निसर्गाच्या गप्पा (भाग ११)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 13 October, 2012 - 04:19

"जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालीले. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारा गाणे गाईल. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटुन घेऊ. या निसर्गाकडे पहा आणि आनंदी रहा.
-सानेगुरूजी (सानेगुरूजींच्या गोड गोष्टी).
जिप्सी यांच्या सौजन्याने.

निसर्गाच्या गप्पांच्या ११ व्या भागाबद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनी नसावीत.. आपल्या महाराष्ट्रात मातीखाली कातळ आहे, म्हणून कि काय माहीत नाही, पण झाडे फार ऊंच वाढत नाहीत. प्रा. घाणेकरांच्या पुस्तकात पण बहुतेक झाडांचे, मोठे अवतार उत्तरेकडे बघितले असा उल्लेख आहे.

आफ्रिकेत प्रदूषणमूक्त वातावरण, नियमित पाऊस यामूळे झाडे भराभर वाढतात. नैरोबीला मी सहाव्या मजल्यावर होतो, आणि आजूबाजूची काही झाडे, मला घरातूनच दिसत. इथे लोक फार कोळसा वापरतात, बांधकामातही लाकूड असते, ( म्हणजे झाडांची तोड होतेच ) तरी झाडे भरपूर आहेत. आमच्याकडचे फर्निचर क्वचितच प्लायवूडचे असते. बहुदा भरीव लाकडाचेच असते ते. नैरोबीत एक फर्निचर बाजार आहे, तिथले सर्व फर्निचर उघड्यावरच, ऊन / पाऊस / थंडी सोसत पडलेले असते. ना ते कूजत ना वाकडे तिकडे होत.

शेतकर्‍याची, शेतीची अवस्था चांगली नाही,पत कमी झाली आहे, ५-१० एकर बागाईत शेती असणार्‍या तरुणाला लग्नाला मुलगी मिळत नाही पण ५-१० हजार पगार असणार्‍याला लगेच मिळते, ५ एकर पेक्षा कमी शेती असणार्‍याला त्यात जिराईत शेती असणार्‍याला तर मुलगी बघायला देखील मिळत नाही हे वास्तव आहे > खरंच दुर्दैवी आहे हे.
भविष्यकाळात ही परिस्थिती नक्की बदलेल.

सातत्याने येउ घातलेली मंदीची चक्रं, क्षणात चढणारे आणि उतरणारे बाजार, अत्यंत तीव्र आणि वाढत जाणारी रहाणीमानातली दरी या सर्वात शाश्वत असलेल्या काही गोष्टींपैकी `अन्नाची गरज' ही एक आहे.

पण हे जेव्हा बदलेलं ; तेव्हा गरीब माणूस हा चांगल्या अन्नापासून वंचित झालेला असेल आणि त्यात शहरी गरीब हा सर्वात आधी Sad .

<<आफ्रिकेत प्रदूषणमूक्त वातावरण, नियमित पाऊस यामूळे झाडे भराभर वाढतात. नैरोबीला मी सहाव्या मजल्यावर होतो, आणि आजूबाजूची काही झाडे, मला घरातूनच दिसत. इथे लोक फार कोळसा वापरतात, बांधकामातही लाकूड असते, ( म्हणजे झाडांची तोड होतेच ) तरी झाडे भरपूर आहेत. आमच्याकडचे फर्निचर क्वचितच प्लायवूडचे असते. बहुदा भरीव लाकडाचेच असते ते. नैरोबीत एक फर्निचर बाजार आहे, तिथले सर्व फर्निचर उघड्यावरच, ऊन / पाऊस / थंडी सोसत पडलेले असते. ना ते कूजत ना वाकडे तिकडे होत.<<

हे भारीय! तिथली लोकसंख्याही कमी असेल म्हणुन प्रदुषणमुक्त वातावरण!

दुर्दैवाने आपल्याकडे टेकड्या फोडण्याने आणि जंगलतोडीने फार नुकसान झालय.
मागे गोंदवल्याला जातांना सातार्‍याच्या अलिकडे दिसणार्या सुंदर टेकड्या फोडतांना बघितलं तेव्हा असच काळजावर घाव घातले गेले. Sad

लोकसंख्या.. हा आता कुणालाच भारतापुढचा प्रश्न वाटत नाही !
अटेंबरो साहेबांचाच एक कार्यक्रम होता, आणखी किती लोकसंख्येचा भार ही पृथ्वी सोसू शकते, यावर त्यांची मते होती.. अगदी नेमक्या आकडेवारीने बोलले आहेत ते. यू ट्यूबवर आहे तो भाग.

अंगोलात, इंद्रधनुष्य नाही दिसले अजून. नायजेरियातही बघितल्याचे आठवत नाही. नैरोबीत मात्र खुपदा दिसायचे.. आणखी एक म्हणजे, सूर्यास्ताच्या वेळी, इथे एक नवल दिसते. अगदी त्याच वेळी, पूर्वेकडेही तशीच लाली पसरलेली असते. म्हणजे पश्चिमेला जसे रंगाचे खेळ चाललेले असतात, तसेच पूर्वेलाही. फक्त सूर्यबिंब नसते. मी हे नवल अनेकांना दाखवतो. सगळ्यांना आश्चर्यच वाटते. भारतात असे बघितल्याचे आठवत नाही. हा प्रकार मी नायजेरियात पण बघितलाय. दोन्ही देश पश्विमेकडे आहेत. दोन्ही देशात वाळवंट आहे, पण अंगोलाच्या पश्चिमेला आणि नायजेरियाच्या दक्षिणेला, समुद्र आहे.

सुप्रभात!!!!

"निसर्गातील वैविध्य, रचनाचातुर्य, रंगाची योजना, हे झाडात, फुलांत दिसते. तसे ते 'बी' मध्येही दिसते. पुननिर्मिती, वाढ, प्रसार, म्हणजे उत्पत्ति, स्थिती, विलय यांतून पुन्हा नवनिर्मिती अशा निसर्ग चक्रांतून निसर्ग वंशसातत्य टिकवत असतो.
----- पंखपरया वनस्पती स्रुष्टीमधील .... उषःप्रभा पागे.... लोकसत्ता, मुंबई व्रुत्तान्त २१ नोव्हेंबर २०१२

लेख छान आहे. वाचनीय आहे. पण सगळी झाडे माहीत नाहीत. गुगलून पहावे लागेल. त्या शिवाय लेख वाचण्याचा आनंद घेता येणार नाही.

कालच मी 'सिंहांच्या देशात' हे पुस्तक वाचलं ; बर्नाड आणि मायकेल ग्रझिमिक हे बापलेक सेरेंगेटी नॅशनल पार्क मधे साधारणत: १९५६ ते १९५९ या काळात काही महिने राहिले.
हाताशी अत्यंत कमी साधनं.जवळजवळ उघड्यावरच (कारण त्यांची झोपडी अगदीच तकलादू पत्र्याची बांधलेली होती) ते राहिले होते. पण त्यांनी जी निरीक्षणं नोंदवली आहेत ती आजही खूप उपयुक्त आहेत. त्यांची धडपड, त्यांचं काम आणि तो थरार ह्या पुस्तकात मांडला आहे.
अगदीच छोटं म्हणजे जेमतेम १०० पानांचं, श्री.व्यंकटेश माडगूळकरांनी संक्षिप्त अनुवादित केलेलं हे पुस्तक खूपच वाचनीय आहे. 'Serengeti Shall Not Dia' हे ते मूळ पुस्तक.
त्यातला मायकेल हा डॉ.बर्नाड ग्रझिमिक यांचा मुलगा ह्या मोहिमेच्या शेवटी सालेई मेडोज मधे अवघ्या २५ व्या वर्षी विमान अपघातात जातो. गोरोंगोरा क्रेटरमधे ते कसे राहिले हे वाचताना अक्षरश: काटा येतो.
व्यंकटेश माडगूळकरांची खूप सुंदर रेखाचित्रं या पुस्तकात आहेत.मिळालं तर जरूर वाचा!
दिनेशदा, तुम्ही हे गोरोंगोरा क्रेटर पाहिलं आहे का? असल्यास त्याची काही माहिती इथे द्या ना.

पंखपरया वनस्पती स्रुष्टीमधील .... उषःप्रभा पागे.... लोकसत्ता, मुंबई व्रुत्तान्त २१ नोव्हेंबर २०१२>>>>हा लेख सुरेख आहे. मला बित्तुने फोन करून आवर्जुन वाच सांगितलेला. Happy

शांकली, मी नाही पाहिले ते क्रेटर. या जागा सिनेमात दिसतात तेवढ्या सुंदर असल्या तरी तिथे जायचा प्रवास खुपच कष्टाचा आहे.
मी नैरोबी पार्कात गेलो होतो त्यावेळी सिंह दिसलाच नव्हता, पण माझा एक मित्र, केनयात ट्रांझिट मधे होता, तेवढ्यात त्याने सफारी केली, तर त्याला दिसला.. केनयातले सिंह, पर्यटकांकडे ढुंकून ( की डरकाळी फोडून ) बघत नाहीत.

त्या लेखाची लिंक मला स्वप्नाने पाठवली होती. पण फोटो नाही त्यात. कौशी चा फोटो मी आणि जिप्स्याने पण इथे टाकला होता. राणीच्या बागेत झाड आहे हे.

कोकणात दिवाळीच्या सुमारास हे तुर्‍याचं रोप सगळीकडे फुललेलं दिसतं. याच्या फुलांची रचना फारच सुंदर आहे. फुलांची रास मांडल्यासारखं दिसतं ह्याच्याकडे बघून......

diveagar nov 2012 186.jpgdiveagar nov 2012 187.jpg

याची पानं मात्र डोंबियाच्या पानांची भाईबंद वाटावीत इतकी सारखी वाटतात.

जिप्सी, लेखाच्या लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद. मस्त आहे लेख. खरंच ह्या सगळ्या बिया पंखपर्‍याच आहेत!! किती समर्पक नाव दिलंय नै!
त्यातली लापतानी (anodendron) ही अगदी कावळीसारखीच दिसतीये बरंका! पानं, त्या शेंगा, फुलं सगळं अगदी कावळीसारखंच! फॅमिली मात्र वेगळी आहे. लापतानीची apocynaceae आणि कावळीची periplocaceae!! ही लापतानीसुद्धा विषारी आहे की नाही हे मात्र बघितलं पाहिजे.

छान गाव आहे दिवेआगार !
या उडणार्‍या बिया गोळा करुन, गच्चीतून खाली टाकायचा छंद होता मला... बालपणीचा नाही, अलिकडचा, नैरोबीचा. ठोसेघर जवळ पण अर्जूनाच्या बिया, धबधब्याकडे भिरकावल्या होत्या. माझ्या सोबतचा मायबोलीकर.. बघतच राहिला माझ्याकडे.

हे काय आहे? दिवेआगरच्या समुद्र किनार्‍यावर दिसलं. एका शंखात हे होतं. आम्ही ते घेऊन खोलीवर आलो. ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांना विचारलं. पण ते सांगू शकले नाहीत. आणि काही वेळाने ते जे काय होतं ना ते चक्क परत त्या शंखात गेलं.. ( हे मत शांकलीचे आहे, माझ्या मतानुसार तो प्राणी त्या शंखात मावणे शक्यच नव्हते - त्याला इतर कुठल्या पक्ष्याने / प्राण्याने पळवले असणार - त्यामुळे नंतर फक्त शंखच दिसत होता - शशांक.)

diveagar nov 2012 244.jpgdiveagar nov 2012 245.jpg

फारच गंमतशीर दिसतेय ते. मृण्मयी धन्यवाद माहितीबद्दल. समुद्राखालचे जीवन बघायला मला खूप आवडते.

जागुचेही आभार मानले पाहीजेतच. निसर्ग जवळुन पाहण्याची संधी ( प्रत्यक्षात नसली तरी इंटरनेटद्वारा) तिच्या मुळे आणी बाकी सहभागी माबोकरांमुळे पण मिळाली.:स्मितः

मृ, तू म्हणतेस तसंच असणार, ते नक्कीच सी अ‍ॅनिमन असणार. मी आत्ताच गुगलून बघितलं. धन्स गं. Happy
मुंबईच्या अ‍ॅक्वेरियममधे म्हणजे तारापोरवालाच नं? जवळजवळ ३० वर्षांपूर्वी मी बघितलं होतं हे अ‍ॅक्वेरियम. खूप मज्जा वाटली होती. पण आता फारसं आठवत नाही त्यावेळी काय काय बघितलं हे.

टुनटुन मी फक्त निमित्त आहे. थिएटरचा दरवाजा उघडणारी. पिक्चर आतल्या कलाकारांमुळे तयार होतो. बाकी सगळ्यांकडे इथे भरपूर ज्ञान आहे.
शांकली मस्त फुले आहेत. आणि तो प्राणी तर कमालच.

टुनटुन मी फक्त निमित्त आहे. थिएटरचा दरवाजा उघडणारी. पिक्चर आतल्या कलाकारांमुळे तयार होतो.>>>>> हा हा हा हा - हे कोणाचे आहे सर्व -
"रानफुलांच्या रान वाटेवर (भाग - ७)"

जागू आज "बाळ विनया" कॅटेगरीत दिस्तेय.....

शांकली
मी पण ही फुलांची रास पाहिली आहे बरेचदा, फारच छान दिसते.

तो शंख भारीच आहे. तो प्राणी आत गेल्यावर फोटो काढला नाही का? आकार केवढा होता त्याचा?
असले काहि जपूनच हाताळायला पाहिजे.

Pages