"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.
निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
नितीन करड्या माळेतला पहिला
नितीन करड्या माळेतला पहिला फोटो अप्रतिम. बॉर्डर आणखी खुलवेल तो फोटो.
उजू केशरी माळ मस्तच.
(No subject)
वरचे फुल कसले असावे? गडद
वरचे फुल कसले असावे? गडद हिरवी पाने त्याची नाहीयेत, हृदयाकृती पोपटी पाने त्याची आहेत.
दिवाळीला आपण पायाखाली चिरडतो त्या कोराटीची तर नाही ना?? दिनेशनी पण असाच एक फोटो त्यांच्या रंगिबेरंगीवर ब-याच वर्षांपुर्वी टाकलेला. (शोधायला हवा )
मलाही नितीनचा फोटो आवड्ला
अजुन एक शुभ्र काही ....
ते पडवळाचे फूल आहे ना?
ते पडवळाचे फूल आहे ना?
नाही पडवळाचे नक्कीच नाही.
नाही पडवळाचे नक्कीच नाही. माझ्या कॉलनीतली रानटी झाडे/वेली आहेत या. काही वेलींना कोराटीसारखी लहान फळे आलेली मी पाहिलीत, पण तेव्हा फुले नव्हती आणि पाने कशी होती ते आता आठवत नाहीय
परत पाहिली तर फोटो टाकेन इथे. कदाचित कोराटीचे असु शकेल.
साधना, नक्की टाक त्याच्या
साधना, नक्की टाक त्याच्या फळाचा पण फोटो. रच्याकने आज मांजराचा फोटो टाकला आहेस. पुढच्या वर्षी करड्या रंगाला कबुतराचा फोटो येणार का?
आजची माळः
मला या फुलांचे नाव कुणी सांगू
मला या फुलांचे नाव कुणी सांगू शकेल का?
माझा ही एक शुभ्र !
माझा ही एक शुभ्र !
रानपडवळाचे फूल आहे ना ते
रानपडवळाचे फूल आहे ना ते साधना. ( मला पण शोधावे लागेल ! )
रानपडवळाचे फूल आहे ना ते
रानपडवळाचे फूल आहे ना ते साधना. >>>>>>>मलाही तसच वाटल.
ही माझी माळ. :
माधव, शोभा, तुमची प्रचि दिसत
माधव, शोभा, तुमची प्रचि दिसत नाहीयेत मला या पानावरची!
शोभा,
शोभा, मधुमकरंद,उजु,आंबा,माधव,साधनाताई ,चमकी सुंदर प्रचि
साधनाताई - मांजराने डोळे मिट्ल्याने अगदी पांढर शुभ्रच दिसतय मस्तय.
नितीन करड्या माळेतला पहिला फोटो अप्रतिम. बॉर्डर आणखी खुलवेल तो फोटो.
धन्स माधव, जिप्सी गुरुजींचा क्लास लावायचाय,बघु गुरुजी कधी गंडा बांधताहेत
आजचा रंग पांढरा
आजचा रंग पांढरा
दिनेशदा, आज सप्तपर्णी दिसली
दिनेशदा,
आज सप्तपर्णी दिसली आणि गाडितुन ओळखता आली..इतक मस्त वाटलं
सप्तपर्णि उर्फ शेफ्लेरा सध्या
सप्तपर्णि उर्फ शेफ्लेरा सध्या फुललीय्/फुललाय... पुर्ण नवी मुंबईभर दालचिनीचा मत्त गंध भरुन राहिलाय. कधीकधी खुपच हेडी होतो हा गंध. आणि इतका चांगला गंध असलेली फुले मात्र चक्क विषारी आहेत.
पुढच्या वर्षी करड्या रंगाला कबुतराचा फोटो येणार का?
आज आमच्या ऑफिसात घरात्ले/ऑफिसातले हवेचे प्रदुषण या विषयावर मुंबईतले एक ख्यातमान डॉक्टर प्रकाश छाजेड यांचं लेक्चर होतं. |डॉक्टरांचा बायोडेटा १५ पानाचा होता, ऑफिसातल्या डॉक्टरने त्याला दोन पानात बसवला. पण ती दोन पाने ऐकतानाच छाती दडपली. माणुस एका जन्मात एवढे शिकू शकतो आणि इतकी असंख्य कामे करु शकतो? डॉक्टरांना यायला वेळ झाला म्हणुन त्या वेळात त्यांची ओळख हा कार्यक्रम पार पडला. ओळख ऐकल्यावर एवढा शिकलेला माणुस कसा असेल हा प्रश्न मनात उभा राहिला. पण डॉक्टर एकदम साधे, डाऊन टु अर्थ वाटले. घरातल्या प्रदुषणाविषयी खुप छान माहिती दिली. प्रदुषणामुळॅ फुफ्फुसाचे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे आजार संभवु शकतात आणि ते प्रदुषणामुळॅ होताहेत हे आपल्याला कळतही नाही.
त्यांनी सांगितले की मुंबईवर कबुतरांनी जवळजवळ पूर्ण कबजा मिळवलाय. घरातल्या प्रदुषणात कबुतरांचा खुप मोठा वाटा आहे. कबुतरे घरात घुसतात, खिडकीबाहेरच्या एसीच्या जाळीत घुसतात आणि सगळीकडे शिटुन ठेवतात. या शिटीमुळे एक प्रकारचा श्वसनरोग होतो ज्याची लागण एकदा झाली की माणसाची इम्युन सिस्टिम वेगाने ढासळायला लागते. डॉक्टर म्हणाले की मी स्वतः जैन आहे आणि माझ्या धर्मात कबुतरांना खायला दिले तर स्वर्गप्राप्ती होते असा समज आहे. पण मी लोकांना सल्ला देतो की कबुतरांना खायला घालुन त्यांना घराच्या आजुबाजुला राहण्यासाठी चांगले असे वातावरण निर्माण करु नका. दीर्घकाळ त्रासदायक ठरतील असे आजार तुम्हाला होण्याचा संभव आहे. कबुतरांचे काय करायचे ते मी काही तुम्हाला सांगणार नाही पण आपला जीव वाचवणे आपले प्रथम कर्तव्य आहे.
त्यांनी जाताजाता हेही सांगितले आपण घरात लावत असलेल्या अगरबत्त्या ह्याही प्रदुषणाचा एक मोठा सोर्स आहे, पण या विषयावर बोलल्यामुळे याआधी एकदोनदा मी अडचणीत आलोय त्यामुळे असल्या भानगडीत आता पडत नाही. पण माझ्या पेशंटसमध्ये पुजा-यांची संख्याही खुप आहे.
हुपू..... आज संध्याकाळी
हुपू.....
आज संध्याकाळी ऑफिसच्या बागेत हुपू पक्षांचे दर्शन झाले. एक नाही, दोन नाही तर चक्क तीन हुपू दिसले. बागेत लॉनवर टिपत होते. मधेच कावळे त्यांच्या मागे लागत होते. पण हुपू धीट वाटले. त्यांचे टिपणे चालूच होते.
ऑफिसचे लॉन आज अगदी नेत्रसुखद होते. हुपू, कावळे, बगळे, हेरॉन आणि साळुंख्यांचा मुक्त संचार होता.
माझे ऑफिस मुंबईच्या उत्तर टोकाला... कुलाबा येथे.
साधना, मला सुगंध आवडत असला
साधना,
मला सुगंध आवडत असला तरी उदबत्ती लहानपणापासून आवडत नाही. गाभार्यात कोंडलेला धूर वगैरे मला असह्य होतो आणि डॉ नी जैन धर्माबद्दल सांगितले, म्हणजे सोनाराने कान टोचल्यासारखे आहे. आपण धर्माबद्दल काही बोलले तर फट्क्न ब्रम्हहत्येचे पातक लागते.
मधु, कुलाबा म्हणजे नेव्हीनगरच्या आसपास का ? तिथला निसर्ग खरोखरीच अप्रतिम आहे.
त्यांनी जाताजाता हेही
त्यांनी जाताजाता हेही सांगितले आपण घरात लावत असलेल्या अगरबत्त्या ह्याही प्रदुषणाचा एक मोठा सोर्स आहे, पण या विषयावर बोलल्यामुळे याआधी एकदोनदा मी अडचणीत आलोय
. इथेही कापराच्या धाग्यावर डॉक्टरांविरुद्ध फतवे निघाले होते.
माझ्याकडे पोळ्या करणार्या
माझ्याकडे पोळ्या करणार्या बाईंनी काही महिन्यांपूर्वी दुसर्या एका कामावर एक वापरात नसलेली खोली स्वच्छ करून दिली होती. ही खोली बंद असली, तरी खिडकीची काच फुटलेली होती, आणि तिथून कबुतरांचा स्वैर संचार होता. आतली उशी, गादी इ. त्यांनी अगदी घाण करून ठेवली होती. या खोलीची सफाई केल्यापासून कित्येक महिने माझी बाई वारंवार आजारी पडते आहे.सर्दी, खोकला, डोकेदुखी, बारीक ताप असे काही ना कही बारीकसारिक दुखणं, पण सारखं चालू आहे. हे त्या कबुतरांच्या खोलीमुळे तर नाही ना अशी आम्हाला शंका होती. साधनानी दिलेली माहिती वाचून जवळपास खात्रीच पटलीय आता.
कबुतर ...... इथे
कबुतर ...... इथे मांजरांबाबत आहे.. ( रिक्षा) ... http://www.maayboli.com/node/38734
मोबाईल टॉवर्स, ट्राफिक,
मोबाईल टॉवर्स, ट्राफिक, झाडांची छाटणी या सगळ्यावर कबुतरांनी मात केलेली दिसतेय. आता पेस्ट कंट्रोल करावा लागणार त्यांचा ! ( हो त्यांना एकदा पेस्ट म्हणून जाहीर केले तर शक्य आहे. पण धार्मिक कारणांसाठी होऊ शकणार नाही हे !)
माफ करा मी पांढर्या
माफ करा मी पांढर्या रंगामध्ये मध्येच जांभळ्या फुलांचे प्रचि टाकले पण मला माहिती लगेच हवी होती म्हणून टाकले.
मला दुसरीकडून त्याचे उत्तर मिळाले आहे. त्याला 'पर्पल हायसिंथ' म्हणतात.
असेच कुणाला माहिती हवी असल्यास म्हणून सांगितले.
Varsha, these are
Varsha, these are hyacinths-the real type. Often, in marshy ponds and lakes in Mumbai, a plant bearing similar flowers is found-that one is known as water hyacinth. This water hyacinth is a very invasive weed-hard to control and harmful to the water body.
These hyacinths bloom in the early spring have and have a distinct fragrance . It is considered a harbinger of spring along with crocuses, and daffodils. Once you plant the bulbs, they come back every year, don't need much pampering.
धन्यवाद मेधा
धन्यवाद मेधा
साधना, 'कबुतरांची अंडी
साधना, 'कबुतरांची अंडी मोकळ्या जागेवर आणून ठेवा, कावळ्यांना अन्न मिळेल, तुम्हाला पुण्य लाभेल' असा प्रचार केला पाहिजे.
काल एक कविता वाचली. खूप छान
काल एक कविता वाचली. खूप छान वाटली. म्हणून आज तुमच्यासाठी .....!!!!!!
स्वप्नांच्या जगात माझ्या एक फुलांची बाग होती
बागेतल्या त्या कट्ट्यावर फक्त तुझीच मला साथ होती
हातात घेवून तुझा हाथ तिथे कविता मी करत होतो
तुझ्याच प्रेमात ग सजणी वेड्यासारखा मी झुरत होतो
तू स्वप्नातही मला अचानकच सोडून जायचीस
वेड्या ह्या जीवाला माझ्या, एकाकी सोडायचीस
घाबरलेल मन माझ तुला शोधत फिरायचं
थकून भागून बिचार मग एकटच रडायचं
स्वप्नातही कधी तू माझी न झालीस
एकट्याला टाकून मला दूरदेशी गेलीस
दूरदेशीच्या राजकुमारात तू अस काय ग बघितलंस
तुझ्याच ह्या प्रतिबिंबाला अस का ग रडवलस???
आजही तुझ्या पाऊलखुणा त्या वाटेवर शाबूत आहेत
परतीची वाट कधीच नसते रडून मला सांगत आहेत
नकळत येणाऱ्या अश्रूंना माझ्या, मी आता वाट करून देत आहे
बागेतल्या वेड्या फुलांना, तुझ्या आठ्वणींच पाणी देत आहे!!!
अनुप मस्त आहे कविता... या
अनुप मस्त आहे कविता...
या खोलीची सफाई केल्यापासून कित्येक महिने माझी बाई वारंवार आजारी पडते आहे.सर्दी, खोकला, डोकेदुखी, बारीक ताप असे काही ना कही बारीकसारिक दुखणं, पण सारखं चालू आहे.
गौरी, लंग स्पेशॅलिस्टला एकदा भेटायला सांग बाईना. मी वर लिहिले नाही पण डॉक्टरांनी सांगितलेले की कबुतरांमुळे जो आजार होतो त्यात हळूहळू तब्येत ढासळून साधारण ५ वर्षात रुग्ण मृत्युमुखी पडतो. आणि त्यांनी याच कारणामुळे आपला जीव वाचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे हे ओळखुन मग पुढे कबुतरांचे काय करायचे ते ठरवा हा सल्ला दिला होता.
घरातील पाळीव प्राण्यांमुळेही घरात प्रदुषण होते. प्राणी घरात ठेवायचे असल्यास प्राण्यांना नियमीत आंघोळ घालणे, त्यांची स्वच्छता राखणे इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
आमच्या एसलाही ऐशू आठवड्यातुन एकदा आंघोळ घालते. अर्थात त्याला ही फालतु आंघोळ अजिबात आवडत नाही. आंघोळ केल्यावर साधारण तासभर तरी तो आपले अंग स्वच्छ चाटुनपुसुन साफ करत बसतो.
माझा गुलाबी रंग -
माझा गुलाबी रंग -
आजची माळ गुलाबी.... दिनेशदा,
आजची माळ गुलाबी....
दिनेशदा, कुलाबा म्हणजे नेव्हीनगरच्या आसपास का ? तिथला निसर्ग खरोखरीच अप्रतिम आहे. >>>>> अगदी बरोबर. माझे ऑफिस म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे. आमच्या बागा, परीसर झाडा-झुडपांनी बहरला आहे. ३०-३५ माळ्यांची टिम मेहनत घेत असते.
आजची माळः
आजची माळः
Pages