निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा !!!! मधु खूप सुंदर दिवे .
या दीपावलीच्या दिव्यांप्रमाणे तुमचे आयुष्य उजळून निघावे ह्याच शुभेच्छा .........!!!!!!

अनिलने मागे टाकलेल्या लिंबाच्या फोटोवरुन आठवले.

लिंबाचा वास आपल्याला आवडतोच. नुसता वास आला तरी, ताजेतवाने वाटते. आपण बहुतकरुन सरबत किंवा
लोणचे खातो. इतर पदार्थात चवीसाठी, रस पिळतो. लिंबाचा खरा स्वाद त्याच्या सालीच्या पिवळ्या भागात असतो. अनेक पाश्चात्य पदार्थात, ती साल वरवर किसून घेतलेली असते. लिंबाच्या पानाना पण छान वास असतो. काफिर लाईम नावाच्या लिंबाची जात केवळ पानासाठी लावतात. या झाडाला लिंबू लागतात खरे, पण त्यात रस नसतो. थाई पदार्थांच्या वाटणात हि पाने घेतात.

झाडावर पिकलेल्या लिंबाचा पिवळा रंग देखील आपल्याला खुप आकर्षित करतो. कपड्यांमधे देखील हा रंग आपल्याला आवडतो.

पण मजा अशी आहे कि आपल्याशिवाय कुणालाच लिंबू आवडत नाही.
लिंबाच्या फुलोर्‍यावर किट्क येतात पण लिंबाकडे मात्र कुठलाच किटक / पक्षी / प्राणी आकर्षित होत नाही.
हा भडक पिवळा, रंग काही किटकांना आवडत असेलही, पण त्याची तीव्र आम्लचव मात्र त्यांना चालणार नाही.
त्यामूळे झाडावरुन, पिकलेला लिंबू खाली पडला, तरी त्याला कुणी तोंड लावत नाही. लिंबू, आतून क्वचितच किडका निघतो.
म्हणजे त्या झाडाची जोपासना आणि प्रसार आपणच केलाय. पिकल्यावर देखील, चव न बदलणारी जी काही
मोजकी फळे आहेत, त्यापैकी हे एक. निसर्गात, फारतर लिंबू झाडाखाली पडल्यावर, गडगडत उतारावरुन खाली जाईल. तिथे नैसर्गिक प्रक्रियेने सडेल, मग त्याच्या बिया तिथेच रुजतील. पण हा प्रसार फार दूरवर होणार नाही.

पिकल्यावरही चव न बदलणारे दुसरे फळ म्हणजे चिंचा. पण या आंबट चिंचा, माकडे आणि हत्तीही आवडीने खातात. त्यामूळे त्यांच्या प्रसाराचा प्रश्न येत नाही.

असेच एक चव न बदलणारे फळ म्हणजे कारले. याचा प्रसार कसा होत असेल, ते कळत नाही. इथे आफ्रिकेत
रस्त्याच्या कडेने, रानटी कारल्याच्या माजलेल्या वेली आहेत. भाजीच्या कारल्याच्या पानापेक्षा, या वेलीची
पाने, लहान पण सुबक असतात. ( कारल्याचा वेल, हा एक पारंपारिक दागिनाही आहे.)
याला साधारण तीन सेमी लांब आणि दोन सेमी रुंद, अशी कारली लागतात. पिकल्यावर ती भडक केशरी होऊन,
तीन भागात तडकतात. ती साधारण फुलाप्रमाणेच दिसतात. आत भडक लाल गरात, बिया असतात. हि कारली तडकल्यावर, त्या बिया दूरवर विखरुन, त्यांचा प्रसार होत असावा. नाहीतर एवढा आकर्षित लाल केशरी रंग असून, त्याला रसिक मात्र नाहीत.

कडुनिंबाच्या निंबोण्याही कडूच लागतात, त्यावर मात्र माकडे तुटून पडतात, कारली खात नाहीत. कडू चवीत पण आपल्या जिभेला, न समजणारा वेगवेगळेपणा असेल का ?

दिवाळीचा पहिला दिवस पोह्यांनी साजरा करतात>> हो कालच माझी एक फ्रेन्ड मला इथे भेटली ती कोकणातली आहे ती सांगत होती मला की पोह्यात गुळ आणि नारळाचा चव घालून ते पोहे खातात. असेच असतात का ते पोहे?

दिनेशदा, मटा मी तेंव्हा वाचायचो नाही पण कालनिर्णय मधे शरदीनी डहाणूकर लिहायच्या. पुस्तकात फक्त रेखाटने आहेत. त्यांचा महोगनी वृक्षांवरचा लेख अप्रतिम आहे.

दिनेशदा - नेहेमीप्रमाणेच मस्त व चुरचरीत माहिती.

दिनेशदा, मटा मी तेंव्हा वाचायचो नाही पण कालनिर्णय मधे शरदीनी डहाणूकर लिहायच्या. पुस्तकात फक्त रेखाटने आहेत. त्यांचा महोगनी वृक्षांवरचा लेख अप्रतिम आहे. >>> डॉ. डहाणूकर या केवळ एखाद्या झाडाचे वर्णन करत नाहीत तर त्याच्या पानांच्या / फांद्यांच्या / फुलांच्या वेगवेगळ्या लकबींचेही इतके अप्रतिम वर्णन करतात की वाचकच काय पण ते झाडदेखील त्या वर्णनाच्या प्रेमात पडेल..... डॉ. डहाणूकर या इतक्या वनस्पतीमय झाल्या आहेत की या सगळ्या वनस्पतींचे वर्णन त्या एखाद्या जीवाभावाची व्यक्ति भेटावी इतके प्रत्ययकारी करतात.... त्यांच्या वृक्षप्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. झाडा -फुला-पाना-फळांचे वर्णन करावे ते डॉ. डहाणूकरांनीच. त्यांनी लिहिलेला एक लेख जरी आपण वाचला तरी आपण भरुन पावलो असे होऊन जाते.

धन्य त्या डॉ. डहाणूकर आणि धन्य त्यांचे वनस्पतीप्रेम.

हो बी, आमच्याकडे दिवाळीच्या दिवशी सकाळी असेच पोहे करतात. नारळाचे पाणी आणि खोबरे यात पोहे भिजवतात आणि त्यात गूळ घालतात. कोकणात पोहे आणि नारळ भरपूर, गूळ मात्र अप्रूपाचा, म्हणून सणासुदीला..

शशांक, त्या झाडांकडे एक व्यक्तीमत्व म्हणून बघायच्या... ती नजर नंतर क्वचितच कुणाच्या लेखनात दिसली.

आमच्याकडे पण फराळाआधी ते पोहेच पहिले नैवेद्याचा प्रसाद म्हणून खाल्ले जातात.. मग बाकीचे..

दिनेशदा.. तुमची माहिती खुपच मस्त

सुदुपार!

पक्षांसाठी चारा-पाणी......
chara.JPGchimani-chara1.JPGchimani-chara2.JPGkharutai-chara.JPGchimani-pani.JPGchimani-pani2.JPGdayal-pani1.JPG

पक्षांसाठी ठेवलेले पाणी अगदीच आडोशाला आहे. म्हणून बरेच पक्षी (चिमणी, कावळा, कबूतर, दयाळ आणि बुलबुलसुद्धा) बिनधास्त पाणी पितात. फोटो फक्त हौसेखातर... नेत्रसुखाचा आनंद अवर्णनीय!!!!!!!!!!

गूळ मात्र अप्रूपाचा, म्हणून सणासुदीला..>>> मला वाटल दिनेशदा कोकणाता गुळाची वाण नसेल.
ईंडोनेशिया मधे गुळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तिथला गुळ रुचकर असतो. कंकर नसतात. ऊसापासून गुळ बनतो आणि पामपासूनही गुळ बनतो. इथे आम्ही गुळाचा शिरा करायचा झाल्यास पामगुळच वापरतो.

खालच्या माळ्यावर राहणार्‍या चिनी शेजार्‍यांकडे अंबाडीला शरबती बोंड आले आहेत...
ambadee.jpg

चटकदार उन्हातील तजेलदार फुले..कुणी नाव सांगू शकेल का?
fule.jpg

रोजच्या दैनंदिनीत बाजारहाटाला वेळ असता तर!!!! चॉन्ग पॅन्गच्या वेट मार्केटचे 'सनी वेलकम्'. लाल पालक, हिरवा पालक, दळलेली हळद, चिनी निंबू, ऑस्ट्रेलियन काशीकोहळा, जांभळा ऊस, जांभळी द्राक्षे, चिरलेली ब्रोकुली-गाजर नि गोबी, जुने बटाटे, कोथिंबीर!!!! तरतरीत बायामाणसे! भरगच्च लोकल बाजार!!!
baajaar.jpg

लक्ष्मीकमळाच्या पाकळ्या आणि पणत्यांची आरास..
deep.jpg

बी, कोकणात ऊस नाहीच पिकत.. गूळ कोल्हापूरचाच.
ती आंबाडीची बोंडे मस्तच. ( ते काय ऊपयोग करतात ?)

मधु, पक्षी आपल्या भाषेत धन्यवाद देताहेत.

मधुरा - ग्रेट, ग्रेट...

बी - पाकळ्यांचा पणत्यांबरोबर सुंदर वापर....

सू कि - कुठली वाण आहे या तांदूळाची ? फोटो पाहून खूपच छान वाटले.

ती आंबाडीची बोंडे मस्तच. ( ते काय ऊपयोग करतात ?) >> दिनेशदा, चिनी लोक शरबत करतात ह्या बोंडांचे सब्जा एकत्रित करुन पितात सोबत संत्र्याची सुकी सालेपण घालतात त्याच पाण्यात.

आज मी जेवण झाल्यानंतर भृंगराज गोळा करायला गेलो. खूप सारा भृंगराज गोळा केला. फोटो काढायला जवळ कॅमेरा नाही. आज रात्री रस काढून डोक्याला लावणार आहे Happy

बी, आधी थोडाच लाव. नवीन आयूर्वेदीक औषध वापरताना, अ‍ॅलर्जी वगैरे नाही ना, ते बघावे.

सगळे फोटो एकदम मस्त.. धान्याचे फोटो पाहुन लहानपणीच्या आठवणी आल्या.

मी खुप लहानपणी खळ्यात (जेथे बैल/रेडे धान्य मळतात, त्या जागेलाही आमच्याकडे खळे म्हणतात). मध्ये एक मजबुत खांब पुरलेला असतो, त्याला बैल बांधुन त्यांना गोल गोल फिरवतात. काही खाऊ नये म्हणुन तोंड बांधलेले असते, बहुतेक चक्कर येऊ नये म्हणुन डोळेही कधीकधी बांधतात. बैलांनी शेण टाकुन धान्य खराब करु नये म्हणुन एकदण सुप घेऊन त्यांच्या मागे असतो.. सुसू केली तर काय करतात देव जाणे, मला तरी कोणी बाटली/बादली घेऊन फिरत असल्याचे आठवत नाही. Happy

सुसू केली तर काय करतात देव जाणे, मला तरी कोणी बाटली/बादली घेऊन फिरत असल्याचे आठवत नाही. >>>> हा हा हा - मेलब्रूकचा "हिस्टरी ऑफ दि वर्ल्ड" कोणी पाह्यलाय का ? त्यात फ्रेंच राज्यक्रांतीची (त्यावेळेसच्या राजा, राणी, उमराव यांची ) खिल्ली उडवताना एक "पिस्सिंग बॉय" प्रकार दाखवला होता -सूसूकरता बादली घेऊन फिरणारा, त्याची आठवण झाली - फार भन्नाट पिक्चर आहे हा.

शशांक मी पाहिलेत ते दोन्ही भाग.. त्या बादलीत " टिप " टाकताना पण दाखवलेय.

हि मळणी करायला जनावरांचेच भक्कम पाय हवेत, माणसाचे पाय त्यासाठी कामाचे नाहीत. भातातून तांदूळ
काढण्यासाठी, मात्र मानवी हात, श्रमत असत. बंगाल मधे हे काम, बायका पायानी करत असत.

मळणी करताना भातातून तांदूळ निघत नाहीत तर भाताच्या लोंब्या/ओंब्यांपासून भातगोटे वेगळे होतात.पूर्वी मग हे भात घिरटीत भरडून अथवा उखळात सडून तूस आणि तांदूळदाणे वेगळे करीत. पाखडून तूस उडवून लावीत आणि तांदूळ साठवून ठेवीत. पाखडायला आणि घोळायला चारपाच बायका बसत. सुपे तांदळांनी भरलेली असली की पाखडताना बद्दाक बद्दाक असा हलका आवाज येई. तेच सुपातले तांदूळ कमी होऊ लागले की सुपात उडून खाली आपटत आणि त्याचा खळ्ळ छन्न्न असा वेगळा मोठा आवाज येई. मग घरातल्या मोठ्या बायका म्हणत, 'चला. सुपे वाजू लागली.पाखडणी संपली वाटतं.'
आता हे सर्व गिरणीत होते. कोंड्याची रास आपोआप वेगळी होऊन मिळते. ती काही जण त्यातून कण्या मिळवण्यासाठी पाखडतात तेव्हढेच .सुपे फक्त गौरीच्या वश्यापुरती आणि देवक ठेवण्यापुरती उरली आहेत.
नाही म्हणायला 'सूप वाजले' या वाक्प्रचारात मात्र अजून त्यांचे अस्तित्व दिसते.

मळणी करताना भातातून तांदूळ निघत नाहीत तर भाताच्या लोंब्या/ओंब्यांपासून भातगोटे वेगळे होतात

येस्स.. गोटे मिळतात. म्हणजे अख्खा भात, वरचे तुस असलेला. मग भिरंडीवर (म्हणजेच घिरटी) दळायचे. नक्की भिरंड म्हणतात का आता आठवत नाही, जवळजवळ तिन फुट व्यासाचे लाकडी जाते असते, उंचीला दोन फुट तरी नक्कीच. जात्याला मोठे दाते असतात. मग यातुन लाल तांदुळ बाहेर पडतो. त्याला व्हायनात सडले (म्हण्जे उखळ) की आपला तांदुळ बाहेर येतो. मग याला दगडी जात्यावर दळायचे की पांढ-या शुभ्र भाकरीसाठी पिठ तय्यार..

मला इतकी हौस होती हे सगळे करायची... Happy माझ्यासाठी पायलीभर धान्य वेगळे ठेवले जायचे आणि मग मी त्याची वाट लावायचे. आता हे बघायलाही मिळणार नहई. गावी भात घेऊन गिरणीवर जातात आणि तांदुळ घरी आणातात.

आता भात कापायला मशिन आलंय इथे मुळशी, मावळात. १ ते १.५ एकर पिक अवघ्या तासाभरात काढून होतो. पण वैरण होत नाही. त्यामुळे आम्ही कातकरी लावूनच हा भात कापला. नंतर ज्या वावरात पेंड्या रचल्यात तिथेच तो झोडला.. नंतर वार्‍यावर & पाठीवरच्या पंख्यानं हवा घालून त्यातलं तर वगेरे वेगळं करून तो ते साळ पोत्यात भरलं. आत्तापर्यंत २७ पोती भरलीयेत.. त्यातून ५० किलो x १७ पोती तर व्हायलाच हवी... आज अजून दोन खाचरांमधे झोडणी चालू आहे. आता हा भात भरडायला मिल मधे नेणार .. फेब्रुवारी मधे.

मशिनची वाट बघत बघत बर्‍याच लोकांच्या खाचरातील भाताच्या ओंब्या लोंबून भात गळायला लागलेत..
माणसं मिळत नाही.. मिळाली तरी उक्तं मागतात आणि कामं करत नाही. पोते बांधून ट्रॅक्टर मधे पोहचवायची बोली आहे तरीही पोत्यांना उचलण्यात आणि ट्रॅक्टर पर्यंत पोहचवण्यात आपलेच कष्ट करावे लागतेय. Sad
मजूरीचा अ‍ॅडव्हान्स ६० % हवा तरच काम करणार.

उस तोडणीच्या बाबतीतही असं अ‍ॅडव्हान्स आधी द्यायचा तो दिल्यावर लोकं पळूनही जातात..
शेतकरी सुखी सुखी म्हणतात खरं पण ज्याची जळते त्यालाच कळते..
चालायचंच.. ह्यावर्षी विहिरीमुळे कोथिंबिर, मिरच्या, वांगी, टोमॅटो, कांदे, घेवडा, शेपू अशी घरी खाण्यापूरती आणि नातेवाईकांमधे वाटण्यापुरती भाजीपाला तरी घावतोय. पुढच्या वर्षी फुलांची शेती करायचा बेत आहे. Happy

वा, सुकी.. आनंद वाटला.
भाताच्या गिरणीत, दोन रबरी धावांच्या मधे चेपून, दाणा बाहेर काढतात, असे बघितले होते,
हे भाताचे तूस, चांगला कोळसा करण्यासाठी वापरतात. आम्ही शाळेत मातीविणा शेती, या कार्यानुभवाच्या
विषयात, हे तूस, जाड रेती ( बांधकामात चाळल्यानंतर वर राहिलेली ) आणि शेणखत वापरून, लागवड करत असू. या मिश्रणात, झाडे चांगली वाढत..

डॉ. कमला सोहोनी म्हणत असत, कि तूसासकट भात दळून त्याच्या भाकर्‍या केल्या, तर त्या पौष्टिक तर होतीलच शिवाय, अन्नात दुप्पट वाढ होईल. यावर त्यांनी प्रयोग केल्याचे मात्र आठवत नाही. पण केले असतीलच, त्याशिवाय त्या असे विधान करणार नाहीत.

तांदळापासून पोहे वगैरे करणे हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ठ आहे. अगदी म्यानमार मधे पण ते केले जातात, त्यापुढच्या थायलंड / लाओस / कंबोडीया मधे मात्र ती प्रथा नाही...

( म्हणजे मला काय म्हणायचेच ते कळले ना, सू की ताईंना म्हणावे, तूम्ही आमच्याच.. या सगळे एक होऊ या. )

दिनेशदा पुर्वी करायचे तश्याच भाकरी.. आजीच्या सांगण्यातून आले होते. भात भरडताना तांदुळ तुकडा होऊन जी कणी उरते ती आज सुद्धा दळून तीच्या भाकरी किंवा मग ती कणी इतर धान्याबरोबर दळून घेतात.

दिनेशदा.. थायलंड / लाओस / कंबोडीयाला आधी कांदापोह्यांचे कार्यक्रम झाले पाहिजेत म्हणजे तिकडे पण पोहे करायला सुरवात करतील. Proud Light 1

भाताच्या तूसाबद्दल मी ऐकले नव्ह्ते.. शेवग्याची झाडे लावताना हा प्रयोग करायला हरकत नाही. जमल्या ह्याबद्दल सविस्तर विपू मधे लिहा.

भाताच्या तुसापासून चांगला कोळसा होतो तसाच तो उसाच्या खुंट्यापासून आणि शेंड्यापासून (चिपाडापासूनही अर्थात. ऊस गाळल्यावर उरते ते चिपाड ना?) होतो. इंधनाचे आकारमान कमीत कमी राखून त्यातून अधिकाधिक ऊर्जा मिळविता यावी या हेतूने ऊस तोडल्यानंतर उरलेल्या भागावर शेतातच प्रक्रिया करून त्याच्या कोळशाच्या चिप्स बनवण्याचे तंत्रज्ञान पुण्यातल्या 'आरती' या संस्थेने व्यावसायिक उपयोगात येऊ शकेल अशा रीतीने विकसित केले आहे. उसाचे अवशिष्ट एक तर जाळून टाकावे लागते किंवा गुर्‍हाळांसाठी आणि बॉयलर्ससाठी इंधन म्हणून वापरायचे असल्यास ते त्या त्या ठिकाणी न्यावे लागते. ही वाहतूक खर्चिक ठरते.शेतातच बनलेल्या चिप्स अधिक उष्णतादायी आणि वाहतूकसुलभ असतात. धूररहित चुलींसाठी हे आदर्श इंधन आहे. 'आरती' ही डॉ.आनंद कर्वे आणि त्यांची मुलगी यांनी स्थापिलेली, वाढवलेली संस्था. त्यांना त्यांच्या अन्य संशोधनासाठी इंग्लंड मधले मानाचे असे अ‍ॅश्डेन अ‍ॅवॉर्ड दोनदा मिळालेले आहे.

धूररहित चुलींसाठी हे आदर्श इंधन आहे. 'आरती' ही डॉ.आनंद कर्वे आणि त्यांची मुलगी यांनी स्थापिलेली, वाढवलेली संस्था. त्यांना त्यांच्या अन्य संशोधनासाठी इंग्लंड मधले मानाचे असे अ‍ॅश्डेन अ‍ॅवॉर्ड दोनदा मिळालेले आहे. >>>> मला वाटतं हे डॉ आनंद कर्वे म्हणजे सुप्रसिद्ध कै. डॉ. इरावतीबाई कर्वे यांचे चिरंजीव.

आणि

डॉ. कमला सोहोनी म्हणत असत, कि तूसासकट भात दळून त्याच्या भाकर्‍या केल्या, तर त्या पौष्टिक तर होतीलच शिवाय, अन्नात दुप्पट वाढ होईल. यावर त्यांनी प्रयोग केल्याचे मात्र आठवत नाही. पण केले असतीलच, त्याशिवाय त्या असे विधान करणार नाहीत.>>> या डॉ सोहोनी म्हणजे कै. दुर्गाबाई भागवतांची बहिणच ना ?

शशांक पुरंदरे, होय तेच ते दिनकर आणि इरावतीबाईंचे सुपुत्र; भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे नातू, गौरी देशपांडे आणि जाई निंमकर यांचे बंधू डॉ. आनंद कर्वे.
aani Dr. Kamalaabaai Sohonee yaa Durgaabaai Bhagavataamchyaa bhagineech.

Pages