निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा अनिल भारी आहे शेती, काय टपोरी लिंब आहेत:)
शेवटच्या प्रचितल्या वेली काळेमीरीच्या आहेत ना ?

शेवटच्या प्रचितल्या वेली काळेमीरीच्या आहेत ना ?
ईनमीन तीन,
त्या वेली पानमळ्यातल्या खाऊच्या पानाच्या आहेत,"नागवेली" अस म्हणतात, त्यामुळे गावाकडॅ "नागवेली प्रसन्न" अस लिहिलेलं अनेकांच्या गाडीवर सरास दिसतं.
गावी गेलो कि अशी २५-३० लिंबु येताना आई पिशवीत घालते, पुण्यात आल्यावर १०-१२ दिवस लिंबु आहेत तसे राहतात्,वास देखील तसाच.

केवढी ती हळद!!... मागे मी बागेत हळद लावण्याचा प्रयत्न केला होता, पण...:अरेरे:

नागवेली प्रसन्न...:हाहा:

दिनेशदा, किलीमांजारोची माहिती एकदम मस्त! Happy

व्वा! अनिल फोटो एकदम मस्त. घाणेरी फुलली आहे म्हणजे फुलपाखरेही असणारच.

काश माझेही एक शेत असते.......

अनिल छान आहे तुमची शेती कधी बोलवताय बघायला Wink , रच्चाकने या नागवेलीची लागवड कशी होते, याला फळ लागतात का? की मनी प्लॅट सारखी लागवड होते,
"नागवेली प्रसन्न" Happy

दिनेशदा, माहिती मस्त !
अनिल, सुंदर आहे शेती तुमची ! खरंच आपण एक गटग करूच तुमच्या शेतावर !

सुदुपार,
शेती असुन पुण्यापासुन खुप लांब असल्यामुळे खुप मिसल्यासारखं होतं,जरी कुठलिही शेती दिसायला सुंदर दिसते पण त्यामानाने उत्पादन घेताना (नैसर्गिक) अडचणी आहेत,त्यांला तोड देऊन जे पिकवतो,त्याला मिळेल तो बाजारभाव स्विकारावा लागतो.
गेल्या महिन्यात भावाने १ एकर बागेत दुधी भोपळा लावला, जोमाने वाढ झाली,दुधींची वाढ खुप जोरात होते,महिन्यात साधारण २ टन माल निघाला, बाजार पेठेत दर २-३ रु किलो असा मिळाला.

प्रज्ञा१२३,
त्यासाठी तुम्हाला सांगलीजबळ यावं लागेल

२-३ रु किलो >> ठाण्याला २० रु. च्या खाली चुकूनही मिळत नाही हल्ली. ह्या दलालांचे खरेच काहीतरी करायला हवे.

अनिल ...मस्तये शेती.

दिनेशदा, किलीमांजारोच्या लिंकांबद्दल धन्स! Happy

<<केवढी ती हळद!!... मागे मी बागेत हळद लावण्याचा प्रयत्न केला होता, पण...<<
शांकली, माझ्या आईने लावलीये घरी कुंडीतच. चांगली मोठी पानं पण झालीत. पण त्याच्यापुढे काय करायचं हे मलाही माहित नाही? त्या पानांचा कुठे उपयोग होतो का?

आर्या मोदक करताना मोदक पात्रात ही पाने ठेऊन त्यावर मोदक लावायचे. पानांचा सुंदर वास येतो. तसेच निखार्‍यावर काही भाजायचे असल्यास ह्या पानात गुंडाळून भाजता येते.

आर्या,
थोडक्यात सांगतो...
हळद ही साधारण ५ महिन्यात तयार होते,पाने साधारण पिवळसर होऊन नंतर वाळु लागतात...
मग हळद जमीनीतुन (हळु उकरुन) बाहेर काढावी,
हळदीच्या ओल्या (फण्या) बाजुला काढाव्यात,(साधारण केळीच्या घडासारखे बाजुंनी कच्ची हळकुंडाचे २-१० जोड असतात)
त्या चांगल्या पाण्यात घालुन शिजवाव्यात,
८-१० दिवस कडक उन्हात खडख्डीत वाळवल्यानंतर मग पॉलीश करावे,पिवळीधमक हळकुंड तुम्हाला मिळेल.
(मोठ्या प्रमाणात असलेल्या हळदीसाठी मोठ्या फिरत्या ड्रमचा वापर केला जातो)

अनिल, मस्तच आहे तुमची शेती. निसर्ग गटग करायला ब्येश्ट! Happy

बाजारात लोणच्यासाठी ओली हळद मिळते ती लावली तर येईल का?

मागच्या आठवड्यात हुबळीला बाजारात मोठ्या लिलीसारखी पानं मुळासकट विकतांना बघितली. याचं काय करतात म्हणून चौकशी केल्यावर समजलं, ही पानं घालून साधा भात शिजवला तर त्याला बासमतीसारखा वास येतो. घरी आणून लावली, पण सगळी पानं वाळून चाललीत ... झाड जगेल असं वाटत नाही. ही पानं घालून खरंच बासमतीचा वास येतो का?

जान्हवी मस्त फोटो...

अनिल, गावाहून येताना शक्य तितका भाजीपाला आण, आणि पुण्यातल्या शेजार्‍यांना कल्पना दे. हातोहात खपतील भाज्या..

त्या हळदीचे, सांगली भागात पेव असतात असे वाचले होते. जमिनीत खड्डा खणून ती प्रक्रिया करतात आणि त्या मातीच्या गूणधर्मामूळे तिथे चांगली हळद तयार होते..

गौरी, तिच हळद लावायची.

आर्या, हळदीच्या पानात पातोळ्या करतात. उकडीच्या मोदकाचाच अवतार तो. पण संपूर्ण पानावर पिठ थापायचे आणि त्यावर सारण घालून, अर्धे दुमडायचे, आणि मग वाफवायचे. छान लागतो हा प्रकार. काकडीचे धोंडस करताना, तूप कढवतानाही टाकतात.

मस्त फोटो अनिल यांच्या बागेचे....

फक्त २-३ रू. किलो भाव म्हणजे शेतकर्^याची लूटमारच ...यावर काही उपाय नाही का? डायरेक्ट सेलिंग ऑपश्न्स??

त्या हळदीचे, सांगली भागात पेव असतात असे वाचले होते. >>> डॉ अनिल अवचट यांनी यासंदर्भात बर्‍याच वर्षांपूर्वी एक लेख लिहिला होता - त्यात त्या पेवांचे भयाकारी वर्णन होते (कामकर्‍यांच्या जिवीताचा विचार करता..)... होप, आता परिस्थिती सुधारली असेल....

पेव हे एक प्रकारच झुडुप असते. पहिल्या पवसानंतर ते उगवते. याची वाढ प्रचंड वेगात होते आणि एकाच वेळी अनेक झुडपे येतात. म्हणजे आज जिथे काहीच नाहीये ती जमीन उद्या पूर्णपणे पेवाने भरून गेलेली असते. त्यावरून पेव फुटणे हा वक्प्रचार आला.

माझ्याकडचा फोटो बहुतेक पिकासावर नाही चढवलेला. म्हणून हा नेटवरून साभारः


दिनेश म्हणतात ते पेव वेगळे.

अनिल, गावाहून येताना शक्य तितका भाजीपाला आण, आणि पुण्यातल्या शेजार्‍यांना कल्पना दे. हातोहात खपतील भाज्या.. >> अनुमोदन.

आज मी सकाळी एक छोटा पक्षी बघितला . तारेवर बसला होता. रंग बाकीचा पोपटाचा पण डोके आणि पाठीवर तांबुस होता. आकाराने पोपटाचे पिल्लु म्हणुन खपला असता पण बसायची ढब किंगफिशरसारखी होती. फोटो काढेपर्यंत उडुन गेला. उडताना तांबुस- पोपटी असे दोन्ही कलर दिसले. कोणता असु शकेल?

बाजारात लोणच्यासाठी ओली हळद मिळते ती लावली तर येईल का?
गौरी,
हळद लागवडीसाठी वेगळी बी मिळते, ती यापेक्षा वेगळी असते,(कांद्याच्या आकाराची मुळे असलेली) तीच लावली तर नवीन हळकुंड मिळु शकेल,हळद काढली कि पुन्हा नविन बी देखील मिळते,ती पुन्हा वापरता येते.हळद काढली कि फोञो टाकेन्,येताना थोडे इकडे घेऊन येईन.

दिनेशदा,
शेतात दरवर्षी असुनही त्याच्या पानाचे इतके उपयोग घरी (माहित नसल्यामुळे) कधी पाहिले नाही,आता घरी/इतरांना सांगेन.
स्वस्त आणि मस्त भाज्या गावाकडुन इकडे आणण्याची कल्पना आवडली,तसा विचारही खुप दिवसापासुन चालला होता.

आस तो वेडा राघु असावा.
हाच का?

हा नसेल तर तांबट असेल.

आज्जे फुले खुप सुंदर आली आहेत.

Pages