातरी पूजेसाठी तामिळ लोकांना हळदीचे रोप लागते. मुंबईत हि रोपेच विकायला येतात ( चेंबूर, माटुंग्याला मिळतील..)

दूधीचे म्हणालास ना, सध्या गुजराथी लोकात दुधीचा रस पिण्याचे खुपच वेड आहे ( नाचणी, तृणांकूर, ओट्स... अशी एकेक वेड, येत जात असतात ) कुणाला तो ताजा रस करुन विकायची कल्पना आली तर बघ. साधारण जिथे लोक जॉगिंगसाठी येतात, तिथे भरपूर खप होईल.

आज्जे खरंच, आता तरणी आज्जी / म्हातारी आज्जी.. असे आयडी घेणार का ?

खलनायिका वर्षू चे अभिनंदन बरं का, लेखाला बक्षीस मिळालेय.

जागू... लेकीला बाहेर न्यायला सुरवात केली कि नाही ? या हवामानात त्रास नाही व्हायचा.

शोभा, खरंच गं आपण खूप दिवसांनी निग वर भेटतोय! ही पांढरी शेवंती(?) कुठे मिळाली तुला? किती गोड फुलं आहेत! अगदी बघत रहावीशी वाटतात..(हे सर्वच फुलांच्या बाबत होतं म्हणा!)

खलनायिका वर्षू!!....:हाहा:...........वर्षूतै, तुझं अभिनंदन!! Happy

जागू, नाव मस्तच आहे. राधाचे काही फोटो दे ना इथे.

दूधीचे म्हणालास ना, सध्या गुजराथी लोकात दुधीचा रस पिण्याचे खुपच वेड आहे ( नाचणी, तृणांकूर, ओट्स... अशी एकेक वेड, येत जात असतात ) कुणाला तो ताजा रस करुन विकायची कल्पना आली तर बघ. साधारण जिथे लोक जॉगिंगसाठी येतात, तिथे भरपूर खप होईल.>>>>अगदी अगदी..

वर्षू, अभिनंदन! Happy

ही पांढरी शेवंती(?) कुठे मिळाली तुला?>>>>अग, ही माझ्या गॅलरीत फुललेत. ये बघायला. Happy
(आता प्रज्ञा म्हणणार, मला दाखवली नाही. :डोमा:)

आज्जे खरंच, आता तरणी आज्जी / म्हातारी आज्जी.. असे आयडी घेणार का ?>>>>>>>>दिनेशदा, Lol

ज्यांना शक्य आहे त्यांनी या दोन क्लिप्स बघाच... नेत्रसुख आहे अगदी !

IMAX - The Magic Of Flight Full Movie HD
http://www.youtube.com/watch?v=AhGiswGvw2M&feature=g-vrec

Flying over Greece | Πετώντας πάνω από την Ελλάδα
http://www.youtube.com/watch?v=RhVMd8iXHMo&feature=related

राधा... खूप्प गोडु नांव आहे जागु..
खलनायिका वर्षू.... हीहीही!!!! Rofl
धन्यु सर्वांना!!!!
और...
अबसे बच के रहना मेरेसे!!!!

जागुताई,
राधा खरंच गोड नाव आहे. लाडाने राधी किंवा राही हाक मारली तरी गोड वाटतं.
कोंकणामध्ये धान्याच्या बंद कोठाराला कणगीच म्हणतात. पेव हा शब्द जास्त करून देशावर वापरला जातो.

Pages